-
प्रकटीकरण २२:१, २पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
२२ मग, त्याने मला जीवनाच्या पाण्याची नदी दाखवली.+ ती स्फटिकासारखी नितळ असून देवाच्या आणि कोकऱ्याच्या+ राजासनातून वाहत होती. २ ती नगराच्या मुख्य रस्त्याच्या मधोमध वाहत होती. नदीच्या दोन्ही बाजूंना जीवनाची झाडं होती. ती वर्षातून १२ वेळा, म्हणजे दर महिन्याला फळ द्यायची. त्या झाडांची पानं राष्ट्रांच्या आरोग्यासाठी उपयोगी होती.+
-