वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 ४/१५ पृ. १३-१८
  • देवाकडून शिक्षण प्राप्त झालेल्यांप्रमाणे चाला

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देवाकडून शिक्षण प्राप्त झालेल्यांप्रमाणे चाला
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • शिक्षण दिलेले व फायदा प्राप्त झालेले
  • शिक्षण कौटुंबिक सदस्यांना लाभ पुरविते
  • सकारात्मक शिक्षण
  • विवाहपूर्व लैंगिक संबंधांबद्दल काय?
    तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे
  • आमच्या कठीण काळासाठी साहाय्यकारी शिक्षण
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • लग्नाआधी लैंगिक संबंध ठेवण्यात काय गैर आहे?
    सावध राहा!—२००४
  • पवित्र शास्त्र आणि नवयौवन नैतिकता
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 ४/१५ पृ. १३-१८

देवाकडून शिक्षण प्राप्त झालेल्यांप्रमाणे चाला

“चला आपण परमेश्‍वराच्या [यहोवा, NW] पर्वतावर . . . चढून जाऊ, तो आम्हास आपले मार्ग शिकवो म्हणजे आम्ही त्याच्या पथांनी चालू.”—मीखा ४:२.

१. मीखानुसार, देव त्याच्या लोकांसाठी या शेवटल्या दिवसांमध्ये काय करील?

देवाचा संदेष्टा मीखा याने भाकीत केले की, आमच्या काळातील “शेवटल्या दिवसात,” अनेक लोक देवाची उपासना करण्यासाठी त्याला सक्रियपणे धुंडाळतील. हे लोक एकमेकांना असे म्हणून उत्तेजन देतील की: “चला आपण परमेश्‍वराच्या [यहोवा, NW] पर्वतावर . . . चढून जाऊ, तो आम्हास आपले मार्ग शिकवो म्हणजे आम्ही त्याच्या पथांनी चालू.”—मीखा ४:१, २

२, ३. माणसे धनलोभी होतील असे पौलाने भाकीत केल्याप्रमाणे आज ते कसे पूर्ण होत आहे?

२ आम्हाला, २ तीमथ्य ३:१-५ वचनांचा अभ्यास, ह्‍या “शेवटल्या दिवसात” देवाकडून शिक्षण प्राप्त करण्याचे परिणाम पाहण्यास मदत करील. मागील लेखात, आपण “स्वार्थी” होऊ नका या पौलाच्या इशाऱ्‍याची ज्यांनी नोंद घेतली त्यांना कोणते फायदे मिळाले याविषयीची माहिती घेण्यास सुरवात केली. पौल पुढे असे म्हणतो की आमच्या काळात “माणसे धनलोभी” देखील असतील.

३ आमच्या काळात याचे वर्णन किती समर्पकपणे केले आहे ते समजण्यासाठी आधुनिक इतिहासाच्या विद्यालयातील पदवीची कोणालाही गरज भासत नाही. वित्तदाते आणि व्यापारी महामंडळाच्या मुख्य व्यक्‍ती, प्रत्येक वर्षी मिळणाऱ्‍या करोडो रुपयांनी देखील समाधानी होत नाहीत याबद्दल तुम्ही कधी वाचले नाही का? बेकायदेशीर माध्यमांच्याद्वारे, या धनलोभी लोकांना अधिक हवे असते. पौलाचे शब्द श्रीमंत नसणाऱ्‍या पण लोभी व कधीच तृप्त नसणाऱ्‍या अनेकांना, त्याप्रमाणेच लागू होतात. तुमच्या परिसरातील अशाप्रकारच्या अनेक लोकांना कदाचित तुम्ही ओळखत असाल.

४-६. पवित्र शास्त्र ख्रिश्‍चनांना धनलोभी होण्याचे टाळण्यासाठी कशी मदत करते?

४ पौलाने ज्याचा उल्लेख केला आहे तो मानवी स्वभावाचा टाळता न येणारा केवळ दृष्टिकोन आहे का? पवित्र शास्त्र लेखकाच्या म्हणण्यानुसार नाही, त्याने अनेक वर्षांपूर्वी हे सत्य सांगितले: “द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचे मूळ आहे; त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्‍वासापासून बहकले आहेत; आणि त्यांनी स्वतःस पुष्कळशा खेदांनी भोसकून घेतले आहे.” लक्षात घ्या, देवाने असे म्हटले नाही की, ‘पैसा सर्व वाइटाचे मूळ आहे.’ उलटपक्षी, “द्रव्याचा लोभ” वाईट आहे असे त्याने म्हटले.—१ तीमथ्य ६:१०.

५ चित्तवेधकपणे, पौलाच्या शब्दांची पार्श्‍वभूमी दाखवते की पहिल्या शतकात काही उत्तम ख्रिस्ती सद्य व्यवस्थीकरणात असतानाही श्रीमंत होते, त्यांनी कदाचित धन वारशाने मिळविले असेल किंवा प्रामाणिकपणे काम करण्याद्वारे त्यांनी ते कमवले असेल. (१ तीमथ्य ६:१७) या कारणास्तव, आमची आर्थिक परिस्थिती कोणतीही असली तरी, पवित्र शास्त्र धनाचे लोभी होण्याच्या धोक्याविषयी आम्हाला स्पष्ट आणि सुज्ञतेचा इशारा देते. हा गंभीर आणि सामान्य दोष टाळण्यासाठी पवित्र शास्त्र आम्हाला आणखी काही साहाय्यकारी शिक्षण देते का? होय नक्कीच, जसे की येशूचे डोंगरावरील प्रवचन. त्याचे सुज्ञान जग प्रसिद्ध आहे. येशूने, मत्तय ६:२६-३३ मध्ये काय म्हटले त्याकडे लक्ष द्या.

६ लूक १२:१५-२१ मध्ये नमूद केल्यानुसार, येशू एका श्रीमंत मनुष्याविषयी बोलला, जो अधिक संपत्ती गोळा करण्याचा प्रयत्न करीत होता परंतु अचानक त्याने त्याचे जीवन गमावले. येशूचा कोणता मुद्दा होता? त्याने म्हटले: “संभाळा, सर्व प्रकारच्या लोभापासून दूर राहा; कारण कोणाजवळ पुष्कळ संपत्ती असली तर ती त्याचे जीवन होते असे नाही.” या सल्ल्याबरोबर पवित्र शास्त्र, आळशीपणाचा निषेध करते तसेच, प्रामाणिकपणे काम करण्याच्या मुल्यावर जोर देते. (१ थेस्सलनीकाकर ४:११, १२) काही असे म्हणतील की, हे शिक्षण आमच्या काळासाठी उचित नाही. परंतु ते निश्‍चितच उचित आहे. ते आजही लागू होते.

शिक्षण दिलेले व फायदा प्राप्त झालेले

७. कोणत्या कारणामुळे आम्ही धनसंपत्तीबद्दलचा पवित्र शास्त्राचा सल्ला यशस्वीपणे लागू करू शकतो?

७ अनेक राष्ट्रातील सर्व प्रकारच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमधून आलेल्या पुरूष आणि स्त्रियांनी या ईश्‍वरी तत्त्वाचा अवलंब केल्याची, खऱ्‍या जीवनातील उदाहरणे तुम्हाला दिसतील. याच्या परिणामस्वरुपात त्यांना स्वतःला व त्यांच्या कुटुंबाला फायदा झाला व हे बाहेरचे लोक देखील पाहू शकतात. उदाहरणार्थ, प्रिन्स्टन विश्‍वविद्यालयातील एका मानवशास्त्रज्ञाने समकालीन अमेरिकेतील धार्मिक चळवळी (इंग्रजी) या पुस्तकात लिहिले: “त्यांच्या, [साक्षीदारांच्या] प्रकाशनात आणि मंडळीच्या भाषणात याची आठवण दिली जाते की नवीन मोटार, खर्चिक कपडे किंवा त्यांच्या व्यवसायासाठी अधिक उधळेपणाचे जीवन जगणे यावर त्यांनी अवलंबून राहू नये. त्याचवेळी साक्षीदाराला मात्र दिवसाचे पूर्ण काम मालकाला द्यावयाचे आहे [आणि ते दिलेच पाहिजे] व ते अत्यंत काटेकोरपणे प्रामाणिक हवेत . . . अशा गुणांमुळे जास्त कुशलता नसतानाही एखादा मनुष्य मालकाचा उपयोगी कामगार बनतो, व यामुळे अमेरिकेतील उत्तर फिलाडेल्फिया येथील काही साक्षीदारांना बरीच जबाबदार पदावरील कामे मिळाली आहेत.” स्पष्टतः, ज्या लोकांनी देवाच्या वचनातून येणाऱ्‍या त्याच्या शिक्षणाचा स्वीकार केला आहे ते लोक सद्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी अधिक कठीण बनविणाऱ्‍या प्रवृत्तींविषयी जागृत झाले आहेत. त्यांचा अनुभव हे शाबीत करतो की पवित्र शास्त्राचे शिक्षण, उत्तम, आनंदी जीवनाकडे निरवते.

८. “बढाईखोर,” “गर्विष्ठ” आणि “निंदक” यांची एकमेकांशी सांगड का घालता येते, व ह्‍या तीन संज्ञांचा काय अर्थ होतो?

८ पौलाच्या यादीतील पुढील तीन गोष्टींना आपण जोडू शकतो. शेवटल्या दिवसात, माणसे “बढाईखोर, गर्विष्ठ, निंदक” असतील. हे तीन गुण समान नाहीत, परंतु ते गर्वाशी संबंधीत आहेत. पहिली गोष्ट “बढाईखोर” ही आहे. एक शब्दकोश म्हणतो की, येथे वापरलेल्या मूळ ग्रीक शब्दाचा अर्थ असा होतो: “‘वस्तुस्थिती जे सिद्ध करते त्यापेक्षा आपण अधिक आहोत असे स्वतःच्या बाबतीत समजणारा’ किंवा ‘फाजील आश्‍वासन देणारा.’” याकारणास्तव, काही पवित्र शास्त्रे “बढाईखोर” हा शब्दप्रयोग का वापरतात हे तुम्ही समजू शकता. पुढे “गर्विष्ठ” किंवा अक्षरार्थपणे “वरकरणी-श्रेष्ठ दिसणे” ही गोष्ट येते. शेवटी, “निंदक.” काही असा विचार करतील की देवाविषयी अनादराने बोलणारे निंदक आहेत, परंतु मूलगामी शब्दात अपायकारक, बदनामीकारक किंवा इतर मानवांच्या विरुद्ध अपशब्द बोलणेही यात समाविष्ट आहे. यास्तव, पौल येथे देव आणि मानव यांच्याविरुद्ध निंदा करीत असलेल्यांचा उल्लेख करीत आहे.

९. वाढत जाणाऱ्‍या अपायकारक मनोवृत्तींच्या विरूद्धतेत, पवित्र शास्त्र कोणत्या मनोवृत्त्या वाढविण्याचे उत्तेजन देते?

९ पौलाच्या वर्णनाप्रमाणे वागणूक असणारे सहकर्मी, शाळा सोबती किंवा नातेवाईक या लोकांबरोबर राहत असताना तुम्हाला कसे वाटते? ते तुमचे जीवन सोपे बनवतात का? किंवा ते लोक, आमच्या कठीण काळाचा सामना करण्यासाठी अधिक कठीण करुन तुमचे जीवन बिकट बनवितात? तरी, देवाचे वचन अशा प्रवृत्तीचा त्याग करण्यास आम्हाला शिकवते व १ करिंथकर ४:७; कलस्सैकर ३:१२, १३; आणि इफिसकर ४:२९ या वचनाद्वारे सल्ला पुरविते.

१०. यहोवाच्या लोकांना पवित्र शास्त्रीय शिक्षणाचा स्वीकार केल्यामुळे लाभ होत आहे याला काय दर्शविते?

१० ख्रिस्ती अपरिपूर्ण असतानाही, ह्‍या उत्कृष्ठ शिक्षणाचा अवलंब केल्याने आमच्या कठीण काळाचा सामना करण्यासाठी त्यांना अधिक मदत मिळते. इटलीच्या ला सिव्हिल्टाʹ कॅटोलिका या नियतकालिकेने, यहोवाच्या साक्षीदारांची वाढ का होत आहे त्याचे एक कारण देताना म्हटले की, “गती त्याच्या सदस्यांना एक तंतोतंत आणि भक्कम ओळख देते.” परंतु, “भक्कम ओळख,” लेखकाचा असे बोलण्याचा अर्थ, “बढाईखोर, गर्विष्ठ, निंदक” अशाप्रकारची ओळख असा होतो का? उलटपक्षी, तेच जेसूईट नियतकालिक पुढे सांगते की, गती “त्यांच्या सदस्यांना तंतोतंत आणि भक्कम ओळख देते व त्यांच्यासाठी ही अशी जागा आहे जेथे त्यांचे उत्साहाने, बंधुप्रीतीच्या जाणीवेमुळे आणि ऐक्याने स्वागत केले जाते.” साक्षीदारांना शिकवलेल्या गोष्टी त्यांना मदत करीत आहेत हे उघड नाही का?

शिक्षण कौटुंबिक सदस्यांना लाभ पुरविते

११, १२. अनेक कुटुंबातील परिस्थिती कशाप्रकारे होईल हे पौलाने अगदी अचूकतेने कसे दर्शविले?

११ आम्ही पुढील चार गोष्टींचा गट करु शकतो, ज्यांचा काहीसा परस्पर संबंध आहे. पौलाने पूर्वभाकीत केले की शेवटल्या दिवसात अनेक जन, “आईबापास न मानणारी, उपकार न स्मरणारी, बेईमानी, क्रूर असतील.” [NW] तुम्हाला माहीत आहे की यातील दोन अवगुण—उपकार न स्मरणारी व बेईमान—आमच्या सभोवती आहेत. परंतु पौलाने ते दोन्ही शब्द, “आईबापास न मानणारी” आणि “क्रूर” या दोहोंच्यासोबत का घातले हे आम्ही स्पष्टपणे पाहू शकतो. हे चारही एकत्र गुंफलेले आहेत.

१२ वास्तविकपणे कोणतीही निरीक्षक व्यक्‍ती, तरुण किंवा वयस्कर, पालकांच्या आज्ञा न मानण्याचे प्रमाण वाढत व अधिकच त्रासदायक होत चालले आहे हे कबूल करील. अनेक पालक तक्रार करतात की, तरुणांसाठी जे काही केले जाते त्याबद्दल ते उपकार स्मरत नाहीत. अनेक तरुण त्यांचे विपरीत मत जोरदारपणे मांडतात की, त्यांचे पालक त्यांच्याशी (किंवा सामान्यपणे कुटुंबाला) वास्तविकपणे प्रामाणिक नाहीत; ते त्यांच्या कामात, सुखविलासात किंवा स्वतःमध्ये तल्लीन होतात. यामध्ये कोणाचा दोष आहे हे ठरविण्यापेक्षा, दुःखद परिणामांकडे पाहा. प्रौढ व तरुणांमधील संबंध तुटणे अनेकदा किशोरवयीनांना नैतिकता, किंवा अनैतिकता याविषयी स्वतःचा स्तर बनविण्याकडे निरवते. याचा परिणाम? किशोरवयीनांमधील गर्भधारणा, गर्भपात आणि लैंगिक संक्रमित आजारांचे प्रमाण वाढत आहे. अनेकदा घरात ममतेची उणीव हिंसाचाराकडे निरवते. तुम्ही तुमच्या क्षेत्रातील अनुभव सांगू शकता. ममता नाहीशी होत असल्याचा हा पुरावा आहे.

१३, १४. (अ) पुष्कळ कुटुंबांपुढे अधोगती उभी ठाकली असल्यामुळे, आम्ही आमचे लक्ष पवित्र शास्त्राकडे का दिले पाहिजे? (ब) देव कौटुंबिक जीवनाविषयी कोणत्या प्रकारचा सुज्ञ सल्ला देतो?

१३ त्यांच्या वाढत्या कुटुंबाचे भाग असलेल्या, एकच कुळ, वंश किंवा स्वाभाविक समुदायांविरुद्ध अधिकाधिक लोक आज का उचल घेत आहेत याचे ते स्पष्टीकरण देऊ शकते. तथापि, हे ध्यानात ठेवा की, आम्ही आजच्या जीवनातील नकारात्मक गोष्टींवर जोर देत नाही. आमच्या दोन मुख्य आस्था आहेत: पवित्र शास्त्राचे शिक्षण, पौलाने उद्धृत केल्याप्रमाणे अवगुणामुळे उद्‌भवणारा त्रास सहन करण्याचे टाळण्यासाठी मदत करु शकते का, व पवित्र शास्त्राच्या शिक्षणाचा आमच्या जीवनात अवलंब केल्याने आम्हाला फायदा होईल का? दोन्ही प्रश्‍नांची होय अशी उत्तरे असू शकतात कारण पौलाच्या यादीतील त्या चार मुद्यांच्या बाबतीत हे सत्य आहे.

१४ या दूरगामी विधानाला अनुमती दिली गेली आहे की: हृदयाला प्रेरणा देणारी, यश प्राप्त झालेली कुटुंबे निर्माण करण्यात कोणतेही शिक्षण पवित्र शास्त्राच्या वरचढ ठरत नाही. येथे काही नमूना दिला आहे तो कौटुंबिक सदस्यांना केवळ धोके टाळण्यासाठीच मदत करणार नाही तर यश प्राप्त करण्यासाठी देखील मदत करील. पती, पत्नी आणि मुलांसाठी लिहिलेल्या इतर अनेक सुंदर आणि व्यावहारिक उतारे असले तरी, कलस्सैकर ३:१८-२१ मध्ये याचे उत्तम उदाहरण आहे. हे प्रशिक्षण आजच्या दिवसात व्यावहार्य आहे. हे खरे आहे की, खऱ्‍या ख्रिश्‍चनांच्या कुटुंबामध्ये देखील बिकट परिस्थिती आणि आव्हाने आहेत. तरीही, सर्वकष परिणाम शाबीत करतो की पवित्र शास्त्र, कुटुंबासाठी फार साहाय्यकारी शिक्षण पुरविते.

१५, १६. एका संशोधिकेला, झांबिया येथील यहोवाच्या साक्षीदारांवर संशोधन करत असताना कोणती परिस्थिती आढळून आली?

१५ कॅनडातील लेथब्रिज विश्‍वविद्यालयातील एका संशोधिकेने, झांबियातील सामाजिक जीवनाचा दीड वर्षांसाठी अभ्यास केला. तिने निष्कर्ष काढला: “वैवाहिक ऐक्य स्थिर ठेवण्यासंबंधी यहोवाचे साक्षीदार इतर पंथातील सदस्यांपेक्षा अधिक आनंदाचा अनुभव घेत आहेत. . . . त्यांचे यश, पती पत्नीमधील नातेसंबंधाच्या परिवर्तनाला सूचित करते, आणि ते त्यांच्या नवीन शोध लागलेल्या, भय नसलेल्या, सहकार्याने प्रयत्न करीत असताना, एकदुसऱ्‍यांशी वागण्याबाबतीत देवाला प्रमुख मानण्याची जबाबदारी समजतात. . . . यहोवाच्या साक्षीदारांच्या पतीला, त्याच्या पत्नीच्या आणि मुलांच्या भल्यासाठी जबाबदारी पार पाडण्यामध्ये प्रौढ असण्याचे शिकवले जाते. . . . पती आणि पत्नींना व्यक्‍तिगतरीत्या सत्त्वनिष्ठ असण्याचे उत्तेजन दिले जाते . . . सत्त्वनिष्ठ वैवाहिक बंधनासाठी ही वरचढ मागणी विवाहाला अधिक दृढ बनवते.”

१६ हे संशोधन अनेक खऱ्‍या अनुभवांवर आधारित होते. उदाहरणार्थ, या संशोधिकेने म्हटले की रूढीगत वागणूकीच्या उलट, “यहोवाचे साक्षीदार अनेकदा त्यांच्या पत्नींना केवळ बागेच्या कामात तयारी करण्यासाठीच नाही, तर रोपटी लावण्यात आणि खोदकाम करण्यासाठी देखील मदत करतात.” होय, संपूर्ण जगभरातील अनेक अनुभव दाखवतात की पवित्र शास्त्राचे शिक्षण जीवनावर प्रभाव पाडते हे स्पष्ट दिसते.

१७, १८. वारसाने मिळालेला धर्म आणि विवाहाआधीचा लैंगिक समागम याविषयी एका अभ्यासात कोणते आश्‍चर्यकारक परिणाम दर्शनीय झाले?

१७ मागील लेखाने, धर्माच्या वैज्ञानिक अभ्यासाचे नियतकालिक (इंग्रजी) यातील काही निष्कर्षांचा उल्लेख केला होता. त्यात, १९९१ मध्ये एक लेख आला होता ज्याचे शीर्षक, “वारसाने मिळालेला धर्म आणि विवाहाआधीचा लैंगिक समागम: तरुण व्यक्‍तिच्या राष्ट्रीय नमुन्याचा पुरावा” हे होते. विवाहाआधीचा लैंगिक समागम किती फैलावत चालला आहे हे कदाचित तुम्हा सर्वांच्या परिचयाचे आहे. अनेक जण तरुण वयातच त्या वासनेला बळी पडतात, आणि अनेक किशोरवयीनांना कित्येक लैंगिक सोबती आहेत. पण पवित्र शास्त्राचे शिक्षण या सर्वसामान्य नमुन्याला बदलू शकेल का?

१८ तीन सहकारी प्राध्यापकांनी या विषयाचे अध्ययन केले, त्यांनी ‘रुढमार्गवादी ख्रिश्‍चन सांप्रदायात वाढलेल्या प्रौढ आणि किशोरवयीन तरुणांमध्ये विवाहाआधीच्या लैंगिक समागमाचे प्रमाण कमी असण्याची अपेक्षा धरली होती.’ परंतु वस्तुस्थितींनी काय दाखवले? एकंदरीत, ७० व ८२ टक्क्यांमधील प्रौढ आणि किशोरवयीन तरुणांनी विवाहाआधी लैंगिक समागम केला होता. काहींसाठी, “‘मूलगामी वारशाने विवाहाआधीच्या लैंगिक समागमाच्या शक्यतेला [कमी] केले, परंतु किशोरवयीनामधील विवाहाआधीच्या लैंगिक समागमाचे’ प्रमाण कमी करु शकले नाहीत.” वरकरणी धार्मिक कुटुंबातील काही तरुणांविषयी त्यांनी भाष्य केले की, त्यांची “प्रॉटेस्टंटच्या प्रमुख भागांबरोबर तुलना केल्यास विवाहाआधीच्या लैंगिक समागमाच्या शक्यतेचे प्रमाण त्यांच्यात अधिक आहे.”—तिरपी अक्षरे आमची.

१९, २०. देवाच्या शिक्षणाने यहोवाच्या साक्षीदारांतील अनेक युवकांना कशारीतीने मदत व संरक्षण दिले आहे?

१९ प्राध्यापकांना, यहोवाच्या साक्षीदारांच्या तरुणांच्याबाबतीत हे अगदी त्याच्या उलटच दिसले, “त्यांचा समूह इतरांपासून फार वेगळा होता.” का बरे? “अनुभव, प्रतिक्षा आणि धार्मिक कार्यातील सहभागाद्वारे जबाबदारी आणि सामाजिक एकीकरणाचे स्थर याला कारणीभूत ठरते . . . सामान्यपणे विश्‍वासाच्या तत्त्वांना चिकटून राहण्याचा मोठा दर्जा उत्पन्‍न करतो.” त्यांनी भर टाकली: “किशोरवयीन आणि तरुण साक्षीदार या नात्याने त्यांनी सुवार्तिकाची जबाबदारी पार पाडण्याची त्यांच्याकडून अपेक्षा केली जाते.”

२० यास्तव, पवित्र शास्त्राचे शिक्षण, यहोवाच्या साक्षीदारांना त्यांच्या भल्यासाठी त्यांनी अनैतिकता टाळावी म्हणून मदत करते. याचा परिणाम, लैंगिक संक्रमणापासून झालेले रोग ज्यामध्ये असाध्य व प्राणघातक आजारांपासून संरक्षण मिळण्यात झाला आहे. याचा परिणाम गर्भपात करण्याचा कोणताही दबाव नाही, ज्याविषयी पवित्र शास्त्र शिकवते की ते जीव घेण्याच्या बरोबरीचे आहे. याचा हाही अर्थ होतो की शुद्ध विवेक असलेले प्रौढ, निष्कलंक विवाहात प्रवेश करु शकतात. याद्वारे विवाहांची एका भक्कम पायावर बांधणी होते. ते अशा प्रकारचे शिक्षण आहे जे आम्हाला समस्यांना तोंड देण्यासाठी, सुदृढ राहण्यासाठी व आनंदी राहण्यासाठी मदत करते.

सकारात्मक शिक्षण

२१. पौलाने आमच्या काळासाठी कोणत्या गोष्टी अचूकतेने भाकीत केल्या?

२१ आता पुन्हा २ तीमथ्य ३:३, ४ वचनाकडे वळा, व पौलाने, आमच्या कठीण काळाला तोंड देण्यासाठी सर्वांनाच नव्हे तर अनेकांना कठीण बनवील असे म्हटले त्याची नोंद घ्या: “[मनुष्ये] सहमत न दर्शवणारे, चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्‍वासघातकी, हूड, गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी असतील.” हे किती अचूक आहे! तरीसुद्धा, पवित्र शास्त्रातील शिक्षण आमचे रक्षण करू शकते व त्याचा सामना करण्यासाठी व यश मिळवण्यासाठी आम्हाला तयार करते.

२२, २३. पौलाने त्याची यादी कोणत्या सकारात्मक आर्जवाने समाप्त केली, आणि त्याचे तात्पर्य काय आहे?

२२ प्रेषित पौल त्याच्या यादीची समाप्ती सकारात्मक नोंदीने करतो. तो शेवटल्या मुद्याला ईश्‍वरी आज्ञेमध्ये रुपांतरीत करतो ज्यामुळे आम्हाला अपरिमित फायदा मिळू शकतो. पौल, “सुभक्‍तीचे केवळ बाह्‍यरुप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी;” अशा लोकांविषयी लिहितो व म्हणतो “त्यांच्यापासून दूर राहा.” काही चर्चेसमधील युवकांत विवाहाआधीच्या लैंगिक संबंधाचे प्रमाण सर्वसामान्यापेक्षा अधिक आहे हे आठवा. चर्चला जाणाऱ्‍यांची अनैतिकता केवळ सरासरीच्या पातळीएवढी होती तरी, त्यांचे सुभक्‍तीचे बाह्‍यरुप निर्बळ होते याचा तो पुरावा नाही का? पुढे, धार्मिक शिक्षण; व्यापारात लोक कसे वागतात, हाताखालच्या मनुष्यांसोबत ते कसा व्यवहार करतात, नातेवाईकांना ते कशी वागणूक देतात, याला ते बदलू शकते का?

२३ पौलाचे शब्द दाखवतात की देवाच्या वचनातून आम्ही ज्या गोष्टी शिकतो त्यांचा आम्ही सराव केलाच पाहिजे, ख्रिश्‍चनत्वाचे खरे सामर्थ्य प्रदर्शित करणारी भक्‍ती असली पाहिजे. सुभक्‍तीचे बाह्‍यरुप निर्बळ असणाऱ्‍यांविषयी पौल आम्हाला म्हणतो: “त्यांच्यापासून दूर राहा.” ही स्पष्ट आज्ञा, आम्हाला निश्‍चित फायदे आणणारी आहे.

२४. प्रकटीकरण १८ अध्यायातील आर्जव पौलाच्या सल्ल्याच्या समांतरात कसा आहे?

२४ कोणत्या प्रकारे ही आज्ञा आम्हाला फायदे आणील? पवित्र शास्त्राचे शेवटचे पुस्तक, मोठी बाबेल म्हटलेली लाक्षणिक स्त्री, एका कलावंतीणचे वर्णन देते. पुरावा दाखवतो की मोठी बाबेल हे खोट्या धर्माचे जगव्याप्त साम्राज्य आहे, ज्याला यहोवा देवाने परीक्षण करुन नाकारले आहे. तरीही, यात आमचा समावेश असू नये. प्रकटीकरण १८:४ आम्हाला आर्वजून सांगते की: “माझ्या लोकांनो, तुम्ही तिच्या पापाचे वाटेकरी होऊ नये आणि तुम्हाला तिच्या पीडांतील कोणतीही पीडा होऊ नये म्हणून तिच्यामधून निघा.” पौलाने सुद्धा, “त्यांच्यापासून दूर राहा” या दिलेल्या संदेशासारखाच हा संदेश नाही का? देवाच्या शिक्षणाचा फायदा घेण्याचा दुसरा मार्ग म्हणजे, त्याचे अनुपालन करणे हा होय.

२५, २६. यहोवा देवाकडून येणाऱ्‍या शिक्षणाचा स्वीकार करणाऱ्‍यांसाठी व त्याचे अनुकरण करणाऱ्‍यांसाठी भविष्यात कोणत्या गोष्टी राखून ठेवल्या आहेत?

२५ लवकरच देव मानवी कारभारात थेटपणे हस्तक्षेप करणार आहे. तो सर्वच खोट्या धर्मांचा, व बाकीच्या सद्य दुष्ट व्यवस्थिकरणाचा नाश करील. प्रकटीकरण १९:१, २ दर्शविते त्याप्रमाणे हे खरेच एक आनंदाचे कारण असेल. पृथ्वीवर जे देवाच्या शिक्षणाचा स्वीकार करतात व आचरणात आणतात त्यांना ह्‍या कठीण काळातील अडथळे पार झाल्यानंतर ते शिक्षण आचरीत राहण्यासाठी अनुमती दिली जाईल.—प्रकटीकरण २१:३, ४

२६ त्या पुनर्स्थापित पृथ्वीवरील नंदनवनात राहणे निश्‍चितच, आमच्या कल्पनेच्याही बाहेर आनंददायक असेल. देव अभिवचन देतो की ते आमच्यासाठी शक्य आहे, व आम्ही त्याच्यावर पूर्णपणे भरवसा ठेवू शकतो. यास्तव तो त्याच्या साहाय्यकारी शिक्षणाचा स्वीकार करण्यासाठी व ते आचरणात आणण्यासाठी आम्हाला भरपूर कारण पुरवितो. केव्हा? आता आमच्या कठीण काळात व त्याने अभिवचन दिलेल्या नंदनवनात आम्ही त्याच्या प्रशिक्षणाला अनुसरू या.—मीखा ४:३, ४.

सखोल विचार करण्यासाठी मुद्दे

▫ यहोवाच्या लोकांना धनसंपत्तीबद्दल असलेल्या त्याच्या सल्ल्याचा फायदा कसा झाला आहे?

▫ एक जेसूईट नियतकालिक देवाच्या सेवकांना त्याच्या वचनाचे आचरण केल्यामुळे कोणते चांगले परिणाम होतात त्याविषयी साक्ष देते?

▫ झांबिया येथे केलेल्या एका संशोधनाने, ईश्‍वरी प्रशिक्षणाचा अवलंब केल्यामुळे मिळालेल्या फायद्यांबद्दल काय प्रकट केले?

▫ ईश्‍वरी प्रशिक्षण तरुण लोकांसाठी कोणते संरक्षण पुरवते?

[१५ पानांवरील चौकट]

किती मोठी किंमत!

“किशोरवयीन, एड्‌सच्या प्रचंड धोक्याला सामोरे जात आहेत कारण, त्यांना लैंगिक समागम आणि मादक पदार्थांचा प्रयोग करून पाहायला आवडतो, ते धोक्यात उडी टाकून क्षणभरासाठी जीवन जगू पाहतात, त्यांना वाटते की ते अमर राहणार आहेत आणि म्हणूनच ते अधिकाराला धुडकावतात” असे, एड्‌स आणि किशोरवयीन या विषयावर झालेल्या परिषदेत एका अहवालाने म्हटले.—न्यूयॉर्क डेली न्यूज, रविवार, मार्च ७, १९९३.

“युरोप, आफ्रिका आणि आग्नेय आशियातील संयुक्‍त राष्ट्र संशोधनात असे आढळून आले आहे की, लैंगिकरीत्या सक्रिय असलेल्या कुमारावस्थेतील तरुण मुली, एड्‌स रोगाच्या पुढील ‘अग्रेसर’ म्हणून वर येत आहेत.”—न्यूयॉर्क टाईम्स, शुक्रवार, जुलै ३०, १९९३.

[१६, १७ पानांवरील चित्रं]

पवित्र शास्त्राचे शिक्षण यहोवाच्या साक्षीदारांना  मंडळीमध्ये आणि घरी फायदेकारक ठरते

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा