-
कोणावर प्रेम केल्याने खरा आनंद मिळतो?टेहळणी बुरूज (अभ्यास)—२०१८ | जानेवारी
-
-
२. देवावर प्रेम न करणारे लोक कोणत्या चुकीच्या गोष्टीवर प्रेम करतात? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.)
२ पण बायबल हेदेखील सांगतं की आपल्या काळात देवावर प्रेम न करणारे लोकही असतील. हे लोक चुकीच्या गोष्टींवर प्रेम करतील आणि हे प्रेम स्वार्थी असेल. प्रेषित पौलने म्हटलं, की शेवटल्या दिवसांत लोक “स्वतःवर प्रेम करणारे, पैशावर प्रेम करणारे” आणि “देवापेक्षा चैनीची आवड” धरणारे असतील. (२ तीम. ३:१-४) स्वतःच्या इच्छांवर प्रेम करणं, देवावर प्रेम करण्याच्या अगदी विरुद्ध आहे. स्वतःची स्वार्थी ध्येयं पूर्ण करण्यामागे लागल्यामुळे एका व्यक्तीला वाटू शकतं की ती आनंदी होईल. पण असं केल्यामुळे ती कधीच आनंदी होऊ शकत नाही. याऐवजी अशा मनोवृत्तीमुळे लोक स्वार्थी होतात आणि त्याचा इतरांवर विपरीत परिणाम होतो.
-
-
कोणावर प्रेम केल्याने खरा आनंद मिळतो?टेहळणी बुरूज (अभ्यास)—२०१८ | जानेवारी
-
-
देवावर प्रेम करणारे की स्वतःवर?
४. स्वतःवर काही प्रमाणात प्रेम करणं चुकीचं नाही असं का म्हणता येईल?
४ पौलने म्हटलं की लोक “स्वतःवर प्रेम करणारे” बनतील. पण याचा असा अर्थ होतो का, की स्वतःवर प्रेम करणं चुकीचं आहे? नाही, उलट स्वतःवर प्रेम करणं हे अगदी स्वाभाविक आणि गरजेचं आहे. यहोवाने आपली रचनाच तशी केली आहे. येशूने म्हटलं: “तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखंच प्रेम कर.” (मार्क १२:३१) खरंतर स्वतःवर प्रेम केल्याशिवाय आपण इतरांवर प्रेम करूच शकत नाही. बायबलमध्ये असंदेखील सांगितलं आहे की “पती जसे स्वतःच्या शरीरावर प्रेम करतात तसेच त्यांनी आपल्या पत्नीवरही प्रेम करावे. जो मनुष्य आपल्या पत्नीवर प्रेम करतो तो स्वतःवर प्रेम करतो; कारण कोणताही मनुष्य स्वतःच्या शरीराचा द्वेष करत नाही; उलट, तो त्याचे पालनपोषण करतो.” (इफिस. ५:२८, २९) या वचनांवरून हे स्पष्टच आहे की स्वतःवर काही प्रमाणात प्रेम करणं चुकीचं नाही.
५. स्वतःवर खूप प्रेम करणारी व्यक्ती कशी असते?
५ पण २ तीमथ्य ३:२ मध्ये ज्या प्रेमाबद्दल सांगितलं आहे ते प्रेम स्वाभाविक आणि योग्य नाही. ते खरंतर स्वार्थी आहे. एक व्यक्ती जेव्हा स्वतःवर खूप प्रेम करते, तेव्हा ती स्वतःबद्दल गरजेपेक्षा जास्त विचार करत असते. (रोमकर १२:३ वाचा.) तिला इतरांची मुळीच काळजी नसते, तर ती फक्त स्वतःचाच विचार करते. काही चूक झाली तर जबाबदारी स्वीकारण्याऐवजी अशी व्यक्ती सहसा इतरांना दोष देते. अशी व्यक्ती कधीच आनंदी नसते.
६. देवावर प्रेम केल्यामुळे कोणते फायदे होतात?
६ बायबलचे काही विद्वान असं म्हणतात, की या वचनात पौलने स्वतःवर प्रेम करण्याचा उल्लेख आधी केला कारण त्यामुळे वाईट गुण उत्पन्न होतात. या वाईट गुणांचा त्याने वचनात पुढे उल्लेख केला. याच्या अगदी उलट देव आपल्याकडून अपेक्षा करतो त्या प्रेमामुळे आपल्यात चांगले गुण उत्पन्न होतात. या प्रेमात आनंद, शांती, सहनशीलता, दयाळूपणा, चांगुलपणा, विश्वास, सौम्यता आणि आत्मसंयम हे गुण समाविष्ट आहेत. (गलती. ५:२२, २३) स्तोत्रकर्त्याने म्हटलं: “ज्या लोकांचा देव परमेश्वर [यहोवा, NW] आहे ते धन्य!” (स्तो. १४४:१५) यहोवा हा आनंदी देव आहे आणि त्याची उपासना करणारे लोकही आनंदी असतात. आज बरेच लोक स्वतःवरच खूप जास्त प्रेम करतात आणि स्वतःचाच विचार करतात. पण त्यांच्या तुलनेत यहोवाचे उपासक आनंदी आहेत कारण ते नेहमी इतरांना मदत करतात.—प्रे. कार्ये २०:३५.
स्वतःवर प्रेम करण्याचं आपण कसं टाळू शकतो? (परिच्छेद ७ पाहा)
७. देवावर आपण किती प्रेम करतो याचं परीक्षण करण्यासाठी कोणते प्रश्न आपल्याला मदत करतील?
७ आपलं देवावर जास्त प्रेम आहे की स्वतःवर, हे आपण कसं ओळखू शकतो? बायबलमध्ये दिलेल्या सल्ल्याकडे लक्ष द्या: “भांडखोर वृत्तीने किंवा अहंकाराने कोणतीही गोष्ट करू नका, तर नम्रतेने इतरांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ समजा, आणि फक्त स्वतःच्याच फायद्याचा विचार करू नका, तर इतरांच्या फायद्याचाही विचार करा.” (फिलिप्पै. २:३, ४) आपण स्वतःला पुढील प्रश्न विचारू शकतो: ‘मी हा सल्ला लागू करत आहे का? यहोवा माझ्याकडून अपेक्षा करतो ते करण्याचा मी प्रयत्न करत आहे का? मंडळीमध्ये आणि प्रचारकार्यात इतरांना मदत करण्यासाठी मी संधी शोधतो का?’ आपल्या वेळेचा आणि शक्तीचा वापर, इतरांना मदत करण्यासाठी करणं नेहमीच सोपं नसतं. कदाचित त्यासाठी आपल्याला मेहनत घ्यावी लागेल आणि आपल्याला आवडणाऱ्या काही गोष्टींचा त्याग करावा लागेल. पण आपण जे काही प्रयत्न करू ते व्यर्थ जाणार नाहीत. कारण असं करून आपण या विश्वाचा सर्वोच्च अधिकारी यहोवा याचं मन आनंदित करत असू. यापेक्षा आनंद देणारी दुसरी कोणतीच गोष्ट नाही!
८. देवावर प्रेम असल्यामुळे काही ख्रिश्चनांनी काय केलं आहे?
८ आज बऱ्याच ख्रिश्चनांनी जगात नाव मिळवून खूप पैसा कमवण्याच्या संधींचा त्याग केला आहे. याचं मुख्य कारण म्हणजे, देवावर असलेलं प्रेम आणि त्याची पूर्णपणे सेवा करण्याची इच्छा. एरिका नावाची बहीण एक डॉक्टर आहे. पण या व्यवसायात जास्त वेळ देण्याऐवजी तिने पायनियर सेवा करण्याचं निवडलं. तिच्या पतीसोबत तिने बऱ्याच देशांमध्ये सेवा केली आहे. ती म्हणते: “नवीन भाषा शिकून इतर देशांमध्ये सेवा करताना आलेले अनुभव, तिथल्या बांधवांसोबत झालेली मैत्री यांमुळे आमचं जीवन आनंदाने भरून गेलं आहे.” एरिका आजही डॉक्टर म्हणून काम करते, पण ती जास्तीत जास्त वेळ आणि शक्ती इतरांना यहोवाबद्दल शिकवण्यासाठी आणि बंधुभगिनींना मदत करण्यासाठी वापरते. ती म्हणते की असं केल्यामुळे तिला “खरा आनंद आणि समाधान मिळतं.”
स्वर्गात धन एकत्र करणारे की पृथ्वीवर?
९. पैशावर प्रेम करणारी व्यक्ती जीवनात आनंदी का नसते?
९ पौलने म्हटलं की लोक “पैशावर प्रेम करणारे” होतील. आयर्लंड देशात काही वर्षांपूर्वी एक पायनियर एका माणसाला देवाबद्दल सांगत होता. बोलत असताना त्या माणसाने खिशातून पैसे काढले आणि म्हटलं: “हाच माझा देव आहे!” बरेच लोक सहसा असं बोलून दाखवत नसले, तरी त्यांच्या मनात हीच गोष्ट असते. त्यांचं पैशावर आणि त्यामुळे घेता येणाऱ्या वस्तूंवर प्रेम असतं. पण बायबल आपल्याला इशारा देतं: “ज्याला पैसा प्रिय वाटतो त्याची पैशाने तृप्ती होत नाही; जो विपुल धनाचा लोभ धरतो त्याला काही लाभ घडत नाही.” (उप. ५:१०) पैशावर प्रेम करणारी व्यक्ती कधीच समाधानी नसते. तिला नेहमी आणखी पैसा हवा असतो आणि ती आपलं सारं आयुष्य ते मिळवण्यातच घालवून देते. यामुळे ती स्वतःवर खूप दुःखं ओढवून घेते.—१ तीम. ६:९, १०.
१०. बायबल श्रीमंती आणि गरिबी याबद्दल काय म्हणतं?
