४० कारण माझ्या पित्याची हीच इच्छा आहे, की जो मुलाला ओळखून त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सर्वकाळाचं जीवन मिळावं.+ शेवटच्या दिवशी मी त्याला पुन्हा जिवंत करीन.”*+
३१ पण जे लिहिलेले आहेत ते या उद्देशाने, की येशू हा ख्रिस्त आणि देवाचा मुलगा आहे असा तुम्ही विश्वास ठेवावा. आणि या विश्वासामुळे तुम्हाला त्याच्या नावाने जीवन मिळावं.+
१५ आणि बालपणापासून+ तुला पवित्र लिखाणांचं ज्ञान आहे,+ याचीही तुला जाणीव आहे. या गोष्टी, ख्रिस्त येशूवरच्या विश्वासाद्वारे तुला तारणासाठी सुज्ञ बनवू शकतात.+