-
१ शमुवेल १:१०, ११पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर
-
-
१० हन्नाचं मन अतिशय कटू झालं होतं. तिला दुःख अनावर होऊन ती तिथे घळाघळा रडू लागली आणि यहोवाला कळकळून प्रार्थना करू लागली.+ ११ तिने असा नवस केला: “हे सैन्यांच्या देवा यहोवा! पाहा मी किती दुःखी आहे. तू जर माझी आठवण ठेवलीस आणि तुझ्या या दासीला एक मुलगा दिलास,+ तर हे यहोवा, मी त्याला आयुष्यभर तुझी सेवा करायला देईन. त्याच्या डोक्याला कधीही वस्तरा लागणार नाही.”+
-