वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • यशया ५४:४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    •  ४ घाबरू नकोस,+ कारण तू लज्जित होणार नाहीस.+

      अपमानित झाल्यासारखं वाटून घेऊ नकोस, कारण तुझी निराशा होणार नाही.

      तरुणपणी झालेली तुझी बदनामी तू विसरून जाशील,

      आणि विधवा असल्यामुळे लागलेला कलंक तुला पुन्हा कधीही आठवणार नाही.”

  • यशया ६०:१४
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १४ ज्यांनी तुझ्यावर जुलूम केले त्यांची मुलं तुझ्यापुढे येऊन नमतील;

      तुझा अपमान करणारे सगळे तुझ्या पायांवर आपलं डोकं टेकवतील.

      ते तुला यहोवाची नगरी, इस्राएलच्या पवित्र देवाची सीयोन असं म्हणतील.+

  • मीखा ७:८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    •  ८ माझ्या शत्रूने* माझ्यावर आलेलं संकट पाहून खूश होऊ नये.

      कारण मी पडलो असलो, तरी पुन्हा उठीन;

      मी अंधारात राहत असलो, तरी यहोवा माझा प्रकाश होईल.

  • सफन्या २:८
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    •  ८ “मवाबने केलेली निंदा+ आणि अम्मोनी लोकांनी केलेला अपमान मी ऐकला आहे,+

      त्यांनी माझ्या लोकांना टोमणे मारले आणि त्यांचा देश बळकावण्याच्या धमक्या दिल्या.”+

  • सफन्या ३:१९
    पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
    • १९ पाहा! त्या वेळी मी तुझ्यावर अत्याचार करणाऱ्‍या सर्वांना शिक्षा देईन;+

      जे* लंगडत होते त्यांना मी वाचवीन,+

      ज्यांची पांगापांग झाली होती, त्यांना मी एकत्र करीन.+

      आणि ज्या देशात त्यांना लज्जित व्हावं लागलं होतं,

      त्या देशात मी त्यांना स्तुती आणि प्रतिष्ठा* मिळवून देईन.

मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२५)
लॉग आऊट
लॉग इन
  • मराठी
  • शेअर करा
  • पसंती
  • Copyright © 2025 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
  • वापरण्याच्या अटी
  • खासगी धोरण
  • प्रायव्हसी सेटिंग
  • JW.ORG
  • लॉग इन
शेअर करा