-
एज्रा ९:६पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
६ आणि म्हणालो: “हे माझ्या देवा, मला खरोखर लाज वाटते. तुझ्याकडे तोंड वर करून बघायचंही मला धैर्य होत नाही. हे माझ्या देवा, आमच्या पापांची आमच्या डोक्यांवर रास झाली आहे; आमचे अपराध आकाशापर्यंत पोहोचले आहेत.+
-
-
यिर्मया ३१:१८पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१८ “मी एफ्राईमचं कण्हणं ऐकलंय,
तो म्हणाला, ‘जू वाहण्यासाठी अजून तयार न झालेल्या वासरासारखा मी होतो,
पण तू मला सुधारलंस आणि मी सुधरलो.
हे यहोवा! तू माझा देव आहेस,
म्हणून मला आपल्याकडे वळव आणि मी लगेच वळीन.
-
-
यहेज्केल ६:९पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
९ आणि ज्या राष्ट्रांमध्ये या उरलेल्या लोकांना बंदी बनवून नेलं जाईल, तिथे ते माझी आठवण करतील.+ माझ्यापासून दूर गेलेल्या त्यांच्या विश्वासघातकी* मनामुळे, आणि घृणास्पद मूर्तींकडे वासनेने लागलेल्या त्यांच्या डोळ्यांमुळे+ माझ्या मनाला किती वेदना झाल्या असतील याची त्यांना जाणीव होईल.+ त्यांनी केलेल्या सगळ्या वाईट आणि घृणास्पद कामांची त्यांना स्वतःलाच लाज वाटेल; त्यांना त्यांचा तिरस्कार वाटेल.+
-