वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 ३/१५ पृ. १०-१५
  • यहोवा उद्देश राखणारा देव

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवा उद्देश राखणारा देव
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • उद्देश असलेला देव
  • प्रगतीशीलपणे प्रकटविले
  • ज्ञानप्रसार
  • अनेकांची जाणून घेण्याची इच्छा नाही
  • जगाच्या प्रकाशाला अनुसरा
    टेहळणी बुरूज अभ्यास लेख माहितीपत्रक
  • ज्योती वाहक—कोणत्या उद्देशास्तव?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • “पहा! मी सर्व नवे करतो”
    “पहा! मी सर्व नवे करतो”
  • जगाच्या प्रकाशाला कोण अनुसरत आहे?
    टेहळणी बुरूज अभ्यास लेख माहितीपत्रक
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 ३/१५ पृ. १०-१५

यहोवा उद्देश राखणारा देव

“मी कल्पिले तसे होईलच; मी योजिले तसे घडेलच.”—यशया १४:२४.

१, २. जीवनाच्या उद्देशाबद्दल अनेकजण काय म्हणतात?

“जीवनाचा काय उद्देश आहे?” असे सर्वत्र लोक विचारतात. एका पश्‍चिमी राजकीय पुढाऱ्‍याने म्हटले: “पूर्वीपेक्षा अधिक लोक आज विचार करीत आहेत, ‘आपण कोण आहोत? आमचा काय उद्देश आहे?’” एका वृत्तपत्राने जीवनाचा उद्देश काय आहे याबद्दल, तरूणांचे मत विचारले तेव्हा, ही वैशिष्ट्यपूर्ण उत्तरे मिळाली, जसे की, “तुमच्या मनाप्रमाणे वागणे.” “जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा पूर्णपणे उपभोग घेणे.” “विलासी व बेफाटपणे जीवन जगणे.” “मुले व्हावी, आनंदी व्हावे आणि मग मरून जावे.” अनेकांना वाटले की जीवन इतकेच होते. पृथ्वीवरील जीवनातील दीर्घ पल्ल्याच्या उद्देशाबद्दल कोणीच बोलले नाही.

२ एका कन्फ्युशियन विद्वानाने म्हटले: “जीवनाचा मूलभूत अर्थ आमच्या सामान्य, मानवी अस्तित्वात सापडतो.” या नुसार, लोकांचा जन्म होतच राहील, त्यांना ७० किंवा ८० वर्षांपर्यंत झगडत राहावे लागेल, आणि शेवटी मेल्यावर चिरकालासाठी अस्तित्वविरहीत व्हावे लागेल. उत्क्रांतीवादाच्या एका शास्त्रज्ञाने म्हटले: “आम्ही ‘उच्च’ उत्तराची उत्कंठतेने वाट पाहू—परंतु ते अस्तित्वात नाही.” ह्‍या उत्क्रांतीवाद्यांसाठी, जीवन बचावासाठीची झटापट आहे, ज्याचा शेवट मृत्यू आहे. अशा प्रकारचे तत्त्वज्ञान जीवनाचा आशाहीन दृष्टिकोन सादर करते.

३, ४. पुष्कळ जण जीवनाकडे ज्या दृष्टिने पाहतात त्यावर जागतिक परिस्थितीचा कसा परिणाम होतो?

३ मानवी अस्तित्व इतक्या दुःखाने भरलेले पाहून अनेकांच्या मनात ही शंका येते की जीवनाला उद्देश आहे की नाही. आमच्या समयात, मानवाने औद्योगिकरीत्या व वैज्ञानिकरीत्या इतकी प्रगती केली असली तरी, संपूर्ण जगभरात शेकडो अब्ज लोक आज आजाराने पछाडलेले किंवा अपुऱ्‍या आहारामुळे अस्वस्थ आहेत. या कारणामुळे प्रत्येक वर्षी लाखो मुले दगावत आहेत. याशिवाय, मागील चारशे वर्षांमधील झालेल्या मृत्युच्या प्रमाणापेक्षा या २० व्या शतकात युद्धांमुळे चार पटीने अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. गुन्हे, हिंसा, मादक पदार्थांचा अयोग्य वापर, कौटुंबिक ताटातूट, एड्‌स आणि इतर लैंगिक संसर्गिक आजार—नकारात्मक घटकांची यादी वाढत चालली आहे. जगिक नेत्यांकडे या सर्व समस्यांवर उपाय नाही.

४ या सर्व परिस्थितीच्या संदर्भात अनेक लोक काय विश्‍वास करतात याविषयी एका व्यक्‍तीने असे मत व्यक्‍त केले: “जीवनात काहीच उद्देश नाही. या सर्व वाईट गोष्टी जर घडत आहेत तर जीवन जगणे अर्थहीन होते.” तसेच एका वयस्कर मनुष्याने म्हटले: “मी माझ्या संपूर्ण जीवनात, येथे का आहे, असे मी स्वतःला विचारत आलो आहे. जर काही उद्देश आहे तर, मला एथूनपुढे त्याची पर्वा वाटत नाही.” अशाप्रकारे, देवाने आजपर्यंत दुष्टाईला अनुमती का दिली याचे कारण अनेकांना माहीत नसल्यामुळे, आजची त्रासदायक जागतिक परिस्थिती भवितव्यासाठी कोणतीच खरी आशा न राखण्यासाठी त्यांना कारणीभूत ठरवते.

५. जीवनाच्या उद्देशाविषयीच्या गोंधळात जगाचे धर्म आणखी भर का घालतात?

५ जीवनाच्या उद्देशाविषयी, धार्मिक नेते देखील विभाजित व अनिश्‍चित आहेत. लंडन येथील सेंट. पॉलस्‌ चर्चचे माजी वरिष्ठ अधिकारी म्हणाले: “जीवनाच्या उद्देशाच्या शोधार्थ मी माझे संपूर्ण जीवन घालवले . . . परंतु मी अपयशी झालो.” हे खरे आहे की, मृत्युच्या वेळी चांगले लोक स्वर्गात जातात व दुष्ट लोक नरकाग्नीत अनंतकाळसाठी अशी शिकवण अनेक पाळक देतात. परंतु हा दृष्टिकोन मानवजातीला पृथ्वीवर त्याच्या पीडामय स्थितीतच खचत ठेवतो. स्वर्गामध्ये लोकांनी जीवन जगावे असा देवाचा उद्देश होता तर मग, इतक्या दुःखाचा सामना करत राहण्यापेक्षा, सुरवातीलाच त्यांना देवदूतांसारखे आत्मिक प्राणी म्हणून का बनवले नाही बरे? यास्तव, पृथ्वीवरील जीवनाचा उद्देश किंवा जीवनाला काही उद्देश आहे असा विश्‍वास करण्यास नाकारणे याबाबतचा गोंधळ सर्वसामान्य आहे.

उद्देश असलेला देव

६, ७. सार्वभौम प्रभूसत्ताकाविषयी पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगते?

६ तरीही, इतिहासातील सर्वाधिक खप असलेले पुस्तक, पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की, सृष्टीचा सार्वभौम यहोवा उद्देश राखणारा देव आहे. वास्तविक पाहता, त्याला पृथ्वीवरील मानवजातीकरता दीर्घ पल्ल्याचा, चिरकालिक उद्देश आहे, असे ते आम्हाला दाखवते. जेव्हा यहोवा काही करण्याचे उद्देशितो तेव्हा ते निश्‍चित पूर्ण होते. पेरलेले बीज पालवण्यास पाऊस जसा कारणीभूत ठरतो त्याचप्रमाणे, “माझ्या मुखातून निघणारे वचन होईल; ते माझी इच्छा पूर्ण केल्यावाचून व ज्या कार्याकरता मी ते पाठविले ते केल्यावाचून मजकडे विफल होऊन परत येणार नाही” असे देव म्हणतो. (यशया ५५:१०, ११) यहोवा जे काही पूर्ण करण्याविषयी बोलतो, तेव्हा ‘तेच घडते.’—यशया १४:२४.

७ सर्वसमर्थ देवाने दिलेल्या अभिवचनांची पूर्तता करील असा पूर्ण विश्‍वास आम्ही मानव ठेवू शकतो, कारण देवाला, “खोटे बोलणे अशक्य आहे.” (तीत १:२; इब्रीकरास ६:१८) तो काही तरी करणार असल्याचे आम्हाला सांगतो तेव्हा, ते पूर्ण होईल याची खात्री आम्हाला त्याचा शब्द देते. ते जणू सिद्धिस गेल्यासारखेच आहे. तो घोषणा करतो: “प्राचीन काळापासून घडलेल्या गत गोष्टी स्मरा आणि समजा की, मीच देव आहे, दुसरा कोणी देव नव्हे, मजसमान कोणीच नाही. . . . माझा संकल्प सिद्धिस जाईल, माझा मनोरथ मी पूर्ण करीन.”—यशया ४६:९-११.

८. देवाला प्रामाणिकपणे जाणून घेणाऱ्‍यांना तो सापडू शकेल का?

८ पुढे, “कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्‍चाताप करावा” असे यहोवा इच्छितो. (२ पेत्र ३:९) या कारणास्तव, त्याच्याविषयी कोणीही अजाण असू नये असे त्याला वाटते. अजऱ्‍या नावाच्या एका संदेष्ट्याने म्हटले: “तुम्ही त्याचा [देव] शोध घेतला तर तो तुम्हाला पावेल, पण तुम्ही त्यास सोडाल तर तो तुम्हांस सोडील.” (२ इतिहास १५:१, २, न्यूव) यास्तव, देव आणि त्याच्या उद्देशांविषयी जे प्रामाणिकपणे जाणू इच्छितात त्या सर्वांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला तर ते तसे करू शकतात.

९, १०. (अ) देवाला जाणू इच्छिणाऱ्‍यांसाठी कशाची तरतूद केली आहे? (ब) देवाच्या वचनाचा शोध आम्हाला काय करण्यास मदत करतो?

९ कोठे शोधणार? देवाचा खरोखर शोध करणाऱ्‍यांसाठी त्याने त्याचे वचन, पवित्र शास्त्र पुरविले आहे. विश्‍वाला निर्माण करण्यासाठी ज्या कार्यकारी शक्‍तिचा त्याने वापर केला, त्याच पवित्र आत्म्याकरवी देवाने विश्‍वासू मानवांकडून त्याच्या उद्देशांविषयी आम्हाला जाणून घ्यावयाच्या गोष्टींना लिहून घेतल्या. उदाहरणार्थ, पवित्र शास्त्राच्या भविष्यवाणीविषयी प्रेषित पेत्राने म्हटले: “संदेश मनुष्याच्या इच्छेने कधी आलेला नाही; तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवापासून आलेला संदेश सांगितला आहे.” (२ पेत्र १:२१) त्याचप्रमाणे, प्रेषित पौलाने घोषित केले: “प्रत्येक परमेश्‍वरप्रेरित शास्त्रलेख सद्‌बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीतीशिक्षण, ह्‍याकरिता उपयोगी आहे, ह्‍यासाठी की, देवाचा भक्‍त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा.”—२ तीमथ्य ३:१६, १७; १ थेस्सलनीकाकर २:१३.

१० देवाचे वचन आम्हाला थोड्याच प्रमाणात किंवा अपूरे नव्हे तर, “पूर्ण होऊन चांगल्या कामासाठी सज्ज होण्यास तयार करते” त्याकडे लक्ष द्या. देव कोण आहे, त्याचे उद्देश काय आहेत, आणि तो त्याच्या सेवकांकडून काय अपेक्षितो याविषयी खात्री करून घेण्यासाठी एखाद्या व्यक्‍तिला ते मदत करते. देव ज्या पुस्तकाचा लेखक आहे त्याच पुस्तकातून अशा गोष्टींची अपेक्षा करता येते. त्यामुळे देवाविषयीचे अचूक ज्ञान शोधण्याचा हाच एकमेव उगम आम्हाला मिळू शकतो. (नीतीसूत्रे २:१-५; योहान १७:३) असे केल्याने, आपण ह्‍यापुढे ‘बाळासारखे राहणार नाही, म्हणजे माणसांच्या धूर्तपणाने, भ्रांतीच्या मार्गास नेणाऱ्‍या युक्‍तीने, प्रत्येक शिकवणरूपी वाऱ्‍याने हेलकावणारे व फिरणारे असे होणार नाही.’ (इफिसकर ४:१३, १४) स्तोत्रकर्त्याने याविषयीचा योग्य दृष्टिकोन व्यक्‍त केला: “तुझे [देवाचे] वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे.”—स्तोत्रसंहिता ११९:१०५.

प्रगतीशीलपणे प्रकटविले

११. यहोवाने त्याचा उद्देश मानवजातीला कसा प्रकट केला आहे?

११ मानवी कुटुंबाच्या अगदी सुरवातीपासूनच, ह्‍या पृथ्वी व तिच्यावरील मानवजातीसाठी त्याच्या असलेल्या उद्देशाला यहोवाने प्रकट केले आहे. (उत्पत्ती १:२६-३०) परंतु आमच्या पहिल्या पालकांनी देवाच्या सार्वभौमत्वाला नाकारले, तेव्हा मानवजात आध्यात्मिक अंधकारात व मृत्युच्या छायेखाली आली. (रोमकरास ५:१२) तरीसुद्धा, यहोवाला हे ठाऊक होते की त्याची सेवा करू इच्छिणारे काही जण असतील. यास्तव, अनेक शतकांपासून त्याने त्याच्या विश्‍वासू सेवकांना त्याचा उद्देश प्रगतीशीलपणे प्रकट केला आहे. त्याने ज्यांच्याबरोबर दळणवळण राखले त्यातील काही, हनोख (उत्पत्ती ५:२४; यहूदा १४, १५), नोहा (उत्पत्ती ६:९, १३), अब्राहाम (उत्पत्ती १२:१-३), आणि मोशे (निर्गम ३१:१८; ३४:२७, २८) हे होते. देवाचा संदेष्टा आमोस याने लिहिले: “प्रभू परमेश्‍वर [यहोवा, न्यूव] आपले रहस्य आपले सेवक संदेष्टे यास कळविल्याशिवाय खरोखर काहीच करीत नाही.”—आमोस ३:७; दानीएल २:२७, २८.

१२. देवाच्या उद्देशांवर येशू ख्रिस्ताने अधिक प्रकाश कसा टाकला?

१२ देवाचा पुत्र, येशू ख्रिस्त एदेन बागेतील बंडाळीच्या ४,००० वर्षांनंतर पृथ्वीवर होता तेव्हा, यहोवाच्या उद्देशांविषयीची अगदी सविस्तर माहिती प्रकट केली गेली. हे खासपणे, पृथ्वीवर राज्य करण्यासाठी एका स्वर्गीय राज्याची स्थापना करण्याच्या देवाच्या उद्देशाविषयी होते. (दानीएल २:४४) येशूने, राज्याला त्याच्या शिकवणींचा मुख्य विषय बनवले होते. (मत्तय ४:१७; ६:१०) तो आणि त्याच्या शिष्यांनी अशी शिकवण दिली की त्या राज्यात, पृथ्वी आणि मानवजातीसंबंधाने असलेला देवाचा मूळ उद्देश पूर्ण होईल. पृथ्वीचे रूपांतर, अनंतकाळसाठी जिवंत राहणाऱ्‍या परिपूर्ण मानवांची वस्ती असलेल्या एका नंदनवनामध्ये केले जाईल. (स्तोत्रसंहिता ३७:२९; मत्तय ५:५; लूक २३:४३; २ पेत्र ३:१३; प्रकटीकरण २१:४) शिवाय, देवाने त्यांना चमत्कार करण्याची शक्‍ती देऊन, त्या नवीन राज्यात काय घडेल याची येशू आणि त्याच्या शिष्यांनी प्रात्यक्षिके दाखवली.—मत्तय १०:१, ८; १५:३०, ३१; योहान ११:२५-४४.

१३. मानवजातीसोबत देवाच्या व्यवहाराच्या बाबतीत, सा.यु ३३ च्या पेंटेकॉस्ट दिवशी कोणता बदल घडला?

१३ येशूच्या पुनरुत्थानाच्या ५० दिवसांनंतर, म्हणजे सा.यु. ३३ च्या पेंटेकॉस्ट दिवशी, देवाचा पवित्र आत्मा ख्रिस्ताच्या अनुयायांच्या मंडळीवर ओतला गेला. त्यांनी यहोवाशी करार केलेल्या अविश्‍वासू इस्त्राएलांची जागा घेतली. (मत्तय २१:४३; २७:५१; प्रे. कृत्ये २:१-४) त्या प्रसंगी पवित्र आत्म्याचे ओतणे, या गोष्टीचा पुरावा देत होते की, येथून पुढे, देव त्याच्या उद्देशांना या नव्या प्रतिनिधींद्वारे प्रकट करील. (इफिसकर ३:१०) सा.यु. पहिल्या शतकादरम्यान, ख्रिस्ती मंडळीच्या संघटनात्मक रचनेची स्थापना करण्यात आली.—१ करिंथकर १२:२७-३१; इफिसकर ४:११, १२.

१४. सत्य शोधक खऱ्‍या ख्रिस्ती मंडळीला कसे ओळखू शकतील?

१४ आज, सत्य शोधक, खऱ्‍या ख्रिस्ती मंडळीला देवाचा प्रमुख गुण, प्रीतीच्या सुसंगत आविष्करणामुळे ओळखू शकतात. (१ योहान ४:८, १६) खरोखर, बंधुप्रीती खऱ्‍या ख्रिश्‍चनत्वाचे ओळख चिन्ह आहे. येशूने म्हटले: “तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.” “जशी मी तुम्हांवर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी अशी माझी आज्ञा आहे.” (योहान १३:३५; १५:१२) तसेच येशूने त्याचे ऐकणाऱ्‍यांना आठवण करून दिली: “मी तुम्हांला जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहा.” (योहान १५:१४) यास्तव, प्रीतीच्या नियमानुसार जगणारेच केवळ देवाचे खरे सेवक आहेत. ते त्याविषयी केवळ बोलत नाहीत, कारण “विश्‍वास क्रियावाचून निर्जीव आहे.”—याकोब २:२६.

ज्ञानप्रसार

१५. देवाच्या सेवकांना कशाची खात्री मिळते?

१५ येशूने भाकीत केले की काही काळानंतर, देवाच्या उद्देशांच्या बाबतीत खऱ्‍या ख्रिश्‍चनांची मंडळी अधिकाधिक ज्ञानप्रसारीत होईल. त्याने त्याच्या शिष्यांना अभिवचन दिले की: “ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवील आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हास आठवण करून देईल.” (योहान १४:२६) येशूने असेही म्हटले: “पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुम्हांबरोबर आहे.” (मत्तय २८:२०) अशाप्रकारे, देव आणि त्याच्या उद्देशांविषयीच्या सत्याच्या ज्ञानप्रसाराची देवाच्या सेवकांमध्ये वाढ होत आहे. होय, “धार्मिकांचा मार्ग मध्यान्हापर्यंत उत्तरोत्तर वाढणाऱ्‍या उदयप्रकाशासारखा आहे.”—नीतीसूत्रे ४:१८.

१६. देवाच्या उद्देशांच्या संबंधात आपण कोठे आहोत याविषयी आमचा आध्यात्मिक ज्ञानप्रसार आम्हाला काय सांगतो?

१६ आज, तो आध्यात्मिक प्रकाश पूर्वीपेक्षा अधिक प्रज्वलित झाला आहे, कारण आम्ही अशा काळामध्ये जगत आहोत ज्यामध्ये अनेक पवित्र शास्त्रीय भविष्यवाद पूर्ण होत आहेत किंवा पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. ते आम्हाला, आम्ही ह्‍या दुष्ट व्यवस्थीकरणाच्या “शेवटल्या दिवसात” राहत असल्याचे दाखवतात. हाच तो ‘युगाच्या समाप्तीचा’ काळ आहे; ज्याच्या पाठोपाठ देवाचे नवे जग येईल. (२ तीमथ्य ३:१-५, १३; मत्तय २४:३-१३) दानीएलाने भाकीत केल्याप्रमाणे, देवाचे स्वर्गीय राज्य फार लवकर “सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यांस नष्ट करील व ते सर्वकाळ टिकेल.”—दानीएल २:४४.

१७, १८. कोणत्या महान भविष्यवाण्या आज पूर्ण होत आहेत?

१७ पूर्ण होत असलेल्या भविष्यवाण्यांतील एक भविष्यवाणी मत्तयाचा २४ वा अध्याय १४ व्या वचनात लिखित आहे. तेथे येशूने म्हटले: “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल तेव्हा शेवट होईल.” संपूर्ण पृथ्वीवर त्या राज्याच्या प्रचाराचे कार्य लाखो यहोवाच्या साक्षीदारांद्वारे होत आहे. आणि प्रत्येक वर्षी शेकडो, हजारो जण त्यांना सामील होत आहेत. हे यशया २:२, ३ मध्ये जे म्हटले आहे त्याप्रमाणेच आहे, की ह्‍या दुष्ट जगातील “शेवटल्या दिवसात” सर्व राष्ट्रांतील लोक यहोवाच्या खऱ्‍या उपासनेसाठी येतील, आणि तो त्यांना ‘त्याचे मार्ग शिकवील, आणि ते त्याच्या पथांनी चालतील.’

१८ या नवोदित जनांच्या, यहोवाच्या उपासनेकडे यशयाच्या ६० अध्यायातील ८ वचनात म्हटल्याप्रमाणे “मेघाप्रमाणे” झुंडीच्या झुंडी येत आहेत. २२ वे वचन म्हणते: “जो सर्वात लहान त्याचे सहस्त्र होतील, जो क्षुद्र त्याचे बलाढ्य राष्ट्र होईल; मी परमेश्‍वर [यहोवा, न्यूव] हे योग्य समयी त्वरीत घडवून आणीन.” सध्या तो काळ असल्याचा पुरावा आता दाखवतो. तसेच नव्या जनांना याची खात्री होऊ शकते की, यहोवाच्या साक्षीदारांसोबत संगती राखल्यामुळेच खऱ्‍या ख्रिस्ती मंडळीसोबत त्यांचा संपर्क आला आहे.

१९. यहोवाच्या साक्षीदारांसोबत संगती करणारे नवोदित, खऱ्‍या ख्रिस्ती मंडळीत येत आहेत असे आम्ही का म्हणतो?

१९ असे आपण ठामपणे का म्हणू शकतो? कारण ह्‍या नवोदितांनी तसेच यहोवाच्या संस्थेत आधीच असलेल्या लाखोंनी, त्यांचे जीवन देवाला समर्पित केले आहे व त्याची इच्छा पूर्ण करत आहेत. यामध्ये ईश्‍वरी प्रीतीच्या नियमाच्या सुसंगतीत जीवन जगणे समाविष्ट आहे. याचा एक पुरावा हा आहे की, ह्‍या ख्रिश्‍चनांनी ‘त्यांच्या तरवारी मोडून त्यांचे फाळ केले, आपल्या भाल्यांचे कोयत्ये केले. व ते युद्धकला शिकत नाहीत.’ (यशया २:४) जगभरातील सर्व यहोवाच्या साक्षीदारांनी असे केले आहे, कारण ते प्रीती आचरतात. याचा अर्थ असा होतो की, त्यांना युद्धाची शस्त्रे एकमेकांविरूद्ध किंवा कोणा इतरांविरूद्ध चालवता येणार नाहीत. याबाबतीत ते इतर जगिक धर्मांपासून वेगळे व अतुलनीय आहे. (योहान १३:३४, ३५; १ योहान ३:१०-१२, १५) विभक्‍त राष्ट्रीयवादात ते सामील होऊ शकत नाहीत, कारण ते “पूर्णता करणारे बंधन,” प्रेमाने एकत्र दृढ केलेल्या विश्‍वव्यापी बंधुप्रीतीचे मिळून बनलेले आहेत.—कलस्सैकर ३:१४; मत्तय २३:८; १ योहान ४:२०, २१.

अनेकांची जाणून घेण्याची इच्छा नाही

२०, २१. मानवजातीचा अधिकांश भाग आध्यात्मिक अंधकारात का आहे? (२ करिंथकर ४:४; १ योहान ५:१९)

२० देवाच्या सेवकांमधील आध्यात्मिक प्रकाश प्रज्वलित होत असता, पृथ्वीची उरलेली लोकसंख्या, अधिक आध्यात्मिक अंधारात लोटत आहे. त्यांना यहोवा किंवा त्याच्या उद्देशांविषयी काहीच माहीत नाही. देवाच्या संदेष्ट्याने ह्‍या काळाचे वर्णन असे म्हणून केले: “पाहा, अंधकार पृथ्वीला झाकीत आहे, निबिड काळोख राष्ट्रांस झाकीत आहे.” (यशया ६०:२) हे असे घडत आहे कारण, देवाविषयी शिकण्याची किंवा त्याची मर्जी राखण्याची प्रामाणिक इच्छा देखील लोक दाखवत नाहीत. येशू म्हणाला: “निवाडा हाच आहे की, जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली; कारण त्यांची कृत्ये दुष्ट होती. कारण जो कोणी वाईट कृत्ये करीतो तो प्रकाशाचा द्वेष करीतो आणि आपली कृत्ये उघडकीस येऊ नये म्हणून प्रकाशाकडे येत नाही.”—योहान ३:१९, २०.

२१ अशा प्रकारच्या व्यर्क्‍तिना देवाची इच्छा शोधून काढण्यात खरोखरची आस्था नसते. उलटपक्षी, ते त्यांच्या जीवनाला स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी केंद्रस्थानी ठेवतात. देवाच्या इच्छेचा धिक्कार करून ते स्वतःला धोकेदायक स्थितीत आणतात, कारण त्याचे वचन घोषित करते: “धर्मशास्त्र कानी पडू नये म्हणून जो आपला कान बंद करीतो त्याची प्रार्थना देखील वीट आणणारी आहे.” (नीतीसूत्रे २८:९) त्यांनी निवडलेल्या मार्गाचा परिणाम ते भोगतील. प्रेषित पौलाने लिहिले: “फसू नका; देवाचा उपहास व्हावयाचा नाही; कारण माणूस जे काही पेरितो त्याचेच त्याला पीक मिळेल.”—गलतीकरास ६:७.

२२. देवाला जाणू इच्छिणारा मोठा जनसमूह आज काय करत आहे?

२२ परंतु, असा एक जनसमूह आहे जो देवाची इच्छा जाणून घेऊ इच्छितो, प्रामाणिकपणे त्याचा शोध घेतो, व त्याच्या जवळ जातो, “देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल,” असे याकोब ४:८ म्हणते. अशांविषयी येशू म्हणाला: “जो सत्य आचरितो तो प्रकाशाकडे येतो ह्‍यासाठी की, आपली कृत्ये देवाच्या ठायी केलेली आहेत हे उघड व्हावे.” (योहान ३:२१) शिवाय, प्रकाशाकडे येणाऱ्‍या सर्वांसाठी देवाने किती अद्‌भुत भवितव्य उद्देशिले आहे! आमचा पुढील लेख रोमांचकारी आशेविषयीची चर्चा करेल.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

▫ जीवनाच्या उद्देशाविषयी अनेक जण काय म्हणत आहेत?

▫ उद्देश राखणारा देव म्हणून यहोवा स्वतःला कसे प्रकट करतो?

▫ सा.यु. पहिल्या शतकात कोणता मोठा ज्ञानप्रसार घडला?

▫ आज खरी ख्रिस्ती मंडळी कशी ओळखता येते?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा