२५ त्या वेळी येशू म्हणाला: “हे पित्या, आकाशाच्या आणि पृथ्वीच्या प्रभू, मी सर्वांसमोर तुझी स्तुती करतो. कारण तू या गोष्टी ज्ञानी आणि बुद्धिमान लोकांपासून लपवून, लहान मुलांना प्रकट केल्या आहेत.+
१६ तुम्ही स्वतःबद्दल जसा विचार करता, तसाच इतरांबद्दलही करा. मोठमोठ्या गोष्टींचा विचार करू नका,* तर हलक्या समजल्या जाणाऱ्या गोष्टी करायला तयार असा.+ स्वतःच्या नजरेत बुद्धिमान होऊ नका.+
२६ कारण बांधवांनो, तुम्ही स्वतःच्याच बाबतीत ही गोष्ट पाहू शकता, की जे माणसांच्या दृष्टीने* बुद्धिमान,+ शक्तिशाली आणि उच्च घराण्यातले आहेत,+ अशा पुष्कळांना देवाने बोलावलं नाही.