-
वाचकांचे प्रश्नटेहळणी बुरूज—२००१ | ऑक्टोबर १
-
-
पहिल्या शतकातील इब्री ख्रिश्चनांना प्रेषित पौलाने लिहिले: “देवाच्या लोकांसाठी शब्बाथाचा विसावा राहिला आहे. कारण जो कोणी त्याच्या विसाव्यात आला आहे त्यानेहि, जसा देवाने आपल्या कृत्यांपासून विसावा घेतला तसा, आपल्या कृत्यांपासून विसावा घेतला आहे, म्हणून त्या विसाव्यात येण्याचा आपण होईल तितका प्रयत्न करावा.”—इब्री लोकांस ४:९-११.
-
-
वाचकांचे प्रश्नटेहळणी बुरूज—२००१ | ऑक्टोबर १
-
-
इब्री लोकांस या पुस्तकातील पौलाच्या विधानाकडे पुन्हा एकदा लक्ष दिल्यास आपल्याला कळेल की तो म्हणाला, “देवाच्या लोकांसाठी शब्बाथाचा विसावा राहिला आहे.” आणि त्याने आपल्या सह-ख्रिश्चनांना “त्या विसाव्यात येण्याचा” आटोकाट प्रयत्न करायला उत्तेजन दिले. यावरून दिसून येते की, पौलाने ते शब्द लिहिले तेव्हा देवाच्या विसाव्याचा ‘सातवा दिवस’—जो सुमारे ४,००० वर्षांआधी सुरू झाला होता तो—चालूच होता. आणि जोवर, “शब्बाथाचा धनी” येशू ख्रिस्त याच्या हजार वर्षांच्या राजवटीच्या शेवटी मानवजात आणि पृथ्वीसंबंधी देवाचा उद्देश पूर्ण होत नाही तोवर तो दिवस संपणार नाही.—मत्तय १२:८; प्रकटीकरण २०:१-६; २१:१-४.
-