स्तोत्र
दावीदचं गीत. संचालकासाठी सूचना. गित्तीथ* याच्या चालीवर गायलं जावं.
८ हे यहोवा, आमच्या प्रभू, सबंध पृथ्वीवर तुझं नाव किती महान आहे!
तू आपलं वैभव आकाशापेक्षाही उंच केलं आहेस!*+
२ तुझा विरोध करणाऱ्यांमुळे,
तू लहान मुलांच्या आणि तान्ह्या बाळांच्या तोंडून+ सामर्थ्य प्रकट केलं आहेस.
तू शत्रूचा आणि सूड घेणाऱ्याचा आवाज बंद केला आहेस.
३ तू आपल्या हातांनी निर्माण केलेलं आकाश*
आणि तू घडवलेले चंद्र-तारे+ जेव्हा मी पाहतो,
तेव्हा माझ्या मनात विचार येतो,
४ नाशवंत माणूस काय आहे, की तू त्याला आठवणीत ठेवावं?
आणि मानव काय आहे, की तू त्याची काळजी घ्यावी?+
५ तू त्याला स्वर्गदूतांपेक्षा काहीसं कमी बनवलंस;
तू त्याला गौरवाचा आणि वैभवाचा मुकुट घातलास.
७ मेंढरांचे व गुरांचे कळप,
८ आकाशातले पक्षी व समुद्रातले मासे,
तसंच, समुद्रात फिरणारे सर्व जीव!
९ हे यहोवा, आमच्या प्रभू, सबंध पृथ्वीवर तुझं नाव किती महान आहे!