वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • उत्पत्ती ४४
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

उत्पत्ती रूपरेषा

      • योसेफचा चांदीचा प्याला बन्यामीनच्या गोणीत (१-१७)

      • यहूदा बन्यामीनसाठी विनवणी करतो (१८-३४)

उत्पत्ती ४४:१

समासातील संदर्भ

  • +उत्प ४२:२५

उत्पत्ती ४४:५

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    १/१५/२००४, पृ. २९

उत्पत्ती ४४:८

समासातील संदर्भ

  • +उत्प ४३:१२

उत्पत्ती ४४:१२

समासातील संदर्भ

  • +उत्प ४४:२

उत्पत्ती ४४:१४

समासातील संदर्भ

  • +उत्प ४३:८; ४४:३२
  • +उत्प ३७:७, ९

उत्पत्ती ४४:१५

समासातील संदर्भ

  • +उत्प ४४:५

उत्पत्ती ४४:१६

समासातील संदर्भ

  • +उत्प ३७:१८, २८; ४२:२१, २२

उत्पत्ती ४४:१७

समासातील संदर्भ

  • +उत्प ४४:९

उत्पत्ती ४४:१८

समासातील संदर्भ

  • +उत्प ४१:४४; ४५:८

उत्पत्ती ४४:२०

समासातील संदर्भ

  • +उत्प ४२:१३; ४३:७
  • +उत्प ३५:१८, १९
  • +उत्प ३७:३१-३४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१/२०१५, पृ. १४

उत्पत्ती ४४:२१

समासातील संदर्भ

  • +उत्प ४२:१५; ४३:२९

उत्पत्ती ४४:२२

समासातील संदर्भ

  • +उत्प ४२:३८

उत्पत्ती ४४:२३

समासातील संदर्भ

  • +उत्प ४२:२०

उत्पत्ती ४४:२५

समासातील संदर्भ

  • +उत्प ४३:२

उत्पत्ती ४४:२६

समासातील संदर्भ

  • +उत्प ४३:५

उत्पत्ती ४४:२७

समासातील संदर्भ

  • +उत्प २९:१८; ३०:२२-२४; ३५:१८, १९; ४६:१९

उत्पत्ती ४४:२८

समासातील संदर्भ

  • +उत्प ३७:३३

उत्पत्ती ४४:२९

तळटीपा

  • *

    हिब्रू भाषेत “शिओल.”  शब्दार्थसूची पाहा.

समासातील संदर्भ

  • +उत्प ३७:३४, ३५; ४२:३८; स्तो १६:१०; ८८:३; उप ९:१०; होशे १३:१४; प्रेका २:२७; प्रक २०:१३

उत्पत्ती ४४:३१

तळटीपा

  • *

    हिब्रू भाषेत “शिओल.”  शब्दार्थसूची पाहा.

उत्पत्ती ४४:३२

समासातील संदर्भ

  • +उत्प ४३:९

उत्पत्ती ४४:३४

इंडेक्स

  • संशोधन मार्गदर्शक

    टेहळणी बुरूज,

    ७/१/२०१५, पृ. १४

समान भाषांतरे

इतर संबंधीत वचन पाहाण्यासाठी, वचनाच्या अंकावर क्लिक करा

इतर

उत्प. ४४:१उत्प ४२:२५
उत्प. ४४:८उत्प ४३:१२
उत्प. ४४:१२उत्प ४४:२
उत्प. ४४:१४उत्प ४३:८; ४४:३२
उत्प. ४४:१४उत्प ३७:७, ९
उत्प. ४४:१५उत्प ४४:५
उत्प. ४४:१६उत्प ३७:१८, २८; ४२:२१, २२
उत्प. ४४:१७उत्प ४४:९
उत्प. ४४:१८उत्प ४१:४४; ४५:८
उत्प. ४४:२०उत्प ४२:१३; ४३:७
उत्प. ४४:२०उत्प ३५:१८, १९
उत्प. ४४:२०उत्प ३७:३१-३४
उत्प. ४४:२१उत्प ४२:१५; ४३:२९
उत्प. ४४:२२उत्प ४२:३८
उत्प. ४४:२३उत्प ४२:२०
उत्प. ४४:२५उत्प ४३:२
उत्प. ४४:२६उत्प ४३:५
उत्प. ४४:२७उत्प २९:१८; ३०:२२-२४; ३५:१८, १९; ४६:१९
उत्प. ४४:२८उत्प ३७:३३
उत्प. ४४:२९उत्प ३७:३४, ३५; ४२:३८; स्तो १६:१०; ८८:३; उप ९:१०; होशे १३:१४; प्रेका २:२७; प्रक २०:१३
उत्प. ४४:३२उत्प ४३:९
  • पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
  • १
  • २
  • ३
  • ४
  • ५
  • ६
  • ७
  • ८
  • ९
  • १०
  • ११
  • १२
  • १३
  • १४
  • १५
  • १६
  • १७
  • १८
  • १९
  • २०
  • २१
  • २२
  • २३
  • २४
  • २५
  • २६
  • २७
  • २८
  • २९
  • ३०
  • ३१
  • ३२
  • ३३
  • ३४
पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
उत्पत्ती ४४:१-३४

उत्पत्ती

४४ मग योसेफने आपल्या घरावर देखरेख करणाऱ्‍या माणसाला अशी आज्ञा दिली: “या माणसांच्या गोणींत, त्यांना नेता येईल इतकं धान्य भर आणि त्यांच्या पैशांच्या थैल्या त्यांच्या गोणींत ठेव.+ २ पण सगळ्यात धाकट्याच्या गोणीत त्याच्या पैशांच्या थैलीसोबत माझा चांदीचा प्यालाही ठेव.” तेव्हा योसेफने सांगितल्याप्रमाणे त्याने केलं.

३ सकाळ झाल्यावर त्यांना त्यांच्या गाढवांसोबत पाठवून देण्यात आलं. ४ ते शहरापासून थोड्याच अंतरावर पोहोचल्यावर, योसेफ त्याच्या घरावर देखरेख करणाऱ्‍या माणसाला म्हणाला: “ऊठ! त्यांचा पाठलाग कर! त्यांना गाठल्यावर त्यांना असं म्हण: ‘तुम्ही चांगल्याची परतफेड वाइटाने का केली? ५ माझा मालक ज्या प्याल्यातून पितो आणि ज्याने शकुन पाहतो, तो तुम्ही का घेतला? तुम्ही केलं ते फार वाईट केलं.’”

६ मग त्याने त्यांना गाठलं आणि योसेफने सांगितल्याप्रमाणे तो त्यांना बोलला. ७ पण ते त्याला म्हणाले: “प्रभू, हे तुम्ही काय बोलत आहात? असं काही करण्याचा विचारही तुमचे सेवक करू शकत नाहीत. ८ जे पैसे आम्हाला आमच्या गोणींमध्ये सापडले, ते आम्ही कनान देशातून परत तुमच्याकडे घेऊन आलो.+ मग, आम्ही तुमच्या मालकाच्या घरातलं सोनंचांदी का चोरू? ९ जर तो प्याला तुमच्या या सेवकांपैकी कोणाकडे सापडला, तर त्याला ठार मारलं जावं आणि बाकीचे आम्ही सर्व तुमचे गुलाम होऊ.” १० तेव्हा तो म्हणाला: “तुम्ही म्हणता तसंच होईल. ज्याच्याकडे तो प्याला सापडेल तो माझा गुलाम होईल, पण बाकीचे सर्व निर्दोष ठरतील.” ११ मग प्रत्येकाने आपली गोण जमिनीवर ठेवून ती उघडली. १२ त्याने मोठ्या भावापासून धाकट्यापर्यंत सर्वांची कसून झडती घेतली. शेवटी तो प्याला बन्यामीनच्या गोणीत मिळाला.+

१३ तेव्हा त्यांनी दुःखाने आपले कपडे फाडले आणि प्रत्येकाने आपलं सामान गाढवावर लादून ते पुन्हा शहरात आले. १४ यहूदा+ आणि त्याचे भाऊ योसेफच्या घरी आले, तेव्हा तो अजूनही तिथेच होता; मग त्यांनी त्याच्यापुढे जमिनीवर डोकं टेकवून त्याला नमन केलं.+ १५ योसेफ त्यांना म्हणाला: “तुम्ही हे काय केलंत? मी शकुन पाहू शकतो, हे तुम्हाला माहीत नव्हतं का?”+ १६ यावर यहूदा म्हणाला: “प्रभू, आम्ही तुम्हाला काय सांगणार आणि काय बोलणार? आम्ही निर्दोष आहोत हे कसं पटवून देऊ? खऱ्‍या देवानेच तुमच्या या सेवकांचा अपराध उघड केला आहे.+ आता हे माझ्या प्रभू, आम्ही सर्व आणि ज्याच्या हातात प्याला सापडला तोही तुमचा गुलाम झाला आहे.” १७ पण तो म्हणाला: “असा विचारही मी करू शकत नाही! ज्याच्या हातात प्याला सापडला, तोच माझा गुलाम होईल.+ बाकीचे तुम्ही सर्व जण, शांतीने आपल्या वडिलांकडे परत जा.”

१८ तेव्हा यहूदा त्याच्या जवळ जाऊन म्हणाला: “माझ्या प्रभू, मी विनंती करतो. कृपा करून तुमच्या सेवकाला तुमच्यासमोर बोलू द्या आणि तुमच्या सेवकावर रागावू नका कारण तुम्ही तर फारोसारखेच आहात.+ १९ माझ्या प्रभूने आपल्या सेवकांना विचारलं होतं, ‘तुमचे वडील आहेत का आणि तुम्हाला एखादा भाऊ आहे का?’ २० तेव्हा आम्ही आमच्या प्रभूला म्हणालो होतो, की ‘आमचे वडील म्हातारे आहेत आणि त्यांच्या म्हातारपणी झालेला एक धाकटा भाऊ आम्हाला आहे.+ पण आता तो आपल्या आईचा एकुलता एक मुलगा आहे,+ कारण त्याचा भाऊ मरण पावला.+ म्हणून आमच्या वडिलांचं त्याच्यावर खूप प्रेम आहे.’ २१ तेव्हा तुम्ही आपल्या सेवकांना म्हणाला होता, ‘मला त्याला पाहायचं आहे, म्हणून त्याला इथे घेऊन या.’+ २२ पण आम्ही आमच्या प्रभूला म्हणालो होतो, ‘तो आपल्या वडिलांना सोडून इथे येऊ शकत नाही. तो त्यांना सोडून आला, तर ते जिवंत राहणार नाहीत.’+ २३ तेव्हा तुम्ही आपल्या सेवकांना म्हणाला होता, ‘जोपर्यंत तुम्ही आपल्या धाकट्या भावाला इथे आणत नाही, तोपर्यंत माझं तोंड पाहू नका.’+

२४ म्हणून आम्ही तुमचे सेवक, आमचे वडील यांच्याकडे गेलो आणि माझ्या प्रभूचे शब्द त्यांना सांगितले. २५ नंतर आमचे वडील म्हणाले, ‘परत जाऊन आपल्यासाठी थोडं धान्य विकत आणा.’+ २६ पण आम्ही म्हणालो, ‘आम्ही जाऊ शकत नाही. आमचा धाकटा भाऊ आमच्यासोबत आला तरच आम्ही जाऊ. कारण, जोपर्यंत आम्ही त्याला आपल्यासोबत नेत नाही, तोपर्यंत आम्ही त्या माणसाचं तोंड पाहू शकत नाही.’+ २७ तेव्हा तुमचे सेवक, आमचे वडील आम्हाला म्हणाले, ‘माझ्या बायकोकडून मला दोनच मुलं झाली,+ हे तुम्हाला चांगलं माहीत आहे. २८ पण त्यांच्यापैकी एक मला सोडून गेला आणि मी म्हणालो: “नक्कीच एखाद्या जंगली प्राण्याने त्याचे तुकडे केले असतील!”+ आणि मी आजपर्यंत त्याला पाहिलेलं नाही. २९ आता तुम्ही यालाही माझ्या डोळ्यांसमोरून दूर नेलं, आणि जर त्याचं काही बरंवाईट झालं, तर तुमच्यामुळे मला शोक करत कबरेत* जावं लागेल.’+

३० तुमचे सेवक, माझे वडील यांचा या मुलावर इतका जीव आहे, की जर मी आता त्यांच्याकडे या मुलाशिवाय गेलो, ३१ तर तो आमच्यासोबत नाही हे पाहताक्षणी ते प्राण सोडतील आणि तुमच्या या सेवकांमुळे खरोखर आमचे वडील शोक करत कबरेत* जातील. ३२ प्रभू, मी माझ्या वडिलांना या मुलाच्या सुरक्षेची खातरी दिली होती आणि म्हणालो होतो, की ‘जर मी त्याला तुमच्याकडे परत आणलं नाही, तर या पापाचा दोष कायमचा माझ्यावर राहील.’+ ३३ म्हणून, आता कृपा करून त्या मुलाच्या ऐवजी तुमच्या या सेवकाला गुलाम म्हणून इथे राहू द्या, म्हणजे त्याला त्याच्या भावांसोबत परत जाता येईल. ३४ या मुलाशिवाय मी आपल्या वडिलांकडे कसा परत जाऊ? माझ्या वडिलांवर हे संकट कोसळताना मी पाहू शकणार नाही!”

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा