वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • आशेने स्थिर, प्रीतीने प्रवृत्त
    टेहळणी बुरूज—१९९९ | जुलै १५
    • आशेची तुलना नांगराबरोबर

      १०, ११. पौलाने आपल्या आशेची तुलना कशाबरोबर केली व ही तुलना उचित का होती?

      १० यहोवाने अब्राहामाद्वारे आशीर्वादांचे अभिवचन दिले आहे हे पौलाने दर्शवले. नंतर पुढे त्याने असे स्पष्टीकरण दिले: “देव शपथेच्या द्वारे मध्ये पडला, ह्‍यासाठी की, जे आपण, स्वतःपुढे ठेवण्यात आलेली आशा हस्तगत करण्याकरिता आश्रयाला धावलो, त्या आपणाला ज्याविषयी खोटे बोलणे देवाला अशक्य आहे अशा दोन अचल गोष्टींच्याद्वारे [त्याचे वचन व त्याची शपथ] चांगले उत्तेजन मिळावे; ती आशा आपल्याला जीवाचा नांगर असून स्थिर व अढळ . . . आहे.” (इब्री लोकांस ६:१७-१९; उत्पत्ति २२:१६-१८) अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांपुढे स्वर्गामध्ये अमर जीवनाची आशा आहे. आज, यहोवाच्या बहुसंख्य सेवकांना परादीस पृथ्वीवर अनंतकाळ जीवनाची अद्‌भुत आशा आहे. (लूक २३:४३) अशा आशेविना कोणाकडेही विश्‍वास असणार नाही.

      ११ नांगर हे शक्‍तिशाली सुरक्षित साधन असते जे जहाजाला जागेवरच स्थिर धरून राहण्यास व भरकटू न देण्यास अत्यावश्‍यक असते. कोणताही खलाशी नांगराविना बंदर सोडून जाण्याचा धोका पत्करणार नाही. जहाज फुटण्याचा पौलाला अनेक वेळा अनुभव आला असल्यामुळे खलाशांचे जीवन जहाजाच्या नांगरावर अवलंबून असते हे त्याला चांगल्याप्रकारे माहीत होते. (प्रेषितांची कृत्ये २७:२९, ३९, ४०; २ करिंथकर ११:२५) पहिल्या शतकात, जहाजाला इंजिन नसल्यामुळे कप्तान त्याला हवे तसे जहाज वळवू शकत नव्हता. वल्हवणाऱ्‍या युद्धजहाजांना सोडून इतर जहाजे पुढे जाण्यासाठी वाऱ्‍यावर अवलंबून होती. आपले जहाज खडकांवर जाऊन आदळण्याची भीती आहे हे कप्तानाच्या लक्षात येते तेव्हा नांगर टाकून वादळात जहाज तरंगत ठेवण्याशिवाय दुसरा पर्याय त्याच्याकडे नसतो; त्याला हा भरवसा असतो, की नांगर समुद्रतळाशी घट्ट बसेल. यास्तव, पौलाने एखाद्या ख्रिश्‍चनाच्या आशेची तुलना ‘जीवाच्या नांगराबरोबर केली जी स्थिर व अढळ’ आहे. (इब्री लोकांस ६:१९) आपल्यावर विरोधाचे किंवा इतर परीक्षांचे वादळ येते तेव्हा आपली अद्‌भुत आशा नांगरासारखी असते जी आपल्या जीवाला स्थिर ठेवते जेणेकरून आपले विश्‍वासरूपी तारू संशयाच्या वालूकायमय घातक उथळ बांधांवर किंवा धर्मत्यागाच्या नाशकारक खडकांवर जाऊन आदळत नाही.—इब्री लोकांस २:१; यहुदा ८-१३.

      १२. आपण यहोवाला सोडून देण्याचे कसे टाळू शकतो?

      १२ पौलाने इब्री ख्रिश्‍चनांना ताकीद दिली: “बंधुजनहो, जिवंत देवाला सोडून देण्याइतके अविश्‍वासाचे दुष्ट मन तुम्हातील कोणाचेहि असू नये म्हणून जपा.” (इब्री लोकांस ३:१२) ग्रीक वचनात, ‘सोडून देणे’ याचा अक्षरशः अर्थ “दूर राहणे” म्हणजेच धर्मत्याग करणे असा होतो. पण आपल्या विश्‍वासरूपी तारवाला आपण फुटण्यापासून वाचवू शकतो. आपल्यावर येणाऱ्‍या परीक्षांच्या सर्वात जोरदार वादळातही यहोवाशी जडून राहण्यास विश्‍वास आणि आशा आपली मदत करतील. (अनुवाद ४:४; ३०:१९, २०) आपला विश्‍वास धर्मत्यागी शिकवणींच्या वाऱ्‍यामुळे हेलकावे खाणाऱ्‍या जहाजाप्रमाणे असणार नाही. (इफिसकर ४:१३, १४) आणि नांगरासमान असलेल्या आपल्या आशेमुळे आपण यहोवाचे सेवक या नात्याने जीवनातील वादळात तग धरून राहू शकतो.

  • आशेने स्थिर, प्रीतीने प्रवृत्त
    टेहळणी बुरूज—१९९९ | जुलै १५
    • आपल्या इष्टस्थळाच्या दिशेने!

      १८. भवितव्यामध्ये आपल्या विश्‍वासाच्या कोणत्याही परीक्षा घेतल्या जातील तेव्हा काय आपल्याला टिकवून ठेवील?

      १८ नवीन व्यवस्थीकरणापर्यंत पोहंचेतोवर आपल्या विश्‍वासाची व प्रीतीची कडक परीक्षा होऊ शकते. पण, यहोवाने आपल्याला “स्थिर व अढळ” नांगर, अर्थात अद्‌भुत आशा दिली आहे. (इब्री लोकांस ६:१९; रोमकर १५:४, १३) विरोध किंवा इतर परीक्षांचा आपल्यावर मारा होतो तेव्हा आपल्या आशेद्वारे आपण सुरक्षितपणे नांगर टाकला असेल तरच आपण निभावू शकतो. एक वादळ येऊन गेल्यावर दुसरे वादळ येण्याआधीच आपण आपली आशा दृढ व आपला विश्‍वास बळकट करण्याचा दृढनिश्‍चय करू या.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा