वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • स्तोत्र ३८:४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    •  ४ कारण माझ्या अपराधांची रास माझ्या डोक्याच्याही वर गेली आहे.+

      त्यांचं भयानक ओझं आता मला सहन होत नाही.

  • स्तोत्र १०३:१४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १४ कारण आपली रचना कशी करण्यात आली, हे त्याला चांगलं माहीत आहे,+

      आपण फक्‍त माती आहोत, हे तो आठवणीत ठेवतो.+

  • स्तोत्र १४३:१, २
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १४३ हे यहोवा, माझी प्रार्थना ऐक;+

      माझ्या मदतीच्या याचनेकडे लक्ष दे.

      तुझ्या विश्‍वासूपणामुळे आणि नीतिमत्त्वामुळे मला उत्तर दे.

       २ तुझ्या या सेवकाला तुझ्या न्यायासनापुढे आणू नकोस,

      कारण कोणीही जिवंत माणूस तुझ्यासमोर नीतिमान ठरू शकत नाही.+

  • यशया ५५:७
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    •  ७ दुष्ट माणसाने आपला दुष्ट मार्ग सोडून द्यावा,+

      आणि वाईट माणसाने आपले वाईट विचार सोडून द्यावेत;

      त्याने यहोवाकडे परत यावं, म्हणजे तो त्याच्यावर दया करेल,+

      त्याने आमच्या देवाकडे परत यावं, कारण तो मोठ्या मनाने क्षमा करेल.+

  • दानीएल ९:१८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १८ हे माझ्या देवा, कान देऊन ऐक! आपले डोळे उघडून आमच्या दयनीय स्थितीकडे लक्ष दे. तुझ्या नावाने ओळखल्या जाणाऱ्‍या तुझ्या शहराकडे लक्ष दे. आम्ही नीतीची कामं केली आहेत म्हणून तुझ्याकडे विनंती करतोय असं नाही; तर तू खूप दयाळू आहेस+ म्हणून आम्ही तुझ्याकडे विनंती करतोय.

  • रोमकर ३:२०
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • २० म्हणून नियमशास्त्रातल्या कार्यांद्वारे कोणालाही देवासमोर नीतिमान ठरवलं जाणार नाही.+ कारण नियमशास्त्रामुळे आपल्याला खऱ्‍या अर्थाने पापाची जाणीव होते.+

  • तीत ३:५
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • ५ त्याने आपल्याला एक नवीन जीवन देणाऱ्‍या स्नानाद्वारे+ आणि पवित्र शक्‍तीने* एक नवीन व्यक्‍ती बनवून आपलं तारण केलं.+ हे आपण केलेल्या नीतिमान कार्यांमुळे नाही,+ तर फक्‍त त्याच्या दयेमुळे झालं.+

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा