स्तोत्र
दावीदचं गीत. मस्कील.* संचालकासाठी सूचना. दावीद अहीमलेखच्या+ घरी आला आहे, हे जेव्हा अदोमी दवेगने शौलला सांगितलं, तेव्हा दावीदने हे गीत रचलं.
५२ हे बलवान माणसा, तू आपल्या दुष्ट कृत्यांबद्दल बढाई का मारतोस?+
देवाचं एकनिष्ठ प्रेम दिवसभर टिकून राहतं,+ हे तुला माहीत नाही का?
३ तुझं चांगल्यापेक्षा वाइटावर;
आणि योग्य ते बोलण्यापेक्षा खोटं बोलण्यावर, जास्त प्रेम आहे. (सेला )
४ तू आपल्या जिभेने किती खोटं बोलतोस!
दुसऱ्यांचं नुकसान करणारे शब्द तुला आवडतात.
५ म्हणूनच, देव तुला कायमचं खाली ओढेल;+
तो तुला धरून तुझ्या तंबूमधून खेचून काढेल;+
जिवंतांच्या देशातून तो तुला उपटून टाकेल.+ (सेला )
८ पण मी देवाच्या घरात असलेल्या हिरव्यागार जैतुनाच्या झाडासारखा होईन;
माझा भरवसा देवाच्या एकनिष्ठ प्रेमावर+ सदासर्वकाळ राहील.
९ तू केलेल्या कार्यांमुळे मी सतत
तुझ्या एकनिष्ठ सेवकांसमोर तुझी स्तुती करीन.+
तुझं नाव चांगलं आहे, म्हणून मी तुझ्या नावावर आशा ठेवीन.+