-
धर्म लोकांना देवापासून दूर कसे नेतात?कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
-
-
बहुतेक धर्म “देवाच्या सत्याऐवजी असत्याला पसंत” करतात. (रोमकर १:२५) जसं की ते लोकांना खऱ्या देवाचं नाव काय आहे हे शिकवत नाहीत. पण बायबल सांगतं की देवाचं नाव वापरणं महत्त्वाचं आहे. (रोमकर १०:१३, १४) तसंच एखादी वाईट घटना घडते, तेव्हा काही धर्मपुढारी असं म्हणतात की ही देवाचीच इच्छा होती. पण ही गोष्ट साफ खोटी आहे. कारण देव कधीही वाईट गोष्टी घडवून आणत नाही. (याकोब १:१३ वाचा.) तर, अशा प्रकारच्या चुकीच्या शिकवणी लोकांना देवापासून दूर नेतात. ही खरंच एक दुःखाची गोष्ट आहे!
-
-
जगात वाईट गोष्टी आणि दुःख का आहे?कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
-
-
४. आपल्या दुःखासाठी कोण जबाबदार आहे?
पुष्कळ लोकांना असं वाटतं की या संपूर्ण जगावर देव नियंत्रण करतो. पण हे खरंय का? व्हिडिओ पाहा.
याकोब १:१३ आणि १ योहान ५:१९ वाचा, आणि मग या प्रश्नावर चर्चा करा:
जगातल्या वाईट गोष्टींसाठी आणि दुःखांसाठी देव जबाबदार आहे का?
-