३० मग मनुष्याच्या मुलाचं चिन्ह आकाशात दिसेल आणि पृथ्वीवर सगळ्या वंशांचे लोक दुःखाने छाती बडवून घेतील.+ ते मनुष्याच्या मुलाला+ आकाशातल्या ढगांवर सामर्थ्याने आणि मोठ्या वैभवाने येताना पाहतील.+
७ पाहा! तो ढगांसोबत येत आहे+ आणि प्रत्येक डोळा त्याला पाहील आणि ज्यांनी त्याला भोसकलं तेही त्याला पाहतील. त्याच्यामुळे पृथ्वीवरचे सर्व वंश छाती बडवून शोक करतील.+ हो, आमेन.