स्तोत्र
पृथ्वीवरच्या सर्व लोकांनो, यहोवासाठी गीत गा!+
२ यहोवासाठी गीत गा; त्याच्या नावाची स्तुती करा.
त्याच्याकडून मिळणाऱ्या तारणाबद्दलचा आनंदाचा संदेश दररोज घोषित करा.+
४ यहोवा महान आहे, तोच सर्वात जास्त स्तुतिपात्र आहे.
इतर सर्व देवांपेक्षा तोच जास्त विस्मयकारक आहे.
७ राष्ट्रा-राष्ट्रांतल्या कुटुंबांनो, यहोवाचा सन्मान करा!
यहोवाचा सन्मान करा, कारण तो गौरवशाली आणि सामर्थ्यशाली आहे!+
१० राष्ट्रांमध्ये ही घोषणा करा: “यहोवा राजा बनला आहे!+
पृथ्वी* कायमची स्थिर करण्यात आली आहे, ती हलवता येणार नाही.*
तो लोकांचा योग्य न्याय करेल.”*+
११ आकाश हर्ष करो, पृथ्वी आनंदित होवो;
समुद्र आणि त्यातलं सर्वकाही गर्जना करो;+
१२ कुरणं आणि त्यांतलं सर्वकाही आनंदित होवो.+
जंगलातली सर्व झाडंही जल्लोष करोत.+
१३ ती यहोवासमोर जल्लोष करोत, कारण तो येत आहे,*
तो पृथ्वीचा न्याय करायला येत आहे.