देवाच्या करारांपासून तुम्ही लाभ प्राप्त करणार का?
“‘तुझ्याकडून सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल.’ म्हणून जे विश्वासाचे आहेत त्यांना विश्वास ठेवणाऱ्या अब्राहामासहित आशीर्वाद मिळतो.”—गलतीकर ३:८, ९.
१. कित्येकांच्या राजवटीचा काय परिणाम घडला असे इतिहास दाखवितो?
“परोपकारी स्वायत्त राजे” असे १८ व्या शतकातील काही युरोपियन सत्ताधिशांना संबोधित. ‘कनवाळू पित्याप्रमाणे लोकांवर राज्य करण्याचा त्यांचा चांगला हेतू होता, पण त्यांच्या योजना बिघडल्या आणि त्यांनी अमलात आणलेल्या सुधारणा पार पडल्या.’a (द एन्सायक्लोपिडीआ अमेरिकाना) या कारणामुळेच युरोपात मोठी क्रांती घडली.
२, ३. मानवी बादशहांपेक्षा यहोवा कसा वेगळा आहे?
२ डळमळीत अशा मानवी शासनकर्त्यांपेक्षा यहोवा केवढा वेगळा आहे. बदल घडवून आणण्याची केवढी निकड आहे ते आपल्याला दिसते कारण यामुळेच मानवजातीला अन्याय व त्रासापासून खरी सुटका सरतेशेवटी मिळेल. पण देवाने ही कारवाई करण्याचे त्याच्या कोणा लहरीवर अवलंबून आहे असे आपण समजू नये. जगात सर्वत्र व्याप्तरुपाने वितरीत झालेल्या पुस्तकात त्याने विश्वासधारी मानवजातीला चिरकालिक आशीर्वाद देण्याच्या अभिवचनाचे लिखाण करून ठेवले आहे. लोकांचे राष्ट्रीयत्व, वंश, शैक्षणिक पात्रता किंवा सामाजिक पातळी काहीही राहिलेली असली तरी हे घडून आलेले असणार. (गलतीकर ३:२८) तुम्हाला हे विश्वसनीय वाटते का?
३ देवाने अब्राहामाला जे अभिवचन दिले होते त्याचा काही भाग प्रेषित पौलाने असा अवतरीत केलाः “मी तुला आशीर्वाद देईनच देईन.” पौल पुढे म्हणाला की, “खोटे बोलणे देवाला अशक्य आहे” त्यामुळे ‘आपण, स्वतःपुढे ठेवण्यात आलेली आशा हस्तगत करण्याकरता . . . चांगले उत्तेजन मिळवू शकतो.’ (इब्रीयांस ६:१३-१८) देवाने आपले हे उद्देश पूर्ण करण्यासाठी जी क्रमवार पद्धत वापरली त्याकडे लक्ष दिल्यास आपला त्या आशीर्वादांविषयी वाटणारा आत्मविश्वास अधिकच बळकट होऊ शकतो.
४. देवाने विविध करारांचा उपयोग आपल्या उद्देशांची पूर्ति करण्यासाठी कसा केला?
४ आपण आधी पाहिले आहेच की, देवाने अब्राहामासोबत संतानाविषयीचा एक करार केला होता व ते संतान “पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांना” आशीर्वाद देण्यात एक साधन ठरणार होते. (उत्पत्ती २२:१७, १८) इस्राएल लोक हे दैहिक संतान बनले पण, अधिक महत्त्वपूर्ण अशा आध्यात्मिक मार्गी येशू ख्रिस्त अब्राहामाच्या संतानाचा प्रधान भाग असल्याचे सिद्ध झाले. येशू हा थोर अब्राहाम, यहोवा देव याचा पुत्र किंवा संतान होते. ख्रिस्तीजन, “जे ख्रिस्ताचे आहेत” त्यांचा मिळून अब्राहामाच्या संतानाचा दुय्यम भाग बनतो. (गलतीकर ३:१६, २९) अब्राहामाचा करार केल्यावर देवाने यासोबत इस्राएल राष्ट्राबरोबरील नियमशास्त्र कराराची तात्कालिक जोड दिली. यामुळे हे सिद्ध झाले की, इस्राएल लोक पापी आहेत व यांना कायमच्या याजकाची तसेच परिपूर्ण यज्ञाची आवश्यकता आहे. याने संतानाची मालिका सुरक्षित ठेवली आणि तो कोण आहे त्याची ओळख पटविण्यात मदत दिली. नियमशास्त्र कराराने हेही दाखविले की, देव कसेतरी राजे-याजकांचे राष्ट्र सामोरे आणणार. नियमशास्त्र करार जारी असतानाच देवाने दावीदासोबत इस्राएलात राजवंशीय मालिकेचा करार केला. या दावीदाच्या कराराने त्या एकाकडे निर्दश केला ज्याच्यापाशी पृथ्वीचे अधिपत्य कायम स्वरुपात राहणार होते.
५. अद्याप कोणते प्रश्न वा समस्या सोडवावयाच्या होत्या?
५ तरीपण, या करारात अशी काही अंगे वा प्रकार होते जे अपूर्ण आहेत वा ज्याविषयीचे स्पष्टीकरण मिळण्यास हवे असे वाटत होते. उदाहरणार्थ, जर येणारे संतान हे दावीदाच्या वंशातून राजा म्हणून येणार होते तर मग त्याला कायमचा याजक कसे बनता येऊ शकणार होते व तो इतर सर्व याजकांपेक्षा अधिक ते काय करून दाखवू शकणार होता? (इब्रीयांस ५:१; ७:१३, १४) हा राजा पृथ्वीवर मोजक्या भूपृष्ठापेक्षा अधिक क्षेत्रावर राज्य करू शकणार होता का? या संतानाचे दुय्यम भाग असणारे लोक थोर अब्राहामाच्या कुटुंबात जाण्यासाठी कसे पात्र ठरू शकणार होते? ते जरी त्यात प्रवेश मिळवू शकले तरी, ते कोणत्या क्षेत्रावर आपला अधिकार गाजवणार, कारण यापैकीचे बहुतेक तर दावीदाच्या वंशातील असू शकणार नव्हते? यासाठीच आपण आता हे पाहू या की, या प्रश्नांच्या निरसनासाठी आणि आम्हाला चिरकालिक आशीर्वाद मिळण्याचा मार्ग मोकळा व्हावा म्हणून देवाने आणखी करारांचा आधार घेऊन कोणते कायदेशीर पाऊल उचलले.
स्वर्गीय याजकपदासाठी करार
६, ७. (अ) स्तोत्रसंहिता ११०:४ नुसार देवाने आणखी कोणता करार प्रस्थापिला? (ब) या आणखी एका कराराची स्पष्टता आपल्याला कोणत्या पार्श्वभूमीमुळे कळते?
६ आपण हेही पाहिले आहे की, नियमशास्त्र करार चालू असताना देवाने दावीदाबरोबर एका वंशजाचा (संतानाचा) करार केला जो पृथ्वीवरील आपल्या राज्यक्षेत्रात कायमचा राज्याधिकार करील. पण याबरोबर देवाने दावीदास हे प्रकटविले की, कायमचा याजक देखील सामोरा येणार. दावीदाने लिहिलेः “यहोवाने शपथ वाहिली आहे आणि ती तो बदलणार नाही; ती अशी की, ‘मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानयुग याजक आहेस.’” (स्तोत्रसंहिता ११०:४) देवाच्या शपथेमागे असे काय होते की, जेणेकडून तो स्वतः व येणारा याजक यात एक व्यक्तीगत करार बांधला गेला?
७ मलकीसदेक हा प्राचीन सालेमचा राजा होता. हे शहर अशा ठिकाणी होते जेथे नंतर यरुशलेम (या नावात “सालेम” हा शब्द अंतर्भूत आहे) बांधण्यात आले. अब्राहामाने या मलकीसदेकशी जे दळणवळण राखले त्यावरुन तो राजा असून “परात्पर देवाची” भक्ती करीत होता असे दिसते. (उत्पत्ती १४:१७-२०) तरीपण देवाने स्तोत्रसंहिता ११०:४ मध्ये मलकीसदेकाविषयी जे उद्गार काढले त्यावरून हा याजक होता असे स्पष्ट कळते. अशाप्रकारे, मलकीसदेक हा राजा व याजक असा अप्रतिम व्यक्ती होता व याने अशा स्थळी आपली सेवा सादर केली जेथे नंतर दावीदाचे राजे व लेवीय याजक दृश्यमान झाले व त्यांनी आपापला ईश्वरी कार्यभाग पूर्ण केला.
८. मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे असणाऱ्या कोणासोबत याजकत्वाचा करार करण्यात आला आणि याचा काय परिणाम होणार?
८ मलकीसदेकाच्या संप्रदायानुरुप असणाऱ्या याजकाच्या कराराविषयी अधिक सविस्तर माहिती पौल आपल्याला देतो. जसे की, तो म्हणतो, हा याजक येशू ख्रिस्त आहे व त्याला देवही म्हणतो की, “मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुग याजक आहेस.” (इब्रीयांस ५:४-१०; ६:२०; ७:१७, २१, २२) मलकीसदेकाला पार्थिव मातापिता होते पण त्याच्या वंशावळीचा अहवाल कोठेच उपलब्ध नाही. त्यामुळे येशूने मलकीसदेकाच्या वंशावळीप्रमाणे याजकाचे आपले स्थान ग्रहण करण्यापेक्षा ते त्याला देवापासून थेटपणे मिळाले असे म्हणता येईल. येशूचे हे याजकपद कोणा वारशाला मिळणार नाही, कारण “तो नित्य याजक राहतो.” असे जर आहे तर याजक सेवेपासून मिळणारे फायदेही चिरकालिक राहणार. तद्वत, जो आपणाद्वारे “देवाजवळ जाणाऱ्यांना पूर्णपणे तारण्यास समर्थ आहे” आणि विश्वासू जनांना चिरकालपणे सूचना व मार्गदर्शन देऊ शकतो असा याजक आम्हाला असणे हे केवढे धन्यतेचे आहे!—इब्रीयांस ७:१-३, १५-१७, २३-२५.
९, १०. पाचव्या करारासंबंधाने मिळालेली माहिती, देवाचे उद्देश कसे पूर्ण होतील त्याविषयी आमची समज कशी विस्तारीत करते?
९ एक अभूतपूर्व गोष्ट अशी की येशूची राजा-याजक या नात्याची भूमिका पृथ्वीच्या परिघापलिकडे जाते. जसा दावीदाने मलकीसदेकाच्या संप्रदायानुसारच्या याजकाचा उल्लेख केला आहे त्याच संदर्भात पुढे दावीद लिहितोः “यहोवा माझ्या प्रभूला म्हणतोः ‘मी तुझे वैरी तुझ्या पायांचे आसन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस.’” याद्वारे आपल्याला दिसेल की येशूला—दावीदाच्या प्रभूला—स्वर्गात यहोवापाशी जागा मिळणार होती, हे त्याचे स्वर्गारोहण झाले तेव्हा घडले. स्वर्गातून ख्रिस्त आपल्या पित्यासोबत अधिकाराने आपल्या शत्रूंना अंकित करून त्यांचे पारिपत्य घडवून आणणार.—स्तोत्रसंहिता ११०:१, २; प्रे. कृत्ये २:३३-३६; इब्रीयांस १:३; ८:१; १२:२.
१० अशाप्रकारे या पाचव्या कराराची माहिती मिळाल्यामुळे आपल्याला यहोवा त्याचा उद्देश केवढ्या व्यवस्थितपणे पूर्ण करतो त्याचा दृष्टीकोण मिळेल. यामुळे हे सिद्ध होते की, संतानाच्या या प्रधानाला स्वर्गात याजकाचाही वाटा आहे आणि त्याचा राजा-याजक या नात्याचा अधिकार सबंध विश्वभरात चालेल.—१ पेत्र ३:२२.
नवा करार व संतानाचा दुय्यम भाग
११. संतानाच्या दुय्यम भागासंबंधाने कोणती गुंतागुंत होती?
११ आम्ही अब्राहामासोबत केलेल्या कराराचा विचार केला त्यावेळी येशू स्वाभाविक हक्कामुळे संतानाचा प्रधान भाग बनला असे आपल्या लक्षात आले. तो कुलपिता अब्राहाम याचा थेट वंशज होता तसेच परिपूर्ण मानव असल्यामुळे थोर अब्राहामाच्या मर्जीतला पुत्र होता. पण ज्यांना अब्राहामाचे दुय्यम संतान बनण्याचा, “अभिवचनाच्या द्वारे वारीस” बनण्याचा हक्क आहे त्या मानवांबद्दल काय? (गलतीकर ३:२९) पापी आदामाच्या कुटुंबातील असल्यामुळे, तसेच स्वतः अपूर्ण असल्यामुळे ते थोर अब्राहाम यहोवा देवाच्या कुटुंबामध्ये असण्यास अपात्र होते. तर मग, हा अपूर्णतेचा अडथळा कसा दूर करता येईल? हे मानवाला अशक्यच होते, पण देवाला ते अशक्य नव्हते.—मत्तय १९:२५, २६.
१२, १३. (अ) देवाने आणखी कराराचे कसे भाकित केले? (ब) या कराराच्या कोणत्या खास लक्षणाने आमचे ध्यान आकर्षित करावे?
१२ नियमशास्त्र अस्तित्वात असतानाच देवाने आपल्या संदेष्ट्याद्वारे हे जाहीर केलेः “इस्राएलाचे घराणे व यहूदाचे घराणे यांच्याबरोबर मी नवा करार करीन; . . . त्यांच्या पूर्वजां[च्या] . . . कराराप्रमाणे हा करार व्हावयाचा नाही; . . . तो माझा करार त्यांनी मोडला. . . . मी आपले धर्मशास्त्र त्यांच्या अंतर्यामी ठेवीन; मी ते त्यांच्या हृदयपटलावर लिहीन. मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील. यापुढे कोणी . . . ‘यहोवाला ओळखा’ असा बोध करणार नाहीत, कारण . . . ते सर्व मला ओळखतील. मी त्यांच्या अधर्माची क्षमा करीन, त्यांचे पाप मी यापुढे स्मरणार नाही.”—यिर्मया ३१:३१-३४.
१३ या नव्या कराराचे मुख्य लक्षण लक्षात घ्या. ते आहे पापांची क्षमा. ही क्षमा नियमशास्त्रानुसार जे प्राण्यांचे यज्ञार्पण होई ‘त्यासारखी नाही.’ येशूने आपल्या मृत्युच्या दिवशी या गोष्टीवर प्रकाश पाडला. नियमशास्त्रास अनुसरून असणारा वल्हांडण सण आपल्या शिष्यांसोबत साजरा केल्यावर ख्रिस्ताने प्रभुच्या सांजभोजनाची प्रस्थापना केली. या प्रतिवार्षिक समारंभात द्राक्षारसाचा एक प्याला वापरला जाणार होता ज्याविषयी येशूने म्हटलेः “हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे. ते रक्त तुम्हासाठी ओतले जात आहे.”—लूक २२:१४-२०.
१४. संतानाचा दुय्यम भाग निर्मिण्यामध्ये नव्या कराराचे महत्त्व का आहे?
१४ तेव्हा, हा नवा करार येशूच्या रक्ताद्वारे कार्यवाहित होणार होता. त्या परिपूर्ण यज्ञार्पणाच्या आधारावर देव ‘अधर्म व पाप यांची क्षमा करणार’ होता—कायमची. याचा काय अर्थ होतो याविषयी विचार करा! आदामाच्या कुटुंबातील भक्तीमान लोकांच्या पापांची पूर्णपणे क्षमा केल्यामुळे देव यांना निष्पाप म्हणून गृहीत धरणार होता व यांना थोर अब्राहामाची आध्यात्मिक मुले असा जन्म देऊ शकत होता व यांचा पवित्र आत्म्याने अभिषेक करू शकत होता. (रोमकर ८:१४-१७) याप्रकारे, येशूच्या यज्ञार्पणाच्या आधारावर स्थापिलेल्या नव्या करारामुळे त्याच्या शिष्यांना अब्राहामाचे दुय्यम संतान बनता येत होते. यामुळेच पौलाने लिहिलेः “मरणावर सत्ता गाजविणारा सैतान ह्याला [येशूने आपल्या] मरणाने शून्यवत् करावे; आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते त्या सर्वांना मुक्त करावे. कारण खरे पाहता, [येशू] देवदूतांच्या साहाय्यास नव्हे तर अब्राहामाच्या संतानाच्या साहाय्यास येतो.”—इब्रीयांस २:१४-१६; ९:१४.
१५. नव्या करारात कोण समाविष्ट आहेत?
१५ येशू हा नव्या कराराचा मध्यस्थ तसेच त्याच्या यज्ञापर्णाचे मोल देणारा होता तर मग, या करारात दुसऱ्या बाजूकडील सदस्य कोण होते? यिर्मयाने भाकित केले होते की, देव “इस्राएलाच्या घराण्यासोबत” करार करणार होता? पण कोणते इस्राएल? नियमशास्त्र कराराखाली सुंता करण्यात आलेले दैहिक इस्राएल नव्हे, कारण नवीन कराराने पूर्वीचा करार रद्द केला होता. (इब्रीयांस ८:७, १३; पहा पृष्ठ ३२.) तर आता देव यहुदी तसेच विदेश्यासोबत व्यवहार राखणार होता जे विश्वासाद्वारे ‘आत्म्याने अंतःकरणाची [लाक्षणिकरित्या] सुंता करणार होते.’ ही गोष्ट याजशी सुसंगत आहे की नव्या करारातील लोक ‘देवाचे नियम आपल्या मनावर व अंतःकरणावर लिहिणार’ होते. (रोमकर २:२८, २९; इब्रीयांस ८:१०) अशा या आध्यात्मिक यहुद्यांना पौलाने “देवाचा इस्राएल” असे संबोधिले.—गलतीकर ६:१६; याकोब १:१.
१६. निर्गम १९:६ ने जे दर्शविले ते पूर्ण करण्यात नवा करार कसे साहाय्य देतो?
१६ देव आता आध्यात्मिक इस्राएलासोबत आपले दळणवळण राखून होता त्यामुळे सुसंधीचे द्वार उघडले. देवाने नियमशास्त्र दिले तेव्हा त्याने इस्राएल लोकांना “याजकराज्य व पवित्र राष्ट्र” बनण्याविषयीचे भाष्य केले होते. (निर्गम १९:६) खरे म्हणजे, सबंध दैहिक इस्राएल राष्ट्राला याजक-राजे असे बनता येत नव्हते आणि ते तसे बनले नाहीत. पण आता, अब्राहामाचे दुय्यम संतान या नात्याने ज्या यहुदी व विदेश्यांचा स्वीकार झाला होता ते याजक-राजे बनू शकत होते.b प्रेषित पेत्राने या गोष्टीला पुष्टी दिली आणि त्याने अशा लोकांना लिहिलेः “तुम्ही तर ‘निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक’ असे आहा; ह्यासाठी की, ज्याने तुम्हास अंधःकारातून काढून आपल्या अद्भूत प्रकाशात पाचारण केले त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे.” याखेरीज त्याने हेही लिहिले की, ‘त्यांच्यासाठी स्वर्गात वतन राखून ठेवण्यात आले आहे.’—१ पेत्र १:४; २:९, १०.
१७. नवा करार हा नियमशास्त्र करारापेक्षा ‘अधिक चांगला’ का आहे?
१७ याप्रकारे, नवा करार पूर्वी अस्तित्वात असलेल्या अब्राहामाच्या करारासोबत मिळून कार्य करतो आणि दुय्यम संतानाची निर्मिती करतो. यहोवा व आत्म्याने जन्मलेल्या ख्रिश्चनांमध्ये असलेल्या या नवीन करारामुळे थोर अब्राहामाच्या बादशाही कुटुंबामध्ये याजक-राजे यांचे स्वर्गीय राष्ट्र तयार करण्याची मुभा मिळते. आणि याच कारणामुळे प्रेषित पौल हे का म्हणाला ते आपल्याला समजते की, ‘हा अधिक चांगला करार आहे जो अधिक चांगल्या अभिवचनांवर स्थापित झालेला आहे.’ (इब्रीयांस ८:६) त्या अभिवचनांमध्ये भक्तीमान लोकांच्या अंतःकरणी देवाचे नियम लिखित करण्यात येतात, त्यांची पापे पुन्हा स्मरण्यात येत नाहीत, आणि ‘लहानापासून थोरापर्यंत ते सर्व यहोवाला ओळखतील’ हे आशीर्वाद येतात.—इब्रीयांस ८:११.
येशूचा राज्याविषयीचा करार
१८. आतापर्यंत आपण ज्या करारांची चर्चा केली त्यांनी देवाचा उद्देश पूर्णपणे तडीस नेला नाही असे कोणत्या अर्थी म्हणता येईल?
१८ आतापर्यंत चर्चिलेल्या सहा करारांवर दृष्टीक्षेप टाकता आपल्याला हे दिसेल की यहोवाने आपला उद्देश तडीस न्यावा यासाठी सर्व गोष्टी कशा कायदेशीरपणे आखल्या. तरीपण पवित्र शास्त्र आणखी एका कराराविषयीची माहिती देते. या कराराचा संबंध आपण विचारात घेतलेल्या गोष्टींशी आहे, आणि तो महत्त्वपूर्ण गोष्टींना अधिक उजाळा देणारा आहे. आत्म्याने जन्मलेल्या ख्रिश्चनांची ही वास्तविक इच्छा आहे की, ‘प्रभु त्यांना सर्व दुष्ट योजनांपासून मुक्त करील, व आपल्या स्वर्गीय राज्यात घेण्यासाठी तारील.’ (२ तीमथ्य ४:१८) अशाप्रकारे ते, स्वर्गात याजक-राजे असतील, पण त्यांच्या कार्याचे क्षेत्र कोणते असेल? त्यांचे पुनरुत्थान होऊन ते स्वर्गात येतील तेव्हा ख्रिस्त हा आधीच परिपूर्ण प्रमुख याजक असणार. याशिवाय तो विश्वामध्ये राज्य करण्यासाठी आपले बादशाही सामर्थ्य घेऊन तयार असणर. (स्तोत्रसंहिता २:६-९; प्रकटीकरण ११:१५) मग आता, इतर याजक-राजे यांचे येथे काय काम असणार?
१९. सातवा महत्त्वाचा करार केव्हा व कोठे केला गेला?
१९ इ.स. ३३ च्या निसान १४ तारखेला संध्याकाळी येशूने प्रभुच्या सांजभोजनाची स्थापना केली व म्हटले की, ‘त्याच्या रक्तात नवा करार आहे.’ पण याच वेळी त्याने आणखी एका कराराचा उल्लेख केला, जो सातवा असून आता आपल्या चर्चेला आला आहे. त्याने आपल्या विश्वासू प्रेषितांना म्हटलेः “माझ्या परीक्षांमध्ये माझ्याबरोबर टिकून राहिलेले तुम्हीच आहा. तर आता मी तुमच्यासोबत एक करार करतो. जसे माझ्या पित्याने मला राज्य नेमून दिले तसे मीही तुम्हास नेमून देतो. ह्यासाठी की, तुम्ही माझ्या राज्यात माझ्या मेजावर खावे व प्यावे, आणि राजासनांवर बसून इस्राएलाच्या बरा वंशांचा न्याय करावा.” (लूक २२:२०, २८-३०, न्यू.व.) जसे पित्याने येशूसोबत मलकीसदेकाप्रमाणे याजक असण्याचा करार केला तसेच ख्रिस्तानेही आपल्या निष्ठावंत अनुयायांसोबत व्यक्तीगत करार केला आहे.
२०. राज्याचा करार कोणासोबत करण्यात आला व का? (दानीएल ७:१८; २ तीमथ्य २:११-१३)
२० येशूचे ११ प्रेषित त्याच्या परीक्षांमध्ये त्याच्यासोबत टिकून राहिले होते आणि यांच्याशी जो करार करण्यात आला तो हे दाखवितो की हे राजासनांवर बसतील. तसेच प्रकटीकरण ३:२१ दाखविते की, जे आत्म्याने जन्मलेले ख्रिस्ती विश्वासू ठरतील अशांना स्वर्गीय राजासनांवर बसण्यास मिळेल. तद्वत, हा करार सर्व १,४४,००० लोकांसोबत आहे ज्यांना येशूच्या रक्ताने विकत घेण्यात आले असून यांना स्वर्गात याजक म्हणून घेतले जाईल आणि ते “पृथ्वीवर राजे या नात्याने राज्य करतील.” (प्रकटीकरण १:४-६; ५:९, १०; २०:६) जो करार येशू त्यांच्याशी करतो तो त्यांना त्याच्या साम्राज्यात सहभागी होण्याची संधी देतो. ते जणू कोणा राजघराण्याची वधू राज्य करीत असणाऱ्या बादशहाबरोबर विवाहात बद्ध होते, असे आहे. यामुळे ती देखील त्याच्या राज्यकिर्दीत सहभागी होते.—योहान ३:२९; २ करिंथकर ११:२; प्रकटीकरण १९:७, ८.
२१, २२. हे करार ज्या गोष्टी पूर्ण करतील त्यामुळे कोणत्या आशीर्वादांची अपेक्षा धरता येईल?
२१ यामुळे आज्ञाधारक मानवजातीला कोणते आशीर्वाद मिळतील? येशू किंवा १,४४,००० पैकी कोणीही त्या परोपकारी स्वायत्त राजांप्रमाणे नसणार, ज्यांना “खरा उपाय सापडला नाही.” उलटपक्षी, आम्हाला ही खात्री दिलेली आहे की, येशू हा असा प्रमुख याजक आहे “जो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता, तरी निष्पाप राहिला.” यामुळेच, त्याला मानवी अशक्तपणाविषयी ‘सहानुभूति का वाटते’ तसेच “दुसरी मेंढरे” देखील अभिषिक्त ख्रिश्चनांप्रमाणेच ख्रिस्ताद्वारे देवाच्या राजासनाकडे “धैर्याने” का येऊ शकतात ते आपल्याला कळू शकते. याकरवी, यांनाही ‘दया प्राप्त होते आणि ऐनवेळी साहाय्यासाठी कृपा मिळते.’—इब्रीयांस ४:१४-१६; योहान १०:१६.
२२ राजे-याजक या अर्थी जे येशूसोबत करारबद्ध आहेत ते मानवजातीवर आशीर्वादांचा वर्षाव करण्यात देखील सहभागी होतात. प्राचीन काळचे लेव्यांचे याजकत्व जसे सबंध इस्राएल राष्ट्राला लाभ देत होते त्याचप्रमाणे येशूसोबत जे स्वर्गीय राजासनांवर सहभागी होतील ते पृथ्वीवर राहणाऱ्या सर्वांचा न्याय धार्मिकतेने करतील. (लूक २२:३०) हे याजक-राजे पूर्वी मानव होते त्यामुळे मानवजातीच्या गरजांविषयी ते सहानुभूति दाखवितील. संतानाचा हा दुय्यम भाग येशूला सहकार्य पुरवून “सर्व राष्ट्रे आशीर्वादित होत आहेत” हे बघतील.—गलतीकर ३:८.
२३. या करारांसोबत सहकार्य दर्शविण्यात वैयक्तीकाने कोणती हालचाल अनुसरावी?
२३ मानवजातीवर येणाऱ्या या आशीर्वादात सहभागी होण्याची व त्याकरवी देवाच्या करारांपासून लाभ घेण्याची ज्यांची इच्छा आहे अशा सर्वांनी त्यासाठी पाऊल उचलावे असे निमंत्रण देण्यात येत आहे. (प्रकटीकरण २२:१७) याचा एक मार्ग म्हणजे, मंगळवार, एप्रिल १०, १९९० रोजी सूर्यास्तानंतर साजऱ्या होणाऱ्या प्रभूच्या सांजभोजनाच्या समारंभास उपस्थित असणे. यासाठी आत्ताच योजना आखून यहोवाच्या साक्षीदारांच्या कोणत्याही मंडळीत या कार्यक्रमासाठी या. येथे तुम्हाला ईश्वरी करारांविषयी अधिक शिकण्यास मिळून त्यापासून आपला कसा फायदा करता येईल त्याविषयीची योजना करता येईल.
[तळटीपा]
a अधिक साहसांनी हाती घेतलेल्या सुधारणांनी देखील गरीब शेतकरी, (कर्ज इ. ची) सूट, माफी लाभलेले, करदाते उमराव आणि मध्यमवर्गीय यांना सरकार वा समाजात अपुरा सहभाग मिळाला . . . जेव्हा परोपकारी स्वायत्तांना अशा काही प्रश्नांचा भडिमार सामोरा आला, जो टाळला जाऊ शकत नव्हता, तेव्हा त्यांना राजकीय किंवा आर्थिक क्षेत्रात याविषयीचा खरा उपाय सापडला नाही.”—वेस्टर्न सिविलायझेशन—इटस् जेनिसिस ॲण्ड डेस्टिनीः द मॉडर्न हेरिटेज.
b येशू हा नव्या करारात कोणत्याही बाजूला नाही; तो तर मध्यस्त आहे. याला पापक्षमेची काहीही गरज नाही. याशिवाय या कराराद्वारे त्याने राजा-याजक बनण्याची गरज भासत नाही; कारण तो तर दावीदाशी करण्यात आलेल्या कराराप्रमाणे राजा आणि मलकीसदेकासारखा याजक आहे.
तुम्हाला आठवते का?
◻ स्तोत्रसंहिता ११०:४ मध्ये दाखविण्यात आलेला करार का करण्यात आला, व यामुळे काय साध्य झाले?
◻ नव्या करारात कोण आहेत, व यामुळे याजक-राजे असणाऱ्या राष्ट्राची निर्मिती करण्यामध्ये कशी मदत मिळाली?
◻ येशूने आपल्या शिष्यांसोबत व्यक्तीशः करार का केला?
◻ आता आम्ही ज्यांची चर्चा केली ते सात करार कोणते?
[१७ पानावरील चौकट]
[For fully formatted text, see publication]
एदेनमधील करार उत्पत्ती ३:१५
अब्राहामाचा करार
नियमशास्त्र करार
दावीदाचा राज्याचा करार
मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे याजक बनण्याचा करार
प्रधान संतान
दुय्यम संतान
चिरकालिक आशीर्वाद
[१९ पानावरील चौकट]
[For fully formatted text, see publication]
एदेनमधील करार उत्पत्ती ३:१५
अब्राहामाचा करार
नियमशास्त्र करार
नवा करार
दावीदाचा राज्याचा करार
मलकीसदेकाच्या संप्रदायाप्रमाणे याजक बनण्याचा करार
प्रधान संतान
स्वर्गीय राज्याचा करार
दुय्यम संतान
चिरकालिक आशीर्वाद