“समयोचित भाषण”
“रुपेरी करंड्यात सोन्याची फळे, तसे समयोचित भाषण होय,” असे नीतीसूत्रे २५:११ म्हणते. आमचे विचारशील शब्द आणि दयाशील कृत्ये धार्मिक माणसाच्या अंतःकरणास यहोवाच्या स्विकृत मार्गावर सोबत येण्यास हळूच कोपरखळी देऊ शकतात. आम्ही पुष्कळ वर्षांआधी काही म्हटलेले वा केलेले काही, अद्यापही काहीजण आनंदाने आठवून सांगतात. उदाहरणार्थ, नव्यानेच बाप्तिस्मा घेतलेल्या एका बहिणीच्या घरी विभागीय देखरेखे व त्यांच्या पत्नी पाहुणे म्हणून राहिले. विभागीय देखरेख्यांच्या पत्नीने पाहुणचाराप्रीत्यर्थ या बहिणीला आभाराचे पत्र पाठविले. आता सुमारे सात वर्षांनी यांना हे पत्र आलेः
“मला वाटले की हे पत्र पाठवून तुम्ही मला अनपेक्षितपणे जी मदत केली व जिचा मला आज इतके वर्षे फायदा मिळत गेला त्याविषयी लिहावे. तुम्ही मजकडे दुपारच्या जेवणाला होता आणि मी केलेल्या पाहुणचाराविषयी तुम्ही मला आभाराचे पत्रही पाठविले. ते खूपच जिव्हाळ्याचे होते आणि त्यात नमूद केलेले शास्त्रवचन माझ्या अंतःकरणी भिडले. ते मला विसरताच येणार नाही. हे १९७६ मध्ये घडले. यावेळी मी माझ्या कुटुंबात एकटीच आस्थेवाईक होत्ये. मी माझ्या मुलींसोबत अभ्यास केला आणि सद्गुणी पत्नी बनण्याचा प्रयत्न केला. पण कधी कधी मला मुक्त व्हावेसे वाटत होते—होय, सत्यापासून, जबाबदाऱ्यांपासून मुक्त—स्वतंत्र असावेसे वाटत होते. पण जे शास्त्रवचन तुम्ही मला लिहून पाठविले ते माझ्या अंतःकरणास बोचत राहिले त्यामुळे मी स्वतःशीच म्हणत राहिले की, ‘किती बाई मी स्वार्थी!’ आणि मग मी दृढ राहण्याचा निश्चय करीत गेले.
“या गेल्या आठ वर्षांत इतका भव्य परिणाम इतर कोणत्याहि गोष्टीने मजवर केला नाही. याकारणास्तव हे पत्र मी तुम्हाला लिहित आहे. या शास्त्रवचनाखेरीज हाही विचार मला आला की तुम्ही इतके कार्यमग्न होता तरी वेळात वेळ काढून केलेल्या व केले पाहिजे त्या कामाच्या बाबतीत माझे आभार मानणारे पत्र पाठविले. हे खूपच चांगले होते.
“आणि हो, ते शास्त्रवचन—२ रे योहान ८.
“सॅण्ड्रा”
आज सॅण्ड्राचे पति बाप्तिस्मा झालेले आहेत आणि ते तिच्यासोबत सुवार्तेची सहभागिता करीत आहेत. त्यांच्या दोन मुलीतील एक नियमित पायनियर असून दुसरी आपले माध्यमिक शिक्षण संपवून सहाय्यक पायनियरींग करीत आहे.
शेवटी, योहानाच्या दुसऱ्या पत्रातील ८ वे वचन काय म्हणते? “आम्ही केलेले कार्य तुम्ही निष्फळ होऊ देऊ नका, तर त्याचे पूर्ण प्रतिफळ तुम्हास मिळावे म्हणून खबरदारी घ्या.”