-
यहोवाने आणि येशूने तुमच्यासाठी जे केलंय त्याबद्दल कदर दाखवाकायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
-
-
३. मनापासून असलेली कदर कामांतून दिसून येईल
कल्पना करा की तुम्ही नदीत बुडत आहात आणि कोणीतरी तुम्हाला वाचवतं. मग तुम्ही त्याचे उपकार विसरून जाल का? की त्याने तुमच्यासाठी जे केलंय, त्याबद्दल तुम्ही त्याचे किती आभारी आहात, हे दाखवायचा प्रयत्न कराल?
यहोवाच्या दयेमुळेच आपल्याला कायमचं जीवन जगण्याची संधी मिळाली आहे. १ योहान ४:८-१० वाचा, आणि मग या प्रश्नांवर चर्चा करा:
येशूने आपल्यासाठी दिलेलं बलिदान इतकं खास का आहे?
यहोवाने आणि येशूने तुमच्यासाठी जे केलंय, त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतं?
यहोवाने आणि येशूने आपल्यासाठी जे केलंय त्याबद्दल आपण आपली कदर कशी दाखवू शकतो, हे जाणून घेण्यासाठी २ करिंथकर ५:१५ आणि १ योहान ४:११; ५:३ वाचा. प्रत्येक वचन वाचल्यावर या प्रश्नावर चर्चा करा:
या वचनाप्रमाणे, आपण आपली कदर कशी दाखवू शकतो?
-
-
तुम्ही समर्पण करून बाप्तिस्मा घेणं का महत्त्वाचं आहे?कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
-
-
१. एक व्यक्ती कशामुळे समर्पण करायचा निर्णय घेते?
यहोवावर प्रेम असल्यामुळे आपण आपलं जीवन त्याला समर्पित करतो. (१ योहान ४:१०, १९) बायबल आपल्याला असं प्रोत्साहन देतं, की “आपला देव यहोवा याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने, पूर्ण बुद्धीने आणि पूर्ण शक्तीने प्रेम करा.” (मार्क १२:३०) हे प्रेम आपण फक्त बोलूनच नाही तर आपल्या कार्यांतूनही दाखवतो. उदाहरणार्थ, एखाद्या तरुण मुलाचं आणि मुलीचं एकमेकांवर खरं प्रेम असतं तेव्हा ते लग्न करतात. त्याच प्रकारे, यहोवावर प्रेम असल्यामुळे आपण आपलं जीवन त्याला समर्पित करून बाप्तिस्मा घेतो.
-