-
यहेज्केल २५:१२, १३पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१२ सर्वोच्च प्रभू यहोवा असं म्हणतो: ‘अदोम हा यहूदाच्या घराण्याशी सूड घेण्याच्या हेतूने वागलाय आणि त्यांचा बदला घेऊन त्याने स्वतःवर मोठा दोष ओढवून घेतलाय.+ १३ म्हणून सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो: “मीसुद्धा अदोमवर आपला हात उगारीन आणि त्याच्यामधून माणसांचा आणि गुराढोरांचा नाश करीन. मी त्याला ओसाड करून टाकीन.+ तेमानपासून थेट ददानपर्यंत सगळे लोक तलवारीने मारले जातील.+
-
-
यहेज्केल ३५:१०, ११पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१० तू म्हणालास, ‘ही दोन्ही राष्ट्रं, हे दोन्ही देश माझे होतील, आणि मी त्यांच्यावर कब्जा करीन.’+ मी यहोवा स्वतः त्या राष्ट्रांसोबत असताना तू असं म्हणालास. ११ ‘म्हणून मी माझ्या जीवनाची शपथ घेऊन तुला सांगतो, तू जसा माझ्या लोकांचा द्वेष केलास, त्यांच्याशी रागाने वागलास आणि त्यांचा हेवा केलास, तसंच मीही तुझ्याशी वागीन,’ असं सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो.+ ‘मी तुला शिक्षा करीन, आणि मी कोण आहे हे त्यांना दाखवून देईन.
-