स्तोत्र
१४८ याहची स्तुती करा!*
आकाशातून यहोवाची स्तुती करा!+
उंच आकाशात त्याची स्तुती करा!
२ त्याच्या स्वर्गदूतांनो, त्याची स्तुती करा!+
त्याच्या सैन्यांनो, त्याची स्तुती करा!+
३ सूर्याने आणि चंद्राने त्याची स्तुती करावी.
सर्व चमकणाऱ्या ताऱ्यांनो, त्याची स्तुती करा!+
५ त्या सर्वांनी यहोवाच्या नावाची स्तुती करावी
कारण त्याने आज्ञा दिली आणि ते निर्माण झाले.+
७ पृथ्वीवर यहोवाची स्तुती करा!
समुद्रात राहणाऱ्या महाकाय प्राण्यांनो आणि सर्व महासागरांनो,
८ विजांनो आणि गारांनो, हिम आणि घनदाट मेघांनो,
त्याच्या आज्ञेचं पालन करणाऱ्या वादळी वाऱ्यांनो,+
९ पर्वतांनो आणि सर्व टेकड्यांनो,+
फळं देणाऱ्या झाडांनो आणि सर्व देवदार वृक्षांनो,+
१० जंगली पशूंनो+ आणि पाळीव प्राण्यांनो,
जमिनीवर रांगणाऱ्या जिवांनो आणि आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांनो,
११ पृथ्वीवरच्या राजांनो आणि सर्व राष्ट्रांनो,
अधिकाऱ्यांनो आणि पृथ्वीवरच्या सर्व न्यायाधीशांनो,+
वृद्धांनो आणि लहान मुलांनो, तुम्ही सर्व त्याची स्तुती करा.
त्याचं वैभव पृथ्वी आणि आकाशाहून उंच आहे.+
१४ आपल्या सर्व एकनिष्ठ सेवकांची स्तुती व्हावी;
इस्राएलच्या मुलांची, त्याला प्रिय असलेल्या लोकांची स्तुती व्हावी,
म्हणून तो आपल्या लोकांचं सामर्थ्य वाढवेल.*
याहची स्तुती करा!*