जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ
१२-१८ ऑगस्ट
आध्यात्मिक रत्नं शोधा
टेहळणी बुरूज८९-E ५/१५ पृ. ३१ परि. ५
वाचकांचे प्रश्न
क्रेतमध्येही देवाची संमती असलेले आणि पवित्र आत्म्याने अभिषिक्त असलेले ख्रिस्ती होते. आणि या गोष्टीची पौलला जाणीव होती. (प्रेका २:५, ११, ३३) कारण त्या वेळी, “प्रत्येक शहरात” मंडळीची स्थापना करता येईल इतके एकनिष्ठ ख्रिस्ती लोक नक्कीच होते. ते जरी परिपूर्ण नसले, तरी ते निश्चितच खोटारडे आणि ऐतखाऊ नव्हते हे आपण खात्रीने म्हणू शकतो. कारण तसं असतं तर त्यांना देवाची संमती नक्कीच मिळाली नसती. (फिलि ३:१८, १९; प्रक २१:८) आज प्रत्येक देशात आहेत, त्याप्रमाणे क्रेतमध्येसुद्धा प्रामाणिक मनाचे लोक होते. आणि त्यांना समाजात ढासळत चाललेल्या नैतिक स्तरांबद्दल चिंता वाटत होती. म्हणूनच ते ख्रिस्ती संदेशाला प्रतिसाद द्यायला तयार होते. (यहे ९:४ आणि प्रेका १३:४८ पडताळून पाहा.) त्यामुळे या वचनात क्रेतमधल्या लोकांवर जातीय किंवा वांशिक टीका करण्याचा पौलचा हेतू होता, असं नक्कीच म्हणता येणार नाही.
१९-२५ ऑगस्ट
आध्यात्मिक रत्नं शोधा
इन्साइट-१ पृ. ११८५ परि. १
प्रतिमा
येशू आपल्या पित्याचे गुण आणि व्यक्तिमत्त्व नेहमी सारख्याच प्रमाणात प्रदर्शित करू शकला का?
पृथ्वीवर येशू या नावाने ओळखला जाणारा, देवाचा सर्वात पहिला मुलगा, देवाचं प्रतिरूप असा होता. (२कर ४:४) मानवाची निर्मिती करताना देवाने याच पुत्राला म्हटलं, की आपण “आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य असा मनुष्य” तयार करू. यावरून कळतं की या पुत्राला निर्माण केलं, तेव्हापासूनच तो आपल्या पित्यासारखा म्हणजे आपल्या निर्माणकर्त्यासारखा होता. (उत्प १:२६; योह १:१-३; कल १:१५, १६) येशू पृथ्वीवर एक परिपूर्ण मानव होता. पण मानवी मर्यादा असतानासुद्धा त्याने आपल्या पित्याच्या गुणांना आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वाला होता होईल तितक्या प्रमाणात प्रदर्शित केलं. म्हणूनच तो असं म्हणू शकला, की “ज्याने मला पाहिलं आहे त्याने पित्यालाही पाहिलं आहे.” (योह १४:९; ५:१७, १९, ३०, ३६; ८:२८, ३८, ४२) पण जेव्हा त्याला आत्मिक स्वरूपात पुन्हा जिवंत करण्यात आलं आणि “स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार” देण्यात आला, तेव्हा देवासोबत असणारा त्याचा हा सारखेपणा नक्कीच आणखी जास्त प्रमाणात वाढला. (१पेत्र ३:१८; मत्त २८:१८) देवाने आता त्याला ‘श्रेष्ठ स्थान देऊन गौरवलं’ होतं. त्यामुळे देवाचा हा पुत्र पृथ्वीवर येण्याआधी, स्वर्गात असताना जितकं करू शकत होता त्याहून जास्त प्रमाणात आपल्या पित्याच्या गौरवाला आता तो प्रदर्शित करत होता. (फिलि २:९; इब्री २:९) म्हणूनच, सध्या तो आपल्या पित्याचं “हुबेहूब प्रतिरूप आहे.”—इब्री १:२-४.
इन्साइट-१ पृ. १०६३ परि. ६
स्वर्ग
स्तोत्र १०२:२५, २६ मधले शब्द यहोवा देवाला लागू होतात. पण प्रेषित पौलने हे शब्द येशूच्या बाबतीत वापरले. कारण भौतिक सृष्टीची निर्मिती करण्यासाठी देवाने या एकुलत्या एका पुत्राला कुशल कारागीर म्हणून वापरलं होतं. पौलने या पुत्राच्या अविनाशीपणाची तुलना भौतिक सृष्टीसोबत केली आणि म्हटलं की देवाने या सृष्टीची निर्मितीच अशी केली आहे की “एखाद्या कापडाप्रमाणे” तो तिला ‘गुंडाळून टाकेल’ आणि ‘ती बदलून जाईल.’ पण पुत्राचं अस्तित्व मात्र कधीच न संपणारं आहे.—इब्री १:१, २, ८, १०-१२ आणि १ पेत्र २:३, तळटीप पडताळून पाहा.
२६ ऑगस्ट–१ सप्टेंबर
आध्यात्मिक रत्नं शोधा
इन्साइट-१ पृ. ११३९ परि. २
आशा
“स्वर्गीय निमंत्रणात वाटेकरी” असलेल्यांना अविनाशी शरीरात सदासर्वकाळच्या जीवनाची आशा आहे. (इब्री ३:१) त्यांच्या या आशेला एक खंबीर आधार आहे. एक असा आधार, ज्यावर नक्कीच विश्वास ठेवला जाऊ शकतो. ही आशा, अशा दोन गोष्टींवर आधारलेली आहे, ज्याबद्दल देवाला खोटं बोलणं शक्य नाही. या दोन गोष्टी म्हणजे त्याचं अभिवचन आणि त्याने शपथ घेऊन दिलेली हमी. ही आशा सध्या स्वर्गात अमरत्व मिळालेल्या ख्रिस्तामुळे मिळते.—इब्री लोकांना ६:१७-२०.