वाचकांचे प्रश्न
◼ २ योहान १० जे म्हणते की एखाद्याला घरात घेऊ नये वा त्याचे अभिवादन करू नये ते केवळ, खोट्या धर्मतत्वांना वाढीस लावणाऱ्यांच्या बाबतीत लागू होणारे आहे का?
संदर्भ पाहता ही सूचना “फसविणारी पुष्कळ माणसे, म्हणजे येशू ख्रिस्त देहाने येतो असे कबूल न करणारी माणसे” यांच्या बाबतीत लागू होणारी आहे. (२ योहान ७) येशू कसा होता वा तो मशीहा वा खंडणी देणारा होता हे अमान्य करणाऱ्यांना कसे वागवावे याचे मार्गदर्शन प्रेषित योहानाने त्या काळातील ख्रिश्चनांना दिले. त्याने म्हटले: “हे शिक्षण न देणारा असा कोणी तुम्हाकडे आला तर त्याला घरात घेऊ नका व त्याचे स्वागत करू नका; कारण जो त्याचे स्वागत करतो तो त्याच्या दुष्कर्माचा भागीदार होतो.” (२ योहान १०, ११) तरीपण पवित्र शास्त्र इतर ठिकाणी दाखविते की या गोष्टीचा अवलंब विस्तारीत स्वरूपाचा आहे.
एके काळी, करिंथमधील ख्रिश्चनांत एक माणूस अनैतिकता आचरीत होता आणि प्रेषित पौलाने त्यांना लिहिले की, “बंधु म्हटलेला असा कोणी जारकर्मी, लोभी, मूर्तिपूजक, चहाड, मद्यपि किंवा वित्त हरण करणारा असला तर तशाची संगत धरू नये; त्याच्या पंक्तीस बसू नये.” (१ करिंथकर ५:११) आता ही गोष्ट, ज्यांनी येथे लिहिलेली कुकर्मे केली म्हणून बहिष्कृत केले होते त्या माजी बांधवांना लागू होऊ शकत होती का?
नाही. प्रकटीकरण २१:८ दाखविते की पश्चाताप नसणारे खूनी, भूतविद्या करणारे व लबाड यासारख्या लोकांचा समावेश दुसऱ्या मरणाची शिक्षा मिळणाऱ्यात आहे. या चुकीचे दोषी असणाऱ्या माजी ख्रिश्चनांना १ करिंथकर ५:११ मधील सूचना तितक्याच प्रमाणात लागू झाली असती. योहान पुढे म्हणतो की, काही जण “आपल्यातूनच निघाले तरी ते आपले नव्हते. ते आपले असते तर आपल्या बरोबर राहिले असते. त्यांच्यातील कोणी आपला नाही हे प्रकट व्हावे म्हणून ते निघाले.” (१ योहान २:१८, १९) अशांना गंभीर पातकास्तव बहिष्कृत केले होते असे योहानाने म्हटले नाही. कदाचित त्यांच्यापैकी काही, एखाद्या तत्वावर सहमत होत नसल्यामुळे आपल्याला मंडळीत राहायचे नाही अशी इच्छा धरून बाहेर पडले असावेत. काही कंटाळून बाहेर पडले असतील.—१ करिंथकर १५:१२; २ थेस्सलनीकाकर २:१–३; इब्रीयांस १२:३, ५.
हे खरे की कोणी बांधव पापात वाहवत चालला तर प्रौढ ख्रिश्चनांनी त्याला मदत देण्याचा प्रयत्न केला असावा. (गलतीकर ६:१; १ योहान ५:१६) त्याच्या ठायी काही शंका असल्या तर त्याला त्यांनी जणू ‘अग्नीतून ओढून बाहेर काढले असते.’ (यहुदा २३) तो अक्रियाक बनला असता, म्हणजे सभांना जाण्याचे व जाहीर उपाध्यपण करण्याचे त्याने बंद केले असते तर आध्यात्मिक दृष्टया बळकट असणाऱ्यांनी त्याला पुर्वस्थितीत आणण्याचा प्रयत्न केला असता. आपला कमकुवत विश्वास व आध्यात्मिकतेची नीचतम पातळी दर्शवून मंडळी सोबत राहण्याची त्याला इतकी पर्वा वाटली नव्हती असे त्याने म्हटले असते तर त्यांनी त्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला नसता, उलट त्याला वेळोवेळी मित्रत्वाच्या भेटी दिल्या असत्या. अशा या प्रेमळ, सहनशील व दयाळू प्रयत्नांकरवी हे प्रदर्शित झाले असते की कोणाचा नाश व्हावा अशी देवाला आस्था नाही.—लूक १५:४–७.
परंतु, प्रतिपक्षात योहानाचे शब्द दर्शवितात की ते काही जण आध्यात्मिक अशक्तपणा वा अक्रियाक स्थिति याच्याही पुढे गेले होते; त्यांनी वस्तुतः देवाच्या मंडळीचा त्याग केला होता. काहीजण तर देवाच्या लोकांच्या विरूद्ध अगदी जाहीरपणे आले असतील व आपणाला मंडळीचा भाग म्हणून राहावयाचे नाही हे त्यांनी उघडपणे म्हटले असेल. त्याने औपचारिकपणे म्हणजे पत्राद्वारे आपल्या विश्वासाचा धिक्कार वदविला असेल. अर्थात, मंडळीने त्याच्या अलिप्त होण्याच्या निर्णयाचा स्वीकार केला असेल. पण मग त्यानी त्याच्याशी कशी वागणूक ठेवावी?
योहान म्हणतो: “ख्रिस्ताचे शिक्षण धरून न राहता जो पुढेपुढे जातो त्याला देव नाही; जो शिक्षण धरून राहतो त्याला पिता व पुत्रही आहे. हे शिक्षण न देणारा असा कोणी तुम्हाकडे आला तर त्याला घरात घेऊ नका व त्याचे स्वागत करू नका.” (२ योहान ९, १०) हे शब्द निश्चये, जो खोटया धर्मास जडून वा खोट्या तत्वांचा प्रसार करून धर्मत्यागी झाला आहे त्याला लागू होणारे आहेत. (२ तिमथ्यी २:१७–१९) पण योहानाने ज्याबद्दल “ते आमच्या मधून निघाले” असे म्हटले त्यांच्याबद्दल काय? कोणा बहिष्कृत केलेल्या दुष्कर्म्याबरोबर वा क्रियाशील धर्मत्याग्या सोबत, ज्याने स्वेच्छेने ख्रिस्ती मार्गाचा अव्हेर केला आहे त्याच्या बरोबर सुद्धा त्यांनी अशीच वागणूक केली का?
एड् टु बायबल अंडरस्टँडिंग हे पुस्तक दाखविते की “धर्मत्याग” हा शब्द त्या ग्रीक शब्दापासून येतो ज्याचा अक्षरशः अर्थ “‘पासून वेगळे होणे’ पण ‘त्यागणे, सोडून जाणे वा बंडखोरी’ असाही आशय असणारा” असा आहे.a एड् पुस्तक पुढे म्हणते: “प्रेषितीय सूचनांमध्ये धर्मत्याग्यांच्या कारणांची विविधता या प्रकारे होती: विश्वासाची उणीव (इब्री ३:१२), छळामध्ये सहनशीलतेची उणीव (इब्री १० ३२–३९), बरोबरच्या नैतिक दर्जांना सोडणे (२ पेत्र २:१५–२२), खोट्या शिक्षकांची ‘लाघवी भाषणे’ व ‘फुसलाविणाऱ्या आत्म्याचे शिक्षण’ ऐकणे ( . . . १ तिमथ्यी ४:१–३) . . . या पद्धतीने स्वेच्छापूर्ण रीतीने ख्रिश्चन मंडळी सोडून जाणारा ‘ख्रिस्तविरोधी’चा भाग बनतो. (१ योहान २:१८, १९)”
ज्या माणसाने स्वेच्छेने पूर्वी स्वतःला मंडळीपासून अलिप्त केले त्याला हे वर्णन जुळणारे आहे. देवाच्या मंडळीचा हेतुपुरस्सर त्याग करून तसेच ख्रिस्ती मार्गाचा अवमान करून तो स्वतःला धर्मत्यागी बनवीत असतो. अशा या धर्मत्याग्यासोबत कोणीही निष्ठावंत ख्रिश्चन सख्य करण्याची इच्छा धरणार नाही. ते पूर्वी मित्र असले व आता त्यापैकी एक मंडळीचा त्याग करतो, धर्मत्यागी बनतो तेव्हा तो बंधुवर्गाची जवळीक राखण्याच्या आधाराचा धिक्कार करीत असतो. योहानाने स्पष्ट केले की तो स्वतः ज्याला ‘देव नाही’ व जो ‘आमच्या मधील नाही’ त्याला घरात घेणार नव्हता.
शास्त्रवचनीय दृष्टया, देवाच्या मंडळीस सोडून जाणारा जगातल्या लोकांपेक्षा अधिक दोषी बनत असतो. ते का? पौलाने दाखविले की रोमी जगतातील ख्रिश्चनांना दैनंदिनी व्यभिचारी, वित्त हरण करणारे आणि मूर्तिपूजक यांचा संपर्क येत होता. तरीही त्याने म्हटले की अशा अभक्त मार्गाचे पुनःअनुकरण करणारा “बंधू म्हटलेला असा कोणी . . . असला तर त्याची संगत धरू नये.” (१ करिंथकर ५:९–११) याचप्रमाणे पेत्रानेही म्हटले की कोणी “जगाच्या मळातून सुटल्यावर” आपल्या पूर्वीच्या जीवनाक्रमणाकडे परत गेला तर तो अंग धुतल्यानंतर गाळात परत लोळण्यास परतणाऱ्या डुकरीणी सारखा आहे. (२ पेत्र २:२०–२२) यास्तव, ख्रिश्चनांनी ‘आपणामधून स्वच्छेने बाहेर निघालेल्या’ माणसाला ‘आपल्या घरात घेऊ नये’ ही सूचना करताना योहान त्यामध्ये सुसंगतपणा दाखवीत होता.—२ योहान १०.
योहानाने पुढे म्हटले: “जो त्याचे स्वागत करतो तो त्याच्या दुष्कर्माचा भागीदार होतो.” (२ योहान ११) येथे योहानाने स्वागत याकरता वापरलेला खाय’रो हा शब्द १३ वचनातील अ:स्पा’झो:मई शब्दापेक्षा भिन्न आहे.
खाय’रो याचा अर्थ आनंद आहे. (लूक १०:२०; फिलिप्पैकर ३:१; ४:४) त्याचा बोलणे वा लिखाणातील अभिवादन या अर्थीही वापर होत होता. (मत्तय २८:९; प्रे.कृत्ये १५:२३; २३:२६) अ:स्पा’झो:मई याचा अर्थ “हाताचे तळवे जुळवणे म्हणजे नमस्कार करणे, स्वागत करणे.” (लूक ११:४३; प्रे.कृत्ये २०:१, ३७; २१:७, १९) अ:स्पा’झो:मई सलामाचा प्रकार असावा पण तो बहुधा साधारण “नमस्कार” वा “शुभेच्छा” पेक्षा अधिक असावा. येशूने आपल्या सत्तर शिष्यांना कोणाला अ.स्पाझो.मई करू नये असे म्हटले. त्याद्वारे त्याने सुचविले की त्यांचे काम इतक्या तातडीचे होते की त्यामध्ये पूर्वदेशीय प्रकारच्या अभिवादनाला म्हणजे मुके घेणे, मिठ्या मारणे वा गप्पा करणे याला वाव नव्हता. (लूक १०:४) पौल व पेत्राने आर्जविले: ‘पवित्र प्रेमाने वा पवित्र चुंबनाने एकमेकांस सलाम (अ.स्पाझो.मई) करा.’—१ पेत्र ५:१४; २ करिंथकर १३:१२, १३; १ थेस्सलनीकाकर ५:२६.
यास्तव योहानाने (१३व्या वचनातील) अ.स्पाझो.मईच्या वापरापेक्षा २ योहान १०, ११ मध्ये खाय’रो चा वापर मुद्दाम केला असावा. ते जर आहे तर योहान त्याकाळच्या ख्रिश्चनांना ज्याने खोटे शिक्षण आरंभले वा मंडळीचा (धर्मत्यागी बनून) त्याग केला त्यांचे (मिठी, चुंबन व संभाषण करवी) उबदार स्वागत करण्याचे टाळावे एवढेच सांगत नव्हता. उलटपक्षी, योहान म्हणत होता की अशा विशिष्ठाला खाय’रो प्रमाणेच नमस्कार वा शुभेच्छा सुद्धा वदवू नयेत.b
या सूचनेतील गंभीरता योहानाच्या या शब्दावरून कळते की “जो त्याचे स्वागत करतो तो त्याच्या दुष्कर्माचा भागीदार होतो.” बहिष्कृत केलेला दुष्कर्मी वा देवाच्या मंडळीचा धिक्कार करणाऱ्यासोबत सहवास राखून त्याच्या दुष्कर्माचे सहभागी होत असल्याचे देवाने पाहावे असे कोणाही ख्रिश्चनाला वाटणार नाही. या उलट, योहानाने लिहील्याप्रमाणे प्रेमळ ख्रिस्ती बंधुवर्गाच्या सहवासात सहभागी होणे किती चांगले आहे. तो म्हणाला: “जे आम्ही ऐकले व पाहिले आहे ते तुम्हासही यासाठी कळवितो की तुमचीही आम्हाबरोबर भागी व्हावी. आपली भागी तर पित्याबरोबर व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याजबरोबर आहे.”—१ योहान १:३
[तळटीपा]
a वेबस्टर यांचा न्यू कॉलेजिएट शब्दकोश म्हणतो की “धर्मत्याग” म्हणजे: “१. धार्मिक विश्वासास नाकारणे २. पूर्वीची निष्ठा त्यागणे.”
b २ योहान ११ मधील खाय’रोच्या वापराबद्दल आर.सी.एच. लेन्स्की म्हणतात: “भेटताना वा विलग होताना हे सर्वसाधारण अभिवादन होते. . . . त्याचा अर्थ असा: धर्मांतर केलेल्यांना हे अभिवादन मुळीच करू नका! त्याने जी दुष्ट कृत्ये आचरली आहेत त्यात तसे केल्यामुळे आधीच सहभागी होता. योहान . . . कोणत्याही प्रकारच्या अभिवादना बद्दल ते” सांगत होता.