वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 १०/१५ पृ. २८-३०
  • तत्त्वाच्या जाणिवेमुळे परिपक्वता दिसून येते

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तत्त्वाच्या जाणिवेमुळे परिपक्वता दिसून येते
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • ईश्‍वरी तत्त्वाची माणसे
  • तत्त्वे आणि हृदय
  • नियमाच्या मागे पाहा
  • देवाच्या तत्त्वांच्या मार्गदर्शनाने पावले टाका
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • बायबलमधल्या तत्त्वांमुळे आपल्याला कसा फायदा होतो?
    देवाकडून आनंदाची बातमी!
  • ईश्‍वरी तत्त्वांचा तुम्हाला फायदा होऊ शकतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • तो मेला असूनही बोलत आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 १०/१५ पृ. २८-३०

तत्त्वाच्या जाणिवेमुळे परिपक्वता दिसून येते

कुसंगतीने नीती बिघडते. तुम्ही जे काही पेराल त्याचेच तुम्हाला पीक मिळेल. (१ करिंथकर १५:३३; गलतीकर ६:७) शब्दशः असो अगर आध्यात्मिकरीत्या असो, प्रत्येक विधान मूलभूत सत्याचे—तत्त्वाचे—उदाहरण असून प्रत्येक विधान नियमांसाठी आधार पुरवते. तथापि, नियम हे येतील आणि जातील आणि ते विशिष्ट असतात. दुसऱ्‍या बाजूला पाहता, तत्त्वांचा आवाका जास्त असतो आणि ते सर्वकाळ राहू शकतात. अशा प्रकारे, देवाचे वचन आपल्याला जेथे कोठे शक्य आहे तेथे तत्त्वांचा विचार करण्याचे उत्तेजन देते.

वेबस्टर्स थर्ड न्यू इंटरनॅशनल डिक्शनरी तत्त्वाची व्याख्या अशा प्रकारे करते, “सामान्य किंवा मूलभूत सत्य: बहुव्यापक आणि मूलभूत नियम, शिकवण किंवा गृहीत ज्यावर इतर जण आधारित आहेत किंवा ज्यातून इतरांना मिळते.” उदाहरणार्थ, एखाद्या मुलाला कदाचित असा नियम देण्यात येईल, “तू स्टोव्हला हात लावू नकोस.” पण मोठ्यांसाठी केवळ असे विधान पुरेसे होईल, “स्टोव्ह गरम आहे.” याकडे लक्ष द्या, की नंतरचे अधिक मूलभूत विधान आहे. कारण ते एखाद्याचे कार्य नियंत्रित करते—कदाचित, स्वयंपाक करणे असेल, भाजणे असेल किंवा स्टोव्ह बंद करणे असेल—एका अर्थाने ते तत्त्व होते.

अर्थात, जीवनाची प्रमुख तत्त्वे आध्यात्मिक आहेत; आपण करत असलेल्या देवाच्या उपासनेवर आणि आपल्या आनंदावर त्याचे नियंत्रण असते. तथापि, काही जण तत्त्वांवर तर्क करण्यासाठी आवश्‍यक असलेला प्रयत्न करत नाहीत. त्यांना एखादा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा त्यांना एखादा नियम सोयीस्कर वाटतो. हे बुद्धिमत्तेचे नाही आणि बायबलच्या जुन्या काळातील विश्‍वासू मनुष्यांनी मांडलेल्या उदाहरणाच्या विरोधात आहे.—रोमकर १५:४.

ईश्‍वरी तत्त्वाची माणसे

अपरिपूर्ण मानवांत, ईश्‍वरी तत्त्वाचा सर्वात पहिला मनुष्य म्हणून हाबेल याला म्हटले जाऊ शकते. त्याने कदाचित अभिवचनयुक्‍त ‘संततीवर’ अधिक लक्ष दिले असावे आणि पापापासून सुटका होण्यासाठी रक्‍ताच्या अर्पणाची गरज लागेल, हेही त्याने जाणले असावे. (उत्पत्ति ३:१५) यामुळे त्याने देवाला त्याच्या “कळपातील प्रथम जन्मलेल्यांतून” अर्पण केले. कळपातील “पुष्टांतून” ही संज्ञा दाखवते, की हाबेलाने यहोवाला त्याचे सर्वोत्तम दिले. तथापि, हाबेलाचा मृत्यू झाल्याच्या दोन हजार वर्षांनंतर देव पहिल्यांदाच अर्पणांविषयीच्या गरजा सविस्तरपणे सांगणार होता. देवभिरू, तत्त्वांना धरून चालणाऱ्‍या हाबेलच्या विरोधात, त्याचा भाऊ काईन याने देवाला चालढकलीचे अर्पण केले. पण त्याची मनोवृत्ती असमाधानी होती आणि त्याच्या अर्पणात अशी काही गोष्ट होती जी हृदयातील कमतरतेस दाखवत होती.—उत्पत्ति ४:३-५.

नोहा देखील ईश्‍वरी तत्त्वाचा मनुष्य होता. त्याने तारू बांधावे, अशी देवाने त्याला स्पष्ट आज्ञा दिल्याचे बायबलमध्ये नमूद आहे, पण त्याने इतरांना प्रचार करावा, अशी कोणतीही आज्ञा त्याला दिल्याचे आपल्या वाचनात येत नाही. तरी देखील नोहाला “नीतिमत्त्वाचा उपदेशक,” [“प्रचारक,” NW] असे संबोधण्यात आले आहे. (२ पेत्र २:५) प्रचार करण्यासाठी देवाने त्याला कदाचित मार्गदर्शित केले असले तरी, यामध्ये कोणतीही शंका नाही, की त्याला तत्त्वाच्या जाणिवेने आणि शेजाऱ्‍यांवर असलेल्या प्रेमाने तसे करण्यासाठी प्रेरित केले होते. आपण ज्या दिवसांत राहतो ते दिवस नोहाच्या दिवसांप्रमाणेच असल्यामुळे त्याच्या उत्तम मनोवृत्तीचे आणि उदाहरणाचे अनुकरण आपण करू या.

येशूने त्याच्या काळातील पाळकांप्रमाणे शिकवले नाही, तर त्याने लोकांना तत्त्वांचा विचार करण्याचे शिकवले. डोंगरावरील त्याचे प्रवचन हे त्याचे एक उदाहरण आहे. याचा पूर्ण आशय तत्त्व या रूपाने विचार करण्यास अपीलकारक आहे. (मत्तय, अध्याय ५-७) येशूने अशा प्रकारे शिकवले कारण त्याच्यापूर्वी हाबेल आणि नोहा यांच्याप्रमाणे तो खरोखरच देवाला ओळखत होता. आपल्या लहान वयातच त्याने मूलभूत सत्याचा आदर केला: “मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्‍वराच्या मुखातून निघणाऱ्‍या प्रत्येक वचनाने जगेल.” (अनुवाद ८:३; लूक २:४१-४७) ईश्‍वरी तत्त्वाचा मनुष्य होण्याचा मार्ग म्हणजे यहोवाला, त्याच्या आवडी-निवडींना आणि उद्देशांना वास्तविकरीत्या जाणणे. जेव्हा ही मूलभूत तत्त्वे आपल्या जीवनांवर नियंत्रण करतात तेव्हा परिणामी ती मूलभूत तत्त्वे क्रियाशील होतात.—यिर्मया २२:१६; इब्री लोकांस ४:१२.

तत्त्वे आणि हृदय

नाखुशीने नियमाचे पालन करणे शक्य आहे, कदाचित आज्ञा मोडल्यामुळे मिळणाऱ्‍या शिक्षेच्या भितीने देखील असे केले जाते. तथापि, तत्त्वाचे पालन करण्याच्या बाबतीत अशी मनोवृत्ती राहत नाही कारण तत्त्वांचे नियंत्रण असते तेव्हा माणूस साहजिकच मनापासून त्यांचे पालन करतो. योसेफाचा विचार करा, हाबेल आणि नोहा यांच्याप्रमाणे तोही मोशेचे नियमशास्त्र स्थापन होण्याच्या आधी होता. पोटीफरच्या बायकोने त्याला भुलवण्याचा प्रयत्न केला तेव्हा योसेफाने तिला असे उत्तर दिले: “एवढी मोठी वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करू?” होय, पती आणि पत्नी “एकदेह” आहेत हे तत्त्व योसेफाला माहीत होते.—उत्पत्ति २:२४; ३९:९.

आजच्या जगात धार्मिक तत्त्वांची उणीव आहे. हिंसाचार आणि अनैतिकता या गोष्टींची हे जग अधाशीपणे भरवणूक करून घेत आहे. याचा असा धोका आहे, की एखादा ख्रिश्‍चन त्या निकस आहाराचा—चित्रपट, व्हिडिओ किंवा पुस्तके—यांचा आस्वाद घेण्यासाठी, कदाचित चोरून स्वाद घेण्यासाठी मोहीत होईल. देव ‘मोठ्या संकटातून’ केवळ धार्मिक लोकांचा बचाव करील, याची जाण ठेवून आपण जेव्हा योसेफाप्रमाणे तत्त्वांसाठी वाईटाचा त्याग करतो तेव्हा ते खरोखरच प्रशंसनीय आहे. (मत्तय २४:२१) आपण बाहेर जसे आहोत त्यापेक्षा आपण खासगीत कसे आहोत यावरून मुख्यतः आपण आंतरिक कसे आहोत, हे स्पष्ट होते.—स्तोत्र ११:४; नीतिसूत्रे १५:३.

आपण बायबल तत्त्वांनी मार्गदर्शित झालो तर त्याचा परिणाम असा होईल, की आपण देवाच्या नियमांतून पळवाटा काढण्याचा प्रयत्न करणार नाही तसेच विशिष्ट नियम न मोडता आपण त्यापासून जास्तीत-जास्त किती दूर जाऊ शकतो, हे देखील आपण पाहणार नाही. अशा प्रकारचा विचार आत्मघातक आहे; अखेरीस त्यामुळे आपली हानी होते.

नियमाच्या मागे पाहा

अर्थात, ख्रिश्‍चनांच्या जीवनांत नियमांची महत्त्वाची भूमिका आहे. ते पहारेकऱ्‍यांप्रमाणे आहेत जे आपल्या संरक्षणासाठी मदत करतात आणि त्यांच्या पायाशी अनेक महत्त्वाची तत्त्वे असतात. या तत्त्वांची जाण न झाल्यामुळे संबंधित नियमांप्रती आपले प्रेम थंडावेल. प्राचीन इस्राएल राष्ट्राने हे दाखवून दिले.

देवाने इस्राएलला दहा आज्ञा दिल्या, यहोवाशिवाय इतर कोणत्याही देवाची उपासना करण्याचे पहिल्या आज्ञेनुसार निषिद्ध होते. यहोवाने सर्व गोष्टींची निर्मिती केली आहे, हे त्या नियमामागील मूलभूत सत्य आहे. (निर्गम २०:३-५) पण हे राष्ट्र या तत्त्वानुसार जगले का? यहोवा स्वतः उत्तर देतो: “काष्ठास [इस्राएल लोकांनी म्हटले] ‘तुम्ही आमचे पिता आहात’ आणि पाषाणाला ‘आई’ असे म्हणून [त्यांनी आक्रोश केला]. पण माझ्याकडे [यहोवाकडे] त्यांनी पाठ फिरवली आहे आणि त्यांनी त्यांची तोंडे माझ्यापासून वळवली आहेत.” (यिर्मया २:२७, द न्यू इंग्लिश बायबल) किती कठोर आणि तत्त्वरहित मूर्खपणा! आणि यामुळे यहोवाचे हृदय किती दुखावले असेल!—स्तोत्र ७८:४०, ४१; यशया ६३:९, १०.

ख्रिश्‍चनांना देखील देवाकडून काही नियम मिळाले आहेत. उदाहरणार्थ, त्यांनी मूर्तिपूजा, लैंगिक अनैतिकता आणि रक्‍ताचा गैरवापर टाळला पाहिजे. (प्रेषितांची कृत्ये १५:२८, २९) आपण याविषयी विचार करतो तेव्हा आपल्याला अधोरेखित तत्त्वे पाहण्यास मिळू शकतात, जसे की: देव एकनिष्ठ भक्‍तीच्या पात्र आहे; आपण आपल्या वैवाहिक सोबत्याशी विश्‍वासू असले पाहिजे आणि यहोवा आपला जीवनदाता आहे. (उत्पत्ति २:२४; निर्गम २०:५; स्तोत्र ३६:९) या मार्गदर्शकांच्या मागील तत्त्वे आपण जाणून घेतल्यास आणि त्यांची मनःपूर्वक कदर केल्यास, ती मार्गदर्शके आपल्या चांगल्यासाठी असल्याचे आपल्याला दिसते. (यशया ४८:१७) आपल्याकरता देवाच्या “आज्ञा कठीण नाहीत.”—१ योहान ५:३.

एकेकाळी इस्राएल लोकांनी देवाच्या आज्ञांकडे दुर्लक्ष केले होते, तर येशूच्या काळापर्यंत त्यांचे “नियमांचे पंडित,” अर्थात शास्त्री दुसऱ्‍या टोकापर्यंत पोहंचले होते. नियमांचा आणि परंपरांचा त्यांनी तर डोंगरच उभा केला होता आणि ईश्‍वरी तत्त्वांना झाकाळून टाकले होते. (मत्तय २३:२, NEB) अपयश, निराशा किंवा दांभिकपणा यांच्यासमोर मान टाकण्यासारखे लोकांना वाटले. लोकांनी अपयश, आशाहीनता किंवा दांभिकतेस स्वीकारले. (मत्तय १५:३-९) येशू जेव्हा आकडलेला हात असलेल्या मनुष्याला बरे करणार होता तेव्हा तेथे असलेल्या परूश्‍यांना त्याने विचारले: “शब्बाथ दिवशी बरे करणे . . . सशास्त्र आहे?” त्यांच्या उगे राहिल्याने नाही, हे उत्तर दिले त्यामुळे येशू “त्यांच्या मनाच्या कठीणपणामुळे खिन्‍न” झाला. (मार्क ३:१-६) अडकलेल्या किंवा जखमी झालेल्या पाळीव प्राण्याच्या (आर्थिक गुंतवणूक) मदतीला शब्बाथाच्या दिवशी शास्त्री धावून आले असते पण जीवन मरणाचा प्रश्‍न जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ते एखाद्या पुरुषाच्या किंवा स्त्रीच्या मदतीला धावून आले नसते. खरोखर, त्यांची मने मानवी नियम आणि बारीकसारिक गोष्टींनी इतकी वेडी झाली होती, की एखाद्या चित्रावरील मुंग्यांना जसे ते संपूर्ण चित्र दिसत नाही त्याप्रमाणे त्या लोकांना ईश्‍वरी तत्त्व पाहता आले नाही.—मत्तय २३:२३, २४.

तथापि, तरुण जण देखील, जेव्हा त्यांची हृदये शुद्ध असतात, तेव्हा बायबल तत्त्वांप्रती कदर व्यक्‍त करण्याद्वारे यहोवाला सन्मान दाखवू शकतात. जुगार कोण खेळेल, असे रिबेकाच्या वर्गाला तिच्या शिक्षिकेने विचारले तेव्हा रिबेका तेरा वर्षांची होती. जुगार खेळणार नाही, असे त्यांपैकी अनेकांनी म्हटले. तथापि, विविध परिस्थिती सांगण्यात आल्या, तेव्हा सर्वांनी या किंवा त्या मार्गाने जुगार खेळण्याचे मान्य केले, रिबेका मात्र याला अपवाद होती. एखाद्या चांगल्या कामासाठी २०-सेंटचे लॉटरीचे तिकीट घेशील का, असे रिबेकाच्या शिक्षिकेने तिला विचारले. रिबेकाने नाही, असे म्हटले आणि असे करणे एक प्रकारचा जुगारच होईल, याची शास्त्रवचनीय कारणे तिने दिली. त्यानंतर त्या शिक्षिकेने संपूर्ण वर्गाला म्हटले: ‘माझ्या मते, संपूर्ण वर्गात एकमेव रिबेकाच आहे जिच्याकडे असे काही आहे ज्यास मी खऱ्‍या अर्थाने “तत्त्व” असे म्हणेल.’ होय, रिबेकाला सरळ असे म्हणता येत होते, “हे माझ्या धर्माच्या विरोधात आहे,” पण तिने त्यापेक्षाही अधिक विचार केला; जुगार खेळणे चुकीचे का आहे आणि त्यामध्ये भाग घेण्यास ती का तयार झाली नाही, याची कारणे ती देऊ शकली.

हाबेल, नोहा, योसेफ आणि येशू ही उदाहरणे दाखवून देतात, की आपली “वैचारिक क्षमता” आणि आपली “तर्कशक्‍ती” यांचा देवाची उपासना केल्यामुळे आपल्याला कसा फायदा होऊ शकतो. (नीतिसूत्रे २:११; रोमकर १२:१, NW) ख्रिस्ती वडील “[त्यांच्यामधील] देवाच्या कळपाचे पालन” करण्यात येशूचे अनुकरण करतात तेव्हा ते चांगले करतात. (१ पेत्र ५:२) येशूने उत्तम उदाहरण मांडले, ईश्‍वरी तत्त्वांवर प्रेम करणारेच यहोवाच्या सार्वभौमत्वाच्या अधीन भरभराटीस येतात.—यशया ६५:१४.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा