१० शलमोनची नीतिवचनं.+
बुद्धिमान मुलगा आपल्या वडिलांना खूश करतो,+
पण मूर्ख मुलगा आपल्या आईला दुःख देतो.
२ दुष्टपणाने मिळवलेल्या संपत्तीचा
काहीच उपयोग होणार नाही,
पण नीतिमत्त्वामुळे मृत्यूपासून सुटका होते.+
३ यहोवा नीतिमानाला अन्न देऊन तृप्त करेल,+
पण तो दुष्टाची इच्छा पूर्ण होऊ देणार नाही.
४ आळशी हातांमुळे गरिबी येते,+
पण मेहनती हातांमुळे संपत्ती मिळते.+
५ सखोल समज असलेला मुलगा उन्हाळ्यात पीक गोळा करतो,
पण निर्लज्जपणे वागणारा मुलगा कापणीच्या काळात गाढ झोपेत असतो.+
६ नीतिमानाला आशीर्वाद मिळतात,+
पण दुष्ट आपल्या मनातल्या हिंसक कल्पना लपवून ठेवतो.
७ नीतिमानाला लोक आठवणीत ठेवतील आणि आशीर्वाद देतील,+
पण दुष्टाचं नाव कुजून जाईल.+
८ जो बुद्धिमान मनाचा असतो तो सल्ला स्वीकारतो,+
पण मूर्खपणे बोलणाऱ्याला तुडवलं जाईल.+
९ खरेपणाने चालणारा सुरक्षितपणे चालेल,+
पण वाकड्या मार्गांनी चालणारा पकडला जाईल.+
१० कपटीपणे डोळे मिचकावणारा दुःख देतो+
आणि मूर्खपणे बोलणाऱ्याला तुडवलं जाईल.+
११ नीतिमानाचं तोंड म्हणजे जीवनाचा झरा,+
पण दुष्ट आपल्या मनातल्या हिंसक कल्पना लपवतो.+
१२ द्वेषामुळे भांडणांना तोंड फुटतं,
पण प्रेम सर्व अपराधांना झाकतं.+
१३ समंजस माणसाच्या ओठांवर बुद्धीच्या गोष्टी असतात,+
पण ज्याला समज नसते त्याच्या पाठीला काठीचा मार मिळतो.+
१४ जे बुद्धिमान असतात, ते ज्ञान साठवतात+
पण मूर्ख आपल्या तोंडाने नाश ओढवतो.+
१५ श्रीमंताची संपत्ती त्याच्यासाठी तटबंदी शहरासारखी असते.
पण गरिबाची गरिबी त्याचा नाश करते.+
१६ नीतिमानाची कामं जीवन देणारी असतात;
पण दुष्टाची मिळकत त्याला पाप करायला लावते.+
१७ जो शिक्षणाकडे लक्ष देतो तो इतरांना जीवनाचा मार्ग दाखवतो,
पण जो ताडनाकडे दुर्लक्ष करतो, तो इतरांना भरकटायला लावतो.
१८ जो आपला द्वेष लपवतो तो खोटं बोलतो+
आणि जो बदनामी करणाऱ्या गोष्टी पसरवतो, तो मूर्ख असतो.
१९ जितके जास्त शब्द, तितक्याच जास्त चुका,+
पण जिभेवर ताबा ठेवणारा शहाणपणाने वागतो.+
२० नीतिमानाची जीभ उत्कृष्ट चांदीसारखी असते,+
पण दुष्टाचं हृदय कवडीमोल असतं.
२१ नीतिमानाचे बोल बऱ्याच लोकांचं पोषण करतात,+
पण मूर्ख लोक समज नसल्यामुळे मरतात.+
२२ यहोवाच्या आशीर्वादानेच माणूस श्रीमंत होतो+
आणि तो त्यासोबत दुःख देत नाही.
२३ मूर्खाला लाजिरवाण्या गोष्टी करणं खेळ वाटतो,
पण समंजस माणसाकडे बुद्धी असते.+
२४ दुष्टाला ज्या संकटाची भीती वाटते तेच त्याच्यावर येईल;
पण नीतिमानाची इच्छा पूर्ण केली जाईल.+
२५ वादळ सरल्यावर, दुष्ट नाहीसा झालेला असेल,+
पण नीतिमान हा कायम टिकणारा पाया असतो.+
२६ शिरक्यामुळे दातांना आणि धुरामुळे डोळ्यांना,
तसा आळशी माणसामुळे त्याच्या मालकाला त्रास होतो.
२७ यहोवाची भीती बाळगल्यामुळे आयुष्य वाढतं,+
पण दुष्टाच्या आयुष्याची वर्षं कमी केली जातील.+
२८ नीतिमानाची आशा आनंददायक असते,+
पण दुष्टाची आशा धुळीला मिळेल.+
२९ यहोवाचा मार्ग निर्दोष माणसासाठी बुरुजासारखा असतो,+
पण तो मार्ग दुष्टांवर विनाश आणतो.+
३० नीतिमान कधीच डळमळणार नाही,+
पण दुष्ट पृथ्वीवरून नाहीसे होतील.+
३१ नीतिमानाच्या तोंडून बुद्धीच्या गोष्टी निघतात,
पण खोटं बोलणारी जीभ कापून टाकली जाईल.
३२ नीतिमानाच्या शब्दांमुळे त्याच्यावर कृपा होईल,
पण दुष्टाच्या तोंडून कपटीपणाच्या गोष्टी निघतात.