यशस्वी पालक कसे व्हावे
“यशस्वी पालक होण्यात काय गोवलेले आहे ते मी तुला सांगतो,” असे पाच मुलांचा बाप रेमन्ड म्हणतो. “यासाठी रक्त, मेहनत, अश्रु व घाम यांची गरज आहे.”
रेमन्डची पत्नी पूर्णपणे सहमत दर्शविते, पण ती पुढे म्हणतेः “आज मुलांची वाढ करणे तितके सोपे नाही. पण जेव्हा ती जबाबदार प्रौढ बनत असलेले तुम्हाला पहावयाला मिळते तेव्हा तुमचे परिश्रम कामी लागले असे म्हणता येईल.”
मुलांची वाढ काळजीविना कधीही शक्य झाली नाही. तरीपण आज पुष्कळ पालकांना मुलांचे संगोपन म्हणजे बरेच त्रासल्यासारखे वाटते. “मला वाटते की, आज पालक असणे ही गोष्ट माझ्या वडीलांच्या काळापेक्षा अधिक कठीण झाली आहे; याचे कारण आज जीवन अधिक गुंतागुंतीचे बनले आहे,” असे चाळीस वर्षे वयाची आणि नवयौवनात आलेल्या मुलाची आई एलाईन म्हणते. “केव्हा कडक रहावे आणि केव्हा सैल व्हावे हे बहुधा सुचत नाही.”
यशस्वी पालक असणे म्हणजे काय?
यशस्वी पालक तो आहे जो आपल्या मुलास अशा मार्गी वाढवितो की, ज्यामुळे प्रौढ बनण्यास मुलाला विकासासाठी प्रत्येक संधी मिळते व तो देवाची उपासना तसेच आपल्या सहमानवावरील प्रेम प्रदर्शित करण्यात नेहमी क्रियाशील राहतो. (मत्तय २२:३७-३९) तथापि, खेद हा की सर्वच मुले जबाबदार प्रौढ बनण्याकडे झेप घेत नाही. का बरे? जेव्हा असे घडते तेव्हा तो नेहमीच पालकांचा दोष असतो का?
एका उदाहरणाचा विचार करा. एका इमारत कंत्राटदाराकडे सर्वोत्तम नकाशा व इमारत बांधणीचे साहित्य उपलब्ध आहे. पण तेच या कंत्राटदाराने नकाशाप्रमाणे अनुसरण्याचे नाकारले आणि होता होईल तितक्या आडवळणांचा वापर केला तसेच उत्कृष्ठ साहित्याऐवजी निकृष्ठ स्वरुपाचे साहित्य वापरले तर काय? तर मग, पूर्ण झालेली ती इमारत डळमळीत व धोकादायक असणार नाही का? आता समजा, कंत्राटदार जागरुक आहे व त्याने नकाशाप्रमाणे सर्व गोष्टी हाताळल्या आणि दर्जेदार साहित्य वापरले. तर आता इमारतीच्या मालकावर तिचा योग्यपणे प्रतिपाळ करण्याची जबाबदारी येत नाही का? वापरलेले दर्जेदार साहित्य काढून टाकून त्याऐवजी निकृष्ठ साहित्याची बदली न करण्याची त्याची जबाबदारी राहात नाही का?
पालक देखील, अलंकारिकरित्या एका बांधणीकामात सहभागी आहेत. आपल्या मुलांत चांगले व्यक्तीमत्व असावे अशीच त्यांची इच्छा असते. याकरता पवित्र शास्त्र सर्वोत्कृष्ठ नकाशा पुरविते. “सोने, रुपे, मोलवान पाषाण” अशा दर्जेदार साहित्याची जोड पवित्र शास्त्रात भक्कम विश्वास, ईश्वरी सूज्ञता, आध्यात्मिक सूक्ष्मदृष्टी, निष्ठावंतपणा अणि सर्वसमर्थ देव व त्याचे नियम याविषयी प्रेमळ रसिकता यांच्यासोबत करण्यात आली आहे.—१ करिंथकर ३:१०-१३; पडताळा स्तोत्रसंहिता १९:७-११; नीतीसूत्रे २:१-६; १ पेत्र १:६, ७.
मूल देखील, ते वाढत जाते तसतसे त्याच्यावर स्वतःमध्ये खरे सरळ व्यक्तीमत्व उभारण्याची जबाबदारी येते. त्यानेही देवाच्या वचनात असणारा तोच नकाशा अनुसरला पाहिजे आणि त्याच्या पालकाने आरंभाला जे दर्जेदार साहित्य त्याच्यासाठी वापरले तेच स्वखुशीने वापरले पाहिजे. मोठा झाल्यावर मुलाने हे करण्याचे नाकारले आणि तोपर्यंत उभारण्यात आलेले सुंदर काम तोडून टाकले तर येणाऱ्या आपत्तीबद्दल तोच जबाबदार असेल.—अनुवाद ३२:५.
ते का कठीण आहे?
यशस्वी पालक असणे हे कमीत कमी दोन कारणास्तव कठीण आहे. पहिली गोष्ट ही की, पालक व मुले दोघेही अपूर्ण असून त्यांच्या हातून चुका होतात. यालाच पवित्र शास्त्र पाप करणे असे म्हणते आणि ही पापी प्रवृत्ती अनुवंशिकपणे लाभली आहे.—रोमकरांस ५:१२.
दुसरे कारण हे आहेः वाढत्या मुलांवर पालकांपेक्षा अधिक गोष्टींचा प्रभाव येत असतो. तो वसाहतीस आहे त्या समाजाचा, मुलाची मूल्ये व जीवनाचा दृष्टीकोन यावर प्रभाव पडत असतो. याच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास पौलाचा आमच्या दिवसाबाबतचा भविष्यवाद पालकांच्या चिंतेची बाब आहेः “तुम्ही या वस्तुस्थितीला तोंड दिले पाहिजे की, या जगाच्या समाप्तीच्या काळात कठीण परिस्थिती येईल. माणसे केवळ धन व स्वतःवर प्रेम करणारे होतील. ते उद्धट, बढाईखोर व शिवीगाळ करणारे पालकांविषयी आदर नसणारे, उपकारांची जाण न ठेवणारे, धर्महीन, ममताहीन, शांतताद्वेषी, चहाडखोर, असंयमी, क्रुर, चांगल्यावर प्रेम न करणारी, हूड, मदांध, स्वाभिमानाने फुगलेली अशी होतील. ती देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी, सुभक्तीचे केवळ ढोंग दाखवून तिचे आचरण न करणारी होतील. असल्या माणसांपासून तुम्ही दूर रहा.” (तिरप्या वळणाचा प्रकार आमचा.)—२ तीमथ्य ३:१-५, न्यू इंग्लिश बायबल.
सध्याच्या समाजाची गुंफण हे दोषी धाग्याने झालेले आहे हे दिसत असता काही पालक आपल्या डोक्याला हात लावून मुलांचे संगोपन करण्याचे सोडून देतात हे बघणे काही नवलाईचे वाटते का? मागे वळून १९१४ या वर्षाकडे बघा. त्या दुर्भागी वर्षाने समाजात मूलभूत बदल घडत असल्याचे बघितले आणि तेव्हापासून अधिक चांगले असे काही होऊ शकले नाही. तेव्हापासून दोन जागतिक युद्धांनी पृथ्वीची शांती पार हिरावून घेतली आहे. समाज मुलांना जबाबदार प्रौढ असे तयार करण्यास जरुरीच्या नैतिक मूल्यांमध्ये शून्यवत आहे. वस्तुस्थिती ही आहे की, मुलांना चांगली नीतीमूल्ये शिकविण्याची सदिच्छा राखणाऱ्या पालकांनाच प्रतिकूल सामाजिक वातावरणास तोंड द्यावे लागते.
अशाप्रकारे पालकांच्या वाट्याला सहाय्यक गोष्टी खूपच कमी आहेत. गत काळात सार्वजनिक शाळा, पालकांनी आपल्या घरात जतन केलेली आणि मुलांवर बिंबविलेली नैतिक मूल्ये जोपासत राहण्याची मदत देत राहतील असा पालकांचा विश्वास होता. पण आता तो राहिला नाही.
“युवकावरील आत्ताचे दबाव भिन्न आहेत,” असे १९६० मध्ये माध्यमिक शाळेचे शिक्षण पूर्ण केलेल्या शर्लेने म्हटले. “मी माध्यमिक शाळेत होते तेव्हा मादक औषधे व मुक्त लिंगाचार हे काही नव्हते. ३० वर्षांआधी सिगारेटचा चोरुन एखादा झुरका मारणे हे देखील वाईट मानले जात होते. पण जेव्हा माझी थोरली मुलगी १९७७-१९८१ दरम्यान माध्यमिक शाळेत होती तेव्हा मादक औषधांचा वापर ही महाभयंकर समस्या बनली होती. आता ही मादक औषधे प्राथमिक शाळांतदेखील पसरली आहेत. माझ्या १३ वर्षांच्या धाकट्या मुलीला गेल्या दोन वर्षांपासून मादक औषधांच्या दबावाला दररोज तोंड द्यावे लागत आहे.”
पूर्वी, आजोबाआजी, नातलग व शेजारी “जॉनी”च्या वागणूकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पालकांच्या मदतीला धावून येत. पण आता सारे काही बदलले आहे. शिवाय हे सांगणे खेदाचे वाटते की, पुष्कळ अधिकाधिक कुटुंबात नवरा-बायकोत ऐक्य राहिलेले नाही; मुलांचे संगोपन करण्याची संपूर्ण जबाबदारी एकाच पालकावर येऊन पडते.
पालकांना यश देणारा नकाशा
मुलांचे संगोपन करणे आज कठीण असले तरी पालकांनी काळाने परिक्षिलेल्या साधनाचा—पवित्र शास्त्राचा—अवलंब स्वतःसाठी केला तर त्यांना यशस्वी होता येईल. पालकत्वाच्या बाबतीत देवाचे वचन तुम्हासाठी नकाशा किंवा हालचालीचे कार्यक्रम पत्रक ठरु शकते. जसे सूज्ञ कंत्राटदार इमारतीचे बांधकाम यशस्वीपणे पूर्ण होण्यासाठी बांधकामाच्या मार्गदर्शनार्थ नकाशाचा चांगला उपयोग करतो, त्याप्रमाणे तुम्हीही पवित्र शास्त्राचा, मुलांना जबाबदार प्रौढ बनविण्यात तुमचा मार्गदर्शक या अर्थी उपयोग करु शकता. हे खरे की, पवित्र शास्त्र, यशस्वी पालक बनण्यासाठी असणाऱ्या आवश्यक मार्गदर्शिका हाच केवळ हेतू राखून लिहिण्यात आलेले नाही; तरीपण यात पालक व मुलांसाठी थेट सूचना पहावयास मिळतील. तसेच ते तत्वांचा गुप्त निधि स्वतःमध्ये सामावून आहे, ज्याचा वापर केल्यास पालक या नात्याने तुम्हास नक्कीच फायदा होणार.—अनुवाद ६:४-९.
उदाहरणार्थ, डाईनचा विचार करा. तिचा १४ वर्षे वयाचा मुलगा एरिक, ती म्हणते की, “फारच ताठ होता; त्याच्यासोबत बोलायला देखील फार कठीण जात असे.” येथेच तिला पवित्र शास्त्रातील ही सूज्ञता सापडलीः “मनुष्याच्या मनातील मसलत [एखाद्याचा उद्देश वा हेतू] खोल पाण्यासारखी असते; तरी समंजस ती बाहेर काढतो.” (नीतीसूत्रे २०:५) काही मुलांत त्याच्या भावना, विचार—त्याचा खरा हेतू—हृदयात, विहीरीतील तळाला असलेल्या पाण्यासारखा दडलेला असतो. एरिक त्याप्रमाणे होता. ते हेतू बाहेर काढण्यासाठी पालकांना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागे. डाईन आठवून सांगते की, “तो शाळेतून घरी येई तेव्हा दुसऱ्या मुलांप्रमाणे शाळेत काय काय गोष्टी घडल्या ते बडबडत नसे. तेव्हा मीच, त्याच्या हृदयात काय आहे ते काढण्यासाठी वेळ दिला. काही वेळेस तर मी एरिकसोबत, तो आपल्या हृदयात काय विचार करत आहे ते काढण्यासाठी तासन्तास खर्च करी.”
पवित्र शास्त्रातील उच्च मूल्ये मार्गदर्शक या अर्थी असण्याचे साधे कारण आहेः यहोवा देव त्याचा संपादक आहे. तसेच तो आमचा निर्माणकर्ता आहे. (प्रकटीकरण ४:११) आमचा स्वभाव त्याला ठाऊक आहे व म्हणूनच ‘आम्हास हितकारक ते शिकविण्यास व ज्या मार्गाने आम्ही जाण्यास हवे त्याने नेण्यास’ तो तयार आहे. हे कोणी पालक आहे किंवा मूल आहे तरी सत्य आहे. (यशया ४८:१७; स्तोत्रसंहिता १०३:१४) चांगले पालक बनण्यासाठी काहींना इतरांपेक्षा अधिक कष्ट करावे लागत असले तरी सर्वजण शास्त्रवचनात रुपरेषीत केलेले मार्गदर्शन अनुसरुन चांगले पालक बनू शकतात.
प्रत्येकास वैयक्तीक स्थरावर वागणूक द्या
मानवाच्या ठरवून दिलेल्या नियमांचे अनुसरण करुन चांगल्या मुलांची निर्मिती करता येत नाही. हे त्याप्रमाणेच खरे आहे की, प्रत्येक प्रौढ “परिपूर्ण” प्रकारचा पालक निपजतोच असे नाही. प्रत्येक मुलास त्याचे व्यक्तीमत्व असते आणि म्हणूनच प्रत्येक मुलासोबत स्वतंत्र व्यवहार राखला गेला पाहिजे. पवित्र शास्त्र देखील याची जाणीव राखते. पालकांनी एका मुलाची दुसऱ्यासोबत असमंजसपणे तुलना करण्याचे टाळावे हे तत्व पवित्र शास्त्रातील पुढील सल्ल्यात अगदी योग्यपणे सुचविण्यात आलेले आहेः “तर प्रत्येकाने आपापल्या कामाची परिक्षा करावी म्हणजे त्याला दुसऱ्यांच्या संबंधाने नव्हे तर केवळ स्वतःसंबंधाने अभिमान बाळगण्यास जागा मिळेल.”—गलतीकर ५:२६; ६:४.
जॉन, या दोन मुले असणाऱ्या वडीलाला हे आढळून आले आहे की वरील शास्त्रवचनीय सल्ल्यामुळे त्याच्या एका मुलाचे दुसऱ्या बाबतचे दृष्टीकोन किंवा कुटुंबाबतचेही दृष्टीकोन समतोल राखले जातात. “मी माझ्या मुलांना इतर कुटुंबाकडे काय आहे वा ते काय करतात याकडे लक्ष देऊ नये असे उत्तेजन देतो,” असे जॉन म्हणतात. “आम्हाला आमच्या कुटुंबाचा स्वतःचा दर्जा आहे व तो राखला जावा असा आमचा कटाक्ष आहे.”
“बाळपणापासून” तालीम द्या
धर्माने यशस्वी पालकत्वाचा भाग केव्हा बनावे? ज्याच्या मुलाने बालवाडीस जाण्यास आरंभ केला आहे तो गेरी म्हणतो की, “तुम्हाला अगदी लवकरात लवकर सुरवात करण्याचे लांबणीवर टाकता येणे शक्य नाही.” गेरीचा विश्वास आहे की, मुलांनी शाळेत जाण्यास सुरवात करण्यापूर्वी त्यांनी स्थानिक ख्रिस्ती मंडळीतील खरे मित्र संपादण्यास हवेत. आणि याच कारणामुळे गेरी व त्याची पत्नी त्यांचा हा मुलगा इवान जन्मला तेव्हापासूनच त्याला सभेला घेऊन येत आहेत. याबाबतीत गेरी हा पवित्र शास्त्रात जिचा प्रशंसापर उल्लेख करण्यात आला आहे त्या तीमथ्याच्या आईचे, युनिके हिचे अनुकरण करीत आहे. तीमथ्याला शास्त्रवचनातील बाळकडू “बाळपणापासून” शिकायला मिळाले होते.—२ तीमथ्य १:५; ३:१५.
तीमथ्याची आई आणि कदाचित त्याची आजी लोईस यांनी, तीमथ्यावर आपल्या व्यक्तीगत कल्पना बाळपणापासून ठसविल्या जात नाहीत याची खात्री केली होती; त्यांना हे ठाऊक होते की, यहोवाचे शिक्षण त्याला तारणासाठी सूज्ञ करण्यास समर्थ होते. ख्रिस्ती प्रेषित पौलाने तीमथ्याला लिहिलेले पत्र म्हणतेः “तू तर ज्या गोष्टी शिकलास व ज्याविषयी तुझी खात्री झाली आहे त्या धरुन राहा. त्या कोणापासून शिकलास हे, आणि बाळपणापासूनच तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे हे तुला ठाऊक आहे; ते ख्रिस्त येशूमधील विश्वासाच्या द्वारे तुला तारणासाठी ज्ञानी करावयाला समर्थ आहे.”—२ तीमथ्य ३:१४, १५.
अशाप्रकारे लोईस व युनिके यांनी तीमथ्याला वचनावर विचार करण्यास व देवाचे लिखित वचन काय म्हणते त्यावर त्याचा विश्वास बसविण्यास मदत केली. याद्वारे, त्याचा विश्वास पूर्णपणे त्याच्या पालकावर मुळावला नाही तर यहोवाच्या वचनाच्या सूज्ञतेवर मुळावला गेला. त्याने, आई व आजी यहोवा देवाचे उपासक होते म्हणून ख्रिस्ती सत्याचा अनुकार केला नाही, तर त्याला जे शिकवण्यात आले ते सत्य आहे याची खात्री पटल्यामुळे त्याने ते केले.
याशिवाय, आपली आई व आजी कोणत्या प्रकारातील व्यक्ती आहेत याचा तीमथ्याने निःसंशये विचार केलाच असेल. त्या खरोखरी आध्यात्मिक व्यक्ती होत्या. त्यांनी स्वार्थापोटी सत्याचा विपर्यास करुन त्याला फसविले नव्हते. शिवाय त्यांनी ढोंगीपणाही व्यक्त केला नव्हता. या कारणास्तव तीमथ्याला जे शिकायला मिळाले त्याविषयी त्याच्या मनात कोणतीही शंका आली नाही. त्याच्या प्रौढावस्थेतील क्रियाशील ख्रिस्ती जीवनाने त्याच्या विश्वासू मातेच्या अंतःकरणाला मोठे समाधान दिले असेल यात मुळीच शंका नाही.
होय, यशस्वी पालकत्व राखणे हे कठीण दिव्य आहे. तरीपण आधी उल्लेखिलेल्या मातेने म्हटले त्याप्रमाणे यशप्राप्तीनंतर “तुमचे परिश्रम कामी लागले असे म्हणता येईल.” प्रेषित योहानाने त्याच्या आध्यात्मिक मुलांविषयी जे म्हटले तेच खासरितीने पालक आपल्या मुलांविषयी म्हणू शकतील की, “माझी मुले सत्यात चालतात हे ऐकून मला आनंद होतो तितका दुसऱ्या कशानेही होत नाही.”—३ योहान ४.
[६ पानावरील चौकट]
इस्राएलातील पालकांनी अनुसरलेला शैक्षणिक कार्यक्रम
पुरातन इस्राएलामध्ये पालकांवर त्यांच्या लहान मुलांना शिक्षण व तालीम देण्याची जबाबदारी होती. ते त्यांच्या मुलांचे प्रशिक्षक व मार्गदर्शक बनत. त्यांच्या या कार्यक्रमापासून आधुनिक पालकांना लाभ होऊ शकतो. इस्राएलातील शैक्षणिक कार्यक्रमाचा याप्रकारे सारांश देता येऊ शकतोः
१. यहोवाचे भय बाळगावे असे शिकविले जात होते.—स्तोत्रसंहिता ३४:११.
२. आईवडीलाविषयीचा आदर आज्ञापिला होता.—निर्गम २०:१२.
३. नियमशास्त्राचे शिक्षण तसेच यहोवाची कार्ये यांचेही बिंबवणे होई.—अनुवाद ६:७-२१.
४. वडीलधाऱ्यांविषयी आदर राखण्याचे जोरदारपणे सांगितले जाई.—लेवीय १९:३२.
५. आज्ञाधारकतेवर जोर दिला जात असे.—नीतीसूत्रे २३:२२-२५.
६. चरितार्थासाठी व्यावहारिक शिक्षणावर भर होता.—मार्क ६:३.
७. लिहिण्याचे व वाचनाचे शिक्षण दिले जाई.—योहान ७:१५.
[५ पानांवरील चित्रं]
पालकत्वासाठी देवाचे वचन नकाशा किंवा कार्यप्रवणाचा कार्यक्रम आहे