-
प्रकटीकरण १५:३, ४पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
३ ते देवाचा सेवक मोशे+ याचं गीत आणि कोकऱ्याचं+ गीत गाऊन म्हणत होते:
“हे सर्वसमर्थ यहोवा* देवा,+ तुझी कार्यं महान आणि अद्भुत आहेत.+ हे अनंतकाळच्या राजा,+ तुझे मार्ग नीतीचे आणि सत्याचे आहेत.+ ४ हे यहोवा* तुझी भीती कोण बाळगणार नाही? तुझा गौरव कोण करणार नाही? कारण, फक्त तूच एकनिष्ठ आहेस.+ सर्व राष्ट्रं तुझ्यापुढे येऊन तुझी उपासना करतील.+ कारण तुझा न्याय नीतिमान असल्याचं प्रकट झालं आहे.”
-