होशेय
त्याने आपल्याला जखमी केलं, पण तोच आपल्या जखमांना पट्टी बांधेल.
२ तो दोन दिवसांनी आपल्याला जिवंत करेल.
तिसऱ्या दिवशी तो आपल्याला उठवेल,
आणि आपण त्याच्यासमोर जिवंत राहू.
३ आपण यहोवाला जाणून घेऊ, आपण त्याला जाणून घेण्याचा मनापासून प्रयत्न करू.
पहाट उगवण्याइतकंच त्याचं येणं निश्चित आहे;
तो बरसणाऱ्या सरींसारखा आपल्याकडे येईल,
पृथ्वीला ओलंचिंब करणाऱ्या वसंतातल्या पावसासारखा तो येईल.”
४ “अरे एफ्राईम, मी तुझ्यासोबत काय करू?
अरे यहूदा, मी तुझं काय करू?
कारण तुझं प्रेम सकाळच्या मेघांसारखं आहे,
लगेच नाहीशा होणाऱ्या दवासारखं आहे.
५ म्हणून मी संदेष्ट्यांद्वारे त्यांना कापून टाकीन;+
माझ्या तोंडातून निघणाऱ्या शब्दांनी मी त्यांना ठार मारीन.+
तुमच्यावर येणारे न्यायदंड प्रकाशासारखे चमकतील.+
६ कारण मला बलिदानाने नाही, तर एकनिष्ठ प्रेमाने* आनंद होतो,
आणि होमार्पणांनी नाही, तर देवाच्या ज्ञानाने मला आनंद होतो.+
७ पण त्यांनी पापी मानवांप्रमाणे माझा करार मोडला आहे.+
त्यांनी तिथे माझ्याशी विश्वासघात केला आहे.
९ याजकांची टोळी एखाद्या माणसाला मारायला टपून बसलेल्या लुटारूंच्या टोळीसारखी आहे.
ते शखेमच्या+ रस्त्यावर खून करतात;
त्यांचं वागणं लाजिरवाणं आहे.
१० इस्राएलच्या घराण्यात मला एक किळसवाणी गोष्ट दिसली.
११ हे यहूदा, तुझ्यासाठी तर कापणीचा काळ ठरलेला आहे;
त्या वेळी मी माझ्या बंदिवान लोकांना गोळा करून परत आणीन.”+