तुम्ही सेवा करण्यास पात्र आहात का?
“आमची पात्रता देवापासून आहे.”—२ करिंकथर ३:५, न्यू.व.
१. ख्रिस्ती मंडळीत कसल्या प्रकारच्या लोकांना जागा नाही?
यहोवा देव व येशू ख्रिस्त हे कामकरी आहेत. येशूने म्हटलेः “माझा पिता आजपर्यंत काम करीत आहे आणि मीही काम करीत आहे.” (योहान ५:१७) जे काम करीत नाहीत अशांविषयी देव संतुष्ट नाही. याचप्रमाणे जे इतरांवर प्राबल्य करावे या हेतूने जबाबदाऱ्या घेत असतात अशांवरही त्याची कृपादृष्टी राहात नाही. ख्रिस्ती मंडळीत असे आळशी तसेच स्वार्थी महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्यांना जागा नाही.—मत्तय २०:२५-२७; २ थेस्सलनीकाकर ३:१०.
२. ख्रिस्ती मंडळीत जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी पुरुषांची इतकी गरज का आहे?
२ सध्याच्या काळी खऱ्या उपासनेच्या “डोंगरा”कडे आज लोकांच्या झुंडी येत असल्यामुळे यहोवाच्या साक्षीदारांना ‘प्रभूमध्ये करायला खूप काम’ आहे. (१ करिंथकर १५:५८; यशया २:२-४) यामुळेच मंडळीत जबाबदाऱ्या घेण्यासाठी आध्यात्मिकरित्या पात्रता असणाऱ्या पुरुषांची खूप मोठी गरज आहे. अशा माणसांठायी स्वार्थी महत्त्वाकांक्षा नसल्यामुळे ते स्वतःला नव्हे तर यहोवास उंचावतात. (नीतीसूत्रे ८:१३) यांना ठाऊक आहे की, देव जसे ‘नव्या कराराचे सेवक होण्यासाठी पात्र करतो’ तसेच तो यांना मंडळीतील कर्तव्ये पार पाडण्यासाठी पात्र बनवत असतो.—२ करिंथकर ३:४-६.
३. वडील आणि उपाध्य सेवकांच्या मूलभूतपणे जबाबदाऱ्या काय असतात?
३ आरंभीच्या ख्रिस्तीजनात होते त्याचप्रमाणे आजही पुरुषांची मंडळीत वडील व उपाध्य सेवक या नात्याने सेवा करण्यासाठी पवित्र आत्म्याद्वारे तसेच यहोवाच्या संघटनात्मक व्यवस्थेद्वारे नेमणूक करण्यात येते. (प्रे. कृत्ये २०:२८; फिलिप्पैकर १:१; तीत १:५) वडील देवाच्या कळपाचे आध्यात्मिकदृष्ट्या रक्षण करतात व त्याला संरक्षक अशी देखरेख देतात. यांना उपाध्य सेवक साहाय्य देतात, पण यांची कर्तव्ये आध्यात्मिक देखरेखीशी निगडीत नसतात. (१ पेत्र ५:२; पडताळा प्रे. कृत्ये ६:१-६.) सेवा करण्यासाठी आलेल्या देवाच्या पुत्राप्रमाणेच हे नियुक्त करण्यात आलेले बांधव समविश्वासूंची सेवा करण्याची इच्छा बाळगून असतात. (मार्क १०:४५) तुम्ही ख्रिस्ती पुरुष आहात, तर तुम्हाठायी असा आत्मा आहे का?
सर्वसाधारण गुणवत्ता
४. मंडळीच्या जबाबदाऱ्या ज्यांच्यावर सोपवून देण्यात आल्या आहेत अशांविषयीची गुणवत्ता आपल्याला कोठे खासपणे आढळते?
४ मंडळीच्या जबाबदाऱ्या ज्यांना सोपवून देण्यात आल्या आहेत त्यांच्या गुणवत्तेविषयीची माहिती खासपणे प्रेषित पौलाने १ ले तीमथ्य ३:१-१०, १२, १३ आणि तीत १:५-९ मध्ये दिली आहे. वडील व उपाध्य सेवक यांना समाईकपणे लागू होणाऱ्या काही गुणवत्तेसोबत इतर गुणवत्तेचा विचार करताना आम्ही यांजकडे जागतिक दर्जांनुरुप पाहू नये. उलटपक्षी, आम्ही यांना पहिल्या शतकाच्या रचनेत व आज त्या यहोवाच्या लोकांमध्ये लागू होणाऱ्या या दृष्टीने बघावे. या गुणवत्ता साध्य करण्यामध्ये परिपूर्णता अपेक्षिली जात नाही, कारण तसे झाल्यास कोणीही पात्र ठरणार नाही. (१ योहान १:८) पण तेच तुम्ही ख्रिस्ती पुरुष असल्यास, तुम्हावर सध्या मंडळीचा कार्यभाग सोपवण्यात आलेला असो वा नसो, आपल्या व्यक्तीगत परिस्थितीचे परिक्षण का करून पाहू नये?
५. अदूष्य असण्याचा काय अर्थ होतो?
५ अदूष्य; बाहेरील लोकांपासून चांगले नाव असणारा; दोषापासून मुक्त. (१ तीमथ्य ३:२, ७, ८, १०; तीत १:६, ७) उपाध्य सेवक आणि वडील या नात्याने नियुक्त झाल्यावर व सेवा करीत असताना यांनी अदूष्य असले पाहिजे. याचा अर्थ, कशाचाही दोष असू नये आणि चुकीची वागणूक वा शिक्षण यासंबंधाने न्याय्य आरोप करता येईल व वाग्दंड दिला जाईल असे असू नये. “खोटे बंधू” किंवा इतरांकरवी करण्यात आलेले असत्य आरोप कोणाला दूष्य बनवीत नाही. मंडळीत कोणाला सेवा करण्यापासून दूर करावयाचे आहे तर मग, त्याच्यावर करण्यात येणारा दोषारोप पोरकट नसावा; तो शास्त्रवचनीय दर्जाच्या अनुषंगाने सिद्ध होण्यास हवा. (२ करिंथकर ११:२६; १ तीमथ्य ५:१९) ज्याची मंडळीत नियुक्ती झालेली आहे “त्याची निंदा होऊ नये व त्याने सैतानाच्या पाशात सापडू नये म्हणून . . . बाहेरल्या लोकांपासूनही चांगले नाव मिळविलेले असावे.” कोणा पुरुषाने गतकाळात काही गंभीर पाप केले असेल तर त्याच्यावरील दोष पूर्णपणे गेला आहे आणि त्याने स्वतःचे चांगले नाव मिळविल्यावरच त्याची नियुक्ती होऊ शकते.
६. एका स्त्रीचा पती असण्यामध्ये कोणता अर्थ आहे?
६ एका स्त्रीचा पती. (१ तीमथ्य ३:२, १२; तीत १:६) याचा हा अर्थ नाही की, केवळ विवाहीत पुरुषांचीच वडील आणि उपाध्य सेवक या अर्थाने नियुक्ती होऊ शकते. पण विवाहीत आहे तर त्या पुरुषाला जिवंत असलेली एकच पत्नी असली पाहिजे व तो तिच्याशी विश्वासूपणे राहात असला पाहिजे. (इब्रीयांस १३:४) पहिल्या शतकात ख्रिस्तेत्तर होते त्याप्रमाणे त्याला बहुपत्नीकत्व राखता येणार नाही.a
७. (अ) वडील व्हावयाचे आहे तर याला वयाचे बंधन आहे का? (ब) आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवणारा यामध्ये कशाकशाचा समावेश आहे?
७ घरची व्यवस्था चांगली ठेवणारा, मुलाबाळांना स्वाधीन ठेवणारा. (१ तीमथ्य ३:४, ५, १२; तीत १:६) काहींना वाटते की वडील होणाऱ्याचे वय निदान ३० वर्षे असले पाहिजे, पण पवित्र शास्त्र किती कमीत कमी वय असावे याची रुपरेषा देत नाही. तरीही, त्या पुरुषाने आध्यात्मिक अर्थाने वडीलजन या अर्थी वागत असल्याचे दिसले पाहिजे. उपाध्य सेवक तसेच वडील यांनी मुले होण्याच्या वयाएवढे असावयास हवे. विवाहीत आहे तर मग, इतरत्र ईश्वरी मार्गाचे आचरण दाखवीत आहे पण घरी मात्र हुकुमशहा आहे तर तो पात्र ठरू शकत नाही. आपल्या घरची व्यवस्था पवित्र शास्त्रीय तत्त्वांनुरुप ठेवणारा असा आदर त्याने मिळविलेला असला पाहिजे, आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्याची आध्यात्मिक उन्नती साधावी हे त्याचे ध्येय असले पाहिजे. एक सर्वसाधारण नियम या अर्थी, एक वडील जो प्रत्यक्षात बाप आहे त्याला चांगली वागणारी, “विश्वास ठेवणारी” मुले असली पाहिजेत. ती कदाचित देवास समर्पण करण्याची प्रगति करीत असावयास हवीत, किंवा त्यांचा यहोवाचे साक्षीदार या नात्याने बाप्तिस्मा झालेला असला पाहिजे. जो माणूस आपल्या मुलांत विश्वासाची उभारणी करू शकत नाही, तो इतरांमध्ये करू शकेल हे अशक्य वाटते.
८. कोणा कौटुंबिक गृहस्थास वडील होण्याआधी त्याने काय करण्याचे शिकून घेतले पाहिजे?
८ कोणी कौटुंबिक गृहस्थ मंडळीची आध्यात्मिक देखरेख करण्यास पात्र ठरायचा आहे तर प्रथम त्याने आपल्या घरास कसे मार्गदर्शन द्यावे हे शिकून घेतले पाहिजे. ‘ज्याला आपल्या घरची व्यवस्था कशी चांगली ठेवावी हे माहीत नाही तो देवाच्या मंडळीचा संभाळ कसा करील?’ (१ तीमथ्य ३:५) हे खरे, की कोणा विश्वासात असलेल्या पुरुषाला विश्वासात नसलेली बायको असेल व ती त्याचा विरोध करीत असेल. (मत्तय १०:३६; लूक १२:५२) किंवा त्याची इतर मुले आध्यात्मिकरित्या चांगली असतील, पण त्यामध्ये एकजण गंभीर पापात अडकला असेल. तरीही कुटुंबचालकाने, जे करण्याची अपेक्षा त्याच्याकडून केली जाते ते सर्व केले असेल, आणि घरातील इतर सदस्यांच्या बाबतीत त्याने आध्यात्मिक गोष्टींत यशस्वीता मिळविली असेल तर, त्याच्या सुंदर मार्गदर्शनास एका सदस्याने नाकारले आहे म्हणून तो उपाध्य सेवक किंवा वडील बनण्याच्या पात्रतेस अपात्र ठरू शकत नाही.
९. वडील तसेच उपाध्य सेवक यांनी मद्याच्या पेयांसंबंधाने कोणती काळजी बाळगली पाहिजे?
९ मद्यपी किंवा मद्यपानासक्त नसावा. (१ तीमथ्य ३:३, ८; तीत १:७) कोणी उपाध्य सेवक किंवा वडील याने मद्याच्या पेयांचे अतिप्राशन करू नये. मद्याची सवय ही त्याला विचार व भावना यांचा तोल गमाविण्यास आणि मग बेताल होऊन भांडणे करण्यास प्रवृत्त करू शकते. तो ‘अधिक मद्य पिणारा’ नसावा, किंवा मद्याची नेहमीचीच सवय असणारा वा बेवडेबाज अशी त्याची ख्याति नसावी. (नीतीसूत्रे २३:२०, २१, २९-३५) कोणा मेंढपाळकत्वाच्या भेटीत स्वैर वर्तन घडले गेले तर ते किती शोचनीय ठरेल! कोणा बंधूला मद्य घ्यायचे आहे तर ते त्याने सभेला, प्रचारकार्याला जाताना किंवा इतर पवित्र सेवेत सहभागी होताना घेऊ नये.—लेवीय १०:८-११; यहेज्केल ४४:२१.
१०. पैशाचे लोभी तसेच अन्यायाने मिळविलेल्या मिळकतीचे लोभी यांना वडील किंवा उपाध्य सेवक का बनता येत नाही?
१० द्रव्यलोभ न धरणारा, अन्यायाच्या मिळकतीचा पैसा खाणारा नसावा. (१ तीमथ्य ३:३, ८; तीत १:७) धनाचा लोभ धरणारे आध्यात्मिक विनाशात अडकतात आणि “लोभी” लोकांना देवाच्या राज्याचे वतन नाही. (१ करिंथकर ६:९, १०; १ तीमथ्य ६:९, १०) “अन्याय” यासाठी जो मूळ ग्रीक शब्द वापरण्यात आला आहे त्याचा मूलभूत अर्थ “नीच” असा होतो आणि ज्याचे “मिळकत” असे भाषांतर केलेले आहे त्याचा अर्थ कसल्याही प्रकारचा नफा किंवा लाभ असा आहे. (फिलिप्पैकर १:२१; ३:४-८) देवाच्या ‘मेंढरा’स अप्रामाणिकपणे वागविण्याची ज्याची वृत्ती दिसून येत आहे असा माणूस अर्थातच मंडळीच्या जबाबदाऱ्यांना पात्र ठरू शकत नाही. (यहेज्केल ३४:७-१०; प्रे. कृत्ये २०:३३-३५; यहूदा १६) अशा पुरुषाविषयीची शिफारस करताना फार मोठी दक्षता घ्यावी लागेल, कारण एकदा त्याची नियुक्ती करण्यात आली आणि कदाचित मंडळीचा निधी त्याच्याकडे संभाळण्यास दिला तर त्याला त्यामधून देखील काही चोरून घेण्याचा मोह होण्याची शक्यता आहे.—योहान १२:४-६.
११. कोणा “नवशिका” माणसाला मंडळीच्या जबाबदारीसाठी का शिफारस करू नये?
११ नवशिका नसावा; पूर्वी पारख व्हावी. (१ तीमथ्य ३:६, १०) नवीनच बाप्तिस्मा घेतलेल्या व्यक्तीला, नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या विश्वासूपणे पार पाडता येतील हे सिद्ध करण्यासाठी वेळ मिळालेला नसतो. त्याजठायी पिडिलेल्यांसंबंधीची सहानुभूति नसेल किंवा सहउपासकांना मदत देण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्ञानाची जरूरी असेल; तसेच तो इतरांकडेही हलकेपणाने पहात असेल. यास्तव, एखाद्याची उपाध्य सेवक आणि खासपणे वडील या अर्थाने शिफारस करण्याआधी त्या माणसाची “पारख व्हावी” आणि आपणाठायी चांगले तारतम्य तसेच खरेपणा आहे याचा पुरावा दिला पाहिजे. ही पारख किती काळ करावी याविषयी विशिष्ट काळ दिलेला नाही आणि प्रत्येकजण आध्यात्मिक वाढीच्या बाबतीत भिन्न असतो. पण, वडीलांनी एका नव्या माणसाची लगेच शिफारस करू नये, कारण ‘तो मदांध होऊन सैतानाचा दंडात सापडेल ही भीती असते.’ या माणसाने आधी ख्रिस्ती नम्रता प्रदर्शित करावी.—फिलिप्पैकर २:५-८.
उपाध्य सेवक यांजवर एक कटाक्ष
१२. उपाध्य सेवकांसाठी ज्या गरजा प्रस्तुत करण्यात आल्या आहेत त्या केवळ त्यांनीच पूर्ण करायच्या आहेत का?
१२ उपाध्य सेवकांसाठीही काही गरजा देण्यात आल्या आहेत. याच गरजा जर वडीलांनी पूर्ण केल्या नाहीत तर ते सेवा करण्यास पात्र ठरू शकत नाही. एक ख्रिस्ती मनुष्य या नात्याने तुम्ही याबाबतीत लायक आहात का?
१३. गंभीर असणे याचा काय अर्थ होतो?
१३ गंभीर, (१ तीमथ्य ३:८) जो उपाध्य सेवक म्हणून सेवा करण्यास पात्र आहे त्याने आपल्या जबाबदाऱ्यांना हलके समजू नये. त्याने स्वतःला सन्माननीय रितीने सादर करावे की, ज्यामुळे त्याला आदर मिळू शकेल. कधी कधी हसून बोलणे ठीक आहे, पण तो जर सारखाच पोरकटपणा दाखवीत असला तर या पदास पात्र ठरू शकणार नाही.
१४. (अ) दुबोल्ये नसणे म्हणजे काय? (ब) शुद्ध विवेक कशाची हाक देतो?
१४ दुबोल्ये नसावे; शुद्ध विवेक राखणारे असावे. (१ तीमथ्य ३:८, ९) उपाध्य सेवक (तसेच वडील) यांनी खरे असले पाहिजे; चहाड्या करणारे किंवा वक्र नसावे. त्यांनी दुबोल्ये असण्याचे अपेक्षिले नसल्यामुळे त्यांनी एकास दांभिकपणे एक तर दुसऱ्यास याच्या अगदी विरूद्ध कधीच बोलू नये. (नीतीसूत्रे ३:३२; याकोब ३:१७) हे लोक प्रकट करण्यात आलेल्या सत्याचे कट्टर पुरस्कर्ते असावयास हवेत. ते “विश्वासाचे पवित्र गूज शुद्ध विवेकाने राखणारे” असावेत. देवापुढे या माणसाच्या विवेकाने, तो सरळ आहे व कसलीही दुटप्पी प्रथा किंवा भ्रष्टाचार आचरीत नाही ही साक्ष दिली पाहिजे. (रोमकर ९:१; २ करिंथकर १:१२; ४:२; ७:१) जर कोणी सत्यास आणि ईश्वरी तत्त्वांना बिलगून नाही तर देवाच्या कळपाची सेवा करण्याच्या पात्रतेचा ठरत नाही.
वडीलांच्या गुणवत्तेविषयी एक कटाक्ष
१५. आता कोणाच्या गुणवत्तेचे परिक्षण करण्यात येत आहे, व हे खासपणे कशाच्या अनुषंगाने आहे?
१५ काही विशिष्ट गुणवत्ता खासपणे वडीलांसाठी लागू होते व ती त्यांच्या मेंढपाळ व शिक्षक या नात्याच्या कामास अनुलक्षून आहे. तुम्ही ख्रिस्ती मनुष्य या नात्याने या गरजा पूर्ण करीत आहात का?
१६. (अ) सवयीत नेमस्त असण्यासाठी कशाची गरज आहे? (ब) वडीलांना इंद्रिय-दमन कसे राखता येईल?
१६ सवयीत नेमस्त; संयमी. (१ तीमथ्य ३:२; तीत १:८) वडीलाने माफक असले पाहिजे; ते वाईट सवयांच्या आहारी गेलेले नसावेत. ते कोणा परिक्षेला तोंड देत असतील तर त्यांनी स्तोत्रकर्त्यासारखी प्रार्थना करावी म्हणजे देव त्यांना आपला तोल राखण्यास मदत देईल. स्तोत्रकर्त्याने म्हटलेः “माझ्या अंतःकरणावरचे दडपण काढ, माझ्या संकटातून मला सोडीव.” (स्तोत्रसंहिता २५:१७) देखरेख्याने देवाच्या आत्म्यासाठीही प्रार्थना करावी आणि त्याची फलप्राप्ती, ज्यात इंद्रिय-दमन आहे, ते दाखवावे. (लूक ११:१३; गलतीकर ५:२२, २३) आपले विचार, आचार तसेच वक्तव्य यावर नजर ठेवल्यामुळे वडीलांना मंडळीला आध्यात्मिक मार्गदर्शन पुरविताना अतिरेक टाळता येईल.
१७. स्वस्थचित्त असण्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट आहेत?
१७ स्वस्थचित्त. (१ तीमथ्य ३:२) वडीलांनी शहाणे, बुद्धिमान व दूरदर्शी असले पाहिजे. ते आपले भाष्य व कृती यात उद्देशपूर्ण व माफक असावयास हवेत. त्यांची नम्र व समतोल विचारशक्ती ही ईश्वरी ज्ञान व यहोवाच्या वचनाच्या सुशिक्षणास अनुसरून असते. त्यांनी देववचनाचा परिश्रमी अभ्यास करणारे असले पाहिजे.—रामेकर १२:३; तीत २:१.
१८. सुव्यवस्थित असण्याच्या बाबतीत वडीलांकडून कशाची अपेक्षा केली जाते?
१८ सुव्यवस्थित. (१ तीमथ्य ३:२) येथे वापरण्यात आलेल्या ग्रीक शब्दाचे भाषांतर १ तीमथ्य २:९ मध्ये “साजेल असे” करण्यात आले आहे. यामुळेच वडीलांनी आपल्या जीवनाची सुव्यवस्थित साजेल अशी पद्धत राखावी. उदाहरणार्थ, त्यांनी वक्तशीर असले पाहिजे. पहिल्या शतकातील ख्रिस्तीजनांनी हिशोबाविषयीचा मुद्दा प्रमुख धरला नव्हता; आणि आजचे देखरेखे हे देखील कदाचित हुशार जमाखर्च लेखनिक असण्याची शक्यता नाही. या बाबतीत जे काही करायचे आहे त्याची काळजी उपाध्य सेवक घेऊ शकतील. पण “सुव्यवस्थित” बद्दल असणारा ग्रीक शब्द चांगले वागणे असा अर्थ देतो; यामुळेच जर कोणी अनावर किंवा अव्यवस्थित आहे तर तो वडीलपदास पात्र नाही.—१ थेस्सलनीकाकर ५:१४; २ थेस्सलनीकाकर ३:६-१२; तीत १:१०.
१९. अतिथिप्रिय असल्यामुळे वडील काय काय करतात?
१९ अतिथिप्रिय. (१ तीमथ्य ३:२; तीत १:८) वडील “आतिथ्य करण्यात तत्पर” असावेत. (रोमकर १२:१३; इब्रीयांस १३:२) “आतिथ्य” या शब्दासाठी असणारा ग्रीक शब्द “अपरिचितांची आवड” असा शब्दशः अर्थ देतो. या कारणास्तव, अतिथिप्रिय वडील नव्या लोकांचे सभेत स्वागत करतो, भौतिकरित्या समृद्ध असणारे व गरीब यांजविषयी तीच आस्था प्रदर्शित करतो. ख्रिस्ती धर्माच्या आस्थेसाठी काम करणाऱ्यांच्या बाबतीत तो पाहुणचार दाखवितो व “देवाला योग्य दिसेल अशा रितीने” तो त्यांना पाठवतो. (३ योहान ५-८) खरे म्हणजे, वडील खासपणे आपल्या समविश्वासूंच्या गरजेनुरुप, आपली परिस्थिती मुभा देते त्याप्रमाणे अतिथिप्रेम दाखवतात.—याकोब २:१४-१७.
२०. वडीलाने कोणकोणत्या मार्गी शिक्षण देण्यास पात्र असावयास हवे?
२० शिक्षण देण्यास पात्र. (१ तीमथ्य ३:२) कोणा वडीलाची आध्यात्मिक शिक्षक या नात्याची पात्रता ही त्याच्या मानसिक तसेच जगीक ज्ञानामुळे येत नाही. (१ करिंथकर २:१-५, १३) तो “दिलेल्या [किंवा, शैलीच्या] शिक्षणाप्रमाणे जे विश्वसनीय वचन त्याला धरून राहणारा अस[ल्यामुळे]” ती मिळते. हे यासाठी की, “त्याने सुक्षिणाने बोध करावयास व उलट बोलणाऱ्यांस कुंठित करावयास शक्तीमान असावे.” (तीत १:९; पडताळा प्रे. कृत्ये २०:१८-२१, २६, २७.) त्याने “विरोध करणाऱ्यांस सौम्यतेने शिक्षण देणारा” असले पाहिजे. (२ तीमथ्य २:२३-२६) तो मंडळीत जरी उत्तम जाहीर भाषण देणारा नसला तरी देवाच्या वचनाचा असा उत्तम विद्यार्थी असला पाहिजे की, ज्याद्वारे तो विश्वासूजनांना बोध करण्यात व सल्ला देण्यात कुशल असू शकेल. यासाठी त्याने पवित्र शास्त्राचा अभ्यास केला पाहिजे. (२ करिंथकर ११:६) कुटुंबांनी व विशिष्टांनी ईश्वरी जीवनाचे आचरण करता यावे म्हणून त्यांना “सुशिक्षण” देण्यात त्याने कुशल असले पाहिजे.—तीत २:१-१०.
२१. (अ) वडील मारका नसतो असे का म्हणता येते? (ब) “सौम्य” असणे याचा काय अर्थ होतो? (क) भांडखोर नसणारा म्हणजे काय?
२१ मारका नसावा, तर सौम्य; भांडखोर नसावा. (१ तीमथ्य ३:३; तीत १:७) शांतीप्रिय असल्यामुळे वडील कोणास शारीरिक रितीने प्रहार करीत नाहीत किंवा निंद्य तसेच टोचणारे शेरे देऊन त्यांना डोळे वटारून बोलत नाहीत. (पडताळा २ करिंथकर ११:२०.) (आधीच्या विवेचनानुरुप त्यांनी “मद्यपानासक्त” नसावे; म्हणजे त्यांनी मद्याचा अतिरेक टाळावा, जो सहसा भांडणाकडे निरवीत असतो.) “सौम्य” (किंवा, “नमते घेणारा”) म्हणजे अधिकार गाजविणारा, संतुष्ट न होणारा, तसेच क्षुल्लक गोष्टीवर वादंग माजविणारा असा नाही. (१ करिंथकर ९:१२; फिलिप्पैकर ४:५; १ पेत्र २:१८) वडील भांडखोर व मत्सरी नसल्यामुळे ते भांडणे टाळतात व “रागीट” बनत नाहीत.—तीत ३:२; याकोब १:१९, २०.
२२. वडीलाने स्वच्छंदी नसावे याद्वारे काय सूचित होते?
२२ स्वच्छंदी नसावा. (तीत १:७) याचा शब्दशः अर्थ होतो, “स्वतःला संतुष्ट न करणारा.” (पडताळा २ पेत्र २:१०.) वडीलाने हटवादी नसावे; तर त्यांनी आपणाठायीच्या क्षमतेविषयी नम्र दृष्टीकोण घ्यावा. आपण इतरांपेक्षा अधिक चांगल्याप्रकारे हाताळू शकतो हा दृष्टीकोण न धरता तो नम्रपणे इतरांसोबत जबाबदारीची सहभागिता करतो आणि अनेकांच्या सूचनांना महत्त्व देतो.—गणना ११:२६-२९; नीतीसूत्रे ११:१४; रोमकर १२:३, १६.
२३. (अ) “चांगुलपणाची आवड धरणारा” याची तुम्ही कशी व्याख्या द्याल? (ब) नीतीमान असणे म्हणजे काय?
२३ चांगुलपणाची आवड धरणारा, नीतीमान. (तीत १:८) वडीलपदास पात्र ठरण्यासाठी त्याने चांगुलपणाची प्रीती बाळगली पाहिजे व नीतीमान असले पाहिजे. चांगुलपणावर प्रीती करणारा यहोवाच्या दृष्टीने जे चांगले आहे त्यावर प्रीती करतो, दयावंत व मदतगार कामे करतो आणि इतरांनी दाखविलेल्या चांगुलपणाविषयी आवड व्यक्त करतो. (लूक ६:३५; पडताळा प्रे. कृत्ये ९:३६, ३९; १ तीमथ्य ५:९, १०.) नीतीमान असण्याचा अर्थ देवाचे नियम व दर्जे यांना अनुसरणे असा आहे. इतर गोष्टींसमवेत हा माणूस निःपक्षपाती असतो आणि आपल्या मनात नीतीमान, शुद्ध, व सद्गुणी गोष्टी राखतो. (लूक १:६; फिलिप्पैकर ४:८, ९; याकोब २:१-९) चांगुलपणा हा नीतीमानपणापेक्षा भिन्न असल्यामुळे तो न्याय ज्याची मागणी करतो त्याच्याही पुढे जातो; चांगुलपणाची आवड धरणारा त्याच्याबाबतीत ज्या अपेक्षा धरल्या जातात त्यापेक्षाही अधिक इतरांसाठी करीत असतो.—मत्तय २०:४, १३-१५; रोमकर ५:७.
२४. निष्ठावंत असणे कशाला आव्हान करते?
२४ निष्ठावंत. (तीत १:८) ज्याची वडील म्हणून पात्रता ओळखण्यात आली आहे तो देवास आपली अढळ निष्ठा राखतो, व त्याच्या सचोटीची कोणत्याही प्रकारे परिक्षा झाली तरी तो ईश्वरी नियमांना जडून राहतो. यहोवा जे अपेक्षितो तेच तो करतो; यात राज्याचा विश्वासू घोषक या अर्थाने सेवा करणे देखील समाविष्ट आहे.—मत्तय २४:१४; लूक १:७४, ७५; प्रे. कृत्ये ५:२९; १ थेस्सलनीकाकर २:१०.
गुणवत्ता मिळविणे
२५. आत्ताच चर्चिण्यात आलेली गुणविशेषता कोण मिळवू शकतो व त्या कशा मिळवता येतील?
२५ आत्ताच ज्या गुणवत्तेची चर्चा आपण केली आहे ती साधारणपणे यहोवाच्या प्रत्येक साक्षीदाराला लागू आहे व त्या अभ्यास, प्रयत्न, चांगला सहवास व प्रार्थना यांच्या माध्यमाकरवी देवाच्या आशीर्वादाद्वारे मिळवता येऊ शकतात. कोणी काही गुणवत्तेच्या बाबतीत इतरांपेक्षा अधिक बळकट असेल. पण उपाध्य सेवक तसेच वडीलांनी आपल्या विशिष्ट हक्कासाठी या सर्व गरजा माफक प्रमाणात मिळविल्या पाहिजेत.
२६. मंडळीतील जबाबदारींसाठी ख्रिस्ती पुरुष स्वतःला का उपलब्ध करतात?
२६ यहोवाच्या सर्व साक्षीदारांनी देवाच्या सेवेत करता येण्याजोगे सर्व काही करण्याची इच्छा धरली पाहिजे. या आत्म्यामुळेच ख्रिस्ती पुरुषांना मंडळीतील जबाबदाऱ्यांसाठी स्वतःला उपलब्ध करण्याची चालना मिळते. तुम्ही समर्पित व बाप्तिस्मा झालेले पुरुष आहात का? तर प्रयत्न करा व सेवा करण्यास पात्र बनण्याची पराकाष्ठा करा.
[तळटीपा]
a तसेच द वॉचटावर, मार्च १५, १९८३ च्या अंकात पृष्ठ २९ वर “शास्त्रवचनीय घटस्फोट” या शिर्षकाखाली पहा.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
◻ बाप्तिस्मा झालेल्या पुरुषांनी मंडळीतील जबाबदाऱ्या घेण्याची आता इतकी का निकड आहे?
◻ उपाध्य सेवक यांनी ज्या गुणवत्ता मिळवल्या पाहिजेत त्यापैकी काही कोणत्या आहेत?
◻ वडीलांनी कोणत्या गरजा पूर्ण केल्या पाहिजेत?
◻ एखाद्या वडीलाने आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवण्यास का शिकून घेतले पाहिजे?
◻ मंडळीतील जबाबदारींसाठी स्वतःला उपलब्ध करण्यामध्ये ख्रिस्ती पुरुषांना काय चालना देते?
[१६, १७ पानांवरील चित्रं]
वडील तसेच उपाध्य सेवक यांनी आपल्या घरची व्यवस्था पवित्र शास्त्रीय तत्त्वांच्या अनुषंगाने चांगली ठेवावी