जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ
२-८ सप्टेंबर
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं|इब्री लोकांना ७-८
“मलकीसदेकसारखा सर्वकाळासाठी असणारा याजक”
इन्साइट-२ पृ. ३६६
मलकीसदेक
मलकीसदेक प्राचीन शालेम शहराचा राजा आणि “परात्पर देवाचा याजक” होता. (उत्प १४:१८, २२) याजक म्हणून शास्त्रवचनात सर्वात पहिला उल्लेख मलकीसदेकचाच येतो. इ.स.पू. १९३३ च्या आधी केव्हा तरी त्याला हे पद मिळालं असावं. प्रेषित पौलने मलकीसदेकची ओळख शालेम शहराच्या नावावरून “शांतीचा राजा” आणि मलकीसदेक या नावाच्या अर्थावरून “नीतिमत्त्वाचा राजा” अशी करून दिली आहे. (इब्री ७:१, २) असं म्हटलं जातं, की प्राचीन शालेम शहर हे नंतर बनलेल्या यरुशलेम शहराचं केंद्र होतं. त्यामुळे यरुशलेम या नावात शालेम हे नावसुद्धा समाविष्ट करण्यात आलं होतं. म्हणूनच यरुशलेम शहराचा उल्लेख कधी-कधी ‘शालेम’ असासुद्धा करण्यात आला आहे.—स्तो ७६:२.
अब्रामने (अब्राहामने) कदारलागोमर शहराचा आणि लढाईसाठी संघटित झालेल्या त्याच्या राजांचा पराभव केला आणि तो शावेच्या खोऱ्यात म्हणजे राज्यांच्या खोऱ्यात पोचला. तेव्हा तिथे मलकीसदेकने त्याला भाकरी आणि द्राक्षारस देऊन आशीर्वाद दिला आणि म्हटलं: “आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी जो परात्पर देव तो अब्रामला आशीर्वाद देवो. ज्या परात्पर देवाने तुझे शत्रू तुझ्या स्वाधीन केले तो धन्य!” तेव्हा अब्रामने राजा आणि याजक असलेल्या या मलकीसदेकला सगळ्यातला “दहावा भाग” म्हणजे लढाईत सगळ्या राजांना पराभूत केल्यामुळे आणलेल्या लुटीतला उत्तम असा दहावा भाग दिला.—उत्प १४:१७-२०; इब्री ७:४.
इन्साइट-२ पृ. ३६७ परि. ४
मलकीसदेक
मलकीसदेकबद्दल, ‘त्याच्या दिवसांची सुरवात नाही आणि त्याच्या जीवनाचा अंतही नाही,’ असं जे म्हटलंय, ते खरं आहे असं का म्हणता येईल?
पौलने मलकीसदेकविषयी असलेल्या एका विशेष गोष्टीकडे लक्ष वेधण्यासाठी असं म्हटलं: “त्याला आईवडील किंवा वंशावळ नाही; तसेच, त्याच्या दिवसांची सुरुवात नाही आणि त्याच्या जीवनाचा अंतही नाही, तर त्याला देवाच्या पुत्रासारखे करण्यात आल्यामुळे तो सर्वकाळासाठी याजक राहतो.” (इब्री ७:३) इतर मानवांप्रमाणेच मलकीसदेकचासुद्धा जन्म झाला होता आणि तोसुद्धा नंतर मरून गेला. पण त्याच्या आई-वडिलांचं नाव कुठेच सापडत नाही. त्याच्या वंशावळीबद्दल आणि त्याच्या संततीबद्दलही कुठे माहिती देण्यात आलेली नाही. शास्त्रवचनात त्याच्या सुरुवातीच्या आयुष्याबद्दल आणि त्याचा शेवट कसा झाला याबद्दल काहीही सांगितलेलं नाही. त्यामुळे सर्वकाळासाठी याजक असणाऱ्या येशूला मलकीसदेक अगदी योग्यपणे सूचित करत होता. मलकीसदेकचं याजकपद त्याला कोणाकडून मिळालं आणि त्याच्यानंतर ते कोणाला देण्यात आलं, याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही. त्याचप्रमाणे येशूच्या आधी, त्याच्या स्वतःसारखा एकही मुख्य याजक नव्हता आणि त्याच्यानंतरही कोणाला त्याच्यासारखं याजकपद देण्यात येणार नव्हतं, असं बायबल स्पष्ट करतं. एवढंच नव्हे तर, येशूचा जन्म यहूदाच्या घराण्यात, दावीदच्या राजवंशात झाला असला तरी त्याच्या मानवी वंशावळीत कोणाकडेच याजकपदाचा वारसा नव्हता. शिवाय, त्याच्या मानवी वंशावळीत असं कोणीच नव्हतं ज्यामुळे वारशाने हे याजकपद आणि राजपद त्याला सोबत मिळणार होतं. या गोष्टी त्याला फक्त यहोवाने दिलेल्या शपथेमुळेच मिळाल्या होत्या.
इन्साइट-२ पृ. ३६६
मलकीसदेक
येशूचं याजकपद आधीच लाक्षणिक रीत्या भाकीत करण्यात आलं होतं. मसीहाविषयी असणाऱ्या एका महत्त्वाच्या भविष्यवाणीमध्ये, दावीदच्या ‘प्रभूला’ यहोवाने अशी शपथ दिली होती, की मलकीसदेकसारखाच तोसुद्धा युगानुयुग याजक असेल. (स्तो ११०:१, ४) स्तोत्रामधल्या या भविष्यवाणीमुळे इब्री लोकांना हे समजून घेता आलं की ज्या मसीहाविषयी हे वचन देण्यात आलं आहे, तो मसीहा एक अशी व्यक्ती असेल ज्याच्याकडे याजकपद आणि राजपद या दोन्ही गोष्टी असतील. हा भाकीत करण्यात आलेला मसीहा कोण असेल याची स्पष्ट ओळख देत पौलने इब्री लोकांना लिहिलेल्या पत्रात येशूविषयी असं म्हटलं, की ‘देवाने त्याला मलकीसदेकसारखा याजक होण्यासाठी नेमलं आहे.’ त्यामुळे तो मसीहा येशूच होता याबद्दल कोणतीच शंका उरत नाही.—इब्री ६:२०; ५:१०.
आध्यात्मिक रत्नं शोधा
इन्साइट-१ पृ. ५२३ परि. ५
करार
नियमशास्त्राचा करार कशा प्रकारे “रद्द” करण्यात आला?
जेव्हा यिर्मया संदेष्ट्याद्वारे देवाने हे घोषित केलं, की एक “नवा करार” स्थापण्यात येईल, तेव्हा नियमशास्त्राचा करार आपोआपच “जुना” झाला. (यिर्म ३१:३१-३४; इब्री ८:१३) आणि मग इ.स. ३३ मध्ये वधस्तंभावर झालेल्या येशूच्या मृत्यूच्या आधारावर नियमशास्त्राचा हा करार “रद्द” करण्यात आला (कल २:१४) आणि त्याची जागा नव्या कराराने घेतली.—इब्री ७:१२; ९:१५; प्रेका २:१-४.
इन्साइट-१ पृ. ५२४ परि. ३-५
करार
नवा करार. इ.स.पू. सातव्या शतकात यहोवाने यिर्मया संदेष्ट्याद्वारे नव्या कराराबद्दल भविष्यवाणी केली. आणि हे स्पष्ट केलं, की नियमशास्त्राचा करार ज्याप्रमाणे इस्राएलने मोडला त्याप्रमाणे या कराराच्या बाबतीत होणार नाही. (यिर्म ३१:३१-३४) आपल्या मृत्यूच्या आदल्या रात्री म्हणजे इ.स. ३३ च्या निसान १४ ला येशूने प्रभूच्या सांजभोजनाच्या विधीची सुरवात केली. आणि तेव्हाच शिष्यांना आपल्या बलिदानामुळे हा नवा करार स्थापित केला जाईल असं सांगितलं. (लूक २२:२०) येशूचं पुनरुत्थान झाल्यानंतर ५० व्या दिवशी म्हणजे तो स्वर्गात गेल्यानंतर १० दिवसांनी त्याने यरुशलेममधल्या माडीवरच्या खोलीत जमलेल्या आपल्या शिष्यांवर यहोवाकडून मिळालेला पवित्र आत्मा ओतला.—प्रेका २:१-४, १७, ३३; २करि ३:६, ८, ९; इब्री २:३, ४.
हा नवा करार यहोवा देव आणि ख्रिस्तासोबत असणाऱ्या, आत्म्याने अभिषिक्त असलेल्या लोकांमध्ये, म्हणजे ज्यांना ‘देवाचं इस्राएल’ म्हटलं आहे त्यांच्यामध्ये करण्यात आला. या अभिषिक्त जणांनी मिळूनच ख्रिस्ताचं शरीर म्हणजे त्याची मंडळी बनते. (इब्री ८:१०; १२:२२-२४; गल ६:१५, १६; ३:२६-२८; रोम २:२८, २९) स्वर्गात गेल्यानंतर जेव्हा येशूच्या सांडलेल्या रक्ताचं (मानवी जीवनाच्या बलिदानाचं) मूल्य यहोवापुढे सादर करण्यात आलं तेव्हा हा नवा करार लागू करण्यात आला. (मत्त २६:२८) जेव्हा एका व्यक्तीला स्वर्गीय जीवनासाठी निवडलं जातं, (इब्री ३:१) तेव्हा यहोवा देव त्या व्यक्तीला येशूच्या बलिदानाच्या आधारावर केलेल्या या कराराचे फायदे लागू करतो. (स्तो ५०:५; इब्री ९:१४, १५, २६) या नव्या कराराचा मध्यस्थ येशू आहे, (इब्री ८:६; ९:१५) आणि तोच अब्राहामची प्रमुख संतती आहे. (गल ३:१६) त्यामुळे नव्या कराराचा मध्यस्थ या नात्याने येशू या करारात सामील असणाऱ्यांना, त्यांच्या पापाची क्षमा करण्याद्वारे अब्राहामची खरी संतती (इब्री २:१६; गल ३:२९) बनण्यासाठी मदत करतो. आणि त्यामुळेच यहोवा त्यांना नीतिमान ठरवतो.—रोम ५:१, २; ८:३३; इब्री १०:१६, १७.
आत्म्याने अभिषिक्त असलेले ख्रिस्ताचे हे बांधव मुख्य याजकाच्या अधीन राहून सहयाजक या नात्याने आपली जबाबदारी पार पाडतात. त्यांनाच “राजे असलेले याजक” म्हटलं आहे. (१पेत्र २:९; प्रक ५:९, १०; २०:६) अशा प्रकारे हे सहयाजक आपली जबाबदारी म्हणजे, आपली “जनसेवा” पार पाडतात. (फिलि २:१७ तळटीप) म्हणूनच त्यांना ‘नव्या कराराचे सेवक’ म्हटलं आहे. (२कर ३:६) या सर्व निवडलेल्या अभिषिक्त जणांनी आपल्या मृत्यूपर्यंत विश्वासूपणे येशूच्या पावलांचं अगदी जवळून अनुकरण करणं गरजेचं आहे. कारण त्यानंतरच यहोवा त्यांना आपल्या याजक राज्यात सामील करून स्वर्गात राखून ठेवलेल्या वारशाचे भागीदार बनवेल. मग येशूचे स्वर्गीय वारसदार म्हणून त्यांना अमरत्व व अविनाशी शरीर दिलं जाईल. (१पेत्र २:२१; रोम ६:३, ४; १कर १५:५३; १पेत्र १:४; २पेत्र १:४) अशा प्रकारे, अब्राहामच्या “संततीचा” भाग म्हणून यहोवाच्या नावासाठी पृथ्वीवरून काही लोकांना निवडून घेणं, हाच या कराराचा उद्देश होता. (प्रेका १५:१४) या करारानुसार हे निवडलेले लोक येशूची “वधू” बनतात आणि येशू त्यांना आपल्यासोबत राज्य करण्यासाठी राज्याच्या करारात सामील करतो. (योह ३:२९; २कर ११:२; प्रक २१:९; लूक २२:२९; प्रक १:४-६; ५:९, १०; २०:६) ‘देवाच्या इस्राएलचा’ भाग असणाऱ्या या सगळ्यांना जोपर्यंत अमर आत्मिक जीवनासाठी स्वर्गात उठवलं जात नाही, तोपर्यंत या नव्या कराराचा उद्देश पूर्ण झाला असं म्हणता येणार नाही.
९-१५ सप्टेंबर
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं|इब्री लोकांना ९-१०
‘पुढे येणाऱ्या चांगल्या गोष्टींची छाया’
इन्साइट-१ पृ. ८६२ परि. १
क्षमा
जेव्हा एका व्यक्तीच्या हातून देवाविरुद्ध किंवा इतर मानवांविरुद्ध पाप व्हायचं, तेव्हा इस्राएल राष्ट्राला दिलेल्या नियमशास्त्रानुसार तिला पापाच्या क्षमेसाठी प्रायश्चित्त करावं लागायचं. त्यासाठी बहुतेकवेळा तिला यहोवाला पापार्पण म्हणजे प्राण्याचं रक्त अर्पण करावं लागायचं. (लेवी ५:५-६:७) या गोष्टीमागे असणारं तत्त्व स्पष्ट करत पौलने म्हटलं: “नियमशास्त्राप्रमाणे जवळजवळ सर्व वस्तू रक्ताने शुद्ध होतात; आणि रक्त ओतल्याशिवाय पापांची क्षमा मिळणे शक्य नाही.” (इब्री ९:२२) पण खरं पाहायला गेलं तर, प्राण्यांच्या बलिदानामुळे पापांची पूर्णपणे क्षमा मिळवणं आणि शुद्ध विवेक प्राप्त करणं शक्य नव्हतं. (इब्री १०:१-४; ९:९, १३, १४) याउलट, आधीच भाकीत करण्यात आलेल्या नव्या करारामुळे, येशू ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानाच्या आधारावर पापांची खऱ्या अर्थाने क्षमा मिळवणं शक्य झालं. (यिर्म ३१:३३, ३४; मत्त २६:२८; १कर ११:२५; इफि १:७) शिवाय लकवा मारलेल्या एका व्यक्तीला बरं करण्याद्वारे, पृथ्वीवर असतानाच येशूनेसुद्धा हे दाखवून दिलं की, पापांची क्षमा करण्याचा अधिकार त्याच्याकडे होता.—मत्त ९:२-७.
मेरा चेला अध्या. १८ परि. ४
“मेरे पीछे चलना जारी रख”
४ एक हज़ार पाँच सौ साल से भी ज़्यादा समय से यहूदी एक पवित्र समारोह मनाते आ रहे थे। साल में एक बार महायाजक मंदिर के परम-पवित्र स्थान में जाता था और करार के संदूक के सामने प्रायश्चित दिन पर चढ़ाए गए बलिदानों का लहू छिड़कता था। उस दिन, महायाजक मसीहा को दर्शाता था। उस समारोह को मनाने का मकसद था, पापों की माफी। लेकिन यीशु ने एक ही बार में हमेशा के लिए इंसानों के पापों की माफी की कीमत अदा कर दी। वह स्वर्ग में सारी सृष्टि के राजा यहोवा के सामने हाज़िर हुआ, उस जगह जो पूरे जहान की सबसे पवित्र जगह है और अपने पिता के सामने अपने फिरौती बलिदान की कीमत अदा की।—इब्रानियों ९:११, १२, २४.
इन्साइट-२ पृ. ६०२-६०३
परिपूर्णता
मोशेच्या नियमशास्त्राची परिपूर्णता. मोशेद्वारे इस्राएलांना दिलेल्या नियमशास्त्रामध्ये, इतर तरतुदींसोबतच याजकवर्गाची स्थापना आणि वेगवेगळ्या प्राण्यांच्या बलिदानांची तरतूदसुद्धा सामील होती. ही तरतूद देवाकडून होती आणि त्यामुळे परिपूर्णसुद्धा होती. पण प्रेषित पौलने म्हटल्याप्रमाणे, नियमशास्त्राच्या अधीन असणाऱ्यांना परिपूर्ण जीवन प्राप्त करण्यासाठी याजकवर्गाचा, नियमशास्त्राचा, आणि या तरतुदीनुसार दिल्या जाणाऱ्या बलिदानांचा काहीच फायदा होणार नव्हता. (इब्री ७:११, १९; १०:१) पाप आणि मृत्यूपासून सुटका करून देण्याऐवजी खरंतर या गोष्टींमुळे पापाची जाणीव जास्त तीव्र झाली. (रोम ३:२०; ७:७-१३) तरीसुद्धा देवाकडून असलेल्या या सर्व तरतुदींमुळे, त्यामागे असलेला देवाचा उद्देश मात्र साध्य झाला. म्हणजे लोकांना ख्रिस्तापर्यंत नेण्यासाठी नियमशास्त्र एक ‘रक्षक’ ठरलं आणि त्यामुळे “पुढे येणाऱ्या चांगल्या गोष्टींची” ते एक परिपूर्ण अशी “छाया” (सूचक) बनलं. (गल ३:१९-२५; इब्री १०:१) तरी, पौल ‘मानवी दुर्बलतेमुळे’ नियमशास्त्राला काहीतरी ‘साध्य करता आलं नाही’ असं म्हणतो. (रोम ८:३) पौल या ठिकाणी निश्चितच यहुदी महायाजक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीच्या मानवी दुर्बलतेविषयी बोलत होता. (ज्याला बलिदान अर्पण करण्याच्या तरतुदीमध्ये मुख्य भूमिका घेऊन प्रायश्चित्ताच्या दिवशी बलिदानाचं रक्त घेऊन परमपवित्र स्थानात प्रवेश करण्यासाठी नियमशास्त्राद्वारे नियुक्त करण्यात आलं होतं) कारण इब्री लोकांना ७:११, १८-२८ मध्ये सांगितल्याप्रमाणे महायाजकाकडे येणाऱ्यांचं ‘पूर्णपणे तारण करणं’ त्याला शक्य नव्हतं. अहरोनच्या घराण्यापुरतं मर्यादित असणाऱ्या या याजकपदामुळे जरी मानवांना देवासमोर योग्य पद्धतीनं जाता आलं, तरी पापाच्या दोषी भावनेपासून त्यांना पूर्णपणे किंवा अगदी योग्यपणे मुक्तता मिळाली नाही. त्यामुळे, पौलने जेव्हा प्रायश्चित्ताची अर्पणे ‘देवाजवळ येणाऱ्याला कधीच परिपूर्ण करू शकत नाहीत’ असं म्हटलं, तेव्हा तो याच गोष्टीबद्दल म्हणजे ही अर्पणे सादर करणाऱ्या व्यक्तीच्या दोषी भावनेबद्दल बोलत होता. (इब्री १०:१-४ ची तुलना इब्री ९:९ सोबत करा) थोडक्यात सांगायचं तर महायाजकाची भूमिका पार पाडणारी व्यक्ती पापापासून खरी सुटका मिळण्यासाठी लागणारी खंडणीची किंमत देऊ शकत नव्हती. फक्त ख्रिस्ताची याजक म्हणून असलेली कायमची भूमिका आणि त्याने दिलेल्या कायमच्या बलिदानामुळेच हे शक्य होणार होतं.—इब्री ९:१४; १०:१२-२२.
आध्यात्मिक रत्नं शोधा
टेहळणी बुरूज९२-E ३/१ पृ. ३१ परि. ४-६
वाचकांचे प्रश्न
पौलने म्हटलं की देव आणि मानव यांच्यामधला करार अमलात यायचा असेल तर कोणाचा तरी मृत्यू होणं आवश्यक आहे. याचं एक उदाहरण म्हणजे नियमशास्त्राचा करार. देव आणि वास्तविक इस्राएल राष्ट्रातील लोकांमध्ये असणाऱ्या या कराराचा मध्यस्थ मोशे होता. त्यामुळे असं म्हणता येईल की मोशेची यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका होती. कारण इस्राएल राष्ट्राला या कराराच्या अधीन आणण्याकरता मोशेच देवाच्या वतीनं त्यांच्यासोबत बोलत होता. त्यामुळे याबाबतीत मोशे हाच करार करणारा मनुष्य होता असं म्हणता येईल. पण नियमशास्त्राचा करार अमलात आणण्यासाठी मोशेला आपल्या जीवनाचं बलिदान देऊन रक्त सांडण्याची गरज होती का? नाही. उलट प्राण्यांचं बलिदान देऊन मोशेच्या रक्ताऐवजी पर्याय म्हणून त्यांचं रक्त अर्पण केलं गेलं.—इब्री ९:१८-२२.
मग यहोवा आणि आत्मिक इस्राएलमध्ये करण्यात आलेल्या नव्या कराराबद्दल काय? यहोवा आणि आत्मिक इस्राएल राष्ट्र यांच्यामध्ये मध्यस्थ म्हणून येशू ख्रिस्ताची एक अतिशय खास भूमिका आहे. नवा करार जरी यहोवाने केला असला तरी तो ख्रिस्तावर आधारलेला आहे. मध्यस्थ असण्यासोबतच या करारात ज्यांना पहिल्यांदा घेण्यात आलं त्यांच्याशी येशूचा थेट संबंध आला होता. (लूक २२:२०, २८, २९) शिवाय, करार अमलात आणण्यासाठी ज्या बलिदानाची गरज होती, ते बलिदान देण्यासाठीसुद्धा तो अगदी योग्य असा होता. हे बलिदान प्राण्याचं नाही तर परिपूर्ण मानवी जीवाचं होतं. म्हणून पौलने नव्या कराराच्या बाबतीत ख्रिस्ताला, मानवी करार करणारा असं म्हटलं. जेव्हा येशू स्वर्गात गेला आणि आपल्यासाठी देवासमोर उभा राहिला तेव्हा हा नवा करार खऱ्या अर्थाने अमलात आला.—इब्री ९:१२-१४, २४.
पौलने इथे मोशेला आणि येशूला करार करणारे असं म्हटलं. पण याचा अर्थ असा नव्हता की या दोघांनी कराराची योजना केली. कारण खरंतर हे दोन्ही करार मुळात देवाने केले होते. उलट या दोघांनी हे करार अमलात आणण्यासाठी मध्यस्थ म्हणून अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. पण दोन्ही करारांच्या बाबतीत कोणाचातरी मृत्यू होणं गरजेचं होतं. नियमशास्त्राच्या करारात मोशेऐवजी प्राण्यांचं बलिदान देण्यात आलं, तर नव्या करारात मात्र स्वतः येशूने आपल्या जीवनाचं बलिदान दिलं.
इन्साइट-१ पृ. २४९-२५०
बाप्तिस्मा
येशू त्याच्या बाप्तिस्म्याच्या वेळी प्रार्थना करत होता, असं लूकने म्हटलं. (लूक ३:२१) शिवाय प्रेषित पौलनेही असं म्हटलं की जेव्हा येशू “जगात आला” (त्याचा जन्म झाला होता आणि तो हे शब्द वाचू आणि बोलू शकत नव्हता तेव्हा नाही, तर त्याने स्वतःला बाप्तिस्म्यासाठी सादर केलं आणि आपल्या सेवाकार्याची सुरुवात केली तेव्हा) तेव्हा त्याने जे म्हटलं ते स्तोत्र ४०:६-८ नुसार होतं: “तुला बलिदाने आणि अर्पणे नको होती, तर तू माझ्यासाठी एक शरीर तयार केलं . . . हे देवा पाहा! (गुंडाळीत माझ्याविषयी लिहिण्यात आल्याप्रमाणे) तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी आलो आहे.” (इब्री १०:५-९) येशूचा जन्म यहुदी राष्ट्रातच झाला होता आणि या राष्ट्रासोबत देवाने एक करार केला होता, ज्याला नियमशास्त्राचा करार म्हटलं आहे. (निर्ग १९:५-८; गल ४:४) म्हणून जेव्हा येशू योहानकडे बाप्तिस्मा घेण्यासाठी आला तेव्हा खरंतर तो आधीपासूनच यहोवा देवासोबत या करारात सामील होता. त्यामुळे बाप्तिस्मा घेताना नियमशास्त्रानुसार आवश्यक असणाऱ्या गोष्टींपेक्षा आणखी काहीतरी येशू करत होता. तो आपल्या पित्याची ‘इच्छा’ पूर्ण करण्यासाठी स्वतःला आपल्या पित्यासमोर सादर करत होता. आणि नियमशास्त्रातल्या आज्ञेप्रमाणे दिल्या जाणाऱ्या प्राण्यांच्या बलिदानांना कायमचं बंद करण्यासाठी तो स्वतःचं ‘तयार केलेलं’ शरीर देवाला अर्पण करत होता. प्रेषित पौलने म्हटलं: “याच ‘इच्छेमुळे’ आपल्याला सर्वकाळासाठी एकदाच देण्यात आलेल्या येशू ख्रिस्ताच्या शरीराच्या अर्पणाद्वारे पवित्र करण्यात आले आहे.” (इब्री १०:१०) पित्याची इच्छा पूर्ण करण्यामध्ये राज्याशी संबंधीत असलेल्या कार्यात सहभाग घेणंही सामील होतं आणि त्यासाठीसुद्धा येशूने स्वतःला सादर केलं. (लूक ४:४३; १७:२०, २१) यहोवाने आपल्या पुत्राचं हे अर्पण स्वीकारलं आणि पवित्र शक्तीने त्याचा अभिषेक करून आपली संमतीसुद्धा दाखवून दिली आणि म्हटलं: “तू माझा परमप्रिय पुत्र आहेस; तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे.”—मार्क १:९-११; लूक ३:२१-२३; मत्त ३:१३-१७.
१६-२२ सप्टेंबर
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं|इब्री लोकांना ११
“विश्वासाचं महत्त्व”
टेहळणी बुरूज१३-E ११/१ पृ. ११ परि. २-५
“त्याचा मनापासून शोध घेणाऱ्यांना तो प्रतिफळ देतो”
आपण यहोवाला खूश कसं करू शकतो? “विश्वासाशिवाय देवाला आनंदित करणे अशक्य आहे,” असं पौलने म्हटलं. पण लक्ष द्या पौल इथं असं नाही म्हणाला की विश्वासाशिवाय देवाला खूश करणं कठीण आहे. उलट तो म्हणाला असं करणं मुळात अशक्य आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर देवाला खूश करण्यासाठी विश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे.
पण कशा प्रकारच्या विश्वासामुळे यहोवा खूश होतो? देवावर असणाऱ्या विश्वासामध्ये दोन गोष्टी असल्या पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे, ‘तो अस्तित्वात आहे’ ही खात्री आपण बाळगली पाहिजे. इतर भाषांतरांमध्ये यालाच, ‘तो खरीखुरी व्यक्ती आहे अशी खात्री बाळगणं’ आणि ‘तो आहे असा विश्वास ठेवणं,’ असं म्हटलंय. जर आपल्याला देवाच्या अस्तित्वावरच शंका असेल तर आपण त्याला खूश कसं करू शकतो? पण फक्त विश्वास ठेवणंच पुरेसं नाही कारण दुरात्मेसुद्धा यहोवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात. तर यात आणखीन एक गोष्ट आहे जी आपण केली पाहिजे. (याकोब २:१९) देव अस्तित्वात आहे या आपल्या विश्वासामुळे आपण कार्य करायला प्रवृत्त झालं पाहिजे. म्हणजे देव खूश होईल अशा प्रकारे जीवन जगण्याद्वारे आपण देवावरचा आपला विश्वास सिद्ध केला पाहिजे.—याकोब २:२०, २६.
दुसरी गोष्ट म्हणजे, आपण “ही खातरी बाळगली पाहिजे” की देव “प्रतिफळ” देणारा आहे. भक्कम विश्वास असणाऱ्या व्यक्तीला पूर्ण खात्री असते की देवाला खूश करता येईल अशा प्रकारे जगण्यासाठी आपण जी काही मेहनत घेतो ती कधीही वाया जाणार नाही. (१ करिंथकर १५:५८) आपल्याला जर देवाच्या प्रतिफळ देण्याच्या क्षमतेवर किंवा इच्छेवरच शंका असेल तर आपण त्याला खूश कसं करू शकतो? (याकोब १:१७; १ पेत्र ५:७) जर एखादी व्यक्ती असा निष्कर्ष काढत असेल की देवाला आपली काळजी नाही, आपण केलेल्या कार्यांची त्याला कदर नाही आणि तो उदारही नाही, तर ती व्यक्ती मुळात देवाला ओळखत नाही असा त्याचा अर्थ होतो.
पण देव कोणाला प्रतिफळ देतो? पौलने म्हटलं, “त्याचा शोध झटून करणाऱ्या” तो प्रतिफळ देतो. बायबलचं भाषांतर करणाऱ्यांसाठी असलेल्या एका संदर्भात असं म्हटलं आहे की ‘झटून शोध करणं’ यासाठी जो ग्रीक शब्द वापरला आहे त्याचा अर्थ असा होत नाही की ‘बाहेर जाऊन शोध घेणं,’ तर देवाची ‘उपासना’ करण्यासाठी त्याच्या जवळ येणं, असा होतो. आणखी एका संदर्भानुसार यासाठी वापरण्यात आलेलं ग्रीक क्रियापद, कसोशीने आणि लक्ष विचलित न करता घेतलेल्या मेहनतीला सूचित करतं. तर यावरून हे स्पष्टच आहे, की जे आपल्या विश्वासामुळे प्रवृत्त होऊन पूर्ण मनाने आणि पूर्ण शक्तीने यहोवाची उपासना करतात अशांनाच तो प्रतिफळ देतो.—मत्तय २२:३७.
आध्यात्मिक रत्नं शोधा
इन्साइट-१ पृ. ८०४ परि. ५
विश्वास
विश्वासाची प्राचीन उदाहरणं. “साक्षीदारांचा मोठा ढग” असा ज्या लोकांचा पौलने उल्लेख केला, (इब्री १२:१) त्यांच्यातील प्रत्येकाकडे विश्वास ठेवण्यासाठी ठोस कारणं होती. उदाहरणार्थ, संततीबद्दल देवाने केलेलं अभिवचन हाबेलला चांगल्या प्रकारे माहीत होतं. ही संतती पुढे सापाचं डोकं फोडेल हेही त्याला माहीत होतं. आणि एदेन बागेत त्याच्या आईवडिलांना यहोवाने जी शिक्षा सुनावली होती ती पूर्ण झाल्याचा प्रत्यक्ष पुरावासुद्धा त्याने पाहिला होता. देवाने जमिनीला दिलेल्या शापामुळे, तिच्यातून फक्त काटेकुसळे उगवत असल्यामुळे आदाम आणि त्याच्या कुटुंबाला एदेन बाहेर काबाडकष्ट करून पोट भरावं लागत होतं. हाबेलने हेदेखील पाहिलं असावं की हव्वेची ओढ नेहमी तिच्या नवऱ्याकडे होती आणि आदाम मात्र तिच्यावर अधिकार गाजवायचा. मुलांना जन्म देताना होणाऱ्या वेदनांबद्दलसुद्धा त्याच्या आईने त्याला नक्कीच सांगितलं असावं. शिवाय एदेन बागेच्या प्रवेशाजवळ करूबांना आणि फिरत्या तलवारीला बागेचं रक्षण करतानाही त्यानं पाहिलं होतं. (उत्प ३:१४-१९, २४) हाबेलसाठी या सर्व गोष्टी, अभिवचन दिलेल्या संततीमुळे नक्की सुटका मिळेल, या गोष्टीवर भरवसा ठेवण्याकरता “खातरीलायक पुरावा”होत्या. म्हणूनच आपल्या या विश्वासामुळे त्याने “काइनपेक्षा अधिक चांगलं बलिदान अर्पण केलं.”—इब्री ११:१, ४.
२३-२९ सप्टेंबर
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं|इब्री लोकांना १२-१३
“शिस्त लावणं—यहोवाच्या प्रेमाचा पुरावा”
टेहळणी बुरूज१२-E ७/१ पृ. २१ परि. ३
“तुम्ही प्रार्थना करता तेव्हा असं म्हणा: ‘हे पित्या’”
आपलं मूल मोठं होऊन कशा प्रकारची व्यक्ती बनेल, ही चिंता असल्यामुळे एक प्रेमळ पिता आपल्या मुलांना शिस्त लावतो. (इफिसकर ६:४) शिस्त लावणारा पिता जरी कडक स्वभावाचा वाटत असला तरी तो शिस्त लावताना आपल्या मुलांशी कठोरतेने वागत नाही. त्याच प्रकारे गरज असते तेव्हा आपला स्वर्गीय पितादेखील आपल्याला शिस्त लावतो. पण तो हे कठोरतेने करत नाही, तर प्रेमळपणे करतो. येशूसुद्धा आपल्या पित्यासारखाच होता. त्याच्या शिष्यांनी, चूक सुधारल्यानंतरही हवा तसा प्रतिसाद दिला नाही तेव्हासुद्धा तो त्यांच्याशी प्रेमानेच वागला.—मत्तय २०:२०-२८; लूक २२:२४-३०.
३० सप्टेंबर–६ ऑक्टोबर
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं|याकोब १-२
“पाप आणि मृत्यूकडे नेणारा मार्ग”
सावध राहा!१७.४-E पृ. १४
मोह
जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीकडे आकर्षित होता, खासकरून चुकीच्या गोष्टीकडे, तेव्हा त्याला मोहात पडणं असं म्हणतात. याचं एक उदाहरण घ्या. खरेदी करताना एखादी हवी असलेली गोष्ट तुम्हाला दिसते. तेव्हा तुमच्या मनात चटकन असा विचार येऊन जातो की मी ती वस्तू सहजपणे चोरू शकतो आणि हे कुणाच्या लक्षातही येणार नाही. पण तुमचा विवेक तुम्हाला अडवतो. त्यामुळे तो विचार आपल्या मनातून झटकून तुम्ही तिथून निघून जाता. हीच ती वेळ असते जेव्हा तुम्ही तुमच्या मोहावर मात करून विजय मिळवलेला असतो.
बायबल काय शिकवतं
तुम्हाला एखाद्या गोष्टीचा मोह होतो म्हणून तुम्ही वाईट व्यक्ती आहात असा याचा अर्थ होत नाही. उलट बायबल तर सांगतं की आपल्या सर्वांनाच मोहाचा सामना करावा लागतो. (१ करिंथकर १०:१३) पण एखाद्या गोष्टीचा मोह होतो तेव्हा आपली प्रतिक्रिया काय असते हे जास्त महत्त्वाचं आहे. काही जण चुकीच्या इच्छांना आपल्या मनात घोळू देतात, आणि मग आज ना उद्या त्यांना बळी पडतात. पण असेही काही जण असतात जे या इच्छेला, चुकीची असल्यामुळे लगेचच उपटून टाकतात.
सावध राहा!१७.४-E पृ. १४
मोह
एखादी चुकीची गोष्ट आपल्या हातून कशी घडते याबद्दल बायबलमध्ये सांगण्यात आलं आहे. याकोब १:१५ म्हणतं, “मग [चुकीची] इच्छा गर्भवती होऊन पापाला जन्म देते.” सोप्या शब्दात सांगायचं म्हटलं तर जसं एक गर्भवती स्त्री बाळाला जन्म देण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही तसंच जेव्हा आपण चुकीच्या इच्छांना आपल्या मनात घोळू देतो तेव्हा, आपणही ती गोष्ट करण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही. पण तरीसुद्धा चुकीच्या इच्छांचं दास होण्यापासून आपण स्वतःला वाचवू शकतो. आणि अशा चुकीच्या इच्छांवर विजय मिळवू शकतो.
आध्यात्मिक रत्नं शोधा
इन्साइट-२ पृ. २५३-२५४
प्रकाश
सूर्य, चंद्र आणि तारे यांसारख्या आकाशातील सर्व ‘स्वर्गीय प्रकाशांचा’ पिता यहोवा आहे. (याक १:१७) त्याने दिवसा प्रकाश म्हणून आपल्यासाठी सूर्य दिला, आणि रात्री प्रकाश मिळावा म्हणून चंद्र व नक्षत्रांना नियम लावून दिले. (यिर्म ३१:३५) इतकंच नव्हे तर सर्व आध्यात्मिक ज्ञानाच्या प्रकाशाचा स्रोतसुद्धा तोच आहे. (२कर ४:६) त्याने घालून दिलेले नियम, त्याचा न्याय आणि त्याचा शब्द, त्याच्या मार्गदर्शनानुसार चालणाऱ्यांसाठी प्रकाशासारखे आहेत. (स्तो ४३:३; ११९:१०५; नीत ६:२३; यश ५१:४) म्हणूनच स्तोत्रकर्त्यानं म्हटलं, की “तुझ्या प्रकाशाने आम्ही प्रकाश पाहतो.” (स्तो ३६:९ ची तुलना स्तो २७:१; ४३:३ सोबत करा.) ज्याप्रमाणे सूर्याचा प्रकाश दुपार होईपर्यंत हळूहळू वाढत जातो, त्याचप्रमाणे नीतिमान माणसाचा मार्ग देवाच्या ज्ञानाने हळूहळू प्रकाशमान होत जातो. (नीत ४:१८) यहोवाच्या प्रकाशात चालणं म्हणजे त्याच्या इच्छेनुसार जीवन जगणं. (यश २:३-५) दुसऱ्या बाजूला, जेव्हा एक व्यक्ती वाईट दृष्टिकोनातून किंवा वाईट हेतूने इतर गोष्टींकडे पाहू लागते, तेव्हा ती एका अर्थाने अत्यंत अंधकारमय अशा आध्यात्मिक काळोखात सापडते. म्हणूनच येशूने म्हटलं, ‘जर तुमची नजरच वाईट असेल, तर तुमचं शरीर अंधकारमय होईल. आणि जर तुमच्यात असलेला प्रकाशच अंधकारमय झाला, तर तो अंधकार किती मोठा असेल!”—मत्त ६:२३ ची तुलना अनु १५:९; २८:५४-५७; नीत २८:२२; २पेत्र २:१४ सोबत करा.
इन्साइट-२ २२२ परि. ४
नियम
“राजाज्ञा.”
जसं समाजात राजाला सर्वात महत्त्वाचं स्थान असतं, तसंच मानवी नातेसंबंधाबद्दल असलेल्या नियमांमध्ये ‘राजाज्ञेला’ सर्वात वरचं आणि महत्त्वाचं स्थान आहे. (याक २:८) नियमशास्त्राच्या करारातले सगळे नियम खरंतर प्रेमावरच आधारलेले होते. येशूने दिलेल्या दोन आज्ञांपैकी, ‘तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखंच प्रेम कर’ ही एक आज्ञा आहे. यालाच राजाज्ञा म्हटलं आहे. या आज्ञेवर संपूर्ण नियमशास्त्र आणि संदेष्ट्यांची सगळी लिखाणं आधारित होती. (मत्त २२:३७-४०) आज आपण नियमशास्त्राच्या कराराच्या अधीन नाही. तरीसुद्धा नव्या करारानुसार आपण आपल्या राजाने, यहोवाने दिलेल्या आज्ञेच्या आणि त्याच्या पुत्राच्या म्हणजे राजा येशूने दिलेल्या आज्ञेच्या अधीन आहोत.