वाचकांचे प्रश्न
इब्रीयांस ४:१५, १६ मध्ये उल्लेखित केलेल्या ख्रिस्त येशूच्या महायाजकीय सेवांचा लाभ “दुसरी मेंढरे” यांना आता कशाप्रकारे लागू होतात?
येशूची महायाजकाची भूमिका, त्याच्याबरोबर स्वर्गामध्ये असणाऱ्यांसाठी प्रामुख्याने महत्त्वाची असली तरी, पार्थिव आशा असलेल्या ख्रिश्चनांना येशूच्या याजकीय सेवांचा लाभ आताही होतो.
आदामापासून, मानवांवर पापाचे ओझे लादण्यात आले आहे. इस्राएली लोकांप्रमाणे आपणही वारसाने मिळालेले अपूर्णत्व सहन करतो. ते महायाजकांच्या आणि सहयाजकांच्या परंपरेकडे वळाले ज्यांनी स्वतःच्या तसेच लोकांच्या पापांसाठी बलिदाने अर्पिली. कालांतराने, येशूचा “मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे” याजक म्हणून अभिषेक करण्यात आला. पुनरुत्थान झाल्यानंतर, येशू त्याच्या परिपूर्ण मानवी अर्पणाची किंमत सादर करण्यासाठी यहोवासमोर प्रगट झाला.—स्तोत्र ११०:१, ४.
याचा आज आपल्यासाठी काय अर्थ होतो? इब्रीयांस पत्र लिहिताना पौलाने येशूची महायाजक या नात्याने असलेल्या सेवेची चर्चा केली आहे. इब्रीयांस ५:१ मध्ये आपण वाचतो: “प्रत्येक प्रमुख याजक मनुष्यांमधून घेतलेला असून देवविषयक गोष्टींबाबत मनुष्यांकरिता नेमिलेला असतो; ह्यासाठी की, त्याने दाने व पापाबद्दल यज्ञ ही दोन्ही अर्पावी.” मग ५ आणि ६ वचनात पौलाने दाखवले, की येशू महायाजक झाला ज्यामुळे आपल्या सर्वांना लाभ मिळू शकतात.
ते कसे काय? पौलाने लिहिले: “तो पुत्र असूनहि त्याने जे दुःख सोसले तेणेकरून तो आज्ञाधारकपणा शिकला; आणि परिपूर्ण केला जाऊन तो आपल्या आज्ञेत राहणाऱ्या सर्वांचा युगानुयुगीच्या तारणाचा कर्ता झाला.” (इब्रीयांस ५:८, ९) हे वचन, नव्या जगामध्ये देवाला आणि येशूला निष्ठावान राहिलेल्यांची पापी अवस्था काढून टाकण्यात येईल व त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त होईल तेव्हा आपल्याला कसा लाभ होईल, असा सुरवातीला आपल्याला विचार करावयास लावेल. ही सबळ आशा, येशूच्या बलिदानाच्या विमोचन मूल्यावर तसेच महायाजक या नात्याने त्याच्या सेवेवर आधारित आहे.
खरे पाहता, महायाजक या नात्याने असलेल्या त्याच्या सेवेपासून आणि भूमिकेपासून आपल्याला आता लाभ मिळवता येतो. इब्रीयांस ४:१५, १६ याकडे लक्ष द्या: “आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूति वाटत नाही, असा आपला प्रमुख याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता; तरी निष्पाप राहिला. तर मग, आपल्यावर दया व्हावी आणि ऐनवेळी साहाय्यासाठी कृपा [अपात्री कृपा] मिळावी, म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ.” ती ‘ऐनवेळ’ केव्हा येईल? आपल्याला दया व अपात्री कृपेची गरज लागते तेव्हा. आपल्या सर्वांना आपल्या अपरिपूर्णतेमुळे आता असे वाटले पाहिजे.
इब्रीयांस ४:१५, १६ हा मुद्दा स्पष्ट करतो की येशू—जो स्वर्गामध्ये आता राजा आहे—एके काळी मानव होता म्हणून तो सहानुभूती दाखवू शकतो. कोणासाठी? आपल्यासाठी. केव्हा? आता. मानव असताना येशूने मानवांसाठी सर्वसाधारण असलेले तणाव आणि दबाव अनुभवले. एके प्रसंगी येशूला भूक आणि तहान लागली होती. शिवाय परिपूर्ण असूनही त्याला थकवा आला. यातून आपल्याला दिलासा मिळाला पाहिजे. का बरे? येशूने स्वाभाविक थकवा अनुभवल्यामुळे, आपल्याला बहुधा कसे वाटते याची त्याला जाणीव आहे. हेही लक्षात ठेवा, की येशूला त्याच्या प्रेषितांमधील मत्सरी भांडणाला तोंड द्यावे लागले. (मार्क ९:३३-३७; लूक २२:२४) होय, तोही निरुत्साहित झाला होता. म्हणून आपण जेव्हा निराश, निरुत्साहित होतो तेव्हा तो आपल्याला समजून घेतो याची आपल्याला खात्री होत नाही का? निश्चितच.
तुम्ही निरुत्साहित होता तेव्हा काय करू शकता? नव्या जगात तुमचा महायाजक येशू तुम्हाला मन आणि शरीराने परिपूर्ण होण्यास मदत करीपर्यंत तुम्हाला थांबून राहावे लागेल असे पौलाने म्हटले का? नाही. पौलाने म्हटले: ‘आपल्यावर दया होईल आणि ऐनवेळी साहाय्यासाठी कृपा’ मिळेल आणि त्यावेळेमध्ये सध्याच्या परिस्थितीचा देखील समावेश आहे. शिवाय, येशू मानव असताना त्याने दुःख आणि संकटाचा अनुभव घेतला, “तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता.” यास्तव, आपण अशा गोष्टींना तोंड देतो तेव्हा आपण काय अनुभवत आहोत याची त्याला जाणीव होते आणि तो आपल्याला मदत करण्यास तयार आहे. यामुळे तुम्हाला त्याच्या जवळ जावेसे वाटत नाही का?
आता १६ व्या वचनाकडे लक्ष द्या. पौल म्हणतो की आपण—म्हणजेच अभिषिक्त लोक आणि दुसरी मेंढरे—देवाकडे मनमोकळेपणाने जाऊ शकतो. (योहान १०:१६) प्रेषिताचा म्हणण्याचा अर्थ असा नाही, की आपण प्रार्थनेमध्ये, क्रोधीष्ट होऊन, अनादरयुक्त गोष्टी हव्या तशा बोलू शकतो. तर, येशूच्या बलिदानावर आणि महायाजक या नात्याने त्याच्या भूमिकेच्या आधारावर पापी असलो तरी आपण देवाशी बोलू शकतो.
आपला महायाजक येशू ख्रिस्त याच्या सेवेतून आताही लाभ मिळवण्याच्या आणखी एका मार्गात आपल्या पातकांचा किंवा चुकांचा समावेश आहे. सध्याच्या व्यवस्थीकरणात येशू त्याच्या बलिदानाची पूर्ण किंमत आपल्यासाठी लागू करील अशी आपण अपेक्षा करू शकत नाही. आणि जरी त्याने लागू केले तरी आपल्याला सार्वकालिक जीवन मिळाले नसते. लूक ५:१८-२६ मध्ये, एका पक्षघाती माणसाला बाजेसकट कौलारातून खाली सोडल्याची लिखित घटना आठवते का? येशूने त्याला म्हटले: “हे मनुष्या, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.” त्याचा अर्थ असा होत नाही, की काही विशिष्ट पापांमुळे त्याला तो पक्षघात झाला होता. त्याचा अर्थ कदाचित मानवाचे सर्वसामान्य पाप असाही होऊ शकतो शिवाय काही प्रमाणात दुःखाला कारणीभूत ठरलेली वारसाने मिळालेली अपरिपूर्णता याचाही त्यात समावेश असू शकतो.
प्रायश्चित्ताच्या दिवशी इस्राएलचे पाप वाहून नेणाऱ्या बकऱ्याप्रमाणे [आजाजेल] येशू जे अर्पण देणार होता त्याच्यावर आधारित तो मानवाची सर्व पापे काढून टाकणार होता. (लेवीय १६:७-१०) तरीही, तो पक्षघाती मनुष्य एक मानवच होता. तो पुन्हा पाप करू शकत होता आणि कालांतराने इतर पापी लोकांप्रमाणे तोही मरण पावला. (रोमकर ५:१२; ६:२३) येशूने जे म्हटले त्याचा अर्थ त्या मनुष्याला लागलीच सार्वकालिक जीवन मिळाले असा नाही. परंतु या मनुष्याला त्या समयासाठी काही प्रमाणात क्षमा करण्यात आली.
आता आपल्या परिस्थितीचा विचार करा. अपरिपूर्ण असल्यामुळे आपण दररोज चुका करतो. (याकोब ३:२) त्याबद्दल आपण काय करू शकतो? स्वर्गामध्ये आपला एक दयावान महायाजक आहे ज्याच्याद्वारे आपण यहोवाकडे प्रार्थनेद्वारे जाऊ शकतो. होय, पौलाने लिहिल्याप्रमाणे ‘आपल्यावर दया व्हावी आणि ऐनवेळी साहाय्यासाठी अपात्री कृपा मिळावी, म्हणून आपण मनमोकळेपणाने कृपेच्या [देवाच्या] राजासनाजवळ जाऊ’ शकतो. परिणामी, दुसरी मेंढरे असलेल्या सर्वांना ख्रिस्ताच्या महायाजकीय सेवेतून निश्चितच आश्चर्यकारक लाभ मिळत आहेत ज्यामध्ये शुद्ध विवेकाचा देखील समावेश आहे.
पार्थिव आशा असलेले सर्व ख्रिस्ती, येणाऱ्या नव्या जगातील महान लाभांची वाट पाहू शकतात. तेव्हा आपला स्वर्गीय महायाजक, पापांची पूर्णपणे क्षमा करून त्याच्या बलिदानाची पूर्ण किंमत लागू करील. लोकांच्या शारीरिक आणि आध्यात्मिक आरोग्याची काळजी घेण्याद्वारे देखील तो पुष्कळ लाभ देईल. इस्राएलमध्ये याजकांची नियमशास्त्र शिकवण्याची प्रमुख जबाबदारी असल्याकारणाने, येशू पृथ्वीवरील देवाच्या लोकांचे शिक्षण मोठ्याप्रमाणात विस्तृत करील. (लेवीय १०:८-११; अनुवाद २४:८; ३३:८, १०) यास्तव, आताच आपल्याला येशूच्या महायाजकीय सेवांद्वारे इतका लाभ होतो तर भवितव्यामध्ये किती अधिक प्रमाणात होईल बरे!