स्तोत्र
३ जो प्रभूंचा प्रभू, त्याचे आभार माना,
कारण त्याचं एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ टिकून राहतं.
६ त्याने पृथ्वीला पाण्यावर पसरवलं,+
कारण त्याचं एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ टिकून राहतं.
७ त्याने मोठमोठ्या ज्योती निर्माण केल्या,+
कारण त्याचं एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ टिकून राहतं.
८ दिवसावर राज्य करण्यासाठी त्याने सूर्य घडवला,+
कारण त्याचं एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ टिकून राहतं.
९ रात्रीवर राज्य करण्यासाठी त्याने चंद्र आणि तारे घडवले,+
कारण त्याचं एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ टिकून राहतं.
१० त्याने इजिप्तच्या प्रथमपुत्राला ठार मारलं,+
कारण त्याचं एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ टिकून राहतं.
११ त्याने इस्राएलला इजिप्तमधून बाहेर आणलं,+
कारण त्याचं एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ टिकून राहतं.
१२ त्याने आपल्या महान सामर्थ्याने+ त्यांना बाहेर आणलं,
कारण त्याचं एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ टिकून राहतं.
१४ त्याने इस्राएलला त्यातून पलीकडे नेलं,+
कारण त्याचं एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ टिकून राहतं.
१५ त्याने फारोला आणि त्याच्या सैन्याला तांबड्या समुद्रात बुडवून टाकलं.+
कारण त्याचं एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ टिकून राहतं.
१६ त्याने ओसाड रानातून आपल्या लोकांना मार्ग दाखवला,+
कारण त्याचं एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ टिकून राहतं.
१७ त्याने मोठमोठ्या राजांना हरवलं,+
कारण त्याचं एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ टिकून राहतं.
१८ त्याने शक्तिशाली राजांना मारून टाकलं,
कारण त्याचं एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ टिकून राहतं.
१९ अमोरी लोकांचा राजा सीहोन,+ याला त्याने ठार मारलं,
कारण त्याचं एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ टिकून राहतं.
२० बाशानचा राजा ओग,+ याला त्याने मारून टाकलं,
कारण त्याचं एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ टिकून राहतं.
२१ त्यांचा देश त्याने आपल्या लोकांना वारसा म्हणून दिला,+
कारण त्याचं एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ टिकून राहतं.
२२ त्याने आपल्या सेवकाला, इस्राएलला तो दिला,
कारण त्याचं एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ टिकून राहतं.
२४ आपल्या शत्रूंपासून तो आपल्याला सोडवत राहिला,+
कारण त्याचं एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ टिकून राहतं.
२५ तो सर्व जिवांना अन्न देतो,+
कारण त्याचं एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ टिकून राहतं.
२६ स्वर्गातल्या देवाचे आभार माना,