वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • लोकांमधला फरक ओळखा
    टेहळणी बुरूज (अभ्यास)—२०१८ | जानेवारी
    • ३. दुसरे तीमथ्य ३:२-५ या वचनांत कोणत्या प्रकारच्या लोकांबद्दल सांगितलं आहे?

      ३ पौलने म्हटलं की “शेवटल्या दिवसांत अतिशय कठीण काळ येईल.” यानंतर त्याने १९ नकारात्मक गुणांचा उल्लेख केला जे आज लोकांमध्ये सर्रासपणे पाहायला मिळतात. हे वाईट गुण रोमकर १:२९-३१ मध्ये पौलने सांगितलेल्या गुणांसारखेच आहेत. पण तीमथ्यला लिहिलेल्या पत्रात पौलने सांगितलेल्या गुणांचा उल्लेख ख्रिस्ती ग्रीक शास्त्रात दुसरीकडे कुठेच आढळत नाही. पौलने वचनाची सुरुवात “कारण लोक” या शब्दांनी केली. इथे लोक या शब्दांत स्त्री आणि पुरुष दोघांचाही समावेश होतो, कारण वाईट गुण दोघांमध्येही असू शकतात. पण पौलने सांगितलेले वाईट गुण सर्वच मानवांमध्ये आहेत असं म्हणता येणार नाही. खऱ्‍या ख्रिश्‍चनांमध्ये चांगले गुण असतात.—मलाखी ३:१८ वाचा.

  • लोकांमधला फरक ओळखा
    टेहळणी बुरूज (अभ्यास)—२०१८ | जानेवारी
    • ४. गर्वाने फुगलेले याचा काय अर्थ होतो?

      ४ स्वतःवर आणि पैशावर प्रेम करणाऱ्‍या लोकांचा उल्लेख केल्यानंतर पौलने बढाई मारणारे, गर्विष्ठ आणि गर्वाने फुगलेले यांचा उल्लेख केला. असे गुण दाखवणारे लोक स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजतात. मग त्याचं कारण त्यांचं रूप, क्षमता, संपत्ती किंवा समाजातलं स्तर असू शकतं. अशा लोकांना वाटतं की इतरांनी नेहमी त्यांचं कौतुक करावं. या लोकांबद्दल एका विद्वानाने म्हटलं: “अशा लोकांच्या मनात जणू एक देव्हारा असतो आणि त्यात ते स्वतःसमोरच झुकतात.” दुसऱ्‍या शब्दात ते स्वतःचीच पूजा करतात. काही लोकांचं असं म्हणणं आहे, की गर्व इतका वाईट आहे की गर्विष्ठ लोकांनासुद्धा इतरांमध्ये गर्व पाहून चीड येते.

  • लोकांमधला फरक ओळखा
    टेहळणी बुरूज (अभ्यास)—२०१८ | जानेवारी
    • ८. (क) आईवडिलांची आज्ञा मोडण्याबद्दल आज काही लोकांचा काय दृष्टिकोन आहे? (ख) बायबल मुलांना काय करायला सांगते?

      ८ शेवटल्या दिवसांत लोक इतरांशी कसं वागतील याबद्दल पौलने सांगितलं. त्याने म्हटलं की मुलं आईवडिलांचं न ऐकणारे बनतील. आज बरीच पुस्तकं, चित्रपट आणि टिव्हीवरील कार्यक्रम हे दाखवतात की मुलांनी आईवडिलांचं ऐकलं नाही, तर यात काहीच गैर नाही. उलट ते योग्य आहे असं पटवून देण्याचा ते प्रयत्न करतात. पण आईवडिलांचं न ऐकल्यामुळे कुटुंबातील नाती कमकुवत होतात आणि त्याचा समाजावर वाईट परिणाम होतो. ही संकल्पना काही नवीन नाही. अनेक शतकांपासून मानवांना या सत्याबद्दल माहीत आहे. उदाहरणार्थ, प्राचीन ग्रीस राष्ट्रात असा नियम होता की जर एखाद्या व्यक्‍तीने आपल्या आईवडिलांवर हात उचलला, तर त्याचे समाजातले अधिकार काढून घेतले जायचे. तसंच, रोमी कायद्यानुसार आपल्या वडिलांवर हात उचलण्याचा गुन्हा, खून करण्याइतका गंभीर मानला जायचा. इब्री आणि ग्रीक दोन्ही शास्त्रवचनांत मुलांना आपल्या आईवडिलांच्या अधीन राहण्यासाठी आज्ञा दिली आहे.—निर्ग. २०:१२; इफिस. ६:१-३.

  • लोकांमधला फरक ओळखा
    टेहळणी बुरूज (अभ्यास)—२०१८ | जानेवारी
    • १०, ११. (क) कोणत्या वाईट गुणांवरून दिसून येतं की लोकांचं एकमेकांवर प्रेम नाही? (ख) खरे ख्रिस्ती इतरांवर कितपत प्रेम करतात?

      १० पौलने इतर गुणांचाही उल्लेख केला ज्यांवरून आपल्याला कळतं की लोकांचं एकमेकांवर प्रेम नाही. “आईवडिलांचे न ऐकणारे” यानंतर पौलने उपकारांची जाण न ठेवणारे यांचा उल्लेख केला. हे समजण्यासारखं आहे कारण ज्या लोकांना उपकारांची जाण नसते, ते इतरांनी त्यांच्यासाठी केलेल्या चांगल्या गोष्टींचा कधीच विचार करत नाही. पुढे पौलने म्हटलं की लोक बेइमान होतील. हे लोक कोणत्याही गोष्टीशी सहमत न होणारे असतील, म्हणजेच शांती टिकवून ठेवण्याचा ते मुळीच प्रयत्न करणार नाही. तसंच, ते निंदा करणारे आणि विश्‍वासघात करणारे असतील. याचा अर्थ हे लोक इतरांबद्दल आणि देवाबद्दल वाईट, द्वेषपूर्ण गोष्टी बोलतील. ते इतरांची बदनामी करणारे असतील असंदेखील पौलने सांगितलं. म्हणजेच ते इतरांबद्दल खोट्या अफवा पसरवतील आणि त्यांचं नाव खराब करतील.a

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा