वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w08 १२/१५ पृ. २७-पृ. २९ परि. १३
  • योहानाच्या व यहूदाच्या पत्रांतील ठळक मुद्दे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • योहानाच्या व यहूदाच्या पत्रांतील ठळक मुद्दे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • प्रकाशात, प्रीतीत व विश्‍वासाने चालत राहणे
  • (१ योहान १:१–५:२१)
  • सत्याच्या मार्गात चालत राहा
  • (२ योहान १-१३)
  • “सत्यामध्ये सहकारी” होणे
  • (३ योहान १-१४)
  • “आपणांस देवाच्या प्रीतिमध्ये राखा”
  • (यहूदा १-२५)
  • विश्‍वास, योग्य आचरण आणि प्रेम यांबद्दल सल्ला
    बायबल—मानवजातीला कोणता संदेश देते?
  • ‘विश्‍वासासाठी जोरदार लढा!’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • सत्याच्या मार्गावर चालत राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२०
  • धर्मत्याग्यांबद्दल दक्षता राखा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
w08 १२/१५ पृ. २७-पृ. २९ परि. १३

यहोवाचे वचन सजीव आहे

योहानाच्या व यहूदाच्या पत्रांतील ठळक मुद्दे

प्रेषित योहानाची तीन पत्रे कदाचित सा.यु. ९८ च्या आसपास लिहिण्यात आली असावीत. ही तीन पत्रे देवप्रेरित शास्त्रवचनांतील सर्वात शेवटी लिहिण्यात आलेल्या काही पुस्तकांपैकी आहेत. या तीन पत्रांपैकी पहिली दोन पत्रे ख्रिश्‍चनांना प्रकाशात चालत राहण्याचे व धर्मत्यागाच्या दुष्प्रभावाचा प्रतिकार करत राहण्याचे प्रोत्साहन देतात. तिसऱ्‍या पत्रात योहान सत्याच्या मार्गात चालत राहण्यासोबतच एकमेकांना सहकार्य करत राहण्याचेही ख्रिश्‍चनांना प्रोत्साहन देतो.

येशूचा भाऊ यहुदा, पॅलस्टाईनहून कदाचित सा.यु. ६५ साली लिहिलेल्या आपल्या पत्रात, ख्रिस्ती बांधवांना मंडळीत शिरलेल्या दुष्ट माणसांविरुद्ध इशारा आणि घातक प्रभावांना कसे तोंड द्यावे याबद्दलचा सल्ला देतो. योहानाच्या व यहुदाच्या पत्रांतील संदेशाकडे लक्ष दिल्याने आपल्याला सर्व प्रकारच्या अडथळ्यांना तोंड देऊन विश्‍वासात दृढ राहणे शक्य होईल.—इब्री ४:१२.

प्रकाशात, प्रीतीत व विश्‍वासाने चालत राहणे

(१ योहान १:१–५:२१)

योहानाचे पहिले पत्र ख्रिस्तामध्ये असलेल्या सर्व बंधूंना उद्देशून लिहिण्यात आले. धर्मत्यागाचा कडाडून विरोध करण्यास व सत्याच्या व नीतीच्या मार्गात खंबीर राहण्यास ख्रिश्‍चनांना मदत करण्याच्या हेतूने या पत्रात खास सल्ला देण्यात आला. प्रकाशात, प्रीतीत व विश्‍वासाने चालत राहणे किती गरजेचे आहे यावर योहान जोर देतो.

योहान लिहितो: “जसा [देव] प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे.” आणि ज्याअर्थी देव प्रेमाचा स्रोत आहे त्याअर्थी “आपण एकमेकांवर प्रीति करावी” असेही प्रेषित योहान म्हणतो. ‘देवाची प्रीति’ आपल्याला ‘त्याच्या आज्ञा पाळण्यास’ प्रेरित करते आणि यहोवा देवावर, त्याच्या वचनावर व त्याच्या पुत्रावर असलेल्या आपल्या ‘विश्‍वासाच्या’ साहाय्याने आपण जगावर विजय मिळवतो.—१ योहा. १:७; ४:७; ५:३, ४.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

२:२; ४:१०—येशू आपल्या “पापांबद्दल प्रायश्‍चित्त” कसा आहे? येशूने आपल्या पापांबद्दल प्रायश्‍चित्त देण्याद्वारे परिपूर्ण न्यायाची आवश्‍यकता पूर्ण केली. या प्रायश्‍चित्ताच्या आधारावर देव दया दाखवू शकत होता आणि येशूवर विश्‍वास ठेवणाऱ्‍यांचे पाप क्षमा करू शकत होता.—योहा. ३:१६; रोम. ६:२३.

२:७, ८—योहान कोणत्या आज्ञेबद्दल बोलत होता, जी “जुनी” आहे व त्याच वेळी ‘नवीही’ आहे? योहान आत्मत्यागी बंधूप्रेमाविषयीच्या आज्ञेबद्दल बोलत होता. (योहा. १३:३४) तो या आज्ञेला “जुनी” म्हणतो कारण त्याने आपले पहिले प्रेरित पत्र लिहिण्याच्या तब्बल ६० वर्षांअगोदर येशूने ती दिली होती. त्यामुळे विश्‍वासात असलेल्यांच्या ख्रिस्ती जीवनाच्या ‘प्रारंभापासूनच’ त्यांना ही आज्ञा माहीत होती. पण या आज्ञेला “नवी” आज्ञाही म्हणता येते कारण ती “आपल्या शेजाऱ्‍यावर स्वत:सारखी प्रीति कर” एवढेच सांगत नाही तर आत्मत्यागी प्रेमाची अपेक्षा करते.—लेवी. १९:१८; योहा. १५:१२, १३.

३:२—अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना काय “प्रगट झालेले नाही” आणि कोण त्यांना “जसा तो आहे तसाच” दिसेल? आत्मिक शरीराने स्वर्गात पुनरुत्थान झाल्यानंतर ते कसे असतील हे त्यांना प्रगट झालेले नाही. (फिलिप्पै. ३:२०, २१) पण एवढे मात्र त्यांना माहीत आहे, की ‘[देव] प्रगट होईल तेव्हा [ते] त्याच्यासारखे होतील, कारण जसा तो आहे तसाच तो [त्यांना] दिसेल,’ आणि तो “आत्मा” आहे.—२ करिंथ. ३:१७, १८.

५:५-८—“येशू देवाचा पुत्र आहे” अशी साक्ष पाणी, रक्‍त व आत्मा यांनी कशा प्रकारे दिली? पाण्याने साक्ष दिली असे आपण म्हणू शकतो कारण जेव्हा येशूचा पाण्याने बाप्तिस्मा झाला तेव्हा यहोवाने स्वतः आपल्या पुत्राविषयी आपण संतुष्ट असल्याचे व्यक्‍त केले. (मत्त. ३:१७) “सर्वांसाठी मुक्‍तीचे मोल” म्हणून येशूने जे रक्‍त अर्थात त्याचे जीवन अर्पण केले, त्यावरूनही तो देवाचा पुत्र असल्याचे दिसून आले. (१ तीम. २:५, ६) तसेच, येशूच्या बाप्तिस्म्याच्या वेळी त्याच्यावर उतरलेल्या पवित्र आत्म्यानेही तो देवाचा पुत्र असल्याची साक्ष दिली, जेणेकरून तो “सत्कर्मे करीत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करीत फिरला.”—योहा. १:२९-३४; प्रे. कृत्ये १०:३८.

आपल्याकरता धडे:

२:९-११; ३:१५. एखाद्या ख्रिस्ती व्यक्‍तीने कोणत्याही गोष्टीमुळे किंवा कोणत्याही व्यक्‍तीमुळे आपले बंधुप्रेम नष्ट होऊ दिल्यास अशी व्यक्‍ती आत्मिक अंधारात चालत आहे आणि आपण कोठे जात आहोत हे तिला कळत नाही असे म्हणता येईल.

सत्याच्या मार्गात चालत राहा

(२ योहान १-१३)

योहान आपल्या दुसऱ्‍या पत्राची सुरुवात या शब्दांनी करतो: “निवडलेली बाई व तिची मुले ह्‍यांस, वडील ह्‍याजकडून.” “[तिची] काही मुले सत्याने चालत असलेली” आढळल्याबद्दल तो आनंद व्यक्‍त करतो.—२ योहा. १, ४.

प्रीती उत्पन्‍न करण्याचे प्रोत्साहन दिल्यानंतर योहान असे लिहितो: “प्रीति हीच आहे की, आपण त्याच्या आज्ञांप्रमाणे चालावे.” तसेच, “फसवणूक करणारा व ख्रिस्तविरोधक” याच्याविरुद्धही तो इशारा देतो.—२ योहा. ५-७.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

१, १३—“निवडलेली बाई” कोण आहे? योहान या ठिकाणी एका विशिष्ट स्त्रीचा उल्लेख करत असावा, जिला ग्रीक भाषेत कीरिया म्हणजेच “बाई” म्हटले आहे. किंवा छळ करणाऱ्‍यांना गोंधळात टाकण्यासाठी तो अलंकारिक भाषेत एखाद्या मंडळीला उद्देशून लिहित असावा. जर हे खरे असेल तर तिची मुले त्या मंडळीचे सदस्य असतील आणि ‘[तिच्या] बहिणीची मुले’ असे त्याने दुसऱ्‍या मंडळीच्या सदस्यांच्या संदर्भात लिहिले असावे.

७—योहान येथे येशूच्या कोणत्या ‘येण्याविषयी’ बोलतो आणि फसवणूक करणारी माणसे हे ‘कबूल करत नाहीत’ हे कोणत्या अर्थाने? हे ‘येणे’ येशूचे भविष्यातील अदृश्‍य येणे नाही. तर हे त्याच्या शारीरिकरित्या येण्यास व ख्रिस्त या नात्याने अभिषिक्‍त होण्यास सूचित करते. (१ योहा. ४:२) फसवणूक करणारे येशूचे हे शारीरिक येणे कबूल करत नाहीत. येशू कधी या जगात हयात होता किंवा त्याचा पवित्र आत्म्याने अभिषेक झाला होता हे कदाचित ते मान्य करत नसतील.

आपल्याकरता धडे:

२, ४. तारणासाठी, आपण ‘सत्य’ म्हणजेच बायबलमध्ये समाविष्ट असलेल्या एकंदरीत सर्व ख्रिस्ती शिकवणुकी जाणून घेणे आणि त्यांचे पालन करणे गरजेचे आहे.—३ योहा. ३, ४.

८-११. जर आपल्याला “देवपित्यापासून व पित्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्‍याच्यापासून [मिळणारी] कृपा, दया व शांति,” तसेच आपल्या ख्रिस्ती बांधवांचा प्रेमळ सहवास गमवायचा नसेल तर आपण आध्यात्मिक दृष्ट्या ‘खबरदारी घेतली’ पाहिजे आणि जे ‘ख्रिस्ताच्या शिक्षणाला चिकटून राहत नाहीत’ अशा लोकांपासून दूर राहिले पाहिजे.—२ योहा. ३.

“सत्यामध्ये सहकारी” होणे

(३ योहान १-१४)

योहानाचे तिसरे पत्र गायस या त्याच्या मित्राला संबोधित केलेले आहे. योहान लिहितो, “माझी मुले सत्यात चालतात, हे ऐकून मला आनंद होतो तितका दुसऱ्‍या कशानेहि होत नाही.”—३ योहा. ४.

प्रवासी बांधवांना ‘विश्‍वासूपणे’ साहाय्य केल्याबद्दल योहान गायस याची प्रशंसा करतो. तो म्हणतो, “आपण अशांचा पाहुणचार करावा, म्हणजे आपण सत्यामध्ये त्यांचे सहकारी होऊ.”—३ योहा. ५-८.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

११—काही जण दुराचरण का करतात? ख्रिस्ती शिकवणींची कदर नसल्यामुळे काही जण आपल्या मनःचक्षुंनी देवाला पाहू शकत नाहीत. देवाला प्रत्यक्ष पाहता येत नसल्यामुळे तो ही आपल्याला पाहू शकत नाही असे समजून ते वागतात.—यहे. ९:९

१४—“मित्रमंडळी” कोणाला म्हटले आहे? या ठिकाणी “मित्रमंडळी” हा शब्द एकमेकांशी घनिष्ट संबंध असलेल्यांनाच केवळ सूचित करत नाही. तर योहानाने सर्व ख्रिस्ती बांधवांच्या संदर्भात मित्रमंडळी हा शब्द वापरला आहे.

आपल्याकरता धडे:

४. आध्यात्मिक रीत्या प्रौढ व्यक्‍ती, मंडळीतील तरुण सदस्यांना ‘सत्यात चालत असलेले’ पाहतात तेव्हा त्यांना अतिशय आनंद होतो. तसेच, आईवडिलांनाही आपल्या मुलांना आध्यात्मिक प्रवृत्तीच्या व्यक्‍ती बनण्यास मदत करण्यात यश येते तेव्हा त्यांना देखील अवर्णनीय आनंद होतो.

५-८. बांधवांप्रती व यहोवाप्रती प्रेम असल्यामुळे परिश्रम करणाऱ्‍यांत प्रवासी पर्यवेशक्षक, मिशनरी, बेथेल गृहांत किंवा शाखा कार्यालयांत सेवा करणारे तसेच पायनियर सेवेत असलेल्या बंधूभगिनींचा समावेश आहे. त्यांचा विश्‍वास अनुकरण करण्याजोगा आहे आणि अशा बांधवांना आपण प्रेमळपणे साहाय्य केले पाहिजे.

९-१२. आपण बाष्कळ बडबड करणाऱ्‍या चहाडखोर दियत्रफेसचे अनुकरण करू नये. त्याऐवजी आपण देमेत्रियाच्या विश्‍वासू उदाहरणाचे अनुकरण करावे.

“आपणांस देवाच्या प्रीतिमध्ये राखा”

(यहूदा १-२५)

मंडळीत चोरून आत शिरलेल्या व्यक्‍तींना यहूदा, “कुरकुर करणारे, असंतुष्ट व वासनासक्‍त” म्हणतो. ते ‘फुशारकी मारतात व तोंडपुजेपणा करतात.’—यहू. ४, १६.

वाईट प्रभावांचा ख्रिस्ती कशा प्रकारे प्रतिकार करू शकतात? यहूदा असे लिहितो, “प्रियजनहो, तुम्ही तर आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या प्रेषितांनी पूर्वी सांगितलेल्या वचनांची आठवण ठेवा.” तो पुढे म्हणतो, “आपणांस देवाच्या प्रीतिमध्ये राखा.”—यहू. १७-२१.

शास्त्रवचनीय प्रश्‍नांची उत्तरे:

३, ४—यहूदाने ख्रिश्‍चनांना ‘विश्‍वासाचे समर्थन करण्याचा’ बोध का दिला? कारण ‘अभक्‍तीने वागणारी माणसे [मंडळीत] चोरून आत शिरली’ होती. ही माणसे, ‘देवाच्या कृपेचा विपर्यास करून तिला कामातुरपणाचे स्वरूप आणत’ होते.

२०, २१—आपण कशा प्रकारे स्वतःला ‘देवाच्या प्रीतिमध्ये राखू’ शकतो? हे आपण तीन मार्गांनी करू शकतो: (१) देवाच्या वचनाचा परिश्रमपूर्वक अभ्यास करून व प्रचार कार्यात आवेशाने सहभाग घेऊन आपल्या ‘परमपवित्र विश्‍वासावर’ स्वतःची रचना करण्याद्वारे; (२) ‘पवित्र आत्म्याने’ म्हणजेच त्याच्या प्रभावाला प्रतिसाद देऊन प्रार्थना करण्याद्वारे; आणि (३) ज्यामुळे सार्वकालिक जीवन शक्य होते त्या खंडणी बलिदानावर विश्‍वास प्रकट करण्याद्वारे.—योहा. ३:१६, ३६.

आपल्याकरता धडे:

५-७. दुष्ट लोक यहोवाच्या न्यायदंडापासून बचावतील का? यहूदाने सांगितलेल्या तीन उदाहरणांवरून हे स्पष्ट दिसून येते, की दुष्ट जन यहोवाच्या न्यायदंडापासून बचावणे अशक्य आहे.

८-१०. देवाने ठरवलेल्या अधिकाराबद्दल आदर दाखवणाऱ्‍या आद्यदेवदूत मिखाएलाचे आपण अनुकरण केले पाहिजे.

१२. पाण्याखाली लपलेले खडक ज्याप्रमाणे जहाजांकरता किंवा पोहणाऱ्‍यांकरता धोकेदायक असतात त्याच प्रमाणे आपल्यावर प्रेम असल्याचे ढोंग करणारे धर्मत्यागी आध्यात्मिक दृष्ट्या आपल्याकरता धोकेदायक आहेत. खोटे शिक्षक कदाचित खूप उदार असल्याचे भासवतील पण ते निर्जल मेघांप्रमाणे आहेत. म्हणजेच, आध्यात्मिक दृष्ट्या ते आपल्याला काहीही देऊ शकत नाहीत. अशा व्यक्‍ती हेमंत ऋतूतील फलहीन, मृतवत झालेल्या झाडांसारख्या आहेत. समूळ उपटलेल्या झाडांप्रमाणे त्यांचाही नाश ठरलेला आहे. अशा धर्मत्यागी व्यक्‍तींपासून आपण दूर राहिलेलेच बरे!

२२, २३. खरे ख्रिस्ती वाइटाचा द्वेष करतात. जे “संशयात आहेत” अशांना सार्वकालिक नाशाच्या अग्नीतून ओढून काढण्यासाठी मंडळीतील प्रौढ जन, विशेषतः नियुक्‍त वडील त्यांना आध्यात्मिक मदत पुरवतात.

[२८ पानांवरील चित्रे]

पाणी, आत्मा व रक्‍त यांनी “येशू देवाचा पुत्र आहे” अशी साक्ष दिली

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा