-
बायबल यहोवाबद्दल काय शिकवतं?कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
-
-
३. यहोवाचं आपल्यावर प्रेम आहे हे तो कसं दाखवतो?
यहोवाचा सगळ्यात प्रमुख गुण म्हणजे प्रेम. बायबलमध्ये तर म्हटलंय की प्रेम हा फक्त देवाचा गुण नाही, तर देव स्वतःच “प्रेम आहे.” (१ योहान ४:८) यहोवा आपल्याबद्दल प्रेम कसं दाखवतो, हे आपल्याला बायबलमधून कळतं. पण, त्याने निर्माण केलेल्या गोष्टींमधूनही त्याचं प्रेम दिसून येतं. (प्रेषितांची कार्यं १४:१७ वाचा.) उदाहरणार्थ, त्याने आपल्याला कसं बनवलंय याचा विचार करा. त्याने आपल्याला अशा प्रकारे बनवलंय की आपण सुंदर रंग पाहू शकतो, सुरेल संगीत ऐकू शकतो आणि स्वादिष्ट जेवणाचा आनंद घेऊ शकतो. त्याची इच्छा आहे की आपण जीवनाचा पुरेपूर आनंद घ्यावा.
-
-
धर्म लोकांना देवापासून दूर कसे नेतात?कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
-
-
२. धर्माच्या नावाखाली होणारी चुकीची कामं लोकांना देवापासून दूर कशी नेतात?
देव सगळ्या लोकांवर खूप प्रेम करतो. पण बहुतेक धर्मांचे पुढारी लोकांशी अशा प्रकारे व्यवहार करत नाहीत. बायबल म्हणतं की चुकीची कामं करणाऱ्या या धर्मांच्या “पापांची रास थेट आकाशापर्यंत पोहोचली आहे.” (प्रकटीकरण १८:५) कित्येक शतकांपासून धर्मपुढाऱ्यांनी राजकारणात भाग घेतलाय आणि युद्धांनाही पाठिंबा दिलाय. आणि असं केल्यामुळे ते आजपर्यंत असंख्य लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरले आहेत. काही धर्मपुढारी आपल्या भक्तांकडून लाखो रुपये उकळतात आणि ऐशआरामात जगतात. त्यांच्या अशा कामांवरून दिसतं, की ते देवाला अजिबात ओळखत नाहीत. आणि म्हणून लोकांना देवाबद्दल शिकवण्याचा त्यांच्याकडे कोणताही अधिकार नाही.—१ योहान ४:८ वाचा.
-