-
देव कोण आहे?कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
-
-
२. बायबल आपल्याला यहोवाबद्दल काय सांगतं?
मानव बऱ्याच देवीदेवतांची भक्ती करतात. पण बायबल सांगतं की यहोवा हा एकच खरा देव आहे. असं का म्हणता येईल? याची बरीच कारणं आहेत. पहिलं म्हणजे, यहोवाचा अधिकार सगळ्यात मोठा आहे. म्हणजेच “या संपूर्ण पृथ्वीवर फक्त [तोच] सर्वोच्च देव” आहे. (स्तोत्र ८३:१८ वाचा.) तसंच, तो “सर्वशक्तिमान” आहे. याचा अर्थ, त्याला जे काही करायची इच्छा आहे, ते करण्याची ताकद त्याच्याजवळ आहे. शिवाय, त्याने “सर्व गोष्टी निर्माण केल्या.” हे विश्व आणि पृथ्वीवर जे काही आहे, ते त्यानेच बनवलं. (प्रकटीकरण ४:८, ११) आणि फक्त यहोवाच असा आहे, ज्याला सुरुवात नाही आणि अंतही नाही.—स्तोत्र ९०:२.
-
-
देवाला कोणत्या प्रकारची उपासना आवडते?कायम जीवनाचा आनंद घ्या!—देवाकडून शिकू या
-
-
यहोवा आपला निर्माणकर्ता आहे. म्हणून आपण फक्त त्याचीच भक्ती केली पाहिजे. (प्रकटीकरण ४:११) त्याची इच्छा आहे की आपण त्याच्यावर मनापासून प्रेम केलं पाहिजे आणि कोणत्याही मूर्तीचा किंवा प्रतिमेचा वापर न करता, फक्त आणि फक्त त्याचीच उपासना केली पाहिजे.—यशया ४२:८ वाचा.
आपली भक्ती “पवित्र आणि [यहोवाला] स्वीकारयोग्य” असली पाहिजे. (रोमकर १२:१) याचा अर्थ, नैतिक गोष्टींच्या बाबतीत आपण त्याच्या नियमांप्रमाणे वागलं पाहिजे. जसं की, विवाहाच्या बाबतीत यहोवाने घालून दिलेले नियम आपण पाळले पाहिजेत. तसंच, आपल्या शरीराला नुकसान करतील अशा गोष्टींपासून, जसं की तंबाखू, पान-सुपारी आणि ड्रग्स यांपासून आपण दूर राहिलं पाहिजे. तसंच, आपण दारूचं व्यसन नाही केलं पाहिजे.a देवाच्या या आज्ञांचं पालन करण्याद्वारे आपण दाखवतो की आपलं त्याच्यावर प्रेम आहे.
-