-
मार्क ७:८-१३पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
८ तुम्ही देवाची आज्ञा पाळायचं सोडून माणसांच्या परंपरांना धरून बसता.”+
९ तो त्यांना असंही म्हणाला: “तुमच्या परंपरांचं पालन करण्यासाठी तुम्ही देवाची आज्ञा चलाखीने टाळता.+ १० उदाहरणार्थ, मोशेने म्हटलं, ‘आपल्या वडिलांचा आणि आईचा आदर करा,’+ आणि ‘जो आपल्या वडिलांशी किंवा आईशी अपमानास्पद बोलतो* त्याला ठार मारलं जावं.’+ ११ पण तुम्ही म्हणता, ‘जर एखादा आपल्या वडिलांना किंवा आईला म्हणतो, की “तुम्हाला उपयोगी पडेल असं जे काही माझ्याकडे आहे ते कुर्बान आहे (म्हणजे देवाला अर्पण केलेलं आहे),” तर यात काहीच गैर नाही.’ १२ असं म्हणून तुम्ही त्याला त्याच्या वडिलांसाठी किंवा आईसाठी पुढे काहीच करू देत नाही.+ १३ आणि अशा रितीने तुम्ही वर्षानुवर्षं चालू ठेवलेल्या तुमच्या परंपरांमुळे देवाचं वचन तुच्छ लेखता.+ शिवाय, अशा आणखी कितीतरी गोष्टी तुम्ही करता.”+
-