३२ मग दावीद अबीगईलला म्हणाला: “ज्या इस्राएलच्या देवाने, यहोवाने आज तुला माझ्याकडे पाठवलंय, त्याचा गौरव होवो! ३३ तू दाखवलेल्या समंजसपणाबद्दल देव तुला आशीर्वादित करो! आज तू मला रक्तदोषी होण्यापासून आणि आपल्या हाताने बदला घेण्यापासून रोखलंस,+ म्हणून देव तुला आशीर्वाद देवो.