“वचनाप्रमाणे आचरण करणारे” आनंदी लोक
“तुमच्या जिवाचे तारण करावयास समर्थ असे मुळाविलेले वचन सौम्यतेने स्वीकारा. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा केवळ ऐकणारे असू नका.” —याकोब १:२१, २२.
१. सन १९९६ करता असलेल्या आपल्या वार्षिक वचनाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहण्यात यावे?
“वचनाप्रमाणे आचरण करणारे असा.” या साध्या वाक्यात एक जोरदार संदेश आहे. ते वाक्य बायबलमधील “याकोबाचे पत्र” येथून घेतलेले आहे आणि सबंध १९९६ मध्ये ते यहोवाच्या साक्षीदारांचे वार्षिक वचन म्हणून राज्य सभागृहांमध्ये प्रदर्शित केले जाईल.
२, ३. स्वतःचे नाव असलेले पत्र लिहिणे याकोबासाठी उचित का होते?
२ याकोब, प्रभू येशूचा सावत्र भाऊ, प्रारंभिक ख्रिस्ती मंडळीत प्रमुख होता. येशूच्या पुनरुत्थानानंतर एके प्रसंगी, आपला प्रभू व्यक्तिगतरित्या याकोबाला आणि त्यानंतर सर्व प्रेषितांना प्रकट झाला. (१ करिंथकर १५:७) नंतर, प्रेषित पेत्राची चमत्कारिकरित्या तुरुंगातून सुटका करण्यात आल्यावर त्याने एकत्रित झालेल्या एका ख्रिस्ती गटाला म्हटले: “हे याकोबास व बंधुजनांस सांगा.” (प्रेषितांची कृत्ये १२:१७) याकोब स्वतः प्रेषित नसला, तरी मतांतर केलेल्या विदेश्यांना सुंता करावयाची आवश्यकता नाही असे प्रेषितांनी व वडिलांनी निर्णय घेतलेल्या जेरूसलेमेतील नियमन मंडळाच्या सभेत तो अध्यक्ष होता असे दिसते. याकोबाने सर्व बाबींचा सारांश दिला व पवित्र आत्म्याने निर्धारित केलेला निर्णय सर्व मंडळ्यांना कळवण्यात आला.—प्रेषितांची कृत्ये १५:१-२९.
३ स्पष्टतः, याकोबाच्या प्रौढ कारणमीमांसेला अधिक महत्त्व होते. तथापि, तो केवळ “देवाचा व प्रभू येशू ख्रिस्ताचा दास” असल्याचे त्याने नम्रतेने कबूल केले. (याकोब १:१) त्याच्या प्रेरित पत्रात आज ख्रिश्चनांसाठी योग्य सल्ला आणि उत्तेजनाचा ठेवा आहे. सुवार्तेची घोषणा “आकाशाखालच्या सर्व सृष्टीत” विस्तारितपणे झाल्यावर, सेनापती सेस्टीयस गॅलसद्वारे जेरूसलेमवर केलेल्या पहिल्या रोमी हल्ल्याच्या सुमारे चार वर्षांआधी ते पूर्ण केले होते. (कलस्सैकर १:२३) कठीण समय होते आणि यहोवाच्या सेवकांना याची पूर्ण जाणीव होती की, त्याचा न्यायदंड यहुदी राष्ट्रावर बजावण्यात येणारच होता.
४. आरंभीच्या ख्रिश्चनांचा देवाच्या वचनावर दृढ आत्मविश्वास होता हे कशावरून सूचित होते?
४ त्या ख्रिश्चनांजवळ संपूर्ण इब्री शास्त्रवचने आणि ग्रीक शास्त्रवचनांचा पुष्कळसा भाग आधीच होता. आधीच्या लिखाणांचा अनेकदा संदर्भ घेतल्यावरून सूचित होते त्याप्रमाणे, ख्रिस्ती बायबल लेखकांना देवाच्या वचनामध्ये जास्त आत्मविश्वास होता हे स्पष्ट आहे. त्याचप्रमाणे, आपणही देवाच्या वचनाचा मनःपूर्वक अभ्यास करण्याची व ते आपल्या जीवनात लागू करण्याची गरज आहे. टिकून राहण्यासाठी, पवित्र शास्त्रवचने पुरवत असलेले आध्यात्मिक सामर्थ्य आणि धैर्य आपल्याला हवे आहे.—स्तोत्र ११९:९७; १ तीमथ्य ४:१३.
५. आज आपल्याला खास मार्गदर्शन का हवे आहे आणि आपल्याला ते कोठे लाभेल?
५ ‘जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही व पुढे कधीही येणार नाही अशा मोठ्या संकटाच्या’ उंबरठ्यावर मानवजात येऊन ठेपली आहे. (मत्तय २४:२१) आपला बचाव ईश्वरी मार्गदर्शन मिळण्यावर विसंबून आहे. आपल्याला ते कसे सापडेल? देवाच्या आत्म्याने प्रेरित असलेल्या वचनाच्या शिकवणुकी ग्रहण करण्याद्वारे. यामुळे पूर्वीच्या काळातील यहोवाच्या विश्वासू सेवकांप्रमाणे आपण “वचनाप्रमाणे आचरण करणारे” होऊ. आपण परिश्रमपूर्वक देवाचे वचन वाचले पाहिजे व त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि यहोवाच्या स्तुतीसाठी त्याचा उपयोग केला पाहिजे.—२ तीमथ्य २:१५; ३:१६, १७.
आनंदासहित धीर
६. परीक्षांना तोंड देण्यात आपण आनंद का मानला पाहिजे?
६ आपल्या पत्राच्या सुरवातीला याकोब आनंद या देवाच्या पवित्र आत्म्याच्या दुसऱ्या फळाचा उल्लेख करतो. तो लिहितो: “माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हाला तोंड द्यावे लागते तेव्हा तुम्ही आनंदच माना. तुम्हास ठाऊक आहे की, तुमच्या विश्वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्न होतो; आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, ह्यासाठी की, तुम्ही कशातहि उणे न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी.” (याकोब १:२-४; गलतीकर ५:२२, २३) अनेक परीक्षांना तोंड देणे “आनंदच” आहे असे कसे म्हटले जाऊ शकते? येशूने देखील डोंगरावरील आपल्या प्रवचनात असे म्हटले: “माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करितील आणि तुमच्याविरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील तेव्हा तुम्ही धन्य. आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे.” (मत्तय ५:११, १२) आपण जसे सार्वकालिक जीवनाच्या ध्येयाप्रत पोहंचण्यास झटतो तसे आपल्या परिश्रमावर यहोवाचा आशीर्वाद आहे हे पाहण्यात आनंदपूर्ण समाधान असते.—योहान १७:३; २ तीमथ्य ४:७, ८; इब्रीयांस ११:८-१०, २६, ३५.
७. (अ) सहन करण्यास आपली मदत कशी केली जाऊ शकते? (ब) ईयोबाप्रमाणे आपल्याला प्रतिफळ कसे मिळेल?
७ येशूने “जो आनंद त्याच्यापुढे होता त्याकरिता” स्वतः सहन केले. (इब्रीयांस १२:१, २) येशूच्या धैर्यवान उदाहरणाकडे पाहून, आपण देखील सहन करू शकतो! याकोब आपल्या पत्राच्या शेवटी सांगतो त्यानुसार, यहोवा सचोटी रक्षकांना समृद्धतेने प्रतिफळ देतो. याकोब म्हणतो, “पाहा! ज्यांनी सहन केले त्यांना आपण धन्य म्हणतो, तुम्ही ईयोबाच्या धीराविषयी ऐकले आहे, आणि त्याच्याविषयी प्रभूचा [यहोवा, NW] जो हेतू तो तुम्ही पाहिला आहे; ह्यावरून प्रभु फार कनवाळू व दयाळू आहे हे तुम्हास दिसून आले.” (याकोब ५:११) ईयोबाला चांगले आरोग्य आणि प्रियजनांसोबत संपूर्ण, समाधानी जीवनाचा आनंद पुन्हा देण्यात आला तेव्हा, त्याच्या सत्वनिष्ठेसाठी कसे प्रतिफळ देण्यात आले त्याची आठवण करा. सचोटी राखण्यात धीर धरल्याने, तुम्हाला देवाच्या नवीन जगातील वचनदत्त परादीसमध्ये, आता यहोवाच्या करत असलेल्या सेवेचा कळस म्हणून असाच आनंद लाभू शकतो.
बुद्धी प्राप्त करणे
८. आपल्याला खरी, व्यावहारिक बुद्धी कोठे लाभेल आणि यामध्ये प्रार्थनेची काय भूमिका आहे?
८ देवाच्या वचनाचा परिश्रमपूर्वक अभ्यास व त्यासोबत त्याचा व्यावहारिक अवलंब केल्याने ईश्वरी बुद्धी परिणीत होईल व यामुळे सैतानाच्या मर्त्य व्यवस्थीकरणाच्या भ्रष्टाचारामध्ये परीक्षा सहन करण्यास आपल्याला मदत मिळेल. अशी बुद्धी मिळण्याबाबत आपण खात्री कशी बाळगू शकतो? याकोब आपल्याला सांगतो: “जर तुम्हापैकी कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे म्हणजे ते त्याला मिळेल; कारण तो कोणास दोष न लावता सर्वांस उदारपणे देणग्या देतो; पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे; कारण संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या व उचंबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे.” (याकोब १:५, ६) आपण मनःपूर्वक प्रार्थना केली पाहिजे व यहोवा आपल्या विनंत्या ऐकेल व त्याच्या स्वतःच्या योग्य समयी व योग्य मार्गाने त्यांना उत्तर देईल असा अढळ आत्मविश्वास बाळगला पाहिजे.
९. ईश्वरी बुद्धी आणि तिचा अवलंब याचे वर्णन याकोब कसे करतो?
९ ईश्वरी भय यहोवाकडील एक देणगी आहे. अशा देणग्यांचे वर्णन करताना याकोब म्हणतो: “प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान वरून आहे; ज्याला विकार नाही व जो फिरण्याने छायेत जात नाही अशा ज्योतिमंडळाच्या पित्यापासून ते उतरते.” नंतर आपल्या पत्रात, याकोब जेव्हा असे म्हणतो, “तुम्हामध्ये ज्ञानी व समंजस कोण आहे? त्याने ज्ञानजन्य लीनतेने सदाचरणाच्या योगे आपली कृत्ये दाखवावी; . . . वरून येणारे ज्ञान [बुद्धी, NW] हे मुळात शुद्ध असते; शिवाय ते शांतिप्रिय, सौम्य, समजूत होण्याजोगे, दया व सत्फले ह्यांनी पूर्ण, अपक्षपाती, निर्दंभ असे आहे,” तेव्हा तो खरी बुद्धी प्राप्त करण्याच्या परिणामाचे स्पष्टीकरण देतो.—याकोब १:१७; ३:१३-१७.
१०. खोटा धर्म खऱ्या धर्माच्या विरुद्धतेत कसा आहे?
१० खोट्या धर्माच्या जागतिक साम्राज्यात, ख्रिस्ती धर्मजगतात असो किंवा इतर देशांत असो, उपासकांनी काही भजने गाणे, प्रार्थनांची पुनरुक्ती करणे व कदाचित एखादे भाषण ऐकणे ही रीतच असते. उमेदीचा संदेश घोषित करण्याविषयी कोणतेही उत्तेजन दिले जात नाही कारण बहुतेक धर्मांना भवितव्याबद्दल कोणतीच उदात्त आशा नसते. देवाच्या मशीही राज्याच्या भव्य आशेचा एकतर कधी उल्लेख होत नाही किंवा तिचा संपूर्णतः गैरसमज करून घेतला जातो. यहोवा ख्रिस्ती धर्मजगताच्या अनुयायांविषयी भविष्यसूचकपणे असे म्हणतो: “माझ्या लोकांनी दुहेरी दुष्कर्म केले; मी जो जिवंत पाण्याचा झरा, त्या मला त्यांनी सोडिले आणि ज्यात पाणी राहणार नाही असे फुटके हौद आपल्यासाठी खोदून तयार केले.” (यिर्मया २:१३) त्यांच्यामध्ये सत्याचे पाणी नाही. स्वर्गीय बुद्धीची उणीव आहे.
११, १२. (अ) ईश्वरी बुद्धीने आपल्याला कसे प्रवृत्त करावे? (ब) ईश्वरी बुद्धी आपल्याला कशाबद्दल इशारा देते?
११ यहोवाच्या साक्षीदारांमध्ये किती मोठा फरक आहे! देवाने प्रदान केलेल्या चैतन्यशील शक्तीने ते त्याच्या येणाऱ्या राज्याच्या सुवार्तेसहित पृथ्वी व्यापून टाकत आहेत. ते विदित करीत असलेली बुद्धी ठामपणे देवाच्या वचनावर आधारित आहे. (पडताळा नीतिसूत्रे १:२०; यशया ४०:२९-३१.) आपला देव व निर्माणकर्ता याच्या भव्य उद्देशांची घोषणा करण्यात, ते खरे ज्ञान व समज यांचा व्यावहारिक उपयोग करतात. मंडळीतील सर्वजण “सर्व आध्यात्मिक ज्ञान व बुद्धि ह्यांच्याद्वारे . . . [देवाच्या] इच्छेसंबंधीच्या पूर्ण ज्ञानाने भरले जावे” अशी आपली इच्छा असली पाहिजे. (कलस्सैकर १:९) हा पाया असल्यामुळे, युवक व वृद्ध असे दोघेही “वचनाप्रमाणे आचरण करणारे” होण्यास नेहमीच प्रवृत्त होतील.
१२ “वरून येणारे ज्ञान [बुद्धी]” आपल्याला अशा पापांचा इशारा देते ज्यामुळे ईश्वरी नापसंती घडू शकते. “माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्हास हे कळते,” असे याकोब म्हणतो. “तर प्रत्येक माणूस ऐकावयास तत्पर, बोलावयास धीमा, रागास मंद असावा.” होय, आपण ईश्वरी सल्ला ऐकण्यास व त्याचा अवलंब करण्यास तत्पर, उत्सुक असले पाहिजे. तथापि, “लहानसा अवयव” म्हणजेच जीभ हिचा गैरवापर करण्याविरुद्ध आपण सावध असले पाहिजे. बढाई मारणे, असुज्ञ कंड्या किंवा स्वतःचे मत पुढे मांडणारे संभाषण यांद्वारे जीभ लाक्षणिकरित्या “मोठ्या रानाला” पेटवू शकते. यास्तव, आपल्या सर्व सहवासांमध्ये आपल्याला सुखकारकपणा आणि आत्म-संयम विकसित करण्याची आवश्यकता आहे.—याकोब १:१९-२०; ३:५.
१३. आपण “मुळाविलेले वचन” स्वीकारावे हे महत्त्वपूर्ण का आहे?
१३ याकोब लिहितो, “म्हणून सर्व मलिनता व उचंबळून आलेला दुष्टभाव सोडून, तुमच्या जिवाचे तारण करावयास समर्थ असे मुळाविलेले वचन सौम्यतेने स्वीकारा.” (याकोब १:२१) दिखावटी, भौतिक, मीपणाची जीवनशैली आणि निकृष्ट नैतिक मूल्ये यांच्यासह या लोभी जगाचा अंत आता होणारच आहे. “पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.” (१ योहान २:१५-१७) तर मग, आपण “मुळाविलेले वचन” स्वीकारावे हे किती महत्त्वाचे आहे! देवाच्या वचनाने पुरवलेली बुद्धी या मर्त्य जगाच्या वाईटपणाच्या स्पष्टपणे विरोधात आहे. आपल्याला त्यातील कोणताही वाईटपणा नको आहे. (१ पेत्र २:१, २) आपल्याला सत्याविषयी प्रेम आणि आपल्या अंतःकरणात भक्कम विश्वास मुळावलेला असला पाहिजे, जेणेकरून यहोवाच्या नीतिमान मार्गांपासून कधीही दूर न होण्यास आपण दृढनिश्चयी असू. परंतु, देवाचे वचन ऐकणे केवळ पुरेसे आहे का?
“वचनाप्रमाणे आचरण करणारे” होणे
१४. आपण वचनाचे “ऐकणारे” तसेच “आचरण करणारे” कसे होऊ शकतो?
१४ याकोब १:२२ येथे आपण वाचतो: “वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका; अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करिता.” “वचनाप्रमाणे आचरण करणारे असा”! हा विषय याकोबाच्या पत्रात निश्चितच ठळकपणे मांडण्यात आला आहे. आपण ऐकले पाहिजे आणि मग अगदी “तसे केले” पाहिजे! (उत्पत्ति ६:२२) आज अनेक लोक, अधूनमधून एखादे प्रवचन ऐकणे किंवा विधीपूर्वक उपासनेत भाग घेणे पुरेसे आहे असा दावा करून मोकळे होतात. त्यांना कदाचित असे वाटेल की, त्यांच्या दर्जांनुसार ‘चांगले जीवन’ जगणेच केवळ पुरेसे आहे. तरीपण येशू ख्रिस्त म्हणाला: “माझ्यामागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे.” (मत्तय १६:२४) आत्म-त्यागी कृत्य आणि देवाची इच्छा करण्याचा येशूचा नमुना अनुसरण्यामध्ये धीर या गुणाची खऱ्या ख्रिश्चनांकडून स्पष्टपणे अपेक्षा केली जाते. पुनरुत्थित येशूने “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा,” अशी आज्ञा दिली तेव्हा पहिल्या शतकाप्रमाणेच आजही देवाची इच्छा त्यांच्याकरता तीच आहे. (मत्तय २८:१९) या बाबतीत तुम्ही कसे आहात?
१५. (अ) “वचनाप्रमाणे आचरण करणारे” या नात्याने आपण आनंदी कसे होऊ शकतो हे दाखवणारे कोणते उदाहरण याकोब देतो? (ब) केवळ विधीपूर्वक उपासना पुरेशी का नाही?
१५ आपण देवाच्या वचनात निरखून पाहत असल्यास, आपण खरोखर कोणत्या प्रकारच्या व्यक्ती आहोत हे प्रतिबिंबित करणाऱ्या आरशाप्रमाणे ते असू शकते. याकोब म्हणतो: “जो स्वातंत्र्याच्या परिपूर्ण नियमांचे निरीक्षण करून ते तसेच करीत राहतो, तो ऐकून विसरणारा न होता, कृति करणारा होतो व त्याला आपल्या कार्यात धन्यता मिळेल.” (याकोब १:२३-२५) होय, तो आनंदाने ‘वचनाप्रमाणे आचरण करणारा’ ठरेल. शिवाय, आपल्या ख्रिस्ती जीवनाच्या प्रत्येक बाबतीत ‘आचरण करणारा’ होणे महत्त्वाचे आहे. केवळ विधीपूर्वक उपासना पुरेशी आहे असा विचार करण्यामध्ये आपण स्वतःची फसवणूक कधीच करून घेऊ नये. आवेशी ख्रिश्चनांनी देखील कदाचित दुर्लक्ष केले असेल अशा खऱ्या उपासनेच्या काही पैलूंचे परीक्षण करण्याचा याकोब आपल्याला सल्ला देतो. तो लिहितो: “देवपित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथांचा व विधवांचा त्यांच्या संकटात समाचार घेणे, व स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवणे हे आहे.”—याकोब १:२७.
१६. अब्राहाम कोणत्या प्रकारे ‘देवाचा मित्र’ बनला आणि आपण देवाची मैत्री कशी प्राप्त करू शकतो?
१६ केवळ ‘मी देवावर विश्वास ठेवतो’ असे म्हणून मोकळे होणे पुरेसे नाही. याकोब २:१९ म्हणते त्याप्रमाणे, “एकच देव आहे, असा विश्वास तू धरतोस काय? ते बरे करितोस; भुतेहि तसाच विश्वास धरतात व थरथर कापतात.” “विश्वासाबरोबर क्रिया नाही तर तो जात्या निर्जीव आहे” यावर याकोब जोर देतो व अब्राहामाला सूचित करून म्हणतो, “विश्वास त्याच्या क्रियांसहित कार्य करीत होता, आणि क्रियांनी विश्वास पूर्ण झाला.” (याकोब २:१७, २०-२२) अब्राहामाच्या कार्यात त्याच्या नातेवाईकांना मदत करणे, आदरातिथ्य करणे, इसहाकाला अर्पण करण्याची तयारी करणे आणि ‘पाये असलेले नगर,’ म्हणजे भावी मशीही राज्य या देवाच्या अभिवचनावरील भक्कम विश्वासाची ‘जाहीरपणे घोषणा’ करणे समाविष्ट होते. (उत्पत्ति १४:१६; १८:१-५; २२:१-१८; इब्रीयांस ११:८-१०, १३, १४; १३:२) उचितपणे मग, अब्राहामाला “‘देवाचा मित्र’ म्हणण्यात आले.” (याकोब २:२३) आपणही सक्रियतेने यहोवाच्या नीतिमत्त्वाच्या येणाऱ्या राज्याबद्दल विश्वासाची व आशेची घोषणा करतो तसे ‘यहोवाचे मित्र’ म्हणून कदाचित गणले जाऊ.
१७. (अ) राहाबला ‘नीतिमान असे घोषित’ का करण्यात आले, आणि तिला कशा प्रकारे प्रतिफळ देण्यात आले? (ब) जे “वचनाप्रमाणे आचरण करणारे” बनले अशांची कोणती मोठी यादी बायबल पुरवते? (क) ईयोबाला कशा प्रकारे प्रतिफळ देण्यात आले आणि का?
१७ “वचनाप्रमाणे आचरण करणारे” खरे म्हणजे ‘विश्वासाद्वारे नव्हे, तर क्रियांनी नीतिमान ठरतात.’ (याकोब २:२४) राहाबने, यहोवाच्या सामर्थ्यशाली कृत्यांविषयी ऐकलेल्या ‘वचनावरील’ विश्वासात कृतींची भर टाकली. तिने इस्राएली हेरांना लपवले आणि त्यांना पळून जाण्यास मदत केली आणि मग तिने आपल्या पित्याच्या घराण्याचा बचाव व्हावा म्हणून त्यास एकत्र केले. पुनरुत्थानात, तिच्या विश्वासासहित कृती असल्यामुळे ती मशीहाची पूर्वज बनली हे तिला कळाल्यावर किती आनंद होईल! (यहोशवा २:११; ६:२५; मत्तय १:५) इब्रीयांस ११ व्या अध्यायात, आपला विश्वास प्रदर्शित करण्यात जे “आचरण करणारे” ठरले अशांची मोठी यादी आहे आणि त्यांना समृद्धतेने प्रतिफळ दिले जाईल. तसेच आपण ईयोबालाही विसरू नये, ज्याने कठीण परीक्षेत असे म्हटले: “धन्य परमेश्वराचे [यहोवा] नाम.” आपण आधीच निरीक्षिल्याप्रमाणे, त्याचा विश्वास आणि कृत्ये यांमुळे त्याला मोठे प्रतिफळ प्राप्त झाले. (ईयोब १:२१; ३१:६; ४२:१०; याकोब ५:११) त्याचप्रमाणे, आज “वचनाप्रमाणे आचरण करणारे” या नात्याने आपल्याला आपल्या धीरामुळे यहोवाची मान्यता मिळेल.
१८, १९. दीर्घ काळापासून छळ झालेले बांधव “वचनाप्रमाणे आचरण करणारे” कसे बनले आहेत आणि त्यांच्या कार्यामुळे कोणता आशीर्वाद मिळाला आहे?
१८ या वर्षांदरम्यान, पूर्वेकडील युरोपमधील आपल्या बांधवांनी अधिक सहन केले आहे. आता अनेक निर्बंध काढून टाकण्यात आल्यामुळे ते आपल्या नवीन वातावरणात खरोखर “वचनाप्रमाणे आचरण करणारे” बनले आहेत. शेजारच्या देशांतील मिशनऱ्यांनी व पायनियरांनी शिकवणे आणि व्यवस्था करण्यास मदत करण्यासाठी स्थानांतर केले आहे. वॉच टावर संस्थेच्या फिनलंड व इतर नजीकच्या शाखांनी कुशल बिल्डर पाठवले आहेत आणि उदार जागतिक बंधुत्वाने नवीन शाखा दफ्तर व राज्य सभागृहांच्या बांधकामासाठी आर्थिक मदत पुरवली आहे.—पडताळा २ करिंथकर ८:१४, १५.
१९ दीर्घ काळापासून छळण्यात आलेल्या त्या बांधवांनी क्षेत्रात किती आवेशाने प्रतिसाद दिला आहे! “अवेळी” उपलब्ध नसलेल्या संधींची जणू भरपाई करण्यासाठी ते ‘श्रम व खटपट करीत आहेत.’ (१ तीमथ्य ४:१०; २ तीमथ्य ४:२) उदाहरणार्थ, खूप क्रूरतेचे दडपण असलेल्या अल्बेनियात गेल्या एप्रिलमध्ये, “जीवन इतक्या समस्यांनी ग्रस्त का आहे” या शीर्षकाची राज्य वार्ता याचा संपूर्ण साठा केवळ तीन दिवसांमध्येच वितरीत करण्यात आला. येशूच्या मृत्यूचा स्मारक विधी, ज्याला ३,४९१ व्यक्ती उपस्थित होत्या—त्यांच्या ५३८ सक्रिय प्रचारकांपेक्षा पुष्कळ अधिकांचा हा भव्य मागोवा होता.
२०. अलीकडील स्मारक विधीच्या उपस्थिती काय दाखवून देतात आणि अनेकांना कशी मदत दिली जाऊ शकते?
२० इतर देशांनीही स्मारक विधीच्या उपस्थितींमध्ये महत्त्वपूर्ण अनुदान केले आहे व त्यांच्या संख्येत अलीकडील वर्षांमध्ये १,००,००,००० पेक्षा अधिक वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी, स्मारक विधीसाठी उपस्थित राहिलेल्या व साजरा करून ज्यांचा विश्वास भक्कम झाला असे नवोदित जण आता ‘वचनाप्रमाणे आचरण करणारे होत’ आहेत. त्या विशेषाधिकारासाठी पात्र ठरण्यास आपण आणखी नवीन सोबत्यांना उत्तेजन देऊ शकतो का?
२१. आपल्या वार्षिक वचनानुसार आपण कोणता मार्ग अनुसरला पाहिजे आणि कोणत्या ध्येयासह?
२१ सार्वकालिक जीवनाची ‘मर्यादेवरील खूण,’ मग ती स्वर्गीय राज्यात किंवा त्याच्या पार्थिव सान्निध्यात असो, त्याकडे पहिल्या शतकातील आवेशी ख्रिश्चन व त्यानंतरच्या कित्येकांसारखे, ‘धावण्यास’ स्वतः यत्न करण्यात आपण दृढनिश्चयी होऊ या. (फिलिप्पैकर ३:१२-१४) ते ध्येय साध्य करण्यास प्रत्येक प्रयत्न करणे योग्य आहे. केवळ ऐकणारे होण्याची ही वेळ नाही, तर ‘हिम्मत धरून कामास लागण्याची’ ही सर्वात महत्त्वपूर्ण वेळ आहे. (हाग्गय २:४; इब्रीयांस ६:११, १२) ‘मुळावलेले वचन स्वीकारल्याने’ आपण आता तसेच येणाऱ्या अनंतकाळात ‘वचनाप्रमाणे आचरण करणारे आनंदी लोक’ होऊ या.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
◻ आपण आनंदाने कसा धीर धरू शकतो?
◻ “वरून येणारे ज्ञान” काय आहे आणि आपण त्याचा पिच्छा कसा करू शकतो?
◻ आपण ‘केवळ ऐकणारे नसून वचनाप्रमाणे आचरण करणारे का व्हावे?”
◻ “वचनाप्रमाणे आचरण करणारे” असण्यासाठी कोणत्या वृत्तान्तांनी आपल्याला उद्दीपित केले पाहिजे?
[१७ पानांवरील चित्रं]
आपणही ईश्वरी शिक्षणाप्रती आपले अंतःकरण ग्रहणशील बनवू या
[१८ पानांवरील चित्रं]
ईयोबाला प्रियजनांसोबत संपूर्ण, समाधानी जीवन पुन्हा देऊन त्याच्या सत्वनिष्ठेचे प्रतिफळ देण्यात आले