१९ मग मीखाया म्हणाला: “तर आता यहोवाचा संदेश काय आहे तो ऐक: मी पाहिलं, की यहोवा आपल्या राजासनावर बसलाय+ आणि त्याच्या उजवीकडे व डावीकडे स्वर्गातली सगळी सेना उभी आहे.+
१३ मग अचानक, त्या स्वर्गदूतासोबत स्वर्गातलं मोठं सैन्य दिसलं+ आणि ते देवाची स्तुती करत होते आणि म्हणत होते: १४ “स्वर्गातल्या देवाचा गौरव असो आणि पृथ्वीवर तो ज्यांच्याविषयी संतुष्ट* आहे त्या लोकांना शांती मिळो!”