तुम्ही आपल्या विश्वासाच्या द्वारे जगाचा धिक्कार करता का?
“नोहाने . . . आपल्या घराच्या तारणासाठी विश्वासाने तारू तयार केले; त्या विश्वासाच्या द्वारे त्याने जग दोषी ठरवले.”—इब्रीयांस ११:७.
१, २. नोहाच्या जीवनाच्या परिक्षणावरून आपल्याला काय शिकायला मिळते?
जलप्रलयातून वाचण्यासाठी यहोवाने नोहा व त्याचा कुटुंबाला—केवळ आठ जणांना—तो हक्क बहाल केला. बाकीच्या सर्वांना देवाने जलप्रलयाच्या कबरेत समाधी देऊन त्यांचे जीवन संपुष्टात आणले. आता नोहा हाच आमचा सर्वसाधारण कुलपिता असल्याने, आम्ही, त्याने दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञ असावयास हवे.
२ नोहाच्या जीवनाचे परिक्षण करण्याकडून आपण बरेच काही शिकू शकतो. नोहाच्या पिढीतील इतर लोकांचा नाश करताना देवाने त्याच्यावर आपली मर्जी का दाखवली याबद्दल शास्त्रवचने आपल्याला माहिती देतात. हा ईश्वरी अहवाल हे स्पष्ट दाखवतो की, आम्हीही आज देवाकडील अशाच एका न्यायदंडास सामोरे आहोत. याबद्दल येशूने म्हटले: “जगाच्या प्रारंभापासून आले नाही व येणारही नाही, असे मोठे संकट त्या काळी येईल.” (मत्तय २४:२१) तुम्ही आपल्या विश्वासाच्या द्वारे जगाचा धिक्कार करता का? नोहाच्या विश्वासाचे अनुकरण केल्यामुळे या दुष्ट जगाच्या व्यवस्थेवर येणाऱ्या त्वरित नाशापासून आम्हाला बचाव मिळवण्याची खात्रीची आशा धरता येईल.—रोमकर १५:४; पडताळा इब्रीयांस १३:४.
३. देवाने जलप्रलय का आणला?
३ आदामाची निर्मिती ते जलप्रलय या १,६५६ वर्षांच्या कालावधीत केवळ थोड्या लोकांनाच चांगले ते करण्याची इच्छा होती. नैतिकता तर अधिकच खालावली गेली होती. “पृथ्वीवर मानवाची दुष्टाई फार आहे, त्यांच्या अंतःकरणात येणारे सर्व विचारतरंग केवळ एकसारखे वाईट आहेत, असे यहोवाने पाहिले.” (उत्पत्ती ६:५) देवाने त्या मानवजातीच्या प्राचीन जगावर दंडाज्ञा बजावण्यास या गोष्टी कारणीभूत ठरल्या: हिंसाचार, सुखोपभोगविलास, आणि रुपांतरित दिव्यदूत व त्यांना स्त्रियांपासून झालेली राक्षसी संतान. यहोवाने नोहाला म्हटले: “सर्व प्राण्यांचा अंत करण्याचे माझ्या मनात आले आहे, कारण त्यांच्यामुळे पृथ्वीवर अनर्थ माजला आहे.” निर्माणकर्ता, “सर्व जगाचा नियंता” याची सहनशीलता संपली होती.—उत्पत्ती ६:१३; १८:२५.
नोहा देवासमागमे चालला
४. (अ) नोहावर यहोवावर कशी दृष्टी होती व का? (ब) देवाच्या न्यायाने त्या दुष्ट जगाचा नाश करण्याचे अपेक्षिले तरी देवाने नोहा व त्याच्या कुटुंबावर आपली प्रीती कशी दाखवली?
४ नोहा त्याच्या काळातील लोकांहून किती वेगळा होता! त्याने “यहोवाची कृपादृष्टी” मिळवली होती! “नोहा . . . धार्मिक व सात्विक मनुष्य होता; नोहा खऱ्या देवाच्या समागमे चालला.” (उत्पत्ती ६:८,९) तो देवासमागमे कसा चालू शकला? योग्य गोष्टी करून, जसे की, धार्मिकतेचा उदेशक या नात्याने प्रचार करून व विश्वास आणि आज्ञाधारकपणा यामुळे तारू बांधून. या कारणामुळे, त्या प्राचीन जगाचा पूर्ण भ्रष्टतेमुळे संपूर्ण नाश झाला तरी देवाने “धार्मिकतेचा उपदेशक नोहा यांचे सात जणांसह रक्षण केले.” (२ पेत्र २:५) होय, आमचा प्रेमळ व न्यायी देव यहोवा यांने दुष्टांबरोबर धार्मिकांचा संहार केला नाही. जलप्रलयानंतर पृथ्वी पुन्हा भरता यावी यासाठी देवाने नोहाला एक प्रचंड तारू बनवण्यास लावून त्यामधून नोहा, त्याचे घराणे व कित्येक प्राणी यांचा बचाव घडवला. नोहाने, सांगितले “तसे केले.”—उत्पत्ती ६:२२.
५. नोहाचे नीतीमत्व व विश्वास यांचे शास्त्रवचने कसे वर्णन देतात?
५ तारूचे बांधकाम पूर्ण झाल्यावर देवाने नोहाला म्हटले: “तू आपल्या सगळ्या कुटुंबासह तारवात चल, कारण या पिढीत तूच मजशी धर्माने वर्तणारा असा मला दिसला आहे.” पौल याचा सारांश याप्रकारे देतो: “जे आजपर्यंत पाहण्यात आले नव्हते त्याविषयी ईश्वरी संदेश नोहाने ऐकला आणि भक्तीभाव धरून आपल्या घराच्या तारणासाठी विश्वासाने तारू तयार केले; त्या विश्वासाच्या द्वारे त्याने जग दोषी ठरवले, आणि विश्वासाने जे नीतीमत्व त्याचा तो वतनदार झाला.”—उत्पत्ती ७:१; इब्रीयांस ११:७.
६. नोहाने आपल्या विश्वासाच्या आधारावर त्याच्या काळातील जगाचा कसा धिक्कार केला?
६ नोहाचा अप्रतिम विश्वास होता. देवाने त्या पिढीचे उच्चाटन करण्याबद्दल जे म्हटले त्यावर त्याने विश्वास ठेवला. यहोवास नाखूष करू नये याबद्दल नोहाने हितकारक भय धरले आणि देवाने दिलेल्या आज्ञेला अनुसरून त्याने आज्ञाधारकपणे तारू बांधले. याशिवाय, धार्मिकतेचा उपदेशक या अर्थाने त्याने इतरांना येत असलेल्या नाशाबद्दल सांगितले. लोकांनी त्याचे ऐकले नाही, तरी त्याने स्वतःला दुष्ट जगाकरवी ‘त्याच्या साच्यात गुरफटू’ दिले नाही. (रोमकर १२:२, फिलिप्स) उलट, आपल्या विश्वासाच्या आधारावर नोहाने ते जग व त्याच्या दुष्टतेचा धिक्कार केला व ते नाशास पात्र आहे असे दाखवले. त्याची आज्ञाधारकता व धार्मिक कृत्ये यांनी हे दाखविले की, तो व त्याचे कुटुंब या व्यतिरिक्त इतरांनाही, आपल्या जीवनमानात बद्दल करून बचाव मिळवता आला आसता. खरेच, नोहाने सिद्ध केले की, त्याचा अपूर्ण देह, त्याच्या सभोवताली असणारे दुष्ट जग, आणि दियाबल सैतान याजद्वारे दबाब येत होता तरी देवास संतुष्ट करणारे जीवन जगणे शक्य होते.
देव या सध्याच्या व्यवस्थेचा का नाश करील
७. आम्ही शेवटल्या काळी जगत आहोत हे आपल्याला कसे कळू शकते?
७ या २० व्या शतकातील प्रत्येक दशकाने हा जग दुष्टाईच्या खाईत अधिकाधिक उतरत असल्याचे पाहिले आहे. हे पहिले जागतिक महायुद्धापासून तर खासपणे खरे आहे. मानवजात लैंगिक अनैतिकता, गुन्हेगारी, हिंसाचार, युद्धे, द्वेष, लोभ व रक्ताचा गैरवापर यात इतकी गढून गेली आहे की, योग्य गोष्टींवर प्रीती करणाऱ्यांना ही परिस्थिती अजून किती खालावत जाणार याचे सारखे आश्चर्य वाटत आहे. तथापि, पवित्र शास्त्राने आमच्या पिढीतील अति दुष्टतेबद्दल भाकित केले होते व याद्वारे स्पष्ट केले की आम्ही “शेवटल्या काळी” जगत आहोत.—२ तीमथ्य ३:१-५; मत्तय २४:३४.
८. पापाच्या जाणीवेबद्दल काहींनी काय म्हटले आहे?
८ आज, दुष्टतेसंबंधाची विचारधारा पुष्कळांच्या मानात अगदीच सौम्य बनली आहे. साधारणपणे ४० वर्षांआधी पोप पायस बारावे यांनी हे निरिक्षिले होते: “पापाची सर्व संवेदना नष्ट झाली आहे हेच सध्याच्या पिढीचे पाप होय.” पाप व दोष यांची कबूली देण्यास सध्याची पिढी तयार होत नाही. व्हॉटएव्हर बिकेम ओफ सीन? या पुस्तकात हॉ. कार्ल मेनिंन्गर म्हणतात: “‘पोप’ हा शब्द त्याचा अर्थासोबत . . . बहुतेक नष्ट झाला आहे. पण का? कोणीच पाप करीत नाही का?” पुष्कळांनी बरोबर व चूक यामधील भेद जाणण्याची क्षमता गमावली आहे. याबद्दल आम्हाला आश्चर्य वाटत नाही, कारण “अंतसमया”तील ‘आपल्या उपस्थितीच्या चिन्हा’बद्दल भाकित करताना येशूने याच घडामोडींची चर्चा केलेली आहे.—मत्तय २४:३; दानीएल १२:४.
नोहाच्या काळी घालण्यात आलेला न्यायदंडाचा नमुना
९. येशूने नोहाच्या काळातील घटनांची तुलना त्याच्या उपस्थिती काळातील घटनांशी कशी केली?
९ नोहाच्या काळातील घटना आणि १९१४ पासूनच्या त्याच्या राज्य सत्तेतील काळात जे घडणार त्यातील समांतरता येशूने नमूद केली. तो म्हणाला: “नोहाच्या दिवसातल्या प्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे [येशूचे] येणे होईल. तेव्हा जसे जलप्रलयाच्या पूर्वीच्या दिवसात नोहा नौकेत जाईपर्यंत लोक खातपीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते; आणि जलप्रलय येऊन सर्वांस वाहवून नेईपर्यंत त्यांनी त्याची दखल घेतली नाही; तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल.”—मत्तय २४:३७-३९.
१०. ख्रिस्ताच्या उपस्थितीशी संबंधित असणाऱ्या अभूतपूर्व घटनांची सर्वसाधारण लोक कशी दखल घेत नाहीत?
१० होय, नोहाच्या काळातील लोकांप्रमाणेच आजही लोक दखल घेत नाहीत. दैनंदिन जीवन व स्वार्थी गोष्टींच्या परिपूर्तीच्या मागे लागून राहिल्यामुळे ते, सध्याची परिस्थिती ही मागील काळापेक्षा भिन्न असून ती येशूने म्हटल्यानुसार समाप्तीकाळाचा निर्देश करणारी आहे हे ओळखण्याचे नाकारतात. आज कितीतरी वर्षांपासून यहोवाचे साक्षीदार आधुनिक पिढीला सांगत आले आहेत की, येशूची स्वर्गातील मशीही राजा म्हणून उपस्थिती १९१४ पासून सुरू झाली असून ती “व्यवस्थीकरणाची समाप्ती”बरोबर समांतरीत आहेत. (मत्तय २४:३) पुष्कळ लोक राज्यसंदेशाची थट्टा करतात, पण वस्तुतः असे घडणार हे प्रेषित पेत्राने आधीच याप्रकारे सांगितले होते: “हे प्रथम ध्यानात आणावयाचे की, शेवटल्या दिवसात आपल्याच वासनांप्रमाणे चालणारे थट्टेखोर लोक थट्टा करीत येऊन म्हणतील: ‘त्याच्या येण्याचे वचन आता कोठे आहे? कारण वाडवडील निजले तेव्हांपासून, उत्पत्तीच्या प्रारंभापासून, जसे चालू आहे तसेच सर्व काही राहिले आहे.’”—२ पेत्र ३:३, ४.
११. मोठे संकट येईल तेव्हा आजच्या पिढीला कोणतीही सबब का राहणार नाही?
११ पण, तेव्हा मोठे संकट येईल तेव्हा आजच्या पिढीला सबब सांगता येईल असे काही राहणार नाही. ते का? कारण देव आमच्या काळात जे काही करणार आहे त्या ईश्वरी न्यायदंडाचे पवित्र शास्त्रीय अहवाल नमुन्याच्या रुपात उपलब्ध आहेत. (यहूदा ५-७) आमच्या डोळ्यादेखत पूर्ण होत असलेले पवित्र शास्त्रातील भविष्यवाद आम्ही काळाच्या ओघात कोठे आहोत ते स्पष्ट करित आहेत. यहोवाच्या साक्षीदारांमार्फत होणारे प्रचारकार्य तसेच नोहासारख्या सचोटीची अद्यायावत उदाहरणे आजच्या पिढीसमोर आहेत.
१२. पेत्र नोहाच्या काळातील जगाच्या नाशाची समांतरता “सध्याचे आकाश व पृथ्वी” याजवर जे काही गुदरणार, त्याच्याशी कशी करतो?
१२ या वस्तुस्थितीची जे दखल घेणार नाहीत अशांचे काय होईल ते पेत्र विवेचीत करतो. पेत्रही येशूप्रमाणेच नोहाच्या काळात घडलेल्या गोष्टींची समांतरता घेऊन म्हणतो: “हे तर ते बुद्धिपुरःस्सर विसरतात की, पूर्वी देवाच्या शब्दाने आकाश आणि पाण्यातून व पाण्याच्या योगे घडलेली अशी पृथ्वी ही झाली. त्याच्या योगे तेव्हाच्या जगाचा पाण्याने बुडून नाश झाला; पण आत्ताचे आकाश व पृथ्वी ही त्याच शब्दाने अग्नीसाठी राखलेली आहेत; म्हणजे न्यायनिवाड्याचा व अधार्मिक लोकांच्या नाशाचा दिवस येईपर्यंत शिल्लक ठेवलेली आहे.”—२ पेत्र ३:५-७.
१३. पुढे घडणाऱ्या लक्षणीय घटनांच्या दृष्टीने बघता, आम्ही, पेत्राकडील कोणत्या सूचनेकडे लक्ष देण्यास हवे?
१३ देवाचा हा न्यायदंड आमच्या मुखासमोर असताना आपण कोणा थट्टेखोराद्वारे फसविले जाऊ किंवा भीतीग्रस्त होऊ नये. त्यांना लाभणाऱ्या भवितव्यात आपण सहभागी होण्याची जरूरी नाही. पेत्र सूचना करतो: “तर ही सर्व अशी लयास जाणारी आहेत म्हणून पवित्र वर्तणूकीत व ईश्वरी भक्तीत राहून यहोवाचा दिवस येण्याची वाट पाहात व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करीत तुम्ही कसे असले पाहिजे? त्या दिवसामुळे आकाश जळून लयास जाईल व सृष्टीतत्त्वे तप्त होऊन वितळतील! तरी ज्यामध्ये धार्मिकता वास करते असे नवे आकाश व नवी पृथ्वी यांची त्याच्या वचनाप्रमाणे वाट पाहात आहो.”—२ पेत्र ३:११-१३.
बचाव मिळविण्यासाठी नोहाच्या विश्वासाचे अनुकरण करा
१४. आमचे परिक्षण करण्यासाठी कोणते प्रश्न आम्हाला साहाय्यक ठरतील?
१४ बचाव मिळविणारे व तसे टिकून राहणारे उमेदवार या अर्थी आज, आपल्याला, नोहा व त्याच्या कुटुंबाला जी आव्हाने पत्करावी लागली, तीच समोर आहेत. नोहासारखेच यहोवाचे साक्षीदार जगाचा धिक्कार आपला विश्वास व त्याला अनुसरून असणारी सत्कर्मे करून करीत आहेत. पण, आम्ही प्रत्येकाने स्वतःला असे विचारावे: ‘मी व्यक्तीशः काय करीत आहे? मोठे संकट उद्याच आले तर देव मला बचावास पात्र असल्याचे समजेल का? नोहा जसा “आपल्या काळच्या लोकांमध्ये धार्मिक व सात्विक मनुष्य होता.” त्याचप्रमाणे मला या जगापासून वेगळे दाखवण्याचे धैर्य आहे का? किंवा मी ज्या पद्धतीने वागतो. बोलतो आणि पेहराव घालतो ते बघता मजमध्ये आणि जगातील लोकांमध्ये फरक असल्याचे दिसणे जरा मुष्कीलीचे वाटते?’ (उत्पत्ती ६:९) येशूने आपल्या शिष्यांबद्दल म्हटले होते: “जसा मी या जगाचा नाही, तसे तेही या जगाचे नाहीत.”—योहान १७:१६; पडताळा १ योहान ४:४-६.
१५. (अ) पहिले पेत्र ४:३, ४च्या अनुषंगाने आपण आपल्या पूर्वीच्या विचारांचा व वागणूकीचा कसा दृष्टीकोण ठेवावा? (ब) आमच्या पूर्वीच्या जागतिक मित्रांकडून आमची निंदा झाल्यास आम्ही काय करावे?
१५ पेत्र सूचना करतो: “विदेशी लोकांना आवडणारी कर्मे करण्यात म्हणजे कामासक्ती, विषयवासना, मद्यासक्ती, रंगेलपणा, बदफैली व अमंगळ मूर्तिपूजा यात राहण्यात जो काळ गेला तितका पुरे. तुम्ही त्यांच्या दंगलाच्या भ्रात त्यांजबरोबर धावत नाही ह्याचे त्यांस नवल वाटून ते तुमची निंदा करतात.” (१ पेत्र ४:३, ४) आता देवासमागमे चालत राहिल्यामुळे ते तुमची निंदा करतील. पण, नोहाप्रमाणेच तुम्हीही त्यांना आपला विश्वास तसेच भिडस्तपणाने आचरलेली सत्कर्मे याद्वारे धिक्कारू शकाल.—मीखा ६:८.
१६. देवाने नोहाबद्दल कशी दृष्टी राखली, आणि आमचे विचार व वागणूक यासंबंधीची तपासणी करण्यात कोणते प्रश्न आमचे साहाय्य करतील?
१६ देवाने नोहाला नीतीमान असे गृहीत धरले. त्या विश्वासू कुलपित्याने “यहावाची कृपादृष्टी”मिळवली. (उत्पत्ती ६:८) तुम्हीही, आपले विचार व वागणूक देवाच्या दर्जांनुरूप तपासून बघता तेव्हा तुम्ही जे करता व जेथे कोठे जाता त्याबद्दल देवाची कृपादृष्टी तुम्हाला आहे असे तुम्हाला वाटते का? आज सर्वत्र बोकाळलेल्या मानहानीच्या मनोरंजनाकडे जाण्याचा तुमचा कल आहे का? वस्तुतः आपण शुद्ध, हितकारक व उभारणीकारक गोष्टींचाच विचार करावा असे देवाचे वचन सांगते. (फिलिप्पेकर ४:८) तेव्हा, तुम्ही देवाच्या वचनाच्या परिश्रमपूर्वक अभ्यास करता का की, त्यामुळे ‘बरे व वाईट कळण्याचा अभ्यास तुमच्या इंद्रियांना वहिवाटीने मिळाला आहे?’ (इब्री ५:१४) तुम्ही वाईट संगति टाळून ख्रिस्ती सभा व इतर प्रसंगी यहोवाच्या सह उपासकांची संगत वाढवता का?—१ करिंथकर १५:३३; इब्रीयांस १०:२४, २५; योकोब ४:४.
१७. आम्हाला नोहाप्रमाणे यहोवाचे साक्षीदार या नात्याने एक कसे बनता येईल?
१७ तारूचे बांधकाम पूर्ण झाल्याचे कळविल्यावर शास्त्रवचने सांगतात: “नोहाने तसे केले. देवाने त्याला जे काही सांगितले होते ते त्याने केले.” (उत्पत्ती ६:२२) तो ईश्वरी माणूस यहोवाचा साक्षीदार या नात्यने प्रचार करण्यात मग्न होता. नोहाप्रमाणेच तुम्हाला देखील, जे बरोबर आहे त्याचा घोषक, धर्मिकतेचा नियमित रूपाने प्रचार करून बनता येईल. यास्तव, या दुष्ट जगाच्या नाशाची घोषणा, जरी थोड्या लोकांनी त्याकडे कान दिला तरी विदित करण्यात प्रयत्नशील असा. शेवट होण्याआधी शिष्य बनविण्याचे काम पूर्ण करण्यासाठी आपल्या समविश्वासू बंधवांसोबत ऐक्याने काम करीत राहा.—मत्तय २८:१९, २०.
१८. मोठ्या संकटातून कोणास वाचवावे हे यहोवा कोणत्या आधारावर ठरवतो?
१८ नोहाच्या काळी देवाने जसा धार्मिकता व न्यायाचा दर्जा लागू केला तसाचा दर्जा आज तो, मोठ्या संकटातून कोणाचा बचाव होईल व कोण त्या नष्ट होईल ते ठरविण्यासाठी लगू करीत आहे. या विभागणीच्या कामाला येशूने कोणी मेंढपाळ शेरडापासून जशी मेंढरे वेगळी करतो त्या कामाची उपमा दिली. (मत्तय २५:३१-४६) जे लोक स्वार्थी अभिलाषा व ध्येये व यांच्यामागे आपले जीवन केंद्रित करतात अशांना ह्या जुन्या जगाचा शेवट होऊ नये असेच वाटते, त्यामुळे ते बचावणार नाहीत. पण जे या जगाच्या मळात स्वतःला समाविष्ट करीत नाहीत, व जे देवावर आपला दृढ विश्वास राखतात व राज्य संदेशाचा प्रचार करीत, येणाऱ्या यहोवाच्या न्यायदंडाची घोषणा करतात अशांना ईश्वरी कृपापसंती लाभून ते बचावतील. येशूने असे म्हटले: “त्या वेळेस शेतात असलेल्या दोघातून एक घेतला जाईल, व दुसऱ्याचा त्याग केला जाईल. जात्यावर दळीत बसलेल्या दोघीतून एक घेतली जाईल व दुसरीचा त्याग केला जाईल.”—मत्तय २४:४०, ४१; २ थेस्सलीनकाकर १:६-९; प्रकटीकरण २२:१२-१५.
नोहासोबत आशीर्वादांचा लाभ मिळवा
१९. शेवटल्या दिवसाबद्दल यशया तसेच मीखा यांनी काय एकत्रिकरणाबद्दलचे भाकित केले?
१९ देवाचे संदेष्टे यशया व मीखा या दोघांनीही शेवटल्या दिवसात काय घडेल याबद्दल समांतर भविष्यवादात नमूद केले. धार्मिक अंतःकरणाच्या लोकांचा लोंढा या जुन्या जगातून बाहेर पडून खऱ्या भक्तीच्या लाक्षणिक डोंगराकडे येत असल्याचे जे आज आपल्याला प्रत्यक्ष दिसत आहे तेच त्यांनी आधी पाहिले. हे लोक इतरांना हे निमंत्रण देतात: “चला आपण यहोवाच्या पवर्ततावर, याकोबाच्या देवाच्या मंदिराकडे चढून जाऊ; तो आम्हास आपले मार्ग शिकवो, म्हणजे आम्ही त्याच्या पथांनी चालू.” (यशया २:२, ३; मीखा ४:१, २) या आनंदी समूहासोबत आपणही वाटचाल करीत आहात का?
२०. आपल्या विश्वासाद्वारे जगाचा धिक्कार करणाऱ्यांना कोणते अशीर्वाद अनुभवण्यास मिळतील?
२० विश्वासाद्वारे जगाचा धिक्कार करणाऱ्यांना जे आशीर्वाद मिळतील त्याबद्दल सुद्धा यशया व मीखा यांनी महिती दिली. अशांमध्ये खरी शांती व न्याय यांचे वास्तव्य राहील व ते पुढे युद्धकला शिकणार नाहीत. यांना यहोवाकडून वतन मिळण्याची आशा आहे व ते “आपापल्या द्राक्षीखाली व अंजिराच्या झाडाखाली बसतील.” पण, प्रत्येक व्यक्तीने दृढ निश्चय केलाच पाहिजे, कारण दोन मार्ग उघडे आहेत असे मीखा म्हणतो. तो म्हणतो; “सर्व राष्ट्रे आपापल्या दैवतांच्या नावाने चालत आहेत; पण आम्ही यहोवा आमचा देव याच्या नावाने सदासर्वकाळ चालू.”—मीखा ४:३-५; यशया २:४.
२१ मोठ्या संकटातून बचावून जाण्यासाठी काय केले पाहिजे त्याबद्दल शास्त्रवचने स्पष्टपणे दाखवतात: दृढ विश्वास. नोहाठायी तो होता, पण तुमच्याठायी तो आहे का? आहे तर, त्याच्याप्रमाणे तुम्हीही ‘विश्वासाने जे नीतीमत्व, त्याचे वतनदार व्हाल.’ (इब्रीयांस ११:७) देवाने घोषित केलेल्या नोहाच्या पिढीवर गुदरलेल्या नाशातून नोहा वाचला. जलप्रलयानंतर तो पुढे ३५० वर्षे जगू शकला इतकेच नाही तर, त्याला पृथ्वीवर अनंतकाल जगण्याची आशा प्राप्त व्हावी यासाठी पुनरुत्थान मिळणार आहे. तो केवढा भव्य आशीर्वाद राहील! (इब्रीयांस ११:१३-१६) तुम्हालाही नोहा, त्याचे कुटुंब व इतर लाखो धार्मिक लोकांच्या संगतीमध्ये या आशीर्वाद सामील होता येईल. ते कसे? शेवटपर्यंत धीर धरून व आपल्या विश्वासाद्वारे जगाचा धिक्कार करून.
तुम्हाला आठवते का?
◻ नोहाच्या जीवनाचा अभ्यास ख्रिश्चनांसाठी का महत्त्वाचा आहे?
◻ या पिढीचे लोक कशाची दखल घेत नाहीत की, ज्यामुळे त्यांचा नाश होईल?
◻ नोहाप्रमाणे आपल्याला जगाचा कसा धिक्कार करता येईल?
◻ नोहाप्रमाणे आम्हाला धार्मिकतेचा उपदेशक कसे बनता येईल?