१० हे खरं आहे की आपल्या सर्वांनाच पैशाची गरज आहे. पैसा आपल्याला काही प्रमाणात सुरक्षा देतो. (उप. ७:१२) पण आपल्याजवळ मूलभूत गरजा पूर्ण करण्याइतकाच पैसा असला, तरीही आपण आनंदी राहू शकतो का? हो आपण तेव्हाही आनंदी राहू शकतो. (उपदेशक ५:१२ वाचा.) याकेचा मुलगा आगूरने अशी प्रार्थना केली: “दारिद्र्य किंवा श्रीमंती मला देऊ नको; मला आवश्यक तेवढे अन्न खावयास दे.” या व्यक्तीला दरिद्री किंवा खूप गरीब का व्हायचं नव्हतं हे समजण्यासारखं आहे. त्याने म्हटलं की यामुळे त्याला चोरी करण्याचा मोह होऊ शकतो आणि या कृत्यामुळे त्याच्या हातून यहोवाचा अनादर होईल. पण मग त्याने असं का म्हटलं की त्याला श्रीमंती नको? याचं कारण देत तो म्हणाला: “माझी अतितृप्ती झाल्यास मी कदाचित तुझा अव्हेर करेन, आणि परमेश्वर कोण आहे, असे म्हणेन.” (नीति. ३०:८, ९) देवाऐवजी पैशावर जास्त भरवसा ठेवणारे लोक तुम्ही नक्कीच पाहिले असतील.
११. येशूने पैशांबद्दल काय म्हटलं?
११ पैशावर प्रेम करणारी व्यक्ती कधीच देवाचं मन आनंदी करू शकत नाही. येशूने म्हटलं: “कोणीही दोन मालकांची सेवा करू शकत नाही; कारण तो एकतर एका मालकाचा द्वेष करेल आणि दुसऱ्यावर प्रेम करेल; किंवा एका मालकाशी एकनिष्ठ राहून दुसऱ्याला तुच्छ लेखेल. तुम्ही एकाच वेळी देवाची आणि धनाची सेवा करू शकत नाही.” त्याने असंही म्हटलं: “पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका, जिथे कसर व गंज लागून ती नष्ट होते आणि चोर घरफोडी करून ती लुटतात. त्याऐवजी स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा; तिथे कसर व गंज लागून ती नष्ट होत नाही आणि चोर घरफोडी करून ती लुटत नाहीत.”—मत्त. ६:१९, २०, २४.
१२. आपलं जीवन साधं ठेवल्यामुळे यहोवाची सेवा करण्यात कशी मदत होऊ शकते? एक उदाहरण द्या.
१२ आज यहोवाचे बरेच सेवक आपल्या जीवनात बदल करून आपलं जीवन साधं ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. असं केल्यामुळे त्यांना यहोवाची सेवा करण्यासाठी जास्त वेळ मिळतो आणि या सेवेमुळे त्यांना आनंदही होतो. अमेरिकेत राहणाऱ्या जॅकने आपल्या पत्नीसोबत पायनियर सेवा करण्यासाठी आपलं मोठं घर आणि व्यवसाय विकला. तो म्हणतो: “आमचं घर खूप सुंदर आणि शहराबाहेर निसर्गरम्य ठिकाणी होतं. आमच्यासाठी ते विकणं सोपं नव्हतं.” कामाचा ताण असल्यामुळे घरी आल्यावर त्याची चिडचिड व्हायची. बरीच वर्षं असं चालू राहिलं. तो म्हणतो: “माझी बायको पायनियरींग करायची आणि ती नेहमी आनंदी असायची. ती म्हणायची, ‘माझ्या बॉससारखा दुसरा कोणीच नाही!’ आता मी पण पायनियर झाल्यामुळे आम्ही दोघंही एकाच बॉसची, यहोवाची सेवा करत आहोत.”
पैशावर प्रेम करण्याचं आपण कसं टाळू शकतो? (परिच्छेद १३ पाहा)
१३. पैशाबद्दल योग्य दृष्टिकोन बाळगण्यास आपल्याला कशामुळे मदत होऊ शकते?
१३ पैशाबद्दल आपला दृष्टिकोन योग्य आहे की नाही, याचं परीक्षण करताना आपण स्वतःला पुढील प्रश्न विचारू शकतो: ‘बायबलमध्ये पैशाबद्दल जे सांगितलं आहे त्याचं मी पालन करतोय, हे मी घेतलेल्या निर्णयांतून दिसून येतं का? पैसा कमवणं हीच माझ्या जीवनातली सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे का? यहोवासोबतचा, इतरांसोबतचा नातेसंबंध यापेक्षा मी भौतिक गोष्टी मिळवणं याला जास्त महत्त्व देतो का? यहोवा माझ्या गरजा पुरवेल याची मला पूर्ण खात्री आहे का?’ या प्रश्नांची प्रामाणिकपणे उत्तरं दिल्यामुळे आपल्याला परीक्षण करायला मदत होईल. यहोवा त्याच्यावर भरवसा ठेवणाऱ्यांना कधीच निराश करणार नाही याची आपण पूर्ण खात्री बाळगू शकतो.—मत्त. ६:३३.
-