वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • तुमच्या हातून गंभीर पाप झालं तर काय?
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
    • ४. यहोवा पाप करणाऱ्‍यांना दया दाखवतो

      गंभीर पाप करणारी एखादी व्यक्‍ती जेव्हा यहोवाच्या स्तरांप्रमाणे जगायला नकार देते, तेव्हा तिला मंडळीतून काढून टाकलं जातं आणि आपण तिच्यासोबत उठणं-बसणं ठेवत नाही. १ करिंथकर ५:६, ११ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

      • ज्या प्रकारे खमीर संपूर्ण पिठाला फुगवतं, त्याच प्रकारे पश्‍चात्ताप न करणाऱ्‍या व्यक्‍तीशी संबंध ठेवल्यामुळे पूर्ण मंडळीवर वाईट प्रभाव कसा पडू शकतो?

      मंडळीतले वडील पाप करणाऱ्‍यांना यहोवासारखी दया दाखवतात. ज्यांना मंडळीतून काढून टाकलंय त्यांच्यापर्यंत पोहोचायचा आणि त्यांना मदत करायचा ते प्रयत्न करतात. पाप करणाऱ्‍यांना मंडळीतून काढून टाकल्यामुळे सुरुवातीला जरी त्यांना खूप दुःख झालं, तरी यामुळे त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव होते. आणि यामुळेच बऱ्‍याच जणांना मंडळीत परत यायला मदत झाली आहे.—स्तोत्र १४१:५.

      यहोवा पाप करणाऱ्‍यांशी जसं वागतो त्यावरून तो न्यायी, दयाळू आणि प्रेमळ असल्याचं कसं कळतं?

      ५. पश्‍चात्ताप करणाऱ्‍यांना यहोवा क्षमा करतो

      एखादी व्यक्‍ती पश्‍चात्ताप करते, तेव्हा यहोवाला कसं वाटतं हे समजावण्यासाठी येशूने एक उदाहरण दिलं. लूक १५:१-७ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

      • यातून तुम्हाला यहोवाबद्दल काय शिकायला मिळालं?

      यहेज्केल ३३:११ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

  • यहोवाला नेहमी एकनिष्ठ राहा
    कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
    • १. इतरांमुळे आपल्या एकनिष्ठतेची परीक्षा कशी होऊ शकते?

      आपण यहोवाची उपासना करू नये म्हणून काही लोक आपल्याला त्याच्यापासून दूर न्यायचा प्रयत्न करतील. हे कोण असू शकतात? असे काही जण आहेत, जे सत्य सोडून गेले आहेत आणि जे देवाच्या संघटनेबद्दल खोटी माहिती पसरवतात. आपण यहोवाची उपासना सोडून द्यावी हाच त्यांचा उद्देश असतो. त्यांना धर्मत्यागी असं म्हणण्यात आलंय. तसंच, काही धर्मपुढारीसुद्धा आपल्याबद्दल खोटी माहिती पसरवतात. आणि जर आपण सांभाळून राहिलो नाही, तर आपण त्यांच्या पाशात अडकू शकतो आणि सत्य सोडून जाऊ शकतो. अशा लोकांशी वाद घालणं, त्यांची पुस्तकं किंवा इंटरनेटवर त्यांचे ब्लॉग वाचणं, त्यांच्या वेबसाईटवर जाणं किंवा त्यांचे व्हिडिओ पाहणं हे आपल्यासाठी खूप धोकेदायक आहे. जे दुसऱ्‍यांना यहोवाची विश्‍वासूपणे सेवा करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्याबद्दल येशूने म्हटलं: “त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. ते स्वतः आंधळे असून इतरांना रस्ता दाखवतात. एका आंधळ्याने दुसऱ्‍या आंधळ्याला रस्ता दाखवला तर दोघंही खड्ड्यात पडतील.”—मत्तय १५:१४.

      २. आपल्या निर्णयांमुळे आपल्या एकनिष्ठतेची परीक्षा कशी होऊ शकते?

      यहोवावर प्रेम असल्यामुळेच आपण खोट्या धर्माशी कोणताही संबंध ठेवत नाही. आपण जो नोकरी-धंदा निवडतो, ज्या संस्थांचा भाग बनतो किंवा जे काही करायचा निर्णय घेतो, त्यांपैकी कशाचाही खोट्या धर्माशी संबंध नाही याची आपण खातरी केली पाहिजे. यहोवा आपल्याला स्पष्टपणे सांगतो, ‘माझ्या लोकांनो, [मोठ्या बाबेलमधून] बाहेर या.’—प्रकटीकरण १८:२, ४.

      आणखी जाणून घेऊ या

      यहोवाची एकनिष्ठपणे उपासना करण्याचा तुमचा निश्‍चय कोणीही कमजोर करू नये, म्हणून तुम्ही काय करू शकता हे जाणून घ्या. तसंच, मोठ्या बाबेलपासून दूर राहून तुम्ही तुमची एकनिष्ठा कशी दाखवू शकता हेसुद्धा पाहा.

      ३. खोट्या शिक्षकांच्या पाशात अडकू नका

      यहोवाच्या संघटनेबद्दल चुकीच्या गोष्टी आपल्या ऐकण्यात आल्या तर आपण काय केलं पाहिजे? नीतिवचनं १४:१५ वाचा, आणि मग या प्रश्‍नावर चर्चा करा:

      • ऐकलेल्या प्रत्येक गोष्टीवर आपण विश्‍वास का ठेवू नये?

      २ योहान ९-११ वाचा, आणि मग या प्रश्‍नांवर चर्चा करा:

      • धर्मत्यागी लोकांशी आपण कसं वागलं पाहिजे?

      • आपण धर्मत्यागी लोकांशी प्रत्यक्ष बोलत नसलो, तरीसुद्धा त्यांच्या शिकवणींचा आपल्यावर कोणत्या मार्गांनी प्रभाव पडू शकतो?

      • यहोवाबद्दल किंवा त्याच्या संघटनेबद्दल बोलल्या जाणाऱ्‍या चुकीच्या गोष्टींकडे जर आपण लक्ष दिलं, तर यहोवाला कसं वाटेल?

      ४. एखाद्या भावाने पाप केलं तरीसुद्धा एकनिष्ठ राहा

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा