स्तोत्र
आसाफचं+ गीत.
५० सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ देव यहोवा+ बोलला आहे;
तो पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत राहणाऱ्या
पृथ्वीच्या सर्व रहिवाशांना बोलावतो.
२ सौंदर्याने परिपूर्ण अशा सीयोनमधून+ देवाचं तेज चमकतं.
३ आपला देव येईल; तो शांत राहू शकत नाही.+
त्याच्यापुढे भस्म करणारा अग्नी आहे+
आणि त्याच्यासभोवती मोठं वादळ घोंघावतं.+
४ आपल्या लोकांचा न्याय करण्यासाठी+
तो उंच आकाशाला आणि पृथ्वीला बोलावून म्हणतो:+
६ आकाश देवाचं नीतिमत्त्व घोषित करतं,
कारण देव स्वतः न्याय करणारा आहे.+ (सेला )
७ “माझ्या लोकांनो, ऐका. मी तुमच्याशी बोलेन;
हे इस्राएल, मी तुझ्याविरुद्ध साक्ष देईन.+
मी देव, तुझा देव आहे.+
८ मी काही तुझ्या बलिदानांमुळे,
किंवा सतत माझ्यापुढे असलेल्या तुझ्या होमार्पणांमुळे तुला ताडन करत नाही.+
९ तुझ्या घरचा बैल घेण्याची,
किंवा तुझ्या मेंढवाड्यातले बकरे घेण्याची मला गरज नाही.+
१० कारण, रानातले सर्व जंगली पशू माझे आहेत;+
हजारो पर्वतांवरचे प्राणीही माझेच आहेत.
११ पर्वतांवरच्या प्रत्येक पक्ष्याबद्दल मला माहीत आहे;+
रानात राहणारे असंख्य प्राणी माझेच आहेत.
१२ मला भूक लागली, तर मी तुला थोडंच सांगेन?
कारण, उपजाऊ जमीन आणि तिच्यावर असलेलं सगळं काही माझं आहे.+
१३ मी बैलांचं मांस खाईन का?
मी बकऱ्यांचं रक्त पिईन का?+
१५ संकटाच्या काळात मला हाक मार.+
म्हणजे मी तुझी सुटका करीन आणि तू माझा गौरव करशील.”+
१६ पण देव दुष्टाला म्हणेल:
१९ तू आपल्या तोंडाने वाईट गोष्टी पसरवतोस,
तुझ्या जिभेवर सतत फसवणुकीच्या गोष्टी असतात.+
२१ तू या गोष्टी केल्या, तेव्हा मी गप्प राहिलो;
त्यामुळे तुला वाटलं, की मीही तुझ्यासारखाच आहे.
पण आता मी तुला ताडन करीन,
मी तुझ्याविरुद्ध माझा वाद मांडीन.+
२२ देवाला विसरणाऱ्यांनो, जरा या गोष्टीकडे लक्ष द्या;+
नाहीतर, मी तुमचे फाडून तुकडे करीन, तेव्हा तुम्हाला सोडवणारा कोणीही नसेल.