११ हे यहोवा! महानता,+ सामर्थ्य,+ वैभव, ऐश्वर्य आणि सन्मान* हे सर्व तुझं आहे.+ कारण आकाशात आणि पृथ्वीवर असलेलं सगळं काही तुझंच आहे.+ हे यहोवा! राज्यही तुझंच आहे+ आणि तूच सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहेस.
१७ ते म्हणाले: “हे सर्वसमर्थ यहोवा* देवा, तू जो आहेस+ आणि जो होतास, त्या तुझे आम्ही आभार मानतो, कारण तू आपलं महान सामर्थ्य हाती घेतलं आहेस आणि राजा म्हणून राज्य करायला सुरुवात केली आहेस.+