सुशिक्षणाला तुमच्या जीवनाचा मार्ग बनवा
“सुभक्ति तर सर्व बाबतीत उपयोगी आहे.”—१ तीमथ्य ४:८.
१, २. लोक त्यांच्या आरोग्याची कोठवर काळजी घेतात, आणि त्याचा परिणाम काय होतो?
अनेक लोक अगदी तत्परतेने हे कबूल करतील की, उत्तम आरोग्य जीवनातील सर्वात बहुमूल्य ठेवा आहे. ते, स्वतःला निरोगी ठेवण्यास पुष्कळ वेळ आणि अमाप पैसा खर्च करतात. शिवाय त्यांना हवे तेव्हा योग्य प्रकारचे आरोग्य उपचार होतील याची ते खात्री करून घेतात. उदारहणार्थ, अमेरिकेत, आरोग्याची काळजी घेण्यासाठी खर्च केलेली, अलिकडच्या वर्षाची वार्षिक किंमत ९० अब्ज डॉलर्स पेक्षा अधिक होती. ही किंमत, त्या राष्ट्रातील प्रत्येक पुरूष, स्त्री आणि मूल यांच्यामागे वर्षाला लागणाऱ्या ३,००० डॉलर्सच्या बरोबरीची आहे. शिवाय, इतर विकसित राष्ट्रांमधील जनसंख्येच्या प्रत्येक व्यक्तीमागे खर्च केली जाणारी किंमत यापेक्षा काही कमी नाही.
२ सर्व खर्च केलेला वेळ, शक्ती आणि पैसा यातून काय साध्य झाले बरे? संपूर्ण इतिहासात कोणत्याही इतर काळापेक्षा आज, एकंदरीत, अधिक विकसित आरोग्य सेवा आणि सुविधा आहेत ही गोष्ट निश्चितच कोणी अमान्य करणार नाही. तरीही, यामुळे आपोआप सुस्वास्थ्य जीवनात बदल झाला नाही. वास्तविक पाहता, अमेरिकेचे राष्ट्रपती यांनी, एका आरोग्य सेवा कार्यक्रमात बोलत असताना ही गोष्ट निर्दशनास आणून दिली की, इतर कोणत्याही विकसित राष्ट्रापेक्षा, “या राष्ट्रातील हिंसेच्या भयंकर किंमतीसोबत, अमेरिकेतील रहिवाश्यांमध्ये, एडस्, धुम्रपान, अतिशय दारूबाजी, कौमार्यवस्थेत गरोदरपण, अपूर्ण वाढ झालेल्या व कमी वजनाच्या बालकांचा जन्म या गोष्टी देखील मोठ्या प्रमाणात आहेत.” या त्यांच्या बोलण्याचा काय अर्थ होतो? हाच की, “आम्हाला जर खरोखर मनुष्य या नात्याने निरोगी व्हायचे आहे तर आम्हाला आमचा मार्ग बदलला पाहिजे.”—गलतीकर ६:७, ८.
निरोगी जीवनी मार्ग
३. प्राचीन ग्रीक संस्कृतीच्या दृष्टिकोनातून पाहता, पौलाने कोणता सल्ला दिला आहे?
३ पहिल्या शतकात, ग्रीक लोक, त्यांचे शारीरिक आरोग्य, व्यायाम, आणि खेळ यासाठी ते घेत असलेल्या काळजीसाठी सुपरिचित होते. अशा पार्श्वभूमीत, प्रेषित पौलाला, तीमथ्य नावाच्या एका तरुणास असे लिहिण्यास प्रेरणा झाली की: “शारीरिक कसरत थोडक्या बाबतीत उपयोगी आहे; सुभक्ति तर सर्व बाबतीत उपयोगी आहे; तिला आताच्या व पुढच्याहि जीवनाचे अभिवचन मिळाले आहे.” (१ तीमथ्य ४:८) अशाप्रकारे, पौल, आज लोक मान्य करत असलेल्या वैद्यकीय आणि शारीरिक आरोग्याच्या तरतूदी, खरोखर एक निरोगी जीवनी मार्गाची हमी देत नाहीत याकडे निर्देश करत होता. तथापि, पौल आम्हाला याची खात्री देतो की, आध्यात्मिक आरोग्य आणि ईश्वरी भक्ती वाढवणे अनिवार्य आहे.
४. ईश्वरी भक्तीचे कोणते फायदे आहेत?
४ अशाप्रकारचा मार्ग, “सध्याच्या जीवनासाठी” लाभदायक आहे. कारण, तो मार्ग अभक्त लोक, किंवा “सुभक्तीचे केवळ बाह्य रूप [किंवा, स्वरूप]” दाखवणारे लोक स्वतः भोगत असलेल्या सर्व हानीकारक गोष्टींपासून संरक्षण पुरवितो. (२ तीमथ्य ३:५; नीतीसूत्रे २३:२९, ३०; लूक १५:११-१६; १ करिंथकर ६:१८; १ तीमथ्य ६:९, १०) जे लोक त्यांच्या जीवनाला ईश्वरी भक्तीचा आकार देण्याची अनुमती देतात, ते देवाच्या नियमांबद्दल आणि गरजांबद्दल हितकर [निरोगी] आदर दाखवतात. यामुळे ते देवाच्या सुशिक्षणाला त्यांच्या जीवनाचा मार्ग बनवण्यास प्रवृत्त होतात. अशाप्रकारची जीवन पद्धत त्यांना आध्यात्मिक आणि शारीरिक आरोग्य, समाधान, आणि आनंद देते. शिवाय ते “जे खरे जीवन ते बळकट धरण्यास पुढील काळी चांगला आधार होईल, असा साठा स्वतःसाठी” जमा करत आहेत.—१ तीमथ्य ६:१९.
५. पौलाने तीताला लिहिलेल्या त्याच्या पत्रातील दुसऱ्या अध्यायात कोणते सल्ले पुरविले?
५ देवाच्या सुशिक्षणाने मार्गदर्शित असलेले जीवन आता आणि भवितव्यात याप्रकारचे आशीर्वाद आणीत असल्यामुळे, आम्हाला व्यावहारिकपणे हे जाणून घेणे आवश्यक आहे की, आम्ही देवाच्या सुशिक्षणाला आमच्या जीवनाचा मार्ग कसा बनवू शकतो. प्रेषित पौलाने याचे उत्तर, तीताला लिहिलेल्या त्याच्या पत्रात दिले आहे. आम्ही त्या पुस्तकाच्या दुसऱ्या अध्यायाची खास नोंद घेऊ या. तेथे त्याने तीताला, ‘सुशिक्षणाला जे शोभते ते बोलण्याची’ सूचना दिली. निश्चितच, आपण सर्व तरुण व वृद्ध, पुरूष आणि स्त्री, आज, या ‘सुशिक्षणातून’ लाभ मिळवू शकतो.—तीत १:४, ५; २:१.
वृद्ध पुरूषांसाठी सल्ला
६. पौलाने “वृद्ध पुरूषांसाठी” कोणता सल्ला दिला, व हा त्याचा दयाळूपणा का होता?
६ प्रथम, पौलाकडे मंडळीतील वृद्ध पुरूषांसाठी काही सल्ला होता. कृपया तीत २:२ वाचा. ‘वृद्ध पुरूषांना’ गट या नात्याने, आदर दिला जातो, आणि विश्वास व निष्ठेचे सोदाहरण म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. (लेवीय १९:३२; नीतीसूत्रे १६:३१) यामुळे, इतर जण त्यांना, क्षुल्लक बाबींविषयी सल्ला किंवा सूचना देण्यासाठी तयार नसतात. (ईयोब ३२:६, ७; १ तीमथ्य ५:१) यास्तव, पौलाने वृद्ध पुरूषांना प्रथम अनुलक्षून जो सल्ला दिला तो त्याच्या परीने अगदी उचित आहे. तसेच, या वृद्ध पुरूषांनी जर पौलाचा सल्ला अनुसरला आणि त्यांनी देखील पौलाप्रमाणे, अनुकरणीय होण्याची खात्री केली तर ते उत्तम होईल.—१ करिंथकर ११:१; फिलिप्पैकर ३:१७.
७, ८. (अ) ‘सवयींमध्ये नेमस्त असणे’ यात काय गोवलेले आहे? (ब) “गंभीर” असण्याचे संतुलन ‘मर्यादशीलपणा’ सोबत का असावे?
७ सर्वात प्रथम, सर्व वृद्ध ख्रिस्ती पुरूषांनी, “नेमस्त” असले पाहिजे. याचा मूळ शब्द पिण्याच्या सवयीला (“शुद्धीवर,” किंग्डम इंटरलिनियर) सूचित करत असला तरी, त्याचा अर्थ जागृत असणे, ग्रहणशक्ती, किंवा शुद्धीवर असणे असा देखील होतो. (२ तीमथ्य ४:५; १ पेत्र १:१३) यास्तव, पिण्याच्या अगर इतर कोणत्याही गोष्टीत, वृद्ध पुरूषांनी नेमस्त असले पाहिजे. बेसुमार किंवा अतिरेकी होऊ नये.
८ मग, त्यांनी “गंभीर” आणि “मर्यादशील” देखील असले पाहिजे. गंभीर, किंवा आदरणीय व मान्यता या गोष्टी सहसा वयोमानानुसार येतात. परंतु, काही जणांचा अतिशय गंभीर होण्याकडे कल असेल. त्यांना तरुणांच्या उत्साहपूर्ण मार्गाला सहन करत येत नाही. (नीतीसूत्रे २०:२९) याचकारणास्तव, ‘गंभीरतेला’ ‘मर्यादशीलतेच्या’ बरोबरीत ठेवले आहे. वृद्ध पुरूषांनी गंभीरतेला टिकवून ठेवले पाहिजे. परंतु त्यासोबतच, त्यांनी त्यांच्या वयोमानानुसार समतोल देखील असले पाहिजे. त्यांना त्यांच्या भावनांवर आणि मनोविकारांवर पूर्णपणे ताबा ठेवला पाहिजे.
९. वृद्ध पुरूषांनी विश्वास व प्रीतीत आणि विशेषकरून सहनशीलतेत निरोगी का असावे?
९ शेवटी, वृद्ध पुरूषांनी, “विश्वास, प्रीती, व सहनशीलता यामध्ये दृढ” असले पाहिजे. पौलाने अनेक वेळा त्याच्या लिखाणामध्ये, विश्वास आणि प्रीतीला, आशा, यासोबत सूचीबद्ध केले आहे. (१ करिंथकर १३:१३; १ थेस्सलनीकाकर १:३; ५:८) येथे त्याने “आशा” हिला “सहनशीलता” ऐवजी दर्शविले आहे. हे यामुळे केले असेल कारण, कदाचित उतार वयात, काहीही न बोलता स्वतःला दूर ठेवण्याची भावना शिरकाव करू शकते. (उपदेशक १२:१) परंतु, येशूने दर्शविल्याप्रमाणे, “जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल.” (मत्तय २४:१३) यासोबतच, वृद्धजन केवळ त्यांच्या वयामुळे किंवा अनुभवामुळे योग्य उदाहरणशील नाहीत तर, त्यांचे बळकट आध्यात्मिक गुण जसे की, विश्वास, प्रीती आणि सहनशीलता यासाठी सुद्धा आहेत.
वृद्ध स्त्रियांसाठी
१०. पौल मंडळीतील “वृद्ध स्त्रियांसाठी” कोणता सल्ला पुरवतो?
१० पौलाने यानंतर त्याचे लक्ष, मंडळीतील वृद्ध स्त्रियांकडे वळवले. कृपया तीत २:३ वाचा. “वृद्ध स्त्रिया” मंडळीतील इतर स्त्रियांत वयाने मोठ्या आहेत. यामध्ये, ‘वृद्ध पुरूषांच्या’ व इतर सदस्यांच्या पत्नी, माता, आणि आजी यांचा समावेश आहे. असे असल्यामुळे, त्यांचा चांगला किंवा वाईटासाठी बराच प्रभाव असू शकतो. याच कारणास्तव, पौलाने त्याच्या शब्दांची सुरवात, “तसेच” म्हणून केली, याचा अर्थ असा होतो की, ‘वृद्ध स्त्रियांना’ देखील मंडळीतील त्यांच्या भूमिका पार पाडण्यासाठी विशिष्ट जबाबदाऱ्या पूर्ण करणे आवश्यक आहे.
११. आदरणीय वर्तणूक म्हणजे काय?
११ सर्वात पहिल्यांदा, “वृद्ध स्त्रियांनी चालचलणुकीत आदरणीय असावे” असे पौलाने म्हटले. “चालचलणुक” ही एखाद्याची आंतरिक मनोवृत्ती व व्यक्तिमत्त्वाचे बाहेरील प्रदर्शन आहे. हा आविर्भाव, वर्तणूक आणि स्वरूपातून प्रतिबिंबित होतो. (मत्तय १२:३४, ३५) तर मग, एका वृद्ध ख्रिस्ती स्त्रीची मनोवृत्ती किंवा व्यक्तिमत्त्व कसे असले पाहिजे? एका शब्दात सांगायचे झाले तर, “आदरणीय.” याचे भाषांतर, ग्रीक शब्दातून केले आहे ज्याचा अर्थ, “एखाद्या व्यक्तीला, कार्याला शोभेल असा, किंवा देवासाठी वाहून घेतलेल्या गोष्टी” असा होतो. हा सल्ला, मंडळीतील तरुण स्त्रियांवर खासकरून त्यांचा प्रभाव पडत असल्यामुळे निसंशये, उचित आहे.—१ तीमथ्य २:९, १०.
१२. सर्वांनी जीभेचा कोणता दुरुपयोग टाळावा?
१२ यानंतर, दोन नकारात्मक विशेष गुणलक्षणे येतात: “चहाडखोर, मद्यपानासक्त नसाव्यात.” या दोन गुणलक्षणांना एकत्र ठेवलेले आहे ही गोष्ट मनोरंजक आहे. प्राध्यापक ई. एफ. स्कॉट असे निरीक्षण करतात की, “प्राचीन काळी, द्राक्षारसच एकमात्र पेय होते. वृद्ध स्त्रिया, ते, त्यांच्या द्राक्षारसाच्या छोट्याशा पार्टीत घेत असत व तेथे त्यांच्या शेजाऱ्यांच्या चरित्र्याची निंदानालस्ती करत असत.” सर्वसामान्यपणे, स्त्रिया लोकांविषयी काळजी करण्यात पुरूषांपेक्षा अधिक तत्पर असतात, आणि हे प्रशंसनीय आहे. तरीही काळजी, चहाडी, व निंदानालस्ती करून अधोगतीस नेऊ शकते, विशेषकरून जेव्हा पिऊन तर्र्र झाल्यावर जीभेवर ताबा राहत नाही. (नीतीसूत्रे २३:३३) निश्चितच, निरोगी जीवन मार्गाचा पाठलाग करणारे सर्व पुरूष आणि स्त्रियांनी, या चोरखड्ड्यापासून जागृत राहावे हे बरे आहे.
१३. वृद्ध स्त्रिया कोणत्या मार्गांनी शिक्षिका होऊ शकतात?
१३ उभारणीकारक पद्धतीने वेळ वापरण्यासाठी, वृद्ध स्त्रियांना “सुशिक्षण देणाऱ्या असाव्यात” असे उत्तेजन दिले जाते. इतर ठिकाणी, पौलाने अगदी स्पष्टरीत्या सूचना दिल्या की, स्त्रियांनी मंडळीत शिक्षण द्यावयाचे नाही. (१ करिंथकर १४:३४; १ तीमथ्य २:१२) परंतु, हे त्यांना त्यांच्या घरात आणि जनतेला देवाविषयीचे बहुमूल्य ज्ञान इतरांना वाटण्यापासून परावृत्त करत नाही. (२ तीमथ्य १:५; ३:१४, १५) त्या, पुढील वचने दाखवतात त्याप्रमाणे, मंडळीतील तरुण स्त्रियांसाठी उत्तम ख्रिस्ती उदारहण राहून पुष्कळ चांगल्या गोष्टी साध्य करू शकतात.
तरुण स्त्रियांसाठी
१४. तरुण ख्रिस्ती स्त्रिया त्यांच्या कर्तव्याची काळजी घेत असताना समतोलपणा कसा प्रदर्शित करू शकतात?
१४ वृद्ध स्त्रियांना “सुशिक्षण देणाऱ्या असाव्यात” असे उत्तेजन देताना पौलाने खासकरून तरुण स्त्रियांचा उल्लेख केला. कृपया तीत २:४, ५ वाचा. बहुतेक सूचना घरगुती कामावर केंद्रित असल्या तरी, तरुण ख्रिस्ती स्त्रियांनी, भौतिक चिंतांना त्यांच्या जीवनावर वर्चस्व गाजवण्यास अनुमती देऊन अतिरेक होऊ देऊ नये. उलटपक्षी, त्यांनी “मर्यादशील, शुद्धाचरणी . . . मायाळू” असावे. याहूनही अधिक म्हणजे, त्यांनी, ख्रिस्ती मस्तकपदाच्या व्यवस्थेला पाठिंबा देण्यास तयार असले पाहिजे, “म्हणजे देवाच्या वचनाची निंदा होणार नाही.”
१५. मंडळीतील अनेक तरुण स्त्रिया प्रशंसनीय का आहेत?
१५ आज, कौटुंबिक दृश्य, पौलाच्या दिवसात होते त्यापेक्षा बऱ्याचप्रमाणात बदलले आहे. अनेक कुटुंबे विश्वासासाठी विभक्त झाले आहेत, आणि इतर कुटुंबात एकच पालक आहेत. परंपरागत कुटुंब म्हणविणाऱ्या कुटुंबात देखील, पत्नी किंवा माता ही पूर्णवेळची गृहिणी असल्याचे फारच क्वचित पाहण्यास मिळते. या सर्व गोष्टी तरुण ख्रिस्ती स्त्रियांवर प्रचंड दबाव आणि जबाबदाऱ्या लादतात. परंतु त्या त्यांना त्यांच्या शास्त्रीय कर्तव्यातून सूट देत नाहीत. यास्तव, अनेक विश्वासू तरुण स्त्रियांना, त्यांच्या कामाचा तोल राखण्यास कठीण परिश्रम केल्यावरही, राज्य आस्थेला प्रथम स्थानी ठेवताना पाहणे खूप आनंदविणारे आहे. त्यांच्यातील काही जणी साहाय्यक किंवा नियमित पायनियर म्हणून पूर्ण वेळेची सेवा करत आहेत. (मत्तय ६:३३) त्या खरोखर प्रशंसा मिळण्याच्या पात्रतेच्या आहेत!
तरुण पुरूषांसाठी
१६. पौलाकडे तरुण पुरूषांसाठी कोणता सल्ला होता, व तो समयोचित का आहे?
१६ पौल यानंतर तरुण पुरूषांकडे त्याचे बोलणे वळवतो, त्यामध्ये तीताचाही समावेश आहे. कृपया तीत २:६-८ वाचा. आजच्या तरुणांच्या—धुम्रपान, मादक पदार्थ आणि मद्यार्काचा दुरुपयोग, बेकायदेशीर लैंगिकता, आणि इतर जगिक कार्य जसे की, रानटी खेळ, हिणकस संगीत आणि मनोरंजन—या बेजबाबदार व हानीकारक मार्गाच्या दृष्टिपथात, निरोगी व समाधानी जीवनी मार्गानुसार चालू इच्छिणाऱ्या ख्रिस्ती तरुणांसाठी, हा समयोचित सल्ला आहे.
१७. एखादा तरुण पुरूष “मर्यादशील” आणि “चांगल्या कामाचा कित्ता” कसा होऊ शकतो?
१७ आजच्या जगिक तरुणांच्या विरूद्धतेत, एका तरुण ख्रिस्ती पुरूषाने, “मर्यादशील” आणि “चांगल्या कामाचा कित्ता” राखणारे असावे. पौलाने स्पष्ट केले की, मर्यादशील व प्रौढ मन, केवळ अभ्यास करणाऱ्यांनाच मिळवत नाहीत तर जे त्यांच्या “ज्ञानेंद्रियांना वहिवाटीने चांगले आणि वाईट समजण्याचा सराव” करतात अशांनाच प्राप्त होते. (इब्रीयांस ५:१४) तरुण लोकांना, त्यांचा वेळ आणि शक्ती, त्यांच्या तारुण्याचा जोम स्वार्थी कार्यांचा पाठलाग करण्यात वाया घालवण्याऐवजी, ख्रिस्ती मंडळीतील अनेक जबाबदाऱ्यांमध्ये पूर्ण भाग घेण्यासाठी स्वेच्छेने खर्च करताना पाहणे किती मनोरंजक आहे! असे केल्याने, ते तीताप्रमाणे ख्रिस्ती मंडळीत “उत्तम कार्याचा” कित्ता होऊ शकतात.—१ तीमथ्य ४:१२.
१८. शिक्षणात शुद्धपण, गंभीरता, आणि दोष लावता येणार नाही असे बोलण्याचा काय अर्थ होतो?
१८ तरुण पुरूषांना याची आठवण करून दिली जात आहे की, त्यांनी ‘शिक्षणात शुद्धपण, गंभीरता व ज्यावर दोष ठेवता येणार नाही असे [त्यांचे] बोलणे’ ठेवावे (पंडिता रमाबाई भाषांतर). ‘शुद्धपणाचे’ शिक्षण देत असताना, ते पूर्णपणे देवाच्या वचनावर आधारित असले पाहिजे. यास्तव, तरुण पुरूषांनी पवित्र शास्त्राचे परिश्रमी विद्यार्थी असणे आवश्यक आहे. वृद्ध पुरूषांप्रमाणे, तरुण पुरूषांनी देखील गंभीर असले पाहिजे. त्यांनी हे जाणले पाहिजे की देवाच्या वचनाचा सेवक होणे म्हणजे गंभीर जबाबदारी उचलणे होय. यास्तव, त्यांनी “सुवार्तेस शोभेल असे आचरण” ठेवले पाहिजे. (फिलीप्पैकर १:२७) अशाचप्रकारे, त्यांचे बोलणे “ज्याला दोष लावता येत नाही असे” “सद्भाषण” असले पाहिजे जेणेकरून ते, विरोध करणाऱ्यांना त्यांच्याविषयी काहीही वाईट बोलण्यास जागा राहणार नाही.—२ करिंथकर ६:३; १ पेत्र २:१२, १५.
दास आणि चाकरांसाठी
१९, २०. दुसऱ्या लोकांच्या हाताखाली काम करणारे, “आपला तारणारा, देव ह्याच्या शिक्षणास शोभा” कशी आणू शकतात?
१९ शेवटी, पौल, दुसऱ्या लोकांखाली काम करणाऱ्यांविषयी बोलतो. कृपया तीत २:९, १० वाचा. आज आमच्यातील अनेक जण दास किंवा चाकर नाहीत. परंतु अनेक इतरांच्या हाताखाली काम करणारे कर्मचारी व मजूर आहेत. यास्तव, पौलाने जी तत्त्वे दिली आहेत ती आजही लागू होतात.
२० ‘सर्व प्रकारे आपल्या धन्याच्या अधीन रहावे’ याचा अर्थ असा होतो की, ख्रिस्ती कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मालकांना व देखरेख्यांना प्रामाणिक आदर दाखवला पाहिजे. (कलस्सैकर ३:२२) त्यांनी, त्यांच्या मालकाचे देणे म्हणून संपूर्ण दिवसाचे काम देणारे, ईमानदार कामकरी म्हणून नाव कमवले पाहिजे. शिवाय ते कोठेही काम करणारे असोत, तेथे काम करणाऱ्या इतरांच्या वर्तणूकीची पर्वा न करता त्यांनी ख्रिस्ती वर्तणूकीचे उच्च दर्जे कायम टिकून ठेवले पाहिजेत. हे सर्व काही, “आपला तारणारा देव ह्याच्या शिक्षणास शोभा” आणण्यासाठी करण्यास हवे. आपण कितींदा तरी, निरीक्षण करणाऱ्या प्रामाणिक लोकांनी, त्यांच्यासोबत काम करणारे साक्षीदार सहकर्मचारी किंवा नोकरी करणाऱ्यांच्या उत्तम वर्तणूकीमुळे सत्याला प्रतिसाद दिल्याच्या आनंदी परिणामांबद्दल ऐकतो! जे त्यांच्या कामाच्या ठिकाणी देखील त्याच्या सुशिक्षणानुसार चालतात अशांना यहोवाने बहाल केलेला हा मोबदला आहे.—इफिसकर ६:७, ८.
शुद्ध लोक
२१. यहोवाने सुशिक्षण कशासाठी पुरवले आहे, आणि आम्ही त्याला कसा प्रतिसाद द्यावा?
२१ पौलाने स्पष्ट केलेले सुशिक्षण नीतीविषयक तत्त्व किंवा नैतिक मूल्यांची केवळ एक साधी नियमावली नाही जी की आम्हाला वाटेल तेव्हा तिचा सल्ला घेऊ शकतो. पौलाने त्याच्या उद्देशाबद्दलचे स्पष्टीकरण दिले आहे. कृपया तीत २:११, १२ वाचा. यहोवा देवाने, आमच्याबद्दल त्याचे प्रेम आणि अपात्री कृपेमुळे सुशिक्षण पुरविले आहे जेणेकडून आम्ही या कठीण आणि धोकादायक काळी एक उद्देशपूर्ण आणि समाधानी जीवन जगू शकतो. तुम्ही सुशिक्षणाचा स्वीकार करण्यास व त्याला तुमच्या जीवनाचा मार्ग बनवण्यास तयार आहात का? असे करणे म्हणजे तुमचे तारण होय.
२२, २३. आम्ही सुशिक्षणाला आमच्या जीवनाचा मार्ग बनवल्याने कोणत्या आशीर्वादांची कापणी करतो?
२२ याहूनही अधिक म्हणजे, सुशिक्षणाला आमच्या जीवनाचा मार्ग बनवल्यामुळे आमच्यासाठी आता एक अद्वितीय विशेषाधिकार आणि भवितव्यासाठी एक आनंदी आशा मिळू शकते. कृपया तीत २:१३, १४ वाचा. खरेच, सुशिक्षणाला आमच्या जीवनाचा मार्ग केल्याने, ते आम्हाला शुद्ध लोक या नात्याने, भ्रष्ट आणि मरणोन्मुख होणाऱ्या जगापासून वेगळे ठेवते. पौलाचे शब्द, मोशेने सिनाय पर्वतावर इस्त्राएल पुत्रांना आठवण करून दिलेल्या शब्दांसारखे आहेत: ‘परमेश्वर [यहोवा, NW] त्याने निर्माण केलेल्या सर्व राष्ट्रांपेक्षा प्रशंसा, नावलौकिक आणि सन्मान ह्या बाबतीत त्याला श्रेष्ठ करील आणि तू त्याच्या म्हणण्याप्रमाणे परमेश्वर [यहोवा, NW] आपला देव ह्याची प्रजा होशील.’—अनुवाद २६:१९, २०.
२३ आम्ही, सुशिक्षणाला आमच्या जीवनाचा मार्ग करून यहोवाचे शुद्ध लोक होण्याच्या विशेषाधिकाराला जपून ठेवू या! कोणत्याही प्रकारच्या अभक्तीला व जीवनाच्या वासनांना नाकारण्यास जागृत राहा. अशाप्रकारे आम्ही आज यहोवाने आमचा उपयोग महान कार्यात करून घ्यावा यासाठी शुद्ध व योग्यतेचे होऊ शकतो.—कलस्सैकर १:१०.
तुम्हास आठवते का?
▫ ईश्वरी भक्ती सर्व गोष्टींसाठी लाभदायक का आहे?
▫ वृद्ध पुरूष आणि स्त्रिया सुशिक्षणाला जीवनाचा मार्ग बनवण्यासाठी त्याचा पाठलाग कसा करतील?
▫ पौलाने मंडळीतील तरुण पुरूष आणि स्त्रियांसाठी कोणते सुशिक्षण दिले?
▫ आम्ही जर सुशिक्षणाला आमच्या जीवनाचा मार्ग बनवला तर कोणता विशेषाधिकार व आशीर्वाद आमचा होईल?
[१८ पानांवरील चित्रं]
आज अनेक जण तीत २:२-४ मधील सल्ला लागू करतात