स्तोत्र
दावीदचं गीत. संचालकासाठी सूचना. शमीनीथ* या सुरावर गायलं जावं.
१२ हे यहोवा, मला वाचव, कारण एकनिष्ठ माणसांपैकी एकही उरला नाही;
प्रामाणिक लोक नाहीसे झाले आहेत.
३ खोटी स्तुती करणारे ओठ;
आणि फुशारक्या मारणारी जीभ+ यहोवा कापून टाकेल.
४ ते म्हणतात: “आम्ही आमच्या जिभेने विजय मिळवू.
आम्ही आपल्या ओठांनी वाटेल ते बोलू;
आम्हाला हुकूम देणारा कोण?”+
त्यांना तुच्छ लेखणाऱ्यांपासून, मी त्यांचा बचाव करीन,” असं यहोवा म्हणतो.
७ हे यहोवा तू त्यांना सांभाळशील;+
या पिढीपासून सर्वकाळापर्यंत, तू त्यांच्यापैकी प्रत्येकाचं रक्षण करशील.
८ माणसं नीच कामांना प्रोत्साहन देतात,
त्यामुळे दुष्ट लोक बिनधास्त फिरत आहेत.+