वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 ४/१५ पृ. ८-१३
  • आमच्या कठीण काळासाठी साहाय्यकारी शिक्षण

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आमच्या कठीण काळासाठी साहाय्यकारी शिक्षण
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • इतिहासापासून एक धडा
  • आमच्या काळाविषयी भविष्यवाणी
  • समृद्ध फायद्यांची कापणी करा
  • देवाचा उद्देश लवकरच पूर्ण होणार
    जीवनाचा काय उद्देश आहे?
  • आपण ‘शेवटल्या काळात’ जगत आहोत का?
    बायबल नेमके काय शिकवते?
  • या सर्वांचा काय अर्थ होतो?
    जागृत राहा!
  • देवाकडून शिक्षण प्राप्त झालेल्यांप्रमाणे चाला
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 ४/१५ पृ. ८-१३

आमच्या कठीण काळासाठी साहाय्यकारी शिक्षण

“शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे . . . दुष्ट व भोंदू माणसे ही दुसऱ्‍यांस फसवून व स्वत: फसून दुष्टपणात अधिक सरसावतील.”—२ तीमथ्य ३:१, १३.

१, २. आम्ही कोणत्या शिक्षणाला अनुसरत आहोत याविषयी आम्ही आस्था का बाळगली पाहिजे?

तुम्हाला मदत दिली जात आहे की, इजा पोंहचवली जात आहे? तुमच्या समस्या सोडवल्या जात आहेत, की त्या अधिकच बिघडवल्या जात आहेत? कशामुळे बरे? शिक्षणामुळे. होय, शिक्षणाचा तुमच्या जीवनावर बरा किंवा वाईट परिणाम होऊ शकतो.

२ तीन सहकारी प्राध्यापकांनी अलिकडेच या विषयाबद्दल अभ्यास केला आणि त्यांनी त्यांचे संशोधन, धर्माच्या वैज्ञानिक अभ्यासाचे नियतकालिक (इंग्रजी) यात सादर केले. हे मान्य आहे की, त्यांनी तुमचा व तुमच्या कुटुंबाविषयी अभ्यास केला नसेल. तरीही, त्यांना जे प्राप्त झाले ते दाखवते की आमच्या कठीण दिवसाला तोंड देते वेळी, शिक्षण आणि एखाद्या व्यक्‍तिचे यश किंवा अपयश यामध्ये एक निश्‍चित संबंध आहे. त्यांनी कशाचा शोध लावला याची आम्ही पुढच्या लेखात नोंद घेणार आहोत.

३, ४. आम्ही कठीण काळात जगत आहोत याबद्दलचे काही पुरावे कोणते आहेत?

३ प्रथम, या प्रश्‍नावर विचार करा: आम्ही कठीण दिवसात जगत आहोत हे तुम्हाला मान्य आहे का? असल्यास, हे “कठीण दिवस” आहेत हे शाबीत करणारे पुरावे तुम्ही निश्‍चितच पाहाल. (२ तीमथ्य ३:१-५) लोकांवर होणारा प्रभाव भिन्‍न असतो. उदाहरणार्थ, तुम्हाला राजकीय अधिकारासाठी झगडत असलेले देश आता विभागलेले आणि भंगलेले आहे हे माहीत आहे. इतर ठिकाणी, धार्मिक आणि वंशीय द्वेषभावामुळे हत्या होते. यामुळे केवळ सैनिकांनाच इजा होते असे नाही. अगणित स्त्रियांवर आणि मुलींवर जी क्रुरता केली गेली तसेच, वयस्कर लोकांना अन्‍न, ऊब व निवारा मिळण्यापासून वंचित केले गेले याचा जरा विचार करा. काही देशात अनेक लोक अतिशय यातना भोगत आहेत, जे वाढत जाणाऱ्‍या निर्वासितांच्या संख्येकडे व त्याच्या संबंधात असलेल्या अरिष्टांकडे निरवते.

४ आमच्या काळाचे विशेष लक्षण, आर्थिक समस्येमुळे बंद पडलेल्या कंपन्या, बेरोजगारी, जरुरीच्या काळात आर्थिक मदत, आणि निवृत्तीवेतन, चलनाचे मूल्य कमी होणे, अल्प अथवा कमी प्रमाणात भोजन ही आहेत. समस्यांच्या यादीत तुम्ही आणखी भर घालू शकाल का? कदाचित होय. याशिवाय, जगभरातील लाखो लोक अन्‍नाच्या तुटवड्यामुळे व रोगांमुळे त्रास भोगत आहेत. पूर्व आफ्रिकेतील—कृश पुरूष, स्त्रिया आणि लहान मुलांचे तुम्ही फोटो पाहिले असतील. आशियातील लाखोजण लोक अशाच रितीने त्रास सहन करीत आहेत.

५, ६. रोग हा देखील आमच्या कठीण काळातील एक पैलू आहे असे का म्हटले जाऊ शकते?

५ आज वाढत असलेल्या भयानक आजारांविषयी आम्ही सर्वांनी ऐकले आहे. जानेवारी २५, १९९३ च्या द न्यूयॉर्क टाईम्सने म्हटले: “वाढत असलेला लैंगिक संकरीतपणा, ढोंगीपणा आणि आकस्मिक प्रतिबंध यात संयुक्‍त अमेरिकेपेक्षा लॅटिन अमेरिकेतील एडस्‌ संसर्गजन्य रोगाचे प्रमाण अधिक वाढत चालले आहे . . . स्त्रियात होणाऱ्‍या संसर्गामुळे यात अधिक वाढ होत आहे.” ऑक्टोबर १९९२ मध्ये यु. एस. न्यूज ॲण्ड वर्ल्ड रिपोर्टने म्हटले: “केवळ दोन दशकांआधी अमेरिकेच्या प्रमुख शल्यचिकित्सकांनी सार्वजनिक आरोग्यावर विजय मिळवल्याची घोषणा केली व म्हटले की, ‘आता संसर्गजन्य आजाराविषयी काळजी करणे थांबविले पाहिजे.’” परंतु त्याविषयी आता काय? “इस्पितळे पुन्हा एकदा क्लेशाचे शिकार बनणाऱ्‍यांनी कमी होण्याऐवजी पुरासारखी भरू लागली आहेत . . . सूक्ष्म जंतू उत्पन्‍न होत आहेत व पूर्वीपेक्षा अधिक हुशार आनुवंशिक कौशल्य त्यांच्यात असल्यामुळे ते नवीन रोगप्रतिबंधकाचा विकास होण्याआधीच वाढत आहेत. . . . ‘आम्ही सांसर्गिक आजाराच्या नवीन युगात प्रवेश करीत आहोत.’”

६ उदाहरणार्थ, जानेवारी ११, १९९३ च्या न्यूजवीकने अहवाल दिला: “असा अंदाज लावला आहे की हिवतापाच्या परोपजीवी पेशींचा संसर्ग आता प्रत्येक वर्षी २७ कोटी लोकांना होत आहे, त्यामुळे २० लाख लोक मृत्युमुखी पडत आहेत . . . तसेच दहा कोटींना गंभीर आजार झाल्याची उदाहरणे आहेत . . . त्याचवेळी, हे आजार आधीच्या गुणकारी औषधांचा प्रतिकार करतात . . . आजारपणामुळे आलेला काही ताण उपाय करता येण्याजोगा राहणार नाही.” हे तुम्हाला भयभीत करते.

७. आज अनेक जण कठीण काळाबद्दल कशी प्रतिक्रिया करतात?

७ या कठीण दिवसात अनेक लोक त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मदतीचा शोध घेत असल्याचे तुम्ही पाहिले असेल. उदाहरणार्थ, तणावाला तोंड देण्यासाठी किंवा काही नवीन आजारांचा सामना करण्यासाठी जे लोक पुस्तकांकडे वळतात त्यांचा विचार करा. इतर लोक, दुर्बळ ठरलेले विवाह, मुलांची काळजी, मद्य किंवा मादक द्रव्यांचा त्रास, किंवा त्यांच्या कामाच्या मागणीत व घरातील दबावांचा वाटत असणारा त्रास यात समतोल कसा राखावा याचा सल्ला मिळविण्याची मोठी धडपड करीत आहेत. होय, त्यांना खरेच मदतीची आवश्‍यकता आहे! तुम्ही तुमच्या वैयक्‍तिक समस्येशी झटत आहात का, किंवा युद्ध, अन्‍नटंचाई व दुर्घटनेचा अनुभव करीत आहात का? उपाय नसलेली एखादी निकडीची समस्या असली तरी, तुम्हाला असे विचारण्याचे कारण आहे की, ‘आम्ही या कठीण परिस्थितीत का पोहचलो?’

८. सूक्ष्म ज्ञान व मार्गदर्शन यासाठी आम्ही पवित्र शास्त्राकडेच का वळले पाहिजे?

८ आम्ही, आता आणि भविष्यात याचा प्रभावकारी सामना करण्यापूर्वी व जीवनात आम्हाला समाधान मिळण्याचे पाहण्यापूर्वी या कठीण काळाचा सामना का करतो हे माहीत असणे जरुरीचे आहे. स्पष्टतः, ते आम्हातील प्रत्येकांना पवित्र शास्त्राचा विचार करण्यास कारण पुरविते. आम्ही पवित्र शास्त्राकडे का निर्देश करतो? कारण केवळ त्यातच अचूक भविष्यवाण्या सामावलेल्या आहेत, आगाऊ लिहिलेला इतिहास आहे जो आमच्या ह्‍या दुर्दशेची कारणे दाखवतो. तसेच तो, आम्ही कोठे आहोत, काळाच्या ओघात आम्ही कोठे जात आहोत व आमच्यासाठी भवितव्यात काय ठेवले आहे हेही तो दाखवतो.

इतिहासापासून एक धडा

९, १०. मत्तयाच्या २४ व्या अध्यायातील येशूची भविष्यवाणी पहिल्या शतकात कशी पूर्ण झाली?

९ फेब्रुवारी १, १९९४ च्या टेहळणी बुरुजने, मत्तय २४ अध्यायातील येशूच्या भविष्यवाणीचे ठळक पुनरावलोकन सादर केले होते. तुम्ही तुमच्या पवित्र शास्त्रातून तो अध्याय उघडला, तर तुम्हाला ३ ऱ्‍या वचनात, येशूच्या प्रेषितांनी त्याला भविष्यातील त्याच्या उपस्थितीचे आणि या युगाच्या समाप्तीचे चिन्ह विचारले होते ते पाहावयास मिळेल. त्यानंतर, ५ ते १४ वचनात, येशूने खोटे ख्रिस्त, लढाया, अन्‍नटंचाई, ख्रिश्‍चनांचा छळ, अनीती, आणि देवाच्या राज्याचा सर्व जगात प्रचार याविषयी पूर्व भाकीत केले.

१० इतिहास दाखवतो की, या गोष्टी यहुदी व्यवस्थिकरणाच्या समाप्तीला घडल्या. तुम्ही तेथे असता तर, तो कठीण काळ नसता का? तथापि, यरुशलेम आणि यहूदी व्यवस्थिकरणावर एक अपूर्व संकट कळसास पोहचत होते. रोमी लोकांनी सा. यु. ६६ मध्ये यरुशलेमवर हल्ला केल्यानंतर काय घडले त्याविषयी १५ व्या वचनापासून आम्ही वाचनाला आरंभ करतो. येशूने २१ वचनात सांगितलेल्या संकटात त्या घटना कळस गाठतात—म्हणजेच सा. यु. ७० मध्ये यरुशलेमाचा नाश, पूर्वी कधीही आले नव्हते असे सर्वात वाईट संकट त्या शहरावर गुदरले. तुम्हाला माहीत आहे की इतिहास तेथेच थांबला नाही, आणि तो थांबेल असेही येशूने सांगितले नाही. २३ ते २८ वचनात, सा. यु. ७० च्या संकटानंतर इतर गोष्टी घडतील हे त्याने दाखवले.

११. मत्तयाच्या २४ व्या अध्यायाच्या पहिल्या शतकातील पूर्णतेचा संबंध आमच्या दिवसांसोबत कसा येतो?

११ ‘म्हणून काय?’ असे म्हणून आज काही जणांना तो विचार काढून टाकावासा वाटेल. तसे करणे चुकीचे ठरेल. पहिल्या शतकातील भविष्यवाणीची पूर्णता ही महत्त्वपूर्ण आहे. का बरे? यहुदी व्यवस्थिकरणाच्या शेवटल्या काळात युद्धे, दुष्काळ, भूमिकंप, मऱ्‍या यांची मोठ्या प्रमाणातील पूर्णता, राष्ट्रांच्या नियुक्‍त समयाच्या समाप्तीनंतर, १९१४ मध्ये प्रतिबिंबित होणार होती. (लूक २१:२४) याची आधुनिक दिवसात पूर्णता घडण्यास सुरवात झाली तेव्हा आज जिवंत असलेले अनेक जण, पहिले महायुद्ध प्रत्यक्ष पाहणाऱ्‍यांतील साक्षीदार होते. तुमचा जन्म १९१४ नंतर झालेला असला तरी, तेव्हापासून येशूच्या भविष्यवाणीच्या पूर्णतेचे तुम्ही साक्षी आहात. या २० व्या शतकातील घटना शाबीत करतात की, आता आम्ही सद्य दुष्ट व्यवस्थिकरणाच्या शेवटल्या काळात जगत आहोत.

१२. येशूने सांगितल्याप्रमाणे काय पाहण्याची आम्ही आणखी अपेक्षा करू शकतो?

१२ याचा अर्थ असा होतो की, मत्तय २४:२९ वचनात सांगितलेले “संकट” आम्हापुढे आहे. त्यामध्ये, त्या कल्पना करता न येण्याजोग्या स्वर्गीय अपूर्व गोष्टीचा समावेश असेल. वचन ३० दाखवते की नंतर लोक नाश जवळ असल्याचे शाबीत करणारे आणखी एक वेगळे चिन्ह पाहतील. याच्याशी समांतर असणाऱ्‍या लूक २१:२५-२८ मधील अहवालानुसार, भवितव्यातील त्याकाळी, ‘भयाने आणि जगावर कोसळणाऱ्‍या अरिष्टांची धास्ती घेतल्यामुळे माणसे मरणोन्मुख होतील.’ लूकचा अहवाल असेही म्हणतो की, ख्रिश्‍चन तेव्हा आपली डोकी वर करतील कारण त्यांचा मुक्‍तीसमय जवळ आलेला असेल.

१३. कोणते दोन मुख्य मुद्ये आम्ही लक्ष देण्याच्या योग्यतेचे आहेत?

१३ कदाचित तुम्ही म्हणाल की ‘मी हे मान्य करतो व त्याला माझे सहमत आहे, परंतु मी विचार करीत होतो की हा वादविषय मी समजून कठीण काळाचा सामना कसा केला पाहिजे?’ तुमचे म्हणणे बरोबर आहे. आमचा सर्वात प्रथम मुद्दा, मुख्य समस्या ओळखणे आणि त्या कशारितीने टाळू शकतो ते पाहणे हा आहे. याच्याशी संबंधित असणारा दुसरा मुद्दा, आध्यात्मिक शिक्षण आम्हाला, चांगल्या जीवनाचा आनंद घेण्यास आज कसे मदत करू शकते हा आहे. या संबंधात, तुम्ही तुमच्या पवित्र शास्त्रातील दुसरे तीमथ्य याचा तिसरा अध्याय उघडा, व तेथे, प्रेषित पौलाचे शब्द तुम्हाला कठीण काळाचा सामना करण्यासाठी कशी मदत करू शकतात ते पाहा.

आमच्या काळाविषयी भविष्यवाणी

१४. २ तीमथ्य ३:१-५ या वचनाचा विचार करणे फायद्याचे ठरेल असा विश्‍वास करण्यास काय कारण आहे?

१४ देवाने, पौलाला, निष्ठावंत ख्रिस्ती तीमथ्यास चांगला सल्ला लिहिण्यासाठी प्रेरणा दिली, ज्यामुळे त्याला अधिक यशस्वी आणि आनंदी जीवन जगण्यास मदत मिळाली. पौलाने लिहिलेल्या भागाचा मुख्य अवलंब, आमच्या दिवसात लागू होणार होता. ते भविष्यसूचक शब्द तुम्हाला माहीत आहेत असे वाटत असले तरी, २ तीमथ्य ३:१-५ मधील त्या शब्दांचे जवळून निरीक्षण करा. पौलाने लिहिले: “शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे. कारण माणसे स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आईबापांस न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र, ममताहीन, शांतताद्वेषी, चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्‍वासघातकी, हूड, गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी, सुभक्‍तीचे केवळ बाह्‍यरूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी ती होतील.”

१५. आमच्यासाठी २ तीमथ्य ३:१ विशेष आस्थेचे का असले पाहिजे?

१५ येथे १९ गोष्टींची यादी केलेली होती याची कृपया नोंद घ्यावी. यांचे परीक्षण करुन त्याचा फायदा करून घेण्याआधी, भविष्यवाणीचे पूर्णरितीने आकलन करून घेण्यासाठी अंमळ थांबा. पहिले वचन पाहा. पौलाने भाकीत केले: “शेवटल्या काळी कठीण दिवस येतील.” कोणत्या “शेवटल्या काळी?” शेवटला काळ पुष्कळांच्याबाबतीत होता जसे की, प्राचीन काळच्या पॉम्पईचा शेवटला काळ किंवा राजा वा राजवंशाचा शेवटला काळ. पवित्र शास्त्र देखील, अनेक शेवटल्या काळाचा उल्लेख करते, जसे यहुदी व्यवस्थिकरणाचा शेवटला काळ. (प्रे. कृत्ये २:१६, १७) पौलाने येथे उल्लेखिलेला “शेवटला काळ” कोणता आहे हे उचितपणे समजण्यासाठी येशूने आम्हाला आधार दिला आहे.

१६. गहू आणि निदणाच्या दृष्टांताने आमच्या काळासाठी कोणत्या परिस्थितीबद्दल भाकीत केले?

१६ येशूने, गहू आणि निदणाचा दृष्टांत देऊन तो आधार पुरवला आहे. त्यांची शेतात पेरणी करून, वाढ होण्यासाठी ठेवले होते. त्याने म्हटले की गहू आणि निदण खऱ्‍या आणि खोट्या ख्रिस्ती लोकांना सूचित करते. आम्ही ह्‍या दृष्टांताचा उल्लेख केला कारण, या संपूर्ण दुष्ट व्यवस्थिकरणाचा शेवट होण्याआधी लांब पल्ल्याचा काळ जाण्याचे तो सिद्ध करतो. तो शेवट येईल तेव्हा काहीतरी पूर्णपणे बहरलेले असेल. ते काय असेल? ज्याचा परिणाम दुष्टपणाच्या मोठ्या पिकात होतो तो धर्मत्याग, किंवा खऱ्‍या ख्रिस्ती धर्मापासून दूर जाणे. पवित्र शास्त्राच्या इतर भविष्यवाण्या याची खात्री पटवून देतात की हे, जगव्याप्त दुष्ट व्यवस्थिकरणाच्या शेवटल्या काळात घडून येईल. व अशाच काळात, व्यवस्थिकरणाच्या समाप्तीस आज आम्ही जगत आहोत.—मत्तय १३:२४-३०, ३६-४३.

१७. व्यवस्थीकरणाच्या शेवटाबद्दल २ तीमथ्य ३:१-५ वचन कोणती समांतर माहिती पुरवते?

१७ तुम्हाला याचे महत्त्व दिसते का? दुसरे तीमथ्य ३:१-५ आम्हाला व्यवस्थिकरणाच्या समाप्तीच्या वेळी किंवा शेवटल्या काळात, ख्रिश्‍चनांच्या सभोवती सर्वत्र वाईट फळे दिसून येण्याची समांतरीत सूचना देते. पौल, शेवटला काळ आल्याचे शाबीत करण्यासाठी त्याने दिलेले १९ मुद्देच केवळ एकमात्र मार्ग आहेत असे म्हणत नव्हता. उलटपक्षी, शेवटल्या काळात आम्हाला कशाबरोबर लढत द्यावी लागेल याविषयी तो इशारा देत होता. पहिले वचन ‘कठीण दिवसाविषयी’ बोलते. हा शब्दप्रयोग ग्रीक भाषेतील आहे, आणि त्याचा शब्दशः अर्थ, “भयानक नियुक्‍त काळ” असा होतो. “भयानक” हे वर्णन, आज आम्ही ज्याला तोंड देत आहोत त्याच्या अगदी योग्यतेचे आहे याबरोबर तुम्ही सहमत नाही का? हा प्रेरित भाग आमच्या काळासाठी ईश्‍वरी सूक्ष्मदृष्टी देण्याचे चालू ठेवतो.

१८. पौलाच्या भविष्यसूचक शब्दांचा आम्ही अभ्यास करत असताना कशावर विशेष लक्ष दिले पाहिजे?

१८ या भविष्यवाणीच्या आमच्या आस्थेने, आम्हाला आमचा काळ किती कठीण, किंवा भयानक आहे या शोकांतिकेची उदाहरणे ओळखण्यासाठी अनुमती दिली पाहिजे. आमच्या दोन मुख्य मुद्यांची आठवण करा: (१) आमच्या काळास कठीण बनविणाऱ्‍या समस्या ओळखणे आणि त्यांना कसे टाळावे हे पाहणे; (२) खरोखर व्यावहारिक असणाऱ्‍या शिक्षणाचे अनुसरण करणे, ज्यामुळे चांगल्या जीवनाचा आनंद मिळण्यास मदत होऊ शकते. याकारणास्तव, आमच्या काळास कठीण बनविणाऱ्‍या समस्यांवर जोर देण्याऐवजी, आम्हाला व आमच्या कुटुंबाला या कठीण दिवसाला तोंड देण्यासाठी मदत करणाऱ्‍या शिक्षणावर आपण लक्ष केंद्रित करु या.

समृद्ध फायद्यांची कापणी करा

१९. लोक स्वार्थी असल्याचा तुम्ही कोणता पुरावा पाहिला आहे?

१९ पौल, शेवटल्या दिवसाचे भविष्य वर्तवण्याविषयी त्याच्या यादीची सुरवात “माणसे स्वार्थी होतील” अशी करतो. (२ तीमथ्य ३:२) हे बोलण्यामागे त्याचा काय अर्थ होता? संपूर्ण इतिहासभर गर्विष्ठ पुरूष आणि स्त्रियांनी स्वार्थीपणाने कार्य केले असे तुमचे बोलणे बरोबर आहे. तरीही, आज सर्वसामान्य असणारी ही उणीव असामान्य नाही यात कोणताही संशय नाही. बहुतेकांच्या बाबतीत हे अती होत आहे. राजकीय आणि वाणिज्य जगात तर ती जवळजवळ प्रमाणपद्धत आहे. पुरूष आणि स्त्रिया कोणत्याही किंमतीवर सामर्थ्य आणि नावलौकिक मिळवण्याच्या मागे लागतात. असे ते बहुतेककरून इतरांच्या जिवावर करतात. हे स्वप्रेमी इतर लोकांना इजा कशी पोहंचवते याची काळजी करीत नाही. ते इतरांवर कायदेशीर कारवाई करण्यात किंवा इतरांना फसविण्यात चपळ असतात. यास्तव, अनेक जण ह्‍याला “मीपणाची पिढी” असे का म्हणतात ते तुम्हाला समजले असेल. बेशिस्त व अहंभावी लोक विपुल होत चालले आहेत.

२०. पवित्र शास्त्रीय सल्ला, स्वार्थीपणाच्या वाढत जाणाऱ्‍या आत्म्याच्या विरूद्धतेत कसा आहे?

२० “स्वार्थी” लोकांबरोबर अनुभवलेल्या कटू अनुभवाची आम्हाला आठवण करून द्यायची गरज नाही. ही समस्या ओळखल्याने पवित्र शास्त्र आम्हाला मदत करते, आणि आम्ही तो पाश कसा टाळू शकतो याचे शिक्षण देखील ते देते हे खरे आहे. ते असे म्हणते: “चढाओढीने अगर पोकळ डामडौलाने प्रवृत्त होऊन कोणतेही काम हाती घेऊ नका; पण विनयशील वृत्तीने दुसऱ्‍याला स्वतःपेक्षा थोर समजा. आणि आपल्याच पुरते पाहू नये तर दुसऱ्‍यांकडेही लक्ष द्यावे.” “तुम्ही आहात त्यापेक्षा स्वतःला अधिक योग्यतेचे समजू नका. उलटपक्षी, विचारपूर्वक आपली पायरी ओळखून वागावे.” फिलिप्पैकर २:३, ४ व रोमकर १२:३ मधील हा उत्कृष्ट सल्ला, मराठी कॉमन लँग्वेज बायबल मध्ये सापडतो.

२१, २२. (अ) अशा प्रकारचा सल्ला आज मदतदायी ठरू शकतो याचा कोणता विस्तृत पुरावा आहे? (ब) देवाच्या सल्ल्याचा सर्व साधारण वैयक्‍तिकांवर काय परिणाम झाला आहे?

२१ काही कदाचित विरोध करतील, ‘हे ऐकायला तर बरं वाटतं, पण ते व्यवहारी नाही.’ होय, ते व्यावहारिक आहे. ते यशस्वी होत आहे व आजच्या सामान्य मानवांमध्ये कार्य करु शकते. ऑक्सफर्ड विश्‍वविद्यालयाच्या प्रकाशकाने १९९० मध्ये गटबाजीचे सामाजिक परिमाण (इंग्रजी) हे पुस्तक छापले. आठव्या अध्यायाचे शीर्षक “कॅथोलिक देशातील यहोवाचे साक्षीदार” असे होते, आणि त्यात बेल्जियम मधील संशोधनाचे काळजीपूर्वक केलेल्या अभ्यासाचे वर्णन केले आहे. आम्ही वाचतो: “साक्षीदार होण्याच्या सकारात्मक आकर्षणाकडे वळल्यास ‘सत्याच्या’ आकर्षणाऐवजी, पुन्हा एकदा अधिक गुणांचा उल्लेख प्रतिपादित करतात. . . . उबदारपणा, मित्रत्त्व, प्रीती आणि एकता हे नेहमीच उल्लेखिलेले गुण आहेत, परंतु ईमानदारी आणि पवित्र शास्त्रीय तत्त्वांचा अनुवाद करण्यासाठी वैयक्‍तिक सुसंगतता या गुणांचा देखील साक्षीदार आनंद लुटतात.”

२२ आम्ही या निरीक्षणाची तुलना विस्तृत कोनाच्या भिंगातून टिपलेल्या छायाचित्राशी करू; आणि जर कदाचित तुम्ही एका झूम्‌ भिंगाचा (फोकल लांबी समप्रमाणात अंतराप्रमाणे बदलणारे) किंवा दूर अंतरावरुन फोटो घेण्यासाठी असलेल्या भिंगाचा वापर केल्यास, अधिक जवळील गोष्टी, अनेक खऱ्‍या जीवनातील अनुभव पाहू शकाल. यामध्ये पूर्वी उद्धट असणारे, हुकमत गाजवणारे, किंवा स्वार्थी, निर्लज्ज असणाऱ्‍या लोकांचा समावेश होऊ शकतो परंतु, ते आता अधिक नम्र, पती आणि पिता या नात्याने त्यांच्या साथीदारांना, मुलांना आणि इतरांना पूर्वीपेक्षा अधिक, ममता आणि दया दाखवीत आहेत. यामध्ये हक्क गाजविणाऱ्‍या किंवा निष्ठुर स्त्रियांचाही समावेश असेल, आणि त्या आता इतरांना खऱ्‍या ख्रिश्‍चनत्त्वाचा मार्ग शिकवित आहेत. अशाप्रकारचे हजारो शेकडो असे अनुभव आहेत. आता, कृपया याचा स्पष्ट विचार करा. नेहमीच स्वतःवर प्रथम प्रेम करणाऱ्‍या आणि स्वतःला प्रथम ठेवणाऱ्‍या पुरूष आणि स्त्रियांबरोबर व्यवहार करण्याऐवजी अशा लोकांबरोबर राहणे तुम्हाला आवडणार नाही का? आमच्या कठीण काळाचा सामना करण्यासाठी हे अधिक सोपे नाही का? यास्तव, अशा पवित्र शास्त्रीय शिक्षणाचा अवलंबन केल्याने तुम्हाला ते आनंदी करणार नाही का?

२३. २ तीमथ्य ३:२-५ वचनावर आणखी लक्ष देणे योग्यतेचे का ठरेल?

२३ परंतु, आम्ही २ तीमथ्य ३:२-५ मधील पौलाच्या यादीतील केवळ पहिल्याच बाबीचा विचार केला. इतर बाबींबद्दल काय? त्यांचे बारकाईने परीक्षण, आमच्या दिवसातील मुख्य समस्यांना ओळखण्यास मदत करू शकेल, व तुम्ही त्यांना टाळू शकाल व तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना कोणत्या मार्गाने अधिक आनंद मिळू शकेल हे समजण्यास तुम्हाला मदत करू शकेल का? पुढील लेख ह्‍या प्रश्‍नांची उत्तरे देण्यासाठी व समृद्ध आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुम्हाला मदत करील.

लक्षात ठेवण्याजोगे मुद्दे

▫ आम्ही कठीण काळात जगत आहोत याबद्दलचे काही पुरावे कोणते आहेत?

▫ आम्ही शेवटल्या काळामध्ये जगत असल्याची आम्हाला खात्री का आहे?

▫ २ तीमथ्य ३:१-५ वचनाच्या अभ्यासातून आम्ही कोणते दोन मुख्य मुद्दे काढू शकतो?

▫ या काळामध्ये अनेक जण स्वार्थी असताना, पवित्र शास्त्राच्या शिक्षणाने यहोवाच्या लोकांना कशी मदत केली आहे?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा