वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w89 १०/१ पृ. १०-१५
  • देवाने नेमलेल्या न्यायधिशाकरवी सर्वांसाठी न्याय

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देवाने नेमलेल्या न्यायधिशाकरवी सर्वांसाठी न्याय
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • कोणत्या प्रकारची न्यायशक्‍ती व न्यायबुद्धी?
  • न्यायनिवाड्याचा “एक दिवस”—कधी?
  • गतकाळातील अन्याय मिटवले गेले
  • यहोवाचे अनुकरण करा—न्यायानुसार आणि धार्मिकतेनुसार वागा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • यहोवा—खऱ्‍या न्यायाचा आणि धार्मिकतेचा स्रोत
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • यहोवा धार्मिकता आणि न्याय यांचा चाहता
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • सर्व राष्ट्रांसाठी लवकरच न्याय
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
w89 १०/१ पृ. १०-१५

देवाने नेमलेल्या न्यायधिशाकरवी सर्वांसाठी न्याय

“पिता पुत्रावर प्रीती करतो, आणि . . . सर्व न्याय करण्याचे काम त्याने पुत्राकडे सोपून दिले आहे.”—योहान ५:२०, २२.

१. तुम्ही आज कोणत्या प्रश्‍नांना तोंड देत आहात ज्यांना पहिल्या शतकातील लोकांनी तोंड दिले होते?

न्याय हा आपणासाठी केवढ्या महत्त्वाचा आहे? खऱ्‍या न्यायप्राप्तीची खात्री करण्यासाठी आणि जेव्हा सबंध पृथ्वीवर तो प्रचलित असेल त्या काळात जिवंत असण्याकरता तुम्ही केवढे प्रयास करीत असणार? या प्रश्‍नांबद्दल विचार करणे हे अथैने, ग्रीकमधील पुरुष व स्त्रियांकरता जसे होते तसेच आपणाकरताही केवढे आवश्‍यक आहे हे विचारात घ्या.

२, ३. (अ) पौलाने दिलेल्या हाकेत असे काय होते ज्याने त्याच्या अथैनेतील श्रोत्यांना पश्‍चाताप करण्याप्रत निरविले? (ब) त्या श्रोत्यांना पश्‍चाताप हा एवढा नवीन का वाटला?

२ त्या लोकांनी, अरायोपगेसच्या मशहूर न्यायालयात ख्रिस्ती प्रेषित पौलाने जे संस्मरणीय भाषण दिले होते ते ऐकले होते. प्रथम, त्याने जो सृष्टीकर्ता, एकमेव देव व ज्याच्यावर आम्ही सर्व जीवनाकरता अवलंबून आहोत त्याच्या अस्तित्वाचे समर्थन केले. यामुळे, आम्ही सर्व या देवास जबाबदार आहोत या तर्कशुद्ध निर्णयाप्रत निरवले गेले. या मुद्याविषयी पौलाने जोरदारपणे म्हटलेः “अज्ञानाच्या काळांची [जसे मनुष्य मूर्तिपूजा करीत] देवाने उपेक्षा केली, परंतु आता सर्वांनी सर्वत्र पश्‍चाताप करावा अशी तो मनुष्यांस आज्ञा करतो.”—प्रे. कृत्ये १७:३०.

३ त्या श्रोतेजनांकरिता पश्‍चाताप ही आश्‍चर्यकारक धक्का देणारी गोष्ट होती हे स्पष्ट आहे. का बरे? कारण प्राचीन ग्रीक लोकांना पश्‍चाताप म्हणजे कोणा कृतीमुळे किंवा विधानामुळे वाटणारी दुःखद भावना एवढाच अर्थ ज्ञात होता. एक ज्ञानकोश हे स्पष्ट करतो की, हा शब्द, “मानसिक चित्तवृत्ती कायपालट करणे; जीवनाच्या मार्गदर्शनात आमूलाग्र बदल करणे, परिवर्तन घडविणे जे सबंध वागणूकीवर परिणाम करणारे असतात, असे काही सूचवीत नाही.”

४. पश्‍चातापाबद्दल पौलाच्या विधानाला कोणत्या युक्‍तीवादाचा पाठिंबा होता?

४ तरीही यात काय संशय की गंभीरतेतील हा पश्‍चाताप केवढा यथायोग्य आहे. पौलाचा युक्‍तीवाद समजून घ्या. सर्व मनुष्यांठायीचे जीवन देवाकडून आहे, यास्तव सर्वजण त्याला जबाबदार आहेत. मग, देवासाठी हेच केवळ बरोबर आणि न्यायत्वाचे आहे की त्याचा लोकांनी शोध करावा व त्याच्याविषयीचे ज्ञान प्राप्त करावे हे तो त्यांच्याकडून अपेक्षित असतो. जर त्या अथैनेकरांना त्याची नीतीतत्वे व इच्छा ही ज्ञात नव्हती तर ती त्यांनी शिकण्याची व त्यांचे जीवन त्याच्या एकमतात आणण्यासाठी पश्‍चाताप करण्याची गरज होती. हे करणे, आपल्या सोयीनुसार करु यावर अवलंबून नव्हते. असे का ते आपल्याला पौलाच्या जोरदार समारोपाकरवी समजू शकते. तो म्हणतोः “कारण त्याने असा एक दिवस नेमस्त केला आहे की त्या दिवशी आपण नेमिलेल्या मनुष्याच्या द्वारे तो जगाचा न्यायनिवाडा नीतीमत्वाने करवील; त्याने त्याला मेलेल्यामधून उठवून याविषयीचे प्रमाण सर्वांस पटविले आहे.”—प्रे. कृत्ये १७:३१.

५. पौलाच्या भाषणावर श्रोत्यांची प्रतिक्रिया काय होती व का?

५ हे वचन, एवढे अर्थपूर्ण व एवढे जोरदार आहे की, आम्ही त्याचे बारकाईने संशोधन केलेच पाहिजे. कारण आमच्याच काळात लाभणाऱ्‍या खऱ्‍या न्यायाची आशा ते प्रज्वलित करते. काही शब्द लक्षात घ्याः “एक दिवस नेमलेला आहे,” “जगाचा न्यायनिवाडा,” “नीतीमत्वाने,” “आपण नेमिलेल्या मनुष्याच्या द्वारे,” “याविषयीचे प्रमाण,” “त्याला मेलेल्यामधून उठवून.” त्या शब्दांनी की, “त्याला मेलेल्यामधून उठवून,” पौलाच्या श्रोत्यात मोठी खळबळ उडविली. जसे ३२ ते ३४ वचने दाखवितातः “कित्येकांनी थट्टा केली.” कित्येक चर्चा सोडून निघून गेले. तरी काहींनी पश्‍चाताप करुन विश्‍वास धरला. यास्तव, आपणही त्या अथैनेकर श्रोत्यांच्या बहुसंख्यांकापेक्षा अधिक सूज्ञपणा अनुसरु या कारण आम्ही जर खऱ्‍या न्याय प्राप्तीची अपेक्षा करतो तर हे करणे अत्यंत महत्वाचे आहे. ३१ वचनाचा सखोल अर्थ समजावून घेण्यात प्रथम आपण पाहू कीः “तो जगाचा न्यायनिवाडा . . . करवील,” यापासून काय अर्थबोध होतो. हा “तो” कोण आणि त्याचे आदर्श, खासकरुन न्यायत्वाच्या बाबतीत कोणकोणते आहेत?

६. ज्याने जगाचा न्यायनिवाडा करण्यास एक दिवस नेमस्त केला आहे त्याच्याबद्दल आम्ही कसे शिकू शकतो?

६ तसे पाहता, प्रे. कृत्ये १७:३० मध्ये पौलाने हे स्पष्ट केले आहे की कोणास उद्देशून तो बोलत आहे—हा तोच देव जो आम्हास पश्‍चाताप करण्यास सांगत आहे, तोच आमचा जीवनदाता, सृष्टीकर्ता आहे. मग हे स्वाभाविक आहे की देवाबद्दलची अधिक माहिती आम्हास सृष्टीकर्त्याकडूनच प्राप्त होणार. पण त्याच्या न्यायत्वाचे आदर्श केवळ यातूनच नव्हे तर काही खास प्रकारांनी दुसऱ्‍या उगमातही, पवित्र शास्त्रात सापडतात. यात तो मोशेसारख्या व्यक्‍तींशी कसे दळणवळण राखून होता ते व इस्राएलांना देवाने दिलेल्या नियमशास्त्राचाही उल्लेख आहे.

कोणत्या प्रकारची न्यायशक्‍ती व न्यायबुद्धी?

७. मोशाने यहोवा व त्याच्या न्यायाबद्दल काय साक्ष दिली आहे?

७ तुम्हाला कदाचित या गोष्टीचा परिचय असेल की, यहोवा देव मोशेसोबत कैक दशके अगदी निकट संबंध राखून होता. हे संबंध इतक्या जवळचे होते की, देवाने म्हटले, मी मोशाशी जणू “समोरासमोर” बोलत असे. (गणना १२:८) देव त्याच्याशी तसेच सबंध राष्ट्राशी कसे दळणवळण ठेऊन होता तसेच इतर मानवांशी व राष्ट्रांशी तो कसे व्यवहार ठेवतो हे मोशे जाणून होता. आपल्या आयुष्याच्या अखेरीस मोशेने हा आत्मविश्‍वास व्यक्‍त केला की, “तो दुर्ग आहे; त्याची कृति अव्यंग आहे. त्याचे सर्व मार्ग न्यायाचे आहेत. तो सत्य देव आहे, त्याच्याठायी अर्धम नाही, तो न्यायी व सरळ आहे.”—अनुवाद ३२:४.

८. न्यायाबद्दल अलिहूने जे काही म्हटले ते आम्ही लक्षात का घ्यावे?

८ तसेच अलिहू, जो गृहस्थ त्याजठायीच्या सूज्ञानतेबद्दल आणि आकलनशक्‍तीसाठी नावाजलेला होता; त्याच्या सत्य साक्षीला देखील विचारात घ्या. तो घाईने निर्णय घेणारा व्यक्‍ती नाही असे आपण त्याच्याविषयी खात्रीने म्हणू शकतो. एका प्रकरणी तर तो आठवड्यापेक्षा अधिक दिवस शांतचित्त बसून दोन्ही बाजूंचे ऐकत होता. आता, अलिहूच्या स्वानुभवानुसार व देवाच्या मार्गाचा त्याने जो अभ्यास केला होता त्यानुसार, देवाबद्दलच्या कोणत्या निर्णयास तो येऊन पोहंचला? त्याने घोषित केलेः “याकरता, समंजस जनहो, माझे ऐकून घ्या. देवाकडून दुष्कर्म व्हावे, सर्वसमर्थाकडून अन्याय व्हावा, ही कल्पनाही करावयाला नको. तो मनुष्याला त्याच्या कर्मांचे प्रतिफळ देतो. प्रत्येकास त्याच्या त्याच्या आचाराप्रमाणे गती देतो. देव निःसंशय काही वाईट करीत नाही; सर्वसमर्थ प्रभु विपरीत न्याय करीत नाही.”—ईयोब ३४:१०-१२.

९, १०. देवाने मानवी न्यायधिशांकरता जे दर्जे घालून दिले आहेत त्यांच्यामुळे आम्हास उत्तेजनपर का वाटावे? (लेवीय १९:१५)

९ स्वतःस विचाराः आम्ही सर्व कोणा एका न्यायधिशाकडून जे अपेक्षितो ते सर्व केवढ्या उत्तम प्रकारे यात वर्णिलेले आहे, नाही का; की ते निःपक्षपातीपणे किंवा न्यायनिर्णयात कोणताही बदल न करता प्रत्येक व्यक्‍तीस त्याच्या वागणूकीनुसार किंवा कृतीनुरुप वागवितील? आपणास जर कोणा मानवी न्यायधिशासमोर उभे राहणे आहे तर ते तसे असल्यास आपणास बरे वाटणार नाही का?

१० पवित्र शास्त्र यहोवास “सर्व जगाचा नियंता” असे संबोधते. (उत्पत्ती १८:२५) तरीपण काही काळात त्याने मानवी न्यायधिशांचा देखील उपयोग केला. ज्यांनी त्याचे प्रतिनिधित्व केले त्यांच्याकडून तो काय अपेक्षित होता? अनुवाद १६:१९, २० मध्ये आम्हास जे देवाकडील मार्गदर्शन वाचावयास मिळते ते न्यायधिशांवरील कर्तबगारी विवेचीत करतेः “विपरीत न्याय करु नये, पक्षपात करु नये आणि लांच घेऊ नये; कारण लांच शहाण्याचे डोळे अंधळे करते आणि धार्मिकांचे निर्णय विपरीत करते. न्याय आणि केवळ न्यायाचीच कास धर म्हणजे तू जिवंत राहशील.” न्यायदेवतेचे आधुनिक पुतळे अगदी उत्कटपणे हे शब्दचित्र रेखाटतात की, निपक्षपातीपणा दाखविण्यासाठी तिचे डोळे बांधलेले आहेत; पण आपण पाहतो की, देव याच्याही फार पुढे गेलेला आहे. प्रत्यक्षात तो अशाप्रकारच्या निपक्षपातीपणाची, जे त्याचे प्रतिनिधित्व करतात व त्याचे कायदे बजावतात त्या मानवी न्यायधिशांकडून त्याची मागणी करतो.

११. न्यायाविषयीच्या या पवित्र शास्त्र माहितीची उजळणी केल्यामुळे आम्ही कोणत्या निर्णयास पोहंचू शकतो?

११ न्यायत्वाबद्दल देवाच्या दृष्टीकोनाचा हा तपशील, पौलाच्या भाषणातील शेवटच्या जोरदार समर्थनावर थेट परिणाम व्यक्‍त करतो. प्रे. कृत्ये १७:३१ मध्ये पौल घोषित करतो की, देवाने “एक दिवस नेमस्त केला आहे की, त्या दिवशी . . . तो जगाचा न्यायनिवाडा नीतीमत्वाने करवील.” अगदी हेच आम्ही देवाकडून अपेक्षू शकतो—न्याय, नीतीमत्व आणि निपक्षपातीपणा. तरीही काही लोक कदाचित विवंचनेत असतील कारण ३१ व्या वचनानुसार देव, सबंध मानवजातीचा न्याय करण्यास एका “मनुष्याचा” उपयोग करुन घेणार. मग हा “मनुष्य” कोण व आम्हाला याची काय खात्री असेल की तो देवाकडील न्यायाच्या मूल्यांना उंचावून धरणार?

१२, १३. न्याय करण्यास देव कोणत्या “मनुष्या”चा उपयोग करणार हे आम्ही कसे जाणू शकतो?

१२ प्रे. कृत्ये १७:१८ आम्हास सांगते की, पौल “येशू व पुनरुत्थान यांविषयी सुवार्ता गाजवीत असे.” यास्तव त्याच्या भाषणात, पौल जेव्हा असे म्हणाला की, देव ‘जगाचा न्यायनिवाडा नीतीमत्वाने, आपण नेमिलेल्या एका मनुष्याच्या द्वारे करील, व त्याला देवाने मृतातून उठविले आहे,’ तेव्हा तो येशू ख्रिस्तास उद्देशून बोलत आहे हे त्याचे श्रोते जाणत होते.

१३ स्वतः येशूने ही ओळख दिली होती की, देवाने, ईश्‍वरी आदर्शांना कसोशीने उंचावतो असा न्यायाधीश म्हणून त्याची नेमणूक केली आहे. योहान ५:२२ मध्ये त्याने म्हटलेः “पिता कोणाचाही न्याय करीत नाहीत, तर सर्व न्याय करण्याचे काम त्याने पुत्राकडे सोपविले आहे.” जे सर्व कबरेत आहेत त्यांच्या पुनरुत्थानाचा उल्लेख केल्यानंतर, येशूने पुढे म्हटलेः “माझ्याने स्वतः होऊन काही करवत नाही; जसे मी ऐकतो, तसा मी न्यायनिवाडा करतो; आणि माझा न्यायनिवाडा यथार्थ आहे; कारण मी आपली इच्छा नव्हे तर ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावयास पाहतो.”—योहान ५:३०; स्तोत्रसंहिता ७२:२-७.

१४. येशूकडून आम्ही कोणत्या प्रकारच्या वागणूकीची अपेक्षा करु शकतो?

१४ हे विश्‍वस्त विधान, आम्ही जे काही प्रे. कृत्ये १७:३१ मध्ये वाचतो त्याच्याशी केवढ्या चांगल्या रितीने जुळणारे आहे! तेथे पौलाने ही खातरी दिली की, पुत्रच “जगाचा न्यायनिवाडा नीतीमत्वाने करवील.” तो कोणाही प्रकारे कडक, न वळणारा, आणि निष्ठुर न्याय असेल असे त्यात मुळीच सूचित नाही. होना! उलट नीतीमान न्यायात दया आणि सहानुभूति यांच्यासह नेमस्त न्याय समाविष्ट असतो. आपण याकडे दुर्लक्ष करु नये कीः जरी येशू आता स्वर्गात असेल तरीही तो मनुष्यप्रकृतीत देखील होता. याकारणास्तव त्याला निश्‍चितच सहानुभूति, कळवळा असणार. इब्रीयांस ४:१५, १६ मध्ये पौल येशूचे महायाजक या नात्याने वर्णन करण्यात या मुद्यावर अधिक जोर देतो.

१५. येशू हा मानवी न्यायाधिशांपेक्षा वेगळाच कसा ठरतो?

१५ इब्रीयांस ४:१५, १६ वाचताना हा विचार मनात येतो की, येशू हा न्यायधीश असणार त्यावेळी आम्हाला केवढ्या मुक्‍ततेचे वाटू लागेल. “कारण ज्याला आपल्या अशक्‍तपणाचे दुःख वाटत नाही, असा आपला प्रमुख याजक [व न्यायाधीश] नाही. तर तो सर्वप्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता; तरी निष्पाप राहिला. आपल्याला दया प्राप्त व्हावी आणि गरजेच्या वेळी सहाय्य होण्यासाठी कृपा मिळावी म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ.” आज न्यायालयात न्यायाधिशांच्या स्थानकासमोर जाण्यास भय वाटते. तेच स्वतः न्यायाधीश असणारा ख्रिस्त याच्याकडून ‘दया, कृपा आणि गरजेच्या वेळी सहाय्य प्राप्त व्हावे म्हणून मुक्‍तपणे विचार मांडू शकतो.’ परंतु काळाबद्दल म्हटल्यास आपल्याला हे विचारण्याचे रास्त कारण आहे की, न्यायाधीश येशू कधी जगाचा न्यायनिवाडा नीतीमत्वाने करणार?

न्यायनिवाड्याचा “एक दिवस”—कधी?

१६, १७. स्वर्गातून न्यायनिवाडा करण्याचे काम चालू आहे हे आम्ही कसे जाणतो?

१६ हे आठवा की पौलाने म्हटले होते की, देवाने आपण नेमिलेल्या न्यायाधिशाकरवी जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी “एक दिवस नेमस्त केला आहे.” न्यायनिवाड्याच्या त्या ‘दिवसा’च्या अपेक्षेत येशू आज एक विशिष्ट न्यायअधिष्ठित काम करीत आहे. होय, याच काळात! असे आम्ही का म्हणू शकतो? येशूला अटक करुन अन्यायाने वधण्याआधी त्याने असा एक ऐतिहासिक भविष्यवाद दिला होता, ज्यात आमचा काळ गोविलेला होता. तो आम्हास मत्तय अध्याय २४ मध्ये आढळतो. येशूने “युगाच्या समाप्ती”चा काळ म्हटलेल्या समयात कोणत्या जागतिक घटना घडतील त्यांचे वर्णन केले आहे. पहिल्या जागतिक महायुद्धापासून, सबंध पृथ्वीवर जी युद्धे, दुष्काळ, भूकंप आणि इतर संकटे घडली ती सर्व हा पुरावा देतात की, येशूच्या भविष्यवादाची या काळात पूर्णता होत आहे व लवकरच “शेवट होईल.” (मत्तय २४:३-१४) आज कित्येक दशके यहोवाचे साक्षीदार हेच पवित्र शास्त्रातून समजावून सांगत आहेत. या अन्यायी युगाच्या शेवटल्या दिवसात आपण आहोत हे आम्ही कसे जाणतो याचे अधिक पुरावे हवे तर यहोवाचे साक्षीदार पुरवू शकतील.

१७ कृपया, मत्तय अध्याय २५ चा उत्तरार्ध तपासून बघा, जो येशूने शेवटल्या दिवसांबद्दल केलेल्या भविष्यवादाचाच भाग आहे. मत्तय २५:३१, ३२ आमच्या काळास लागू आहेः “जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने येईल व त्याजबरोबर सर्व देवदूत येतील तेव्हा तो आपल्या [स्वर्गीय] वैभवी सिंहासनावर बसेल; त्याजपुढे सर्व राष्ट्रे जमविली जातील; आणि जसे मेंढपाळ शेरडांपासून मेंढरे वेगळी करतो तसे तो त्यांस एकमेकांपासून वेगळे करील.” आता या वेगळे करण्याच्या किंवा न्याय करण्याच्या त्याच्या कामाचा परिणाम काय होणार हे येशू कोठे सांगतो हे जाणण्यास खाली ४६ व्या वचनात पाहूः “ते [ज्यांचा शेरडे म्हणून न्याय झाला ते] तर सार्वकालिक दंड भोगावयास जातील आणि धार्मिक लोक [मेंढरे] सार्वकालिक जीवन भोगावयास जातील.”

१८. आमच्या काळात होणाऱ्‍या न्यायाचे काम आम्हाला कोठे नेऊन पोहंचवील?

१८ अशाप्रकारे, आम्ही आज, न्यायकाळाच्या निर्णायक काळात जगत आहोत. मग जे आज ‘देवाचा शोध करतात आणि त्याला प्राप्त करतात’ अशांनाच “मेंढरे” म्हणून सद्य युगाच्या शेवटातून बचावून राहण्यालायकतेचे व येणाऱ्‍या नवीन जगात प्रवेश करण्याच्या पात्रतेचे ठरविणारा न्याय दिला जाईल. मग, २ पेत्र ३:१३ चा अनुभव येईल की, “ज्यामध्ये धार्मिकता वास करते असे नवे आकाश व नवी पृथ्वी यांची त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहात आहोत,” त्यात प्रवेश करु. तोच तो “दिवस” जेव्हा पौलाचे, प्रे. कृत्ये १७:३१ मधील शब्द पूर्णपणे लागू पडतील व जगाचा न्यायनिवाडा नीतीमत्वाने होईल.

१९, २०. येणाऱ्‍या न्यायाच्या दिवसाचा कोणावर परिणाम होणार?

१९ तो न्यायाचा दिवस, ज्यांचा आधीच न्याय झालेला असेल व जे नवीन जगात प्रवेश करण्यास पात्र ठरलेले असतील अशा “मेंढरे”समान लोकांस बचावून ठेविण्यासोबतच पुष्कळसे अधिक साध्य करील. आपल्या आठवणीत असेल की, पित्याने आपल्याकडे सर्व न्याय करण्याचे काम सोपविले आहे असे सांगितल्यावर येशूने येणाऱ्‍या पुनरुत्थानाच्या घटनेचा उल्लेख केला होता. तसेच प्रे. कृत्ये १०:४२ मध्ये प्रेषित पेत्रानेही म्हटले आहे की येशू ख्रिस्त “देवाने नेमलेला, जिवंतांचा व मेलेल्यांचा असा न्यायधीश हाच आहे.”

२० अनुषंगिकपणे, प्रे. कृत्ये १७:३१ मध्ये उल्लेखित असणारा “एक दिवस” हा असा नेमस्त काळ असेल की ज्यात देव येशू ख्रिस्ताद्वारे “जगाचा न्यायनिवाडा नीतीमत्वाने” करण्याच्या समयात मृतांचे देखील पुनरुत्थान होईल. ईश्‍वरी सामर्थ्याचा मृत्युवरही विजयप्राप्तीकरता उपयोग केला जात आहे हे पाहण्यात केवढा आनंद वाटेल बरे! कारण हेच टाळण्यात केवढा अन्याय घडलेला आहे. जसे स्वतः येशू ख्रिस्ताच्या बाबतीत घडले त्याचप्रकारे काही लोकांनाही अन्यायीपणाने सरकार किंवा हल्लेखोर शत्रुंच्या हल्ल्यांना बळी पडावे लागले. इतरांनाही चक्रीवादळे, भूकंप, आकस्मिक आगी आणि तत्सम धोक्यांमुळे आपले प्राण गमवावे लागले.—उपदेशक ९:११.

गतकाळातील अन्याय मिटवले गेले

२१. गतकाळातील अन्यायांच्या परिणामांवर नवीन जगात कशी मात केली जाईल?

२१ आम्हास प्रिय असलेल्या व्यक्‍ती परत जिवंत होत असल्याचे पहात आहोत अशी कल्पना करा. याप्रकारे अनेकांना प्रथमच ‘देवाचा शोध करण्याची व त्याला मिळवून घेण्याची’ संधि प्राप्त होईल; मग त्यांच्याही समोर जे “दुसरी मेंढरे” यांच्याकरता एक वरदान आहे तेच “सार्वकालिक जीवन” ध्येय समोर असेल. पुनरुत्थितांपैकी काही, एवढेच काय पण या अन्यायी युगातून बचावलेल्यांपैकीही कित्येक, जे या अन्यायामुळे जन्माचे अपंग, अंधदृष्टी, बहिरे आणि वाचा बधीर झाले आहेत. अशा गोष्टी ‘जेथे धार्मिकता वास करेल’ अशा नवीन जगातही असणार का? यहोवा देवाने निरनिराळे भविष्यवाद करण्याकरता यशयाचा उपयोग केला, ज्यांची शब्दशः भव्य पूर्णता येणाऱ्‍या न्यायाच्या दिवसात होईल. आपण काय अपेक्षू शकतो ते लक्षात घ्याः “तेव्हा अंधांचे नेत्र उघडतील, बहिऱ्‍यांचे कान खुले होतील. तेव्हा लंगडा हरिणाप्रमाणे उड्या मारील; मुक्याची जीभ आनंदाने गजर करील.”—यशया ३५:५, ६.

२२. यशयाचा ६५ वा अध्याय न्यायाविषयी इतका उत्तेजनपर का आहे?

२२ पण या अन्यायामुळे आज चोहोकडे जी अत्यंत कष्टप्र्द अवस्था निर्माण झाली आहे तिच्याबाबत काय? यशया अध्याय ६५ याबाबतची काही संतोषविणारी उत्तरे पुरवितो. यशया ६५:१७ चा २ पेत्र ३:१३ बरोबर पडताळा केल्यास असे सूचित होते की हा अध्यायही त्या समयाकडे बोट दाखवितो जेव्हा की, “नवे आकाश आणि नवी पृथ्वी,” म्हणजेच एका नीतीमान नवीन व्यवस्थीकरणाची स्थापना होईल. तरीही, पण काही दुर्वर्तनी लोकांस ती शांती व न्यायकाळाचा भंग करण्यापासून काय दूर ठेवील? जरा पुढे जाता, यशया ६५ हे ज्याचे रुपांतर एका संकटासमान दिसते त्यापासून सुटका दाखविते.

२३. काही वैयक्‍तीकांसाठी तो न्यायाचा दिवस कोणते परिणाम घडवून आणण्याचा संभव आहे?

२३ या न्यायदिवसाचे काळात येशू, सर्व वैयक्‍तीकांचे, ते सार्वकालिक जीवनास पात्र ठरतात का याचे परिक्षण करीत राहील. काही ठरणार नाहीत. पुरेसा कालावधी, जसे “शंभर वर्षांचा” काळ, देवाचा शोध करण्यास देऊनही, धार्मिकता अनुसरण्याचे स्पष्ट नाकारुन काही लोक ही हट्टवादी चित्तवृती व्यक्‍त करतील. मग जसे, आपण यशया ६५:२० मध्ये पाहू त्याप्रमाणे ते न्यायानुसार नवीन जगातील जीवनास मुकतीलः “शापाने मरणारा पापीही शंभर वर्षांचा होऊन मरेल.” जीवनास अपात्र ठरविले गेलेल्यांची अल्पसंख्या असेल. आम्हापाशी आणि इतरांपैकी पुरेशी कारणे आहेत की आम्ही नीतीमत्व रास्तपणे शिकावे व पाळून चालावे.—यशया २६:९.

२४. आर्थिक अन्यायाच्या बाबतीत परिस्थिती कशा स्वरुपाची असेल?

२४ याचा अर्थ असा होतो का की, त्यानंतर अन्याय, एवढेच काय पण आर्थिक अन्यायांचा मागमूसही राहणार नाही? यशया ६५:२१-२३ याच विधेयकाकडे लक्ष आकर्षितेः “ते घरे बांधून त्यात राहतील, द्राक्षांचे मळे लावून त्यांचे फळ खातील, ते घरे बांधतील आणि त्यात दुसरे राहतील, ते लावणी करतील आणि फळ दुसरे खातील असे व्हावयाचे नाही; कारण वृक्षाच्या आयुष्याप्रमाणे माझ्या लोकांचे आयुष्य होईल व माझे निवडलेले आपल्या हातांच्या श्रमाचे फळ पूर्णपणे भोगतील. त्यांचे परिश्रम व्यर्थ जाणार नाहीत, संकट तत्काळ गाठील अशा संततीला ते जन्म देणार नाहीत; कारण यहोवाने आशीर्वाद दिलेली ती संतती आहे, व त्यांची मुले त्यांजजवळ राहतील.” आजच्यापेक्षा केवढा मोठा फरक असेल! केवढे समृद्ध आशीर्वाद!

२५. मग, देवाने नेमलेल्या न्यायाधिशाकरवीच्या न्यायाबद्दल तुमच्या आशा व निर्धार काय आहे?

२५ यास्तव, जे सर्व एवढ्या आतुरतेने दीर्घकाळ न्यायाची वाट पाहात आहेत त्यांनी धीर धरला पाहिजे. तो नक्की—लवकरच येणार. आता, या न्यायकाळाचा जो अल्पसा अवधी उरलेला आहे त्यात जे देवाचे शोधक व ज्यांना खरोखरी तो सापडला आहे अशा यहोवाच्या साक्षीदारांशी संगत जोडावी व अनंतकालिक फायदे मिळवावेत.

उजळणीसाठी प्रश्‍न

◻ देवाच्या न्याय्य दर्जांविषयीचे कोणते पुरावे आम्हापाशी आहेत?

◻ येणाऱ्‍या न्यायाच्या दिवसात येशू कोणत्या प्रकाराने समाविष्ट असेल?

◻ ईश्‍वरी न्यायाच्या संबंधात आमचा काळ कठीण आहे तो कसा?

◻ नवीन जगात गतकाळातील अन्याय कसा सुधरविला जाईल?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